कोरेगाव-भीमा द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय आंबेडकरीसाहित्य संमेलनउमरखेड, दि. २७ व २८ जानेवारी २०१८उद्घाटकीयभाषण - महात्मा जोतीबा फुले आणि राजर्षि शाहू महाराज,गाडगे महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यापुरोगामी विचारांनी ज्या भूमीची मशागत झाली. ज्या भूमीत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्या भूमीत आज आंबेडकरी विचारांना वाहिलेले साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला कोरेगाव-भीमा येथील लढ्याच्या द्विशतकपूर्तीचे निमित्त आहे, ही मोठी अभिमानाची बाब आहे. स्मृतीशेष खा. हरिहरराव सानुले नगरीत सत्यशोधक विचारांचे पाईक असणारे भाऊसाहेब माने यांचे नाव असणा-या विचारमंचावरुन मला या संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या संमेलनाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करते.संमेलनाध्यक्षमा. आनंद गायकवाड,मा. ना. राजकुमार बडोले , मा. महेंद्र भवरे, मा. डॉ. विजय माने, मा. हेमंतकुमार कांबळेतसेच माझे सहकारी संदीप बजोरिया, अॅड.आशिष देशमुख माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर आणि राज्याच्या विविध भागांतून आलेले प्रतिनिधी. मागील दोन महिन्यांपूर्वी मी यवतमाळ जिल्ह्यात पदयात्रेसाठी आले होते. येथील शेतकरी,कष्टकरी,स्त्रियां, मुली, दलित आणि आदिवासी समाजातील सर्व मंडळींना यावेळी भेटले. त्यांचे प्रश्न,त्यांची दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारपुढे त्याची गा-हाणी मांडून ती दूर करण्याच प्रयत्न मी करत आहे. पुढील काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मी जाणारचं आहे. त्यामुळे तुमच्या या निमंत्रणाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते . - कोरेगाव-भीमा सारख्या घटनांनी महाराष्ट्राच्या समाजमनावर जखम केली असताना समतेच्या विचारांचा पुरस्कार करणारे हे साहित्य संमेलन उमरखेड येथे होत आहे. प्रतिगामी शक्तीं एकीकडे प्रबळ होत आहेत की काय अशी भीती व्यक्त होतेय. दलित-सवर्णअसे वाद जाणीवपूर्वक पेटवून देण्याचे प्रयत्नकाहीमनुवादी मंडळी करत आहेत.अश्यावेळीसाहित्यिकांची भूमिका आणि त्यांच्या मानवतावादी लेखनाची यथार्थता अधिक ठळकपणे अधोरेखित होत असतानाच हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सनातनी विचारांना मोठी चपराक देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.प्रथमतः मी या संयोजन समितीच्या आयोजकांचे अभिनंदन करते, कारण या संयोजन समितीने या संमेलनात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारी सर्वच स्तरातील मंडळी जाणीवपूर्वक सहभागी झाली आहेत. हीआशादायक वसमाधानाची गोष्ट आहे. उपेक्षितसमाजाची अधोगती कशामुळे झाली याची समाजशास्त्रीय आणि त्याचबरोबर अर्थशास्त्रीय मांडणी करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. त्यांच्या पुढाकारातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण आणि नव्या विचारांचा प्रकाश नेण्याचे काम सत्यशोधक समाजाने केले. राजर्षि शाहू आणि डॉ. आंबेडकरांनी तो विचार मोठ्या कल्पकतेने पुढे नेला. समाजात नव्या विचारांची पेरणी केली. त्याचे मोठ्या डौलात आलेले पीक म्हणजे आजचे साहित्य संमेलन असे म्हणता येईल. - या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद होत आहेत, परंतु कार्यक्रम पत्रिकेतील एका परिसंवादाबाबत मला उत्सुकता वाटते. फुले-आंबेडकरांचा शेतीविषयक दृष्टीकोन असा या परिसंवादाचा विषय आहे. हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की, या दोन महान व्यक्तींचं या क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला कदाचित फारसं माहित नसावं. महात्मा फुले यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात मोलाचं काम केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे ते जनक आहेत. शेतकऱ्याचा आसूड या आपल्या क्रांतीकारक ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या परिणामकारकरित्या जनतेसमोर मांडले. समाजाच्या उत्थानासाठी शूद्र-अतिशूद्र, शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी जगला पाहिजे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी घटना लिहिली हे आपणा सर्वांनाच माहित आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्जा, खनिज आणि जलनियोजन या मंत्रीपदी असताना वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरले आहेत.दामोदर, हिराकुंड, सोन प्रकल्पांना चालना देण्याचं कार्य बाबासाहेबांनी केले.तसेचदेशातील कृषीक्षेत्राबाबत त्यांनी अनेक मोलाची टिपणे करुन ठेवली आहेत. त्यांनी त्याबाबत केलेल्या मौलिक सूचनांच्या आधारेच देशातील शेतकरी सक्षम होऊ शकला.त्याचबरोबर केंद्रामध्ये वीजपुरवठा विभाग स्थापन करून वीज, कोळसा, पेट्रोल, अल्कोहोल आणि पाणी या मुख्य स्त्रोतांचासर्व्हे करून निर्मिती क्षमता वाढविण्यावार त्यांनी भर दिलेला आढळून येतो. याची कृतज्ञतापुर्वक नोंद केली पाहिजे. - पुढील दोन दिवसांत या संमेलनात विविध विषयांवर उहापोह होणार आहे. विशेषतः आंबेडकरी विचारांच्या साहित्यविषयक चर्चांचा उपस्थितांना लाभ घेता येणार आहे. विचारांचे हे सोने लुटून प्रत्येकजण घरी जाईल, तेंव्हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रींसाठी लढण्याचे मोठे बळ अथवा उर्जा त्यांना मिळालेली असेल. या संमेलनाचे उद्घाटन करताना या व्यासपीठावरुन मी हीच उर्जा घेऊन पुढे जाणार आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या प्रतिगामी शक्तींना नेस्तानाबूत करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा हा जागर आपल्याला कायम ठेवावा लागणार आहेच. त्यासाठीच यासारख्या साहित्य संमेलनांची गरज आहे.या प्रसंगी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सटाणा येथील एक भाषण आठवत आहे. मनमाडहून चांदवड ला जाताना सटाणा येथे एका सभेला संबोधीत करताना ते असे म्हणाले होते की, देशात जर मनुच्या कायदयानुसार राज्य करणारे लोक पुन्हा...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारीराहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 25 May 2018 11:30 PMबारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली. सुप्रिया सुळेंना सायकल चालवताना पाहून उपस्थित विद्यार्थिनीही भारावल्या.बारामतीमध्ये काही स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन उपस्थित होत्या. दोघींच्या हस्ते हे सायकल वाटप करण्यात आलं.यावेळी सुप्रिया सुळे आणि स्काऊटेन यांना सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे दोघींनी काही अंतर सायकल चालवत पुढील कार्यक्रमात आगमन केलंhttp://abpmajha.abplive.in/maharashtra/supriya-sule-cycling-with-netherlands-political-leader-carolla-scouten-latest-update-544991
पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकरांवर सुप्रिया सुळेंचा निशाणामुंबई : राज्यातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही.खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी सध्या संपावर गेला आहे. या संपा संदर्भात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या या संपाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रसिध्दी माध्यमांकडे बोलताना म्हटले होते. त्यानंतर पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी पवार यांच्या भूमिकेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खा.सुळे टीका केली. राज्यातील शेतकरी संपावर असताना राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती पण तसे झाले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.http://www.mumbainagri.com/ncp-mp-supriya-sule-sharad-pawar-pash-patel-prakash-ambedkar-farmers-issue-9139/

