[TV9 Marathi]'तहसीलदारांनी सहीच केली नाही, मग व्यवहार कसा झाला?'-सुळेंचा सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहाराप्रकरणी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील साधारण 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना विकली आहे, असे म्हटले जात आहे. पार्थ पवार यांनी मात्र मी कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. अजित पवार यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विरोधक मात्र अजित पवार यांनी राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. असे असतानाचा आता अजित पवार यांची बहीण खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंका व्यक्त केली आहे.

