एमपीसी न्यूज - भाजपची सत्ता असतानाही शरद पवार यांच्यावर टीका करावी लागते यातच सरकारचे अपयश दिसून येते. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यावर टीका केली. केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविणारे पवार आता मात्र, शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देत आहेत. त्यांना आता अचानक शेतकऱ्यांविषयी कळवळा निर्माण झाला आहे, असे आरोप पाशा पटेल यांनी सोमवारी केले होते. त्याला सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिले. http://www.mpcnews.in/latest-news/item/20400-sharad-pawar-does-not-get-publicity-without-criticism-supriya-sule
सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांच्यावर साधला निशाणा लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 5, 2018 1:54 PM Without Allegations On Sharad Pawar They Does Not Get Publicity Says Supriya Sule महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ५० वर्षाच्या इतिहासात शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील शेतकरी १ जून पासून त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संपावर गेला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका मांडली. त्यावर पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांनी सडकून टीका केली. याच प्रश्नावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी संपावर गेले असताना सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे, सर्व परिस्थितीची जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे होताना दिसत नाही अशी खंत त्यानी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी अन्न वाया घालवू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. रवीना टंडनने शेतकऱ्यांची चेष्ठा केली –प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रवीना टंडन हिने शेतकऱ्यांबद्दल केलेल्या ट्विटविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या एखाद्या महिलेने गरीब शेतकयाविषयी असे विधान करून त्यांची चेष्ठा केली आहे. हे पाहून अत्यत वाईट वाटले असून सरकारची किती लांगूलचालन करायची हे रवीना टंडन यांच्या विधानातून दिसत आहे, अशा शब्दात रविना टंडन यांना सुप्रिया सुळे यांनी सुनावले. शिक्षणात तरी राजकारण आणू नका –शिक्षक उपोषणास बसणे ही दुर्दैवाची बाब असून त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत आहे. या शिक्षकांनी मुख्यमंत्र्याना देखील अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केला आहे. लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही आत्महत्या करण्याचा इशारा देणारे निवेदन देखील देण्यात आले आहे. हे निवेदन घेताना मुख्यमंत्री फोटो काढतात, यासारखी दुसरी वाईट गोष्टी नसल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणात तरी राजकारण आणू नका आणि शिक्षकाचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, अशी मागणी यावेळी केली. https://www.loksatta.com/maharashtra-news/without-allegations-on-sharad-pawar-they-does-not-get-publicity-says-supriya-sule-1691752/
Published On: Jun 05 2018 12:35PM | Last Updated: Jun 05 2018 12:35PM सरकारने शिक्षणात राजकारण करू नये पुणे : पुढारी ऑनलाईन गेल्या काही काळापासून शिक्षक आणि प्राध्यापक भरतीसाठी राज्यभर आंदोलने होत आहेत. परंतु, सरकारने अद्याप त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. सरकारने शिक्षणात राजकारण करू नये. प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्याबाबत सरकारने त्वरीत योग्य ती पाऊले उचलावीत. तसेच त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षण संचालक कार्यालयापुढे सोमवार (दि. ५) पासून सेट, नेट, पीएचडी पात्रताधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खासदार सुळे यांनी आज (दि.६) सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच याप्रकरणात आपण लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. पुण्यातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातही पात्रताधारक धरणे आंदोलनाला बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची मागणी निवदेन आणि आंदोलनाद्वारे सरकारदरबारी पोहचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरकारने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असे आंदोलक डॉ. किशोर खिलारे यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीत निर्णयआंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शिक्षण संचालक धनराज माने यांची सोमवारी आंदोलकांनी भेट घेतली. प्राध्यापक भरती बंदीबाबत आज मुंबईत सायंकाळी ५ वाजता शिक्षण आणि वित्त विभागाच्या सचिवांची बैठक होणार आहे. यावेळी याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले. http://www.pudhari.news/news/Pune/MP-supriya-sule-meets-SET-NET-Ph-D-qualified-protesters-in-pune/
Asking for sanitary pads you need an Akshay Kumar to talk about it. Purnima Sharma
May 30, 2018 बंद शाळेवर राजकीय ‘ट्युशन’ काय कामाचीविठ्ठल जाधव, पुणेराज्यातील तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतरचे आता दुसरे वर्ष सुरू होत आहे. एक कि. मी. परिक्षेत्रात दुसरी शाळा असणाऱ्या ५६८ शाळांची घंटा गतवर्षी बंद झाली. या शाळा बंद करताना त्याला समायोजन हा सरकारी शब्द देण्यात आला. उर्वरित ५४१ शाळेतील विद्यार्थ्यांची वाहन व्यवस्था केली, तरच त्या समायोजित होऊ शकतात, असे सांगून शासनाने त्याचा निर्णय तूर्त थांबविण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधी मंडळात सांगितले होते. प्रत्यक्षात १ कि. मी. अंतरापुढील शाळादेखील बंद केल्या गेल्या; परंतु त्या मुलांची पर्यायी व्यवस्था केली गेली नाही अथवा शासनाकडून वाहन व्यवस्थेचा कोणाताही निर्णय न झाल्याने दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील बंद शाळांमधील विद्यार्थ्यांचे काय झाले? याचा शोध घेण्याची गरज असताना सध्या राज्यात बंद शाळा आणि राजकीयवरच ‘ट्युशन’ चर्चा रंगत आहे.एक किलो मीटरपेक्षा जादा अंतरातील शाळा बंद केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला; तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुळे खोटं बोलत आहेत. त्यांच्या अपचारामुळे बहुजन समाजातील मुले वंचित राहतील. त्यांचा डाव सरकार हाणून पाडील, असे वक्तव्य करून तावडे यांनी खरे तर मूळ विषयाला बगल दिली. या निर्णयातील एक वर्षानंतर समोर आलेले चित्र बघता एक कि. मी. परिक्षेत्रात शाळा नसताना दीड ते दोन कि.मी. अंतरावरील शाळाही बंद केल्याचे समोर आले आहे. याबद्दल खरेतर तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडायला हवी; परंतु विषयांतर करून उत्तर देण्यात पटाईत असणाऱ्या तावडे यांनी राजकीय वळण दिले. त्यावर खासदार सुळे यांनी त्यांचे म्हणणे मांडताना सोबत माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांना आणले होते. बोलण्याच्या ओघात सुळे यांनी काळपांडेकडे ‘ट्युशन’ लावावी असा टोला लगावला. त्याला मात्र, तावडे यांनी अवघ्या तासाभरात उत्तर देत मला बारामतीच्या ट्युशनची गरज नाही. तेथे धरणातल्या भ्रष्टाचाराने पाणी कसे आणायचे हे शिकवले जाते, अशी प्रतिक्रिया दिली. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला; तेव्हा तावडे यांनी मी शिक्षकमंत्री नाही, तर शिक्षणमंत्री आहे असे सांगून मूळ विषय टाळला होता.शाळा बंद करण्याच्या धोरणाबद्दल मंत्री आणि सचिव या दोन्ही पातळीवर एक वाक्यता नसल्याने काही निर्णय चांगले असले, तरी ते वादाचे ठरतात. राज्यातील ८० हजार शाळा टप्प्याटप्प्याने बंद करणार असे सचिव नंदकुमार म्हणाले, नंतर त्यांनी माघार घेतली. शाळा बंद निर्णय असो की शिक्षकांच्या बदलांचे धोरण. याबद्दल शिक्षक किंवा कोणी व्यक्तीने प्रतिक्रिया दिली, तर ती सहन होत नसल्याचे दिसते. शिक्षकांना तर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास प्रतिबंध घातला गेला. तिखट प्रतिक्रिया देणारे २० ते २५ शिक्षक निलंबित झाले. ४० पेक्षा अधिक शिक्षकांना शोकॉज नोटीस देण्यात आल्या म्हणजे सरकारचे निर्णय लादले जातात. दुसरी बाजू ऐकूनच घेतली जात नाही. मंत्री आणि सचिवांचे हे धोरण असेल, तर खालची शिक्षण खात्याची यंत्रणा कशी असेल याचा फक्त विचारच केलेला बरा.राज्य सरकारच्या निर्णयानंतर १ कि. मी. पुढील शाळा बंद केल्या गेल्या ही वस्तुस्थिती आहे. निर्णयात नेमकी स्पष्टता नसल्याने यंत्रणेतही गोंधळ उडाला आहे. शिक्षण हक्क कायदा तथा आरटीईनुसार विद्यार्थ्यांचे घर ते शाळा हे अंतर मोजण्यात येते प्रत्यक्षात शाळा बंद करताना शाळा ते दुसरी शाळा हे अंतर मोजले गेले. यामध्ये आरटीईचा भंग झाला नाही का? शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यात ज्या शाळांना ‘अ’ दर्जा दिला. त्यातील ८ शाळा या नियमाने बंद झाल्या. याचा अर्थ निर्णयात त्रुटी आहेत. या निर्णयात सकारात्मक गोष्टीदेखील आहेत.८ ते १० मुलांची शाळा आणि ही मुले १०० ते १२५ विद्यार्थ्यांच्या शाळेत येऊन शिकणे यामध्ये फरक आहे. मोठ्या शाळेत त्यांना पायाभूत शैक्षणिक सुविधा, खेळ आणि शैक्षणिक वातावरण मिळणार. सहशिक्षणाचा फायदा होणार आहे; परंतु दुर्गम किंवा वाडी-वस्तीवरील या मुलांना मोठ्या शाळेत जाण्याची सोय न करता अथवा जबाबदारी न घेता शाळा बंद करून त्यांचे समायोजन होत असेल, तर सरकारला त्यात नेमके कोणते हशील आहेत, अशा वेळी सरकारकडून नेमकी स्पष्टता हवी. निर्णय घेतला म्हणून ते राबवायचा किंवा लादायचा हे धोरण ठेवणे गैर आहे.सरकारी किंवा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या तथा पटाची घसरण थांबवून आता विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. सेमी इंग्रजी, ई-लर्निंगसारखे शिक्षण जि. प. शाळांमधूनही मिळू लागले परिणामी खासगी इंग्रजी शाळा त्यांचा खर्च आणि फी परवडत नसल्याने आणि त्याच दर्जाचे शिक्षण सरकारी शाळांमध्ये मिळण्याचा भरोसा पालकांमध्ये येऊ लागल्याने सरकारी शाळांकडे ओढा वाढतो आहे, अशा वेळी शिक्षणाचा दर्जा आणि सरकारी शाळांची बदनामी तरी होणार नाही याची खबरदारी नियंत्रण करणाऱ्या यंत्रणांनी घ्यायला हवी. बंद शाळांच्या निर्णयावर होणारी टोलेबाजी गांभीर्य घालवणारी आहे.http://www.saamana.com/decision-to-close-the-thirteenth-school-in-the-state/
https://www.youtube.com/watch?v=01U5-7tiIzM&feature=youtu.be
PTI03H 08M AGONationalist Congress Party MP Supriya Sule, on 28 May, accused the BJP-led Maharashtra government of trying to "promote" its "ideology" through education by using images of Prime Minister Narendra Modi on books recommended for supplementary reading in schools.Waving a book titled 'Chacha Chaudhary and Narendra Modi' at a press conference, Sule said, “I am happy that through these books the message of cleanliness is given to the students, however, what was the need to use PM Modi's large pictures on these books?”Sule said photos of Sant Gadgebaba, a 19th century mendicant-saint and social reformer from Maharashtra, or Mahatma Gandhi, who spread the message about cleanliness, should have been used on these books instead of those of Modi.The Maharashtra government had reportedly taken a decision to buy books worth Rs 59.42 lakh under the Sarva Shiksha Abhiyan (SSA) as a supplementary reading material for students which include the books on Chacha Choudhary and Modi series that can be read by the students in leisure time.“It is unfortunate that the government is trying to promote itself using education as a mean. Education should not be used for political gains but the government is doing it by bringing marketing into the education,” she said.Sule, daughter of NCP chief Sharad Pawar, said no political party had tried to promote its ideology through education in the past, "but this government is doing this which is unfortunate".The Baramati MP also sought clarification from state Education Minister Vinod Tawde over the government's decision to close down 1,300 schools run by Zilla Parishads across the state.After I spoke about the state government’s decision to close 1300 schools in the state, Tawdeji said I and Sharad Pawar were lying. But today, I have all the data with me and on the basis of the data and the media reports, I would like to seek clarification from the state government on what basis they are closing down or merging the schools in the stateSupriya SuleIn most of the villages where the decision to merge or close down the schools is taken the local residents are opposing it, she said. "I am not saying this. It is the school-wise report (sought from respective Zilla Parishads) which shows that in majority areas people are opposing it," she added.Tawde had said that a “false propaganda” was created over the closure of 1,300 schools which had recorded low enrollment.A few months ago, the government decided to close down over 1,300 schools on account of low number of students and poor education standards. The move drew criticism from various quarters.https://www.thequint.com/news/india/narendra-modi-in-chacha-chaudhury-books-maharashtra
सरकारनामा ब्युरो : बुधवार, 30 मे 2018नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उद्या (ता. 31 ) जामखेड तालुक्यातील चौंडी येथे सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याने सुळे भाजपविरोधात काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाची तयारी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केली आहे. सुळे सकाळी चौंडी येथे होळकर यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करतील. नंतर जामखेड येथे हत्या झालेल्या योगेश व राकेश राळेभात यांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन करणार आहेत. http://www.sarkarnama.in/supriya-sule-chondi-tour-ahilyadevi-jayanti-24375
Supriya Sule had brought copies of a book titled Chacha Choudhary and Narendra Modi — which costs Rs 35, and published by Diamond Books — which have been purchased by the state government as supplementary material for students in Classes I to V in state-run schools. Express News Service | Pune | Published: May 29, 2018 Attacking the Narendra Modi government at the Centre, NCP leader Supriya Sule Monday said the government was using education as a “tool for marketing”. “Education is a serious subject. To use it as a tool for marketing is shameful,” said Sule, who was addressing a press conference here. Sule had brought copies of a book titled Chacha Choudhary and Narendra Modi — which costs Rs 35, and published by Diamond Books — which have been purchased by the state government as supplementary material for students in Classes I to V in state-run schools. Thousands of copies of the books on PM Modi have been bought by the state government and distributed to schools. “The book has a message of cleanliness, which is great. But if they wanted to use icons for the message of cleanliness, then why not use Sant Gadge Maharaj? Does the present government feel that Mr Modi is the only person fit to speak about it? Unfortunately, the present government is using education, which is an extremely important and sensitive subject, for political advertising. In so many years, we have never done that as we feel at least education should not be touched,” said Sule. Sule further said that she had only recently got her hands on the book and was made aware that it was being circulated in schools. She said that she would consider if any legal or other routes could be taken to stop this practice. http://indianexpress.com/article/india/modi-govt-using-education-as-marketing-tool-ncp-leader-supriya-sule-5195322/
By Agencies | May 29, 2018 SUPRIYA SULE TARGETS STATE OVER ‘CHACHA CHAUDHARY & NARENDRA MODI’ BOOKS Pune: NCP MP Supriya Sule on Monday accused the BJP-led Maharashtra government of trying to “promote” its “ideology” through education by using Prime Minister Narendra Modi’s pictures on books being recommended for supplementary reading in schools. Waving a book titled ‘Chacha Chaudhary and Narendra Modi’ at a press conference, Sule said, “I am happy that through these books (Chacha Chowdhary and Modi) the message of cleanliness is given to the students, however, what was the need to use PM Modi’s large pictures on these books?” Sule said photos of Sant Gadgebaba–a 19th century mendicant-saint and social reformer from Maharashtra–or Mahatma Gandhi who spread the message about cleanliness, should have been used on these books instead of those of Modi. The Maharashtra government had reportedly taken a decision to buy books worth Rs 59.42 lakh under the Sarva Shiksha Abhiyan (SSA) as a supplementary reading material for students which include the books on Chacha Choudhary and Modi series that can be read by the students in leisure time. “It is unfortunate that the government is trying to promote itself using education as a mean. Education should not be used for political gains but the government is doing it by bringing marketing into the education,” she said. Sule, daughter of NCP chief Sharad Pawar, said no political party had tried to promote its ideology through education in the past, “but this government is doing this which is unfortunate”. The Baramati MP also sought clarification from state Education Minister Vinod Tawde over the government’s decision to close down 1300 schools run by Zilla Parishads across the state http://www.freepressjournal.in/mumbai/supriya-sule-targets-state-over-chacha-chaudhary-narendra-modi-books/1285869
Maharashtra Times | May 29, 2018, IST books on GST, Ujjwala Yojana for primary students, criticised PUNE: A set of books issued by the Central government to primary school students for extra-academic reading glorifying the image of Prime Minister Narendra Modi and his government's achievements has resulted in creating a controversy. Among the set is a book titled "Chacha Choudhari and Narendra Modi". The book has been prescribed for the primary school and highlights various government schemes implemented by the NDA government. The book talks about GST, Ujjwala Yojana, Digital India and several other schemes in a format which can be easily The book is part of 69 books which have been issued by the Ministry of Human Resource and Development under 'Sarva Shiksha Abhiyan'. Several government officers and political leaders have condemned this move of the government. “Instead of Modi, the government should issue biographies of great men like Saint Gadgebaba,” NCP MP Supriya Sule criticised the introduction of the books in a press conference on Monday. https://timesofindia.indiatimes.com/city/pune/central-govt-introduces-books-on-gst-ujjwala-yojana-for-primary-students-criticised/articleshow/64371429.cms
The government had decided to shutdown around 1,300 schools a few months ago, citing reduced enrolment and poor education standards. Updated: May 29, 2018 14:51 ISTAnanya Barua : Hindusta Times, Pune[caption id="attachment_1308" align="alignnone" width="300"] Hindusta Times, PuneCalling for a proper report to be produced on the issue of shutting down of more than1,300 Zilla Parishad-run schools in the state,Lok Sabha MP from Baramati, Supriya Sule, on Monday, questionedstate education minister Vinod Tawde’s recent comment of “false propaganda”.She stated that the party would continue to protest against such decisions of the state government that can threaten the future of hundreds of students.As opposed as we are to minister Tawde’s comment, we have never politicised education, but question the decision that can put lives of hundreds of children at stake. These false claims only exhibit the failure of the government to produce concrete evidence to justify the shutdown,” said Sule.Soon after Sule's press conference, Tawde reacted by issuing a media statement stating,"In the tuition of Baramati, ‘dada’ and ‘tai’ teach how to draw water through corruption in dam construction.I do not need a Pawar school. For me, SSC board is enough. This board teaches honesty."NCP leaders like Sharad Pawar, Ajit Pawar and Supriya Sule have criticised the decision to shut these schools, citing that the move will deny education tostudents from disadvantaged sections of society. This was after the government had decided to shutdown these schools a few months ago, citing reduced enrolment and poor education standards.Sule, during the press conference in Pune, said that under the RTE Act, the government is required to seek approval of the villagers before shutting down schools and that the newly merged schools need to be within one-to-three km distance of homes, both which were violated by the government.According to the Act, schools need to be a one km walking distance from the habitation of a child at the primary level (Class 1 to 5) and within a three km walking distance for upper primary level (class 6 to 8).https://www.hindustantimes.com/pune-news/zp-school-shutdown-sule-says-lives-of-underprivileged-children-at-stake-tawde-s-throws-ssc-curveball/story-8Qv4bAIPOwXclBTYBt0ZKL.html
TIMES NEWS NETWORK TIMES NEWS NETWORKPune:Baramati MP Supriya Sule on Monday said the NCP would intensify its protest against the state government’s “arbitrary decision” of closing down Zilla Parishad schools, which have fewer students, in remote areas. “The government has arrived at a figure that in the first phase, 1,300 schools must be closed. We have been asking how has it arrived at the figure? Whose report was it and who were the people involved? Instead of replying to relevant questions, education minister Vinod Tawde is calling us names. We have facts and figures which prove that some schools were closed despite there being no another school within a distance of 1km,” said Sule while addressing a news conference here. In the Budget session of the legislature, Tawde had said 5,600 schools have less than 10 students. In 1,312 cases, there are other schools within a distance of 1km . Out of this, 568 schools have been merged, transport facility has been provided for students in 541 schools. In 383 schools, the headmaster and extension officer haven’t raised any issues regarding closure. Sule also mentioned about the ‘Long Road to Education’ series in TOIwhich highlighted the problems the students would face if the schools are closed. Sule also gave examples of schools under Pune district that were closed despite the nearest school being more than 2km away. “Schools in Pawarvasti (Indapur), Bagalphata, Velhavale(Khed), Shastabad (Shirur) and Bhillavasti were closed down or merged but the nearest schools in these villages are 2km, 2.5km, 2.8km, 1.7km and 1.9 km, respectively, away. Does the government expect students to walk for almost 6km to school?” Sule asked. Reacting to Sule’s comments, Tawde, via social media, said, “In Baramati’s tuitions, ‘dada’ and ‘tai’ teach how to get water from illegal dams. I don’t want Pawar school, our SSC board is good. We teach being true and genuine.”
May 29, 2018 सामना प्रतिनिधी । पुणे शिक्षण खात्यात विनोदी कारभार राज्यात तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे चुकीचे राजकीय वक्तव्य करीत असून, त्यांच्या अपप्रचारामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आरोपाला खासदार सुळे यांनी बंद पडलेल्या शाळांची यादी दाखवून प्रत्युत्तर दिले. तावडेंचा आरोप म्हणजे स्वत:चे अपयश लपविण्यासाठी केलेली केवलवाणी धडपड आहे. गेली तीन-चार वर्षे शिक्षण खात्यात ‘विनोदी’ कारभार सुरू असून, त्याला आवर घालण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिक्षणमंत्री तावडे यांनी ‘शाळा बंद’ निर्णयाच्या संदर्भात पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कोल्हापुरात पवार आणि सुळे यांच्यावर आरोप केले होते. त्याला सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तर दिले. पुणे जिल्ह्यातील तीन कि. मी. अंतराच्या आतील बारामतीमधील गारमाळ ही दीड कि. मी. आणि शिरूरमधील २.९ कि. मी. अंतर असणारी भिलवस्ती या शाळा बंद केल्या. जिल्ह्यात १९ शाळा बंद झाल्या. असे असताना आम्ही खोटं बोलतो, असा आरोप तावडे करतात कसा? असा सवाल सुळे यांनी केला. यावेळी माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे, जि. प. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, वैशाली नागवडे हे उपस्थित होते. बंद शाळेतील मुलांची कोणतीही व्यवस्था सरकारने केली नाही. असे असताना आमच्यावर खोटे आरोप शिक्षणमंत्र्यांनी करावेत, हे दुर्दैव आहे. सर्वेक्षण बंद, मग ३ रा क्रमांक कसा?राज्याचा शिक्षणाचा दर्जा १६व्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तो कोणत्या निकषाच्या आधारे केला? असा सवाल खासदार सुळे यांनी केला. ‘प्रथम’ने रँकिंग बंद केले आहे. ‘असर’चा अहवालही पाच वर्षांत आला नाही, मग मुख्यमंत्री कशाच्या आधारे दर्जा आणि क्रमांक ठरवत आहेत, ते जाहीर करावे. मला बारामतीची ट्युशन नको – तावडेशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसला ट्युशनची गरज आहे. शाळा बंद धोरणावर त्यांनी माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावावी, अशी खोचक टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना तावडे म्हणाले, बारामतीच्या ट्युशनमध्ये धरणातल्या भ्रष्टाचाराने पाणी कसे आणायचे ते दादा आणि ताई शिकवतात. मला पवार स्कूल नको. एसएससी बोर्ड चांगले आहे. त्यामध्ये प्रामाणिकपणा शिकवितात, असे सांगितले. http://www.saamana.com/supriya-sules-remarks-on-vinod-tawde-and-education-department/
सकाळ वृत्तसेवा : 03.23 AM Supriya Sule Challange To Vinod Tawdeपुणे - ""शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. आम्ही काय खोटे बोललो, हे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट करावे,'' असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले.सरकारच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. शाळा बंद करण्याचा निर्णय घेताना सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही पर्यायांचा विचार केलेला नाही. शाळांचे समायोजन करताना शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.शिरूर तालुक्यामधील भिल्लवस्तीतील शाळा बंद करून तेथील मुलांचे शिंदोडीतील शाळेत समायोजन केले आहे. मात्र, मुलांना शाळेत जाण्यासाठी एक-दीड किलोमीटर नव्हे, तर तब्बल तीन किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. बारामतीमधील गारमळा येथील विद्यार्थ्यांचीही पायपीट वाढणार आहे. अशाच प्रकारे राज्यातील असंख्य शाळा ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांचा विरोध असतानाही बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु, त्यातून विद्यार्थ्यांची होणारी फरफट दुर्लक्षित राहिली आहे. याचा विचार सरकारने "पालक' म्हणून केलाय का?, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.शाळा : समायोजन झालेली शाळा : अंतर (किलोमीटरमध्ये)पवारवस्ती (ता. इंदापूर) : वायसेवाडी : 02बागलफाटा : बावडा : 2.5वेलहावळे (ता. खेड) : काळोखेवस्ती : 1.8शास्ताबाद (ता. शिरूर) : उकीरडेवस्ती : 1.7भिल्लवस्ती : शिंदोडी : 2.9 खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, - शिक्षणात आम्ही राजकारण कधी आणले नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावेत.- शिक्षणात महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर कसा, हे स्पष्ट करा.- शाळा कोणत्या निकषांच्या आधारावर बंद करण्यात येत आहेत, हे सरकारने सांगावे.- शाळा समायोजन करताना, मुलांच्या प्रवासावर खर्च करण्याची तयारी सरकारने दाखवावी.- शिक्षणमंत्र्यांना ट्यूशनची गरज.पुणे जिल्हा परिषदेतील 76 शाळांचे समायोजन करण्यात यावे, असे सरकारने सुचविले आहे. त्यातील 19 शाळा बंद झाल्या आहेत. उर्वरित 57 शाळा बंद करण्याला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीने विरोध दर्शविला आहे.- विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
Maharashtra Times | Updated: May 29, 2018, 03:26AM ISTम. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यार्थ्यांना 'चाचा चौधरी आणि मोदी'चे धडे बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून भारतीय जनता पक्षाचा राजकीय संदेश दिल्यानंतर आता सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या प्राथामिक विभागाच्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी चक्क 'चाचा चौधरी आणि मोदी' असे पुस्तक देण्यात आले आहेत. या पुस्तकातून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकात मोदींचे गुणगान करण्यात आले आहे. दरम्यान, मोदींऐवजी संत गाडगे बाबा यांच्यासारख्या थोरपुरुषांचे महत्त्व सांगितले असते, तर बरे झाले असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगाविला. सुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हे पुस्तक दाखविले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी जिल्हा परिषदेच्या पुस्तकांचा सेट नुकताच मिळाला असून ती पुस्तके येत्या काळात विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी ६९ विषयांवर पुस्तके शाळांना पाठविण्यात आली आहेत. त्यापैकी 'चाचा चौधरी आणि मोदी' हे एक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर मोदींचे मोठे छायाचित्र असून पुस्तकांमध्ये मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती एकप्रकारे जाहिरातींद्वारे सांगण्यात आली आहे. तसेच, या योजना रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये उघड्यावर शौच करू नये, परिसर स्वच्छ ठेवा, घरात शौचालये बनवा, स्वच्छता अभियान अशांची माहिती सांगितली आहे. या पुस्तकामध्ये चाचा चौधरींचे छायाचित्र लहान, तर मोदींचे छायाचित्र मोठे छापले असून विद्यार्थ्यांचे लक्ष छापील मजकूरांपेक्षा मोदींवर कसे जाईल, याची पुरेपुर काळजी घेतल्याचे ठळकपणे दिसून येते. या पुस्तकात प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर पोहोचविण्याची उज्ज्वला योजना, मुलींच्या शिक्षणासाठी मुली वाचवा, मुली शिकवा, नोटबंदीद्वारे काळा पैसा आणि गुन्हेगारी घडामोडींवर प्रतिबंध, डिजिटल इंडिया, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अशा योजनांची माहिती दिली आहे. दरम्यान, या पुस्तकांद्वारे केंद्र सरकार आपल्या योजनांचे मार्केटिंग करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/chacha-chaudhary-books-for-student/articleshow/64359561.cms
प्रतिनिधी | May 29, 2018, 03:08 AM IST MP Supriya Sule Criticized Education Minister Tawdeपुणे - गुणवत्ता आणि दर्जा यांचे खालावलेले स्वरूप आणि कमी पटसंख्येची कारणे देत राज्याचे शिक्षणमंत्री विनाेद तावडे ‘शाळाबंदीचा डाव’ रचत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. शाळा समायोजित करण्याचे कारण दाखवून सरकार राज्यभरातील शाळा बंद करण्याचा डाव रचत आहे. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांचे उघड नुकसान असून, शिक्षणहक्क कायद्यााचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. शिक्षण खात्यात असे अनेक ‘विचित्र विनोद’ सुरू आहेत, असेही सुळे उपरोधिकपणे म्हणाल्या.शाळा बंद धोरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला होता. सुळे म्हणाला, पुणे जिल्हा परिषदेच्या वित्त आणि शिक्षण सभापती विवेक वळसे, बालभारतीचे माजी संचालक डॉ. वसंत काळपांडे या वेळी उपस्थित होते. राज्यातील ५६०० शाळांत १० पटसंख्या आहे, त्यातील १३१२ शाळांच्या १ किमी परिघात दुसरी शाळा आहे, त्यापैकी ५६८ शाळा समायोजित केल्या, ५४१ शाळांसाठी वाहनव्यवस्था केली, तरच त्या समायोजित होऊ शकतात म्हणून अद्याप त्यांचे समायोजन केलेले नाही, ३८३ शाळांतील मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली होती. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.समायोजित झालेल्या शाळांची संख्या ४३० आहे. काही शाळांचे समायोजन १ किमीपेक्षा दूर असलेल्या शाळांत करण्यात आले. शिक्षणहक्क कायद्यानुसार विद्यार्थ्याचे घर ते शाळा असे अंतर मोजण्यात येते. मात्र, समायोजनामध्ये दोन शाळांतील अंतर मोजण्यात आले आहे. शाळांच्या समायोजनामध्ये पटसंख्या, समायोजन आणि गुणवत्ता यांचे नेमके काय निकष लावण्यात आले, याविषयी संदिग्धता आहे. हे निकष स्पष्ट करावेत, अशी मागणी सुळे यांनी केली.https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-IFTM-mp-supriya-sule-criticized-education-minister-tawde-5882739-NOR.html
प्रभात वृत्तसेवा - May 29, 2018 | 2:40 pm शाळा बंद निर्णयाचा समाचारसुप्रिया सुळे : शाळा बंदचा निर्णयाचा घेतला समाचारपुणे – शाळा बंद धोरणाबाबत शरद पवार व सुप्रिया सुळे हे धादांत खोटे बोलत आहे, या विनोद तावडे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देत मी कधी व कुठे खोटे बोलले हे त्यांनी दाखवून द्यावे असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी तावडेंच्या शाळा बंद धोरणाचा समाचार घेतला. राज्यात कशा चुकीच्या पध्दतीने शाळा बंद करण्यात आल्या याची आकडेवारीही त्यांनी सादर केली.सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबची माहिती दिली. यावेळी शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण विभागातील माजी संचालक वसंत काळपांडे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी उपस्थित होते.सुळे म्हणाल्या, राज्यात तेराशे शाळा समायोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. सर्व स्तरातून ओरड झाल्यानंतर त्यातून काही शाळा वगळण्यात आल्या. मात्र माझ्याकडे आजही अशा शाळांची आकडेवारी आहे, कि जी शिक्षण हक्क कायद्याचा भंग करते आहे. शिक्षण हक्क कायदा सांगतो की विद्यार्थ्यांच्या घरापासून त्याच्या शाळेचे अंतर हे तीन किलोमीटरपर्यंत असावे. मात्र यांनी भलताच नियम लावून एक शाळा ते दुसरी शाळा असे अंतर मोजले आहे. शिरुर येथील भीलवस्तीतील शिंदोणी येथे एका शाळेची पटसंख्या 13 आहे. ती शाळा बंद करून दुसऱ्या शाळेत समायोजन झाले ते अंतर शाळेपासून 2.9 किमी आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत असेही त्या म्हणाल्या. शिक्षणाचा कायदा कुठे पाळला जातो आहे असा असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.काळपांडे म्हणाले, शिक्षण विभागाने जे निर्णय घेतले ते जनतेला विश्वासात घेऊन त्यांचे पूर्ण स्पष्टीकरण देऊन घेणे गरजेचे होते. शाळा बंदबाबत आधी 1300 नंतर 567 असा आकडा सांगण्यात आला. मात्र, याचा खरा आकडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच शिक्षणाची प्रगती 16 वरून 3 वर आली हे सांगतानाही अहवाल सादर करायला हवा होता. मात्र तसे काहीच झालेले दिसत नाही.आजवरच्या राजकारणात कधीच खोटे बोलले नाहीआजवर राजकारणात आल्यापासून मी किंवा पवार साहेब कधीही खोटे बोललो नाहीत. मात्र, तावडे यांना असे वाटत असेल तर त्यांनी ते सिध्द करावे. शिक्षणमंत्री हे शाळा बंद धोरणाची पाठराखण करून बहुजन समाजाचे शिक्षण हिरावून घेत आहेत, असाही आरोप सुळे यांनी केला.शिक्षणाबाबत उपस्थित केले प्रश्न– शाळा बंद करण्याचा निर्णय हा कोणते निकष लावून घेण्यात आला व त्याबाबत कोणताच अहवाल अद्यापपर्यंत का प्रसिध्द केला नाही?– शिक्षणात महाराष्ट्र 16 व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. ते कोणत्या सर्वेक्षणाच्या व कोणत्या अहवालाच्या आधारे केले?– शरद पवार आणि सुप्रिया सुळे कोणत्या मुद्यांवर खोटे बोलतात तेही त्यांनी सविस्तर माध्यमांसमोर येऊन स्पष्ट का नाही केले?तावडेंच्या बॉसला ट्युशनची गरजशिक्षणमंत्री काही अभ्यास न करता शाळा बंद करत असतील तर त्यांना ट्युशनची गरज आहे. असा प्रश्न विचारल्यानंतर सुळे म्हणाल्या, शिक्षणमंत्र्यांनाही व त्यांच्या बॉसला (मुख्यमंत्री) या दोघांना ट्युशनची गरज आहे. त्यांनी वसंत काळपांडे सरांकडे ट्युशन लावावी.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95/
ST Correspondent : NCP MP from Baramati continues opposition, points out how move flouts several RTE guidelinesPune: “Sharad Pawar and Supriya Sule have never lied in their social and political journey so far, and more so, we have never brought politics into education,” said MP Supriya Sule while interacting with the media here on Monday.She was responding to an accusation by State Education Minister Vinod Tawde that people opposing the shutting down of 1,300 Zilla Parishad schools in the State are liars. Tawde was keen on the use of the word merger, and insisted that just the school buildings are being shut and schools will merge.Speaking about the issue, Sule said, “I am not against improving the quality of education in the State, which the government keeps saying is the reason behind the said ‘merger’ of schools. However, lack of proper study and planning will just end up deteriorating the system as there might be high number of dropouts.”She said the move breaks many provisions of the Right to Education (RTE) Act and added, “We are procuring data from various districts and data obtained by me about schools in Pune district and my constituency isn’t showing a good picture. According to the RTE Act, the distance from a child’s home to a school shouldn’t be more than 6 km. However, we have so many examples where the distance from the old school to the new one itself is more than 3 kms. We also have to consider cases of remote tribal villages.”She noted that the RTE Act states that a school cannot be shut down if the villagers there are against the closure. However, there are many examples where villages where schools are marked to be shut down are protesting against it.“In Pune district, 76 schools were marked to be shut down. Out of these 19 have been shut, or merged into other schools that are within a 1 km distance. However, 57 others haven’t yet been shut as students and villagers there want the schools to run. Thus, Pune Zila Parishad has decided to run these schools on their own, despite the State government’s orders to shut them,” said Vivek Valse Patil, Vice-President, Pune ZP. Sule said Pune is the only ZP till now that has made such a decision.Over the government’s claims that the schools that are being merged have less than 10 students as people are admitting their children to nearby private schools, Vasant Kalpande, former chairperson of Maharashtra State Board, said, “In many of these villages, the population itself is scarce. Also, people are migrating constantly, due to which, the number of students is very low some years.”Sule asked the government the basis and the parameters according to which the schools to be ‘merged’ are shortlisted. She also pointed out that while Chief Minister Devendra Fadnavis keeps stating that Maharashtra has jumped in ranking from number 16 to number three as far as quality of education is concerned, he fails to answer which study/report has given the said rankings.“The reports by ASER and Pratham, that are considered to be the most credible and are quoted by everyone in the Assembly, have stopped giving rankings for the past few years. I agree that there is no deterioration in the quality of education in the past four years, but who is saying that our State has made such a drastic improvement?,” Sule further asked.Tawde reactsAfter Supriya Sule’s presser, Vinod Tawde issued a statement saying, “In the tuition of Baramati, ‘dada’ and ‘tai’ teach how to draw water through corruption in the dam construction. I do not need Pawar school. For me, SSC board is enough. This board teaches honesty.”‘Politics in education not right’ Drawing attention to a book meant as supplementary reading for students at ZP schools, Sule said that bringing a political agenda into education isn’t the right thing to do. The book in question is titled ‘Chacha Chaudhary...
मीनाक्षी गुरव ; सोमवार, 28 मे 2018 सुप्रिया सुळेंचे विनोद तावडेंना आव्हानपुणे, ता. 28 ः ""शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे,'' असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले.सरकारच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. शाळा बंद करण्याचा निर्णय घेताना सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही पर्यायांचा विचार केलेला नाही. शाळांचे समायोजन करताना शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.शिरूर तालुक्यामधील भिल्लवस्तीतील शाळा बंद करून तेथील मुलांचे शिंदोडीतील शाळेत समायोजन केले आहे. मात्र, मुलांना शाळेत जाण्यासाठी एक-दीड किलोमीटर नव्हे, तर तब्बल तीन किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. बारामतीमधील गारमळा येथील विद्यार्थ्यांचीही पायपीट वाढणार आहे. अशाच प्रकारे राज्यातील असंख्य शाळा ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांचा विरोध असतानाही बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु त्यातून विद्यार्थ्यांची होणारी फरफट दुर्लक्षित राहिली आहे. याचा विचार सरकारने "पालक' म्हणून केलाय का?, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.शाळा : समायोजन झालेली शाळा : अंतर (किलोमीटरमध्ये)पवारवस्ती (ता. इंदापूर) : वायसेवाडी : 02बागलफाटा : बावडा : 2.5वेलहावळे (ता. खेड) : काळोखेवस्ती : 1.8शास्ताबाद (ता. शिरूर) : उकीरडेवस्ती : 1.7भिल्लवस्ती : शिंदोडी : 2.9http://www.sarkarnama.in/what-i-spoke-lie-supriya-sule-asks-tawde-24317