हेलिकॉप्टरने फिरणाऱ्यांना सामान्यांचे प्रश्‍न समजत नाहीत - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा06.26 AMनगर - 'राज्यातील मंत्री हेलिकॉप्टमधून फिरतात. अशांना सर्वसामान्यांचे प्रश्‍न समजत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरमधून रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. सामन्यांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रस्तादुरुस्तीत लक्ष घालावे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्‍त केले. राष्ट्रवादी भवनात आज झालेल्या मेळाव्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी मी राज्यात दौरे करीत आहे. युवा संवादातून युवतींचे प्रश्‍न जाणून घेता येतात. कोणत्याही मागणीसाठी लढायचे असते. आत्महत्येमुळे प्रश्‍न सुटत नाहीत. आत्महत्या करणे चुकीचे आहे. आमच्या सरकारमध्ये एक आत्महत्या झाली, तरी सध्याचे मुख्यमंत्री त्या वेळी राज्य सरकारवर 302 कलम लावण्याची भाषा करीत होते. एक भ्रूणहत्या अथवा एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी सरकारचे ते अपयश असते, हे मी कबूल करते. राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गेल्या तीन वर्षांत झाल्या आहेत, असे सरकारी आकडेवारीच सांगते. मग आता कोणावर 302 कलम लावायचे?''http://www.esakal.com/paschim-maharashtra/supriya-sule-talking-politics-147626

Read More

सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज: तारीख,वेळ, ठिकाण सांगा, खुल्या चर्चेस तयार 

विलास कुलकर्णीबुधवार, 3 ऑक्टोबर 2018मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे .- सुप्रिया सुळे राहुरी (नगर) : "आमचा पंधरा व भाजपचा साडेचार वर्षातील कारभार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करायला राष्ट्रवादीची केव्हाही तयारी आहे. त्यांनी वेळ, तारीख, ठिकाण सांगावे. आमच्यातील कुणालाही त्यांनी बोलवावे", असे आव्हान  राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. पत्रकारांशी बोलतांना केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करीत खासदार सुळे म्हणाल्या, "बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, कुपोषण, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या यामध्ये तीन वर्षात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील रस्त्यांची वाट लागली. खड्डयांमुळे अपघात वाढले. त्याचा मला त्रास होतो. प्रशासनाला नाही. शेतकऱ्यांवर लाठीमार हे पाप आहे. नवी दिल्लीत तेही घडले." "महिलांच्या सुरक्षीतते विषयी मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींच्या किडनॅपींगची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'ब्र' शब्द काढला नाही.  त्यांना ते मान्य आहे. किंवा त्यांचे हात बांधले असावेत. सामान्य माणसाने असे विधान केले असते, तर ती व्यक्ती जेलमध्ये असती. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री यावर गंभीर नाहीत. त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा." राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, मंजुषा गुंड, संदीप वर्पे, अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे, सुरेश वाबळे, मनीषा ओहोळ, निर्मला मालपाणी, कपिल पवार उपस्थित होते. http://www.sarkarnama.in/supriya-sule-challenges-devendra-fadnavis-open-debate-29341 

Read More

ज्यांनी साक्षात पांडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करु नका : सुप्रिया सुळे

संजय काटे  मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 श्रीगोंदा (नगर) : "जे पक्ष सोडून गेले. ज्यांनी साक्षात पाडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करण्याचीही गरज नाही', अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी टोलेबाजी केली. सुप्रियाताई आज श्रीगोंदा दौऱ्यावर होत्या. युवा संवाद साधताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता त्यांनी टोलेबाजी केली. सुळे म्हणाल्या, जे पक्ष सोडून गेले. ज्यांनी साक्षात पांडुरंगाला फसविले, त्यांची चर्चा करण्याचीही गरज नाही. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार राहूल जगताप यांच्यावर लक्ष आहे. त्यांचे कामही चांगले आहे. त्यांना मी आदर्श मानते. सहकारात कसे काम करायचे, हे राहूलकडून मलाही शिकायचे आहे. यावेळी आमदार राहूल जगताप, डॉ. प्रणोती जगताप, राजेंद्र फाळके, मंजूषा गुंड, प्रा. तुकाराम दरेकर, संदीप वर्पे, वैशाली नागवडे, सचिन जगताप, दादा दरेकर, डॉ. सुवर्णा होले, मंगेश सुर्यवंशी, रवि बायकर आदी उपस्थित होते. http://www.sarkarnama.in/supriya-sule-criticise-babanrao-pachpute-29308

Read More

सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ ? – खा. सुप्रिया सुळे

प्रभात वृत्तसेवा  अहमदनगर:  आज अहमदनगर येथे महिला मेळाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील आणि देशाची परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कुपोषणामुळे मुलांचे मृत्यु होत आहेत, महागाई प्रचंड वाढली आहे या सगळ्याबाबत लोकांचा संताप अनावर होत आहे. लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही दौरा आखला आहे. अजित पवार काही भागात फिरतील, प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील काही भागात फिरतील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काही भागात फिरतील आणि मी काही भागात फिरून सत्य परिस्थिती काय आहे याचा अभ्यास करणार आहोत, अशी माहिती यावेळी सुळे यांनी दिली. संवाद दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. सेल्फी विथ पॉटहोल ही मोहीम आम्ही सुरू केली आहे. लोकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र सरकार लक्ष देत नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री राज्याची धुरा सांभाळतात त्यांनी याकडे जातीने लक्ष घालावे. मुख्यमंत्री विरोधी बाकावर असताना आरोप करायचे सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करायचे आज एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, मग आता कोणावर ३०२चा गुन्हा दाखल करावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिल्लीत शेतकरी आंदोलन करणार होते हे सगळ्यांना माहिती होते. ते शांतपणे आंदोलन करणार होते मग पोलिसांचा उपयोग करून लाठीचार्ज का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. या सरकारविरोधात कोणी बोलले तर दबावाचा उपयोग करून आवाज दाबला जातो, अशी ही टीका त्यांनी केली. सत्तेत असलेले आमदार अपहरणाची भाषा करतात, मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ असे चित्र आज निर्माण झाले आहे, असे त्या म्हणाल्या. पेट्रोल-डिझेलवरील कर सरकारने कमी केला तर आत्ता २५ रुपयांनी भाव कमी होतील पण या सरकारला महागाई कमीच करायची नाही. गरीब माणसाचा गळा घोटण्याचे काम या सरकारला करायचे आहे. काल शेतकऱ्यांवर केलेला लाठीचार्ज या सरकारला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF/

Read More

मंदिरातील ड्रेसकोडऐवजी महिला सुरक्षेवर लक्ष देण्याची गरज: सुप्रिया सुळे

अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे. अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज लोकसत्ता ऑनलाइन | October 2, 2018 01:27 pmमहालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यापुढे पूर्ण पोशाखात येण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले असतानाच यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. मंदिरात तोकड्या वेशात जाण्यास मज्जाव करण्याऐवजी कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. आपण २१ व्या शतकात असताना असे निर्णय घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मूक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. भाजपा सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, भाजपाने निवडणुकीपूर्वी पारदर्शक कारभाराच्या घोषणा केल्या, पण पारदर्शक कारभार दिसत नाही. त्यांच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जातात ही निषेधार्ह बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, आपण २१ व्या शतकात असताना कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी तोकडे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश नसल्याची चर्चा सुरू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे. अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावरुनही सुप्रिया सुळेंनी टीका केली.  विचारवंतांना नजरकैदेत ठेवले जाते, जेलमध्ये टाकले जाते. तर दंगल घडवणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कालवा फुटीचे प्रकरण लक्षात घेता स्वतः वरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलल्याचे गिरीश महाजन यांच्या विधानातून स्पष्ट होते.ही बाब अत्यंत चुकीची आहे, असे त्यांनी नमूद केले.https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-supriya-sule-reaction-on-kolhapur-mahalakshmi-temple-dress-code-1763456/

Read More

बोफोर्सचा न्याय 'राफेल'लाही लावा, वादानंतर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

'राफेल च्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना तोच न्याय लावत सरकारने 'जेपीसी'मार्फेत चौकशी करावी हीच शरद पवारांची भूमिका आहे.' Updated On: Sep 28, 2018 08:27 PM IST मुंबई,ता.28 सप्टेंबर : बोफोर्सचं प्रकरण गाजत असताना भाजपने संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी केली होती. आता राफेल च्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना तोच न्याय लावत सरकारने 'जेपीसी'मार्फेत चौकशी करावी हीच शरद पवारांची भूमिका आहे असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी दिलं. राफेलची किंमत 300 पटीने वाढविण्यात आली असा आरोप होतेय त्याचाही खुलासा झाला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. बोफोर्सचा न्याय 'राफेल'लाही लावा, वादानंतर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिकाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'न्यूज18 लोकमत'ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत पवारांनी पंतप्रधान मोदी आणि राफेल बाबत त्यांची भूमिका मांडली होती. राफेल प्रकरण गाजत असतानाही लोकांना पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबद्दल संशय नाही असं पवार म्हणाले आणि त्यानंतर देशभर राजकीय क्षेत्रात वादळ निर्माण झालं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची काय भूमिका होती ते पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या पवार साहेबांच्या मुलाखतीचा सोईस्कर अर्थ काढण्यात आला आहे. राफेलच्या वाढलेल्या किंमतीचं शंकानिरसन आणि त्या प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशी अशा दोन्ही मागण्या पवार साहेबांनी केल्या आहेत त्यामुळं वादाचं काय कारण आहे तेच कळत नाही.या वादानंतर पक्षाचे जेष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. तारिक भाईंनी किमान एकदातरी पवारांना फोन करून विचारायला पाहिजे होतं. तारिक भाई, आपने दिल तोड दिया अशी खंतही त्यांनी तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर व्यक्त केली. पण सगळा वाद सुरू झाला तो पवारांच्या मोदींबाबतच्या वक्तव्यावरून. लोकांना मोदींच्या हेतूबद्दल शंका नाही असं पवार मुलाखतीत म्हणाले होते. असं म्हणणं म्हणजे मोदींना प्रशस्तीपत्रच आहे अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मोदींना चोर म्हणत असताना लोकांची मोदींच्या हेतूवर शंका नाही हे पवारांचं वक्तव्य वादळ निर्माण करणारं ठरलं. वादाचं कारण ठरलेल्या त्या वक्तव्यावर मात्र सुप्रियाताईंनी काहीही मत व्यक्त केलं नाही.https://lokmat.news18.com/national/supriya-sule-clarification-on-sharad-pawars-statement-307718.html

Read More

पवारांनी मोदींना क्लीन चीट दिलीच नाही, सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

September 28, 2018सामना ऑनलाईन । नवी दिल्लीराफेल प्रकरणी जनतेच्या मनात मोदींबद्दल कुठलीच शंका नाही असे वक्त्यव्य करून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मोदींना क्लीनचीट दिली होती. परंतु शरद पवारांनी मोदींना कुठलीच क्लीनचीट दिलीच नसल्याचे पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.“पवारांनी मोदींना राफेल प्रकरणी क्लीनचीट दिली असे वृत्त काही माध्यमांत प्रसिद्ध झाले होते, ते खोटे आहे” असे सुळे यांनी सांगितले तसेच पवारांच्या वक्त्यव्यातील तीन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचेही त्यांनी सांगितले. विमानाच्या किंमतीबाबत खुलासा, खरेदी प्रकरणावर जेपीसी समिती नेमणे आणि भाजपच्या दुटप्पी धोरणावर त्यांनी टीका केली. या तीन गोष्टींकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही!  तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याप्रकरणी सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले तसेच “तारिक अन्वर पक्षस्थापनेपासून सोबत होते, जाण्यापूर्वी पवारांशी बोलून त्यांनी आपले मतभेद दूर करायला हवे होते” असेही त्यांनी यावेळी म्हटले.http://www.saamana.com/pawar-doesnt-give-clean-chit-to-modi-says-supriya-sule/

Read More

कायद्याचा धाक राखण्यात सरकारला अपयश : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा12.19 PMभाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.पुणे : एकीकडे जातीअंतासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे जाती-जातींतील दऱ्या वाढत आहेत. त्यातूनच अशा घटना घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा धाक अबाधित राखण्यात या सरकारला आलेले अपयश हेच आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.भाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.http://www.esakal.com/maharashtra/ncp-mp-supriya-sule-talked-about-nagar-incident-and-government-146031

Read More

आम्हाला न्याय द्या

सकाळ वृत्तसेवा01.38 AMहिंजवडी - हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वन केले. या घटनेतील आरोपींनी लवकर कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी सुळे यांच्याकडे केली. कासारसाई परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत आहे.या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, युवकचे तालुकाध्यक्ष नीलेश पाडाळे, अमित कंधारे, हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, कासारसाईचे सरपंच युवराज कलाटे आदी उपस्थित होते.पीडितेच्या नातेवाइकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नसून, या घटनेत जुजबी कलम लावल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी सुळे यांना दिली असता त्यांनी हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याशी संपर्क साधून गुन्ह्याची गंभीरता व नोंदवलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली.या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असून अटकेत असलेला आरोपी गणेश निकम (वय २२) याच्यावर कलम ३७६ एबी, ३७६ डीबी, ३७७, पाक्‍सो ५ एम (सामूहिक बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार कलमे लावल्याचे गवारे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आवश्‍यक ते पुरावे व जवाब नोंदविण्याचे काम पोलिस करत आहे.’’कायदा जनजागृतीची गरजअशा घटनांबाबत मीडिया, सोशल मीडियामध्ये चर्चा होत असताना लोकांना कायद्याची भीती का वाटत नाही. एका चुकीमुळे संपूर्ण जीवन उदध्वस्त होते. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. सरकारनेही लैंगिक शिक्षणापेक्षा अशा घटनांचे दुष्परिणाम व कायद्याची भीती निर्माण होईल असा अभ्यासक्रम आणणे काळाची गरज आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.http://www.esakal.com/pune/give-us-justice-victims-family-members-demand-145245

Read More

महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरला नाही : सुप्रिया सुळे

सरकारनामा ब्युरोशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 बारामती : राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा संतप्त सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.  पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलीवर बलात्कार झाला, त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णत: निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे. रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिद्ध होते असे सुळे यांनी म्हटले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्‌तेच्या परिस्थिीतवर गंभीर टीका केली आहे. http://www.sarkarnama.in/supriya-question-law-and-order-state-28898

Read More

या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सुप्रिया सुळे

मिलिंद संगई11.26 AMबारामती - राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाला. त्या पैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत, राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णतः निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिध्द करणारी असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणा-या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर टीका केली आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sule-ask-question-cm-about-rape-incident-145106

Read More

तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे

बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: September 20, 2018 01:59 AM | Updated: September 20, 2018 01:59 AM बारामती : मुले चांगल्या शिक्षकांमुळेच हुशार होतात. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या टॅबवर माझा अजिबात विश्वास नाही. या टॅबमुळे मुले अजिबात हुशार होत नाहीत. तंत्रज्ञानावर फार जोर देऊ नये. बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील गदिमा सभागृहात आदर्श शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचा खासदार सुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक गट विकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले, पंचायत समिती उप सभापती शारदा खराडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.http://www.lokmat.com/pune/do-not-stress-technology-supriya-sule/

Read More

लालबागच्या राजाला अजितदादा-सुप्रियाताईंचे साकडे

सरकारनामामंगळवार, 18 सप्टेंबर 2018 मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित दादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि 'महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे' असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी राज्य आज आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार,महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने केली. http://www.sarkarnama.in/ajit-pawar-supriya-sule-offer-prayaers-lalbagchaa-raja-28816

Read More

'गुजर-निंबाळकरवाडीतील प्रस्तावित रिंगरोड बाधितांचा प्रश्न सोडवणार'

खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाहीपुणे, दि. १७ (प्रतिनिधी) – गुजर-निंबाळकरवाडी येथील प्रस्तावित पीएमआरडीएच्या रिंगरोडमुळे या भागातील काही नागरिकांची घरे बाधित होत आहेत. त्यांची घरे पाडण्यापेक्षा यातून सर्वसमावेशक तोडगा निघावा अशी आमची भूमिका आहे. यादृष्टीने मी प्रयत्न करीत आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथील नागरिकांना दिली. गुजर-निंबाळकरवाडी या गावातून रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावातून रस्त्याला विरोध होत आहे. येथील सर्व्हे क्रमांक १२ मधील अनेक घरे या रिंगरोडमुळे उध्वस्त होणार असून त्यांचे संसार उघड्यावर येतील. या कुटुंबांचा विचार करावा, आणि आपण याकामी लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आज सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. वास्तविक रिंगरोडचा प्रस्ताव १९९७ मध्ये आला. त्यानंतरही या भागात जागा विक्री होत राहिली. अनेकांनी जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. त्याचवेळी येथील जमीन खरेदी विक्रीला पायबंद घातला असता तर ही वेळ आली नसती. असे न करता याठिकाणी घरे उभारू दिली आणि आता १९९७ च्या प्रस्तावानुसार रिंगरोडसाठी जागेची मोजणी सुरु करण्यात आली आहे. मोजणी होताच घरे पडली जातील. या भीतीने येथील अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. पीएमआरडीएने याबाबत सर्वसमावेशक तोडगा काढावा, त्यासाठी सुळे यांनी मध्यस्ती करावी, अशी मागणी येथोल नागरिकांनी निवेदनात केली आहे. त्यानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेत सुळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात लोकांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढावा, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Read More

खड्यात जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी सरकारची, सुप्रिया सुळेंचा इशारा

सरकारनामा ब्युरोमंगळवार, 18 सप्टेंबर 2018 बारामती : रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत, या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.  थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-target-cm-fadanvice-pitch-28780

Read More

सुप्रिया सुळेंचा खड्ड्याबरोबर सेल्फी, मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

मिलिंद संगई10.39 AMबारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे.बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sules-selfie-pothole-cm-will-be-answerable-144500 

Read More

“दुष्काळ सेस’च्या रकमेचे काय केले?

खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना ट्‌विटप्रभात वृत्तसेवा पुणे – “दुष्काळ सेस’च्या नावाखाली पेट्रोलवरील लावलेल्या अधिभाराच्या रकमेतून नेमके काय केले, त्याची आकडेवारी जाहीर करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.यासंदर्भातील ट्‌विट सुळे यांनी केले आहे. दरवर्षी महाराष्ट्रात कुठे ना कुठे पावसाचे दुर्भिक्ष असते. त्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी संबंधित शेतकऱ्यांच्या हिताचे नाव देत राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी पेट्रोलवर “दुष्काळ सेस’ लावला. प्रतिलिटर तीन रुपये असा त्याचा दर आहे. आज देशातील सर्वात महागडे पेट्रोल महाराष्ट्रात विकले जाते. दराने नव्वदी गाठली आहे. सेसमधून मागील तीन वर्षांत ते पैसे जमा केले, त्याचा पडताळा जाहीर करावा. महाराष्ट्राला रोजच्या रोज किती पेट्रोलची गरज आहे, त्यातील प्रत्यक्ष विक्री किती होते? त्यातून शासनाला किती महसूल मिळतो, दुष्काळ सेस अंतर्गत किती रक्कम जमा झाली, त्यातील किती रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली, कोणत्या नव्या कृषीयोजना आणल्या, त्याचा किती शेतकऱ्यांना थेट फायदा झाला, किती शेतकऱ्यांची कर्जे फिटली, किती शेतकरी कायमचे कर्जमुक्‍त झाले याची सविस्तर आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.कर्जमाफीसाठी या सरकारने शेतकऱ्यांना रांगेत उभे केले. ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतके करूनही पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचे लाभ पोहोचलेही नाहीत. एक चूक झाली तर अर्ज अपलोडच होत नव्हता, असे असताना शेकडो गोरगरीब शेतकऱ्यांना “बोगस’ ठरवले गेले, असा आरोप सुळे यांनी केला आहे.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95/

Read More

Supriya Sule slams Modi govt over safety of women

THE ASIAN AGE.Published : Sep 16, 2018, 1:02 am ISTUpdated : Sep 16, 2018, 1:02 am ISTCiting a Maharashtra government’s data, Mrs Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000.Mumbai: The Nationalist Congress Party (NCP) leader Supriya Sule Saturday questioned if the laws meant to protect women are being implemented properly. Reacting to the incident of gang-rape in Har-yana, Ms Sule said that Prime Minister Naren-dra Modi should break his silence over the issue.Ms Sule in her statement asked Mr Modi if laws that are meant to prevent atrocities against women were really being implemented. Three men in Haryana’s Mahend-ergarh district allegedly raped a 19-year-old student on Wednesday afternoon. “As a woman, I demand justice from the Prime Minister who spe-aks about ‘Beti Padhao, Beti Bachao’,” Ms Sule said in a statement.“There is nothing to show that what is said is being implemented. There are laws to prevent atrocities against women, but are these laws being implemented? Mr Modi should break his silence and respond,” added Ms Sule.Citing a Maharashtra government’s data, Mrs Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000. “While a ruling party legislator openly talks about kidnapping women, the chief minister Devendra Fadnavis, who is also the state home minister, keeps mum on the issue,” said Ms Sule referring to BJP MLA Ram Kadam’s “will kidnap the girl” remarks.  Meanwhile, the NCP has been aggressively campaigning against the failure of Union government on social networking sites for last few days. Using #JawabDo, Ms Sule and her party colleagues have been raising issues affecting people every day.http://www.asianage.com/metros/mumbai/160918/supriya-sule-slams-modi-govt-over-safety-of-women.html

Read More

Are laws meant to curb crime against women being implemented,

Press Trust of India  |  Mumbai Last Updated at September 15, 2018 16:20 ISTIn the wake of the Haryana gangrape incident, NCP MP Supriya Sule Friday asked Prime Minister Narendra Modi if laws that are meant to prevent atrocities against women were really being implemented.She said the PM should break his silence over the issue.A 19-year-old student was allegedly raped by three men in Haryana's Mahendergarh district after being abducted Wednesday afternoon."As a woman, I demand justice from the prime minister who speaks about 'Beti Padhao, Beti Bachao'," Sule said in a statement."There is nothing to show what is said is being implemented. There are laws to prevent atrocities against women, but are these laws being implemented? Modi should break his silence and respond," the Lok SabhaMP from Baramati said.Citing a state government data, Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000."While a ruling party legislator openly talks about kidnapping women and Chief Minister Devendra Fadnavis, who is also the state Home Minister, keeps mum," Sule said referring to BJP MLA Ram Kadam's "will kidnap the girl" remarks. (This story has not been edited by Business Standard staff and is auto-generated from a syndicated feed.) https://www.business-standard.com/article/pti-stories/are-laws-meant-to-curb-crime-against-women-being-implemented-118091500444_1.html

Read More

महाराष्ट्राचा 'लाडका' मुख्यमंत्री एकही शब्द कां काढत नाही?

सरकारनामा ब्युरोशनिवार, 15 सप्टेंबर 2018 मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्‍या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  सुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत? हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड, बलात्कार अशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-questions-devendra-fadavnis-28676

Read More