सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यांची व्यथा

सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यांची व्यथा

बारामती शहर - राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. केवळ हाच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करुनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, काल दोन अपघात झाले दोघेही लोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार व कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकारदरबारी या निमित्ताने न्याय मागते, असेही सुळे यांनी सांगितले.जेजुरीनजिक रेल्वे उड्डाणपूलावरुन सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत खड्डयांची परिस्थिती किती भीषण आहे याचे चित्रणच लोकांना दाखविले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान लोकांशी संवाद साधत त्यांनी लोकांच्या भावना चित्रीत केल्या, मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत हे खड्डे त्वरित बुजविण्याबाबत तसेच रस्ता व्यवस्थित करण्याबाबत विनंती केली. नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढत सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय हलगर्जीपणाचा लोकांना किती त्रास होतो हे यातून दाखवून दिले.दुष्काळाबाबतही उपाययोजना हव्यात...पुरंदर तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे, नाझरे धरणातील पाणी साठा वेगाने संपत आहे, अशा स्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत, असेही आवाहन त्यांनी केले.https://www.esakal.com/pune/supriya-sule-shows-bad-conditions-streets-through-facebook-live-154932

Read More

राष्ट्रवादीकडून रेल्वे स्थानकात धरणे

राष्ट्रवादीकडून रेल्वे स्थानकात धरणे

दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले.  By लोकमत न्यूज नेटवर्क दौंड : दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात कीर्तन करण्यात आले. तर दुसरीकडे, गॅस दर ६० रुपयांनी वाढल्यामुळे तहसील कचेरीच्या परिसरात ३ दगडांच्या चुलीवर भाकरी भाजून केंद्र आणि राज्य शासनांचा निषेध करण्यात आला.या वेळी घोषणाबाजीने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी ६ वाजता सुप्रिया सुळे यांनी दौंड-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रेल्वे प्रबंधकांच्या कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले. या वेळी पक्षाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, अ‍ॅड. अजित बलदोटा, सोहेल खान, बादशहा शेख, झुंबर गायकवाड, प्रवीण शिंदे, नागसेन धेंडे, राणी शेळके, सारिका पानसरे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या वेळी सुळे म्हणाल्या, ‘‘पुणे-दौंडदरम्यान विद्युत लोकल तातडीने सुरू झाली पाहिजे. दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले गेले पाहिजे. कडेठाण, मांजरी येथील बंद पडलेली रेल्वेची कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. प्रभाग क्र. ५ मधील रेल्वे अधिकाºयांनी थांबविलेली कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. रेल्वे झोपडपट्टी कुठल्याही परिस्थितीत हलवू दिली जाणार नाही. रेल्वे परिसरात पाणीटंचाई आहे.‘मीटू’च्या प्रश्नावर मोदी गप्प का?सध्या राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावर ‘मीटू’चा प्रश्न गाजतोय. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर २० महिला आरोप करतात. त्यात काहीतरी तथ्य असावे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाव’चा नारा देतात, दुसरीकडे ‘मीटू’वर गप्प का? हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. तेव्हा संबंधित मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे सरकार नसून प्रॉडक्ट आहे. केवळ जाहिरातबाजीवर हे सरकार तरलेले आहे. जलयुक्त शिवाराचे श्रेय सिनेअभिनेता आमिर खान यांना दिले पाहिजे. मात्र, हे श्रेय भाजपा सरकार लाटत आहे. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.http://www.lokmat.com/pune/take-ncp-railway-station/

Read More

मुख्यमंत्री दुष्काळाविषयी असंवेदनशील : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री दुष्काळाविषयी असंवेदनशील  : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवादौंड : ''राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,'' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दौंड येथे आज (ता. 2) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या, ''सीएम चषकाच्या निमित्ताने सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. चषकाला माझा विरोध नाही; परंतु वेळ चुकीची आहे. दुष्काळात होरपळणाऱ्यांना आधार देऊन अडचणीत असलेल्यांना मदत करण्यास राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सगळं बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावे. राज्यात बेरोजगारी, महागाई, असुरक्षितता आणि दूषित सामाजिक वातावरणामुळे अस्वस्थता असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे गांभीर्य नाही. जाहिरातबाजीवर तुफान खर्च करणारे हे सरकार आहे. जनतेला हे सरकार वाटत नसून, एखादा प्रॉडक्‍ट वाटावा, अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. राज्याबद्दल भाजप-शिवसेनेचे नेते बोलत नाहीत. राज्य सरकारची कोणतीही योजना चाललेली नाही. आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या या युतीने लोकांची फसवणूक केली आहे.''''सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील वाद, रुपयाचे अव्यमूलन, कोलमडणारी ग्रामीण अर्थव्यवस्था, सीबीआयअंतर्गत लाच प्रकरणावरून झालेल्या धाडी आणि केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वाद दुर्दैवी आहेत. अशा विसंवाद आणि वादांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब होत आहे. त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होत आहे,'' असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.अभ्यास आणि नियोजनाचा अभाव असलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम योग्य नाही. जलयुक्तचे जे काही काम झाले, त्याचे श्रेय अभिनेता अमिर खान व पाणी फाउंडेशनचे आहे. - सुप्रिया सुळे, खासदारhttps://www.esakal.com/pune/supriya-sule-criticises-cm-devendra-fadnavis-over-drought-situation-153060

Read More

‘मी टू’ मोहीम अंतर्मुख करणारी: सुळे

‘मी टू’ मोहीम अंतर्मुख करणारी: सुळे

'मी टू' मोहिमेच्या निमित्ताने महिला बोलू लागल्या, याचे स्वागत आहे. हा विषय गंभीर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा आहे. सर्वच क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या मोहिमेचे गांभीर्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'मी टू' मोहिमेच्या निमित्ताने महिला बोलू लागल्या, याचे स्वागत आहे. हा विषय गंभीर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा आहे. सर्वच क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या मोहिमेचे गांभीर्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. 'देशात कुपोषण, महिला अत्याचार अशा अनेक समस्या असताना आपण कोणत्या मुद्दाला प्राधान्य द्यायला हवे,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शोषण न झालेली एकही महिला दिसणार नाही. एम. जे. अकबर प्रकरणामध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली नाही. एक महिला खोटी बोलत असेल, पण २० महिला खोट्या बोलणार नाहीत. विशाखा समित्यांनी आपल्या भूमिका पार पाडल्या असत्या तर आज इतक्या प्रमाणात तक्रारी पुढे आल्याच नसत्या, असे त्यांनी सांगितले.मुलींना उचलून नेण्याची भाषा होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार खंडणी मागतात, पण गृह खाते असलेले मुख्यमंत्री 'पारदर्शक' कारभार आहे, असे नुसतेच सांगतात. आपल्या आमदारांवर काहीच बोलत नाहीत. राज्य महिला आयोग तर आजकाल बोलतही नाही आणि गंभीरही नाही. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा नारा तुम्ही देता. प्रत्यक्षात महाराष्ट्रात महिला असुरक्षित झाल्या. उत्तर प्रदेश, बिहारला नाव ठेवायचीच कशाला. महाराष्ट्रापेक्षा तर ही राज्ये अधिक उत्तम आहेत अशी म्हणायची वेळ आली. आम्ही सत्तेत आलो तर महिला सुरक्षेला आमचे प्राधान्य असेल. एकल महिला धोरणावर आम्ही गंभीर आहोत असेही त्यांनी सांगितले.या सरकारच्या प्रत्येक योजना, धोरणात पारदर्शकता दिसत नाही. स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, मुद्रा योजना, कौशल्य विकास उपक्रम सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरले. २०१९पेक्षा २०२४मध्ये जनता इतर काही नको फक्त काम द्या, असेच म्हणेल. 'मुद्रा'चे भलेमोठे रॅकेट औरंगाबादमध्येच उघडकीस आले. देशात अशीच परिस्थिती आहे. केंद्राचा, राज्याचा महिला धोरणाचा ड्राफ्ट उत्तम आहे, पण अंमलबजावणी करताना वस्तुस्थिती खूप वेगळी असते. शौचालय बांधण्याचे आवाहन सरकार करते. शासकीय जाहिरातींमध्ये अमिताभ बच्चन काम करताना पाहणे सुखावह आहे, पण महिलांना खरच फायदा झाला का. महिला स्वच्छतागृहाचा विषय तर मागेच पडला. मी इतक्या ठिकाणी फिरते पण महिला स्वच्छतागृहाची सोय कुठेच नाही, अशी खंत सुळे यांनी बोलून दाखवली.निवडणूकांपूर्वीच राम मंदिर आठवते २०१९च्या निवडणुका या मंदिरावर होतील की विकासकामांवर या प्रश्नाचे उत्तर सत्ताधारी पक्षाकडेच असावे, असे त्या म्हणाल्या. पाच वर्षांत ६०० कोटी खर्च करून भाजप मुख्यालयाची इमारत तयार झाली. भाजपची नवे कार्यालये तयार झाली, पण पाच वर्षांत सरकारला राम मंदिर काही बांधता आले नाही. २०१४च्या निवडणुकांमध्ये जनतेने विकासासाठी मतदान केले. मग आता पुन्हा राम मंदिर विषय आला. शिवसेनेला रामाची उशिरा आठवण झाली. शिवसेनेची 'अयोध्या चलो' ही भूमिका सोयीनुसार आली. अशा भूमिकेमुळे देशाचे नुकसान झाले, अशी टीका त्यांनी केली.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/metoo-movement-mp-supriya-sule/articleshow/66376086.cms

Read More

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला: सुप्रिया सुळे

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला: सुप्रिया सुळे

दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही त्यांनी केली. लोकसत्ता ऑनलाइन | October 24, 2018 04:48 amराज्यात भयंकर दुष्काळ असतानाही केवळ शब्दांचे खेळ करत दुष्काळसदृश परीस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पण या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.अपुऱ्या पावसामुळे निम्म्या राज्यावर भीषण दुष्काळाची छाया पसरली असून राज्याच्या तब्बल १८० तालुक्यांतील सुमारे २० हजार गावांत सरकारने मंगळवारी टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.‘राज्यात भयंकर दुष्काळ असतानानाही केवळ शब्दांचे खेळ करीत दुष्काळसदृश परीस्थिती जाहीर करुन मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली’, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सोमवारी पुण्यात अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.दरम्यान, राज्यात यंदा सरासरीच्या ७५.८ टक्के पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद सोलापूर तर सर्वाधिक पावसाची नोंद सातारा जिल्ह्यात झाली आहे. सोलापूर,नाशिक, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्य़ांत ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याने १७३ तालुक्यांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. या जिल्ह्यांमधील जवळपास सर्वच तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती असल्याने जनतेला दिलासा देण्यासाठी या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाची वीज खंडित न करणे आदी विविध आठ सवलती लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-supriya-sule-slams-cm-devendra-fadnavis-over-drought-like-situation-1777310/

Read More

संविधान जाळण्याचे महापाप भाजप सरकारच्या काळात झाले- सुप्रिया सुळे

संविधान जाळण्याचे महापाप भाजप सरकारच्या काळात झाले- सुप्रिया सुळे

प्रभात वृत्तसेवा-October 29, 2018 | 5:50 pmपुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज पुणे येथील बालेवाडीत गणेश कला, क्रीडा मंडळ येथे संविधान बचाव , देश बचाव हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात एक अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे म्हटले. संविधान जाळण्याचे महापाप याच सरकारच्या काळात झाले. भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यावर साधी दिलगिरी व्यक्त करत नाहीत, म्हणूनच संविधान धोक्यात आहे असे आम्हाला वाटते. संविधानाविरोधात कोणीही काहीही बोलले तर आपण ते सहन न करता त्याविरोधात बोलायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.राज्यात अत्यंत भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुढचे काही महिने अडचणीचे आहे. आपण या संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. हे सरकार उदासीन आहे म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहायला हवे. सणासुदीची वेळ आहे, शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा असे काम आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.http://www.dainikprabhat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%aa/

Read More

केवळ संघटनकौशल्य पाहून सुप्रिया सुळे यांनी युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले!

केवळ संघटनकौशल्य पाहून सुप्रिया सुळे यांनी युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले!

सरकारनामा ब्युरोगुरुवार, 25 ऑक्टोबर 2018 सातारा : ''कोणतीही राजकिय पार्श्‍वभूमी नसताना केवळ सुप्रिया सुळे यांनी माझे संघटनकौशल्य पाहून मला युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले, तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आणले,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सक्षणा सलगर पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेली दोन दिवस त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी युवतींचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आज त्या साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आल्या. येथे त्यांचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. यावेळी युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्र जाधव उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला व मुली सुरक्षित नाहीत, भाजप सरकारने त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मोफत पासही मिळालेले नाहीत. त्यामुळे भाजप सरकारच्या कारभाराबाबत सर्वजण नाखुश आहेत. सरकारमधील मंत्री व नेते महिला व मुलींबाबत विकृत वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे बेटी बचाओ ऐवजी बेटी भगाओ असाच यांचा नारा दिसत आहे. भाजपचे मंत्री व नेते महिला व मुलींबाबत सातत्याने विकृत विधाने करत आहेत. मंत्रीमंडळात भाजपची ही अभद्र टीम भरलेली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सॅनिटरी नॅपकिनवरून केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.-सक्षणा सलगर http://www.sarkarnama.in/sakshana-salgar-about-supriya-sule-30024

Read More

दुष्काळाशी एकजुटीने लढू - सुप्रिया सुळे

दुष्काळाशी एकजुटीने लढू - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवाशुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018औरंगाबाद - ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, व्यावसायिकांना घातली.शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या ‘बिझनेस महाएक्‍स्पो २०१८’च्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये २५ ते २८ ऑक्‍टोबरदरम्यान हा एक्‍स्पो होत आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे होते. पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, माजी मंत्री राजेश टोपे आदींची उपस्थिती होती.श्री. खोतकर म्हणाले, ‘‘मराठवाड्यात मराठा समाजाचे नुकसान शेतीनेच झाले आहे. अधिकच्या शेतीमुळे पूर्वी व्यवसायात लोक उतरायचे नाहीत. आता ही परिस्थिती बदलायला हवी.’’ श्री. बागडे यांनीही महाएक्‍स्पोला शुभेच्छा दिल्या.यावेळी रंगनाथ काळे, माजी आमदार कल्याण काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, उद्योजक सचिन मुळे, प्रदीप सोळुंके, प्रमोद खैरनार, बालाजी शिंदे, राम पवार, शिवाईच्या पुष्पा काळे, नीता देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. रंजना देशमुख, डॉ. अनुपमा पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती.आपल्यावरील संस्कार रामायणातूनशासन हे सातत्याने चालणारे काम आहे. सारखे कायदे बदलतात, सध्याचे जग ऑटोमेशनचे असल्याने नोकऱ्या कमीच होत जाणार आहेत. कुठल्याही सरकारसमोर हा प्रश्‍न असेल. त्यामुळे निवडणुकात कितीही टोकाची टीका केली तरी नंतर सोबत काम करायलाच हवे. तसेच आपल्यावर जे संस्कार आहेत ते रामायणातून झाले आहेत. ते विसरता कामा नये, असेही यावेळी खासदार सुळे यांनी नमूद केले.https://www.esakal.com/marathwada/fight-unity-drought-supriya-sule-business-mahaexpo-151914

Read More

श्रवणयंत्रे बसविण्याचा विक्रम

श्रवणयंत्रे बसविण्याचा विक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणेमटा ऑनलाइन | Updated:Oct 27, 2018, 04:00AM ISTजन्मत: आलेला कर्णबधीरपणा आणि वयोमानामुळे आलेले बहिरेपण यामुळे आयुष्यातून निघून गेलेल्या ध्वनिलहरी पुन्हा आणण्याचे विक्रमी कार्य शुक्रवारी घडले. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात आठ तासांमध्ये चार हजार ८०० विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसविण्याचा विक्रम प्रस्थापित झाला असून, या सर्वांच्या आयुष्यात ध्वनिलहरींचे आनंददायी पर्व आले. ही घटना जागतिक विक्रम प्रस्थापित करणारी ठरली असून, याची नोंद 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने घेतली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्रे बसविण्यात आली. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत हा विक्रम रचला गेला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, स्टार्की हीअरिंग फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप आणि आर. व्ही. एस. एज्युकेशन अँड चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यापूर्वी आठ तासांच्याच कालावधीत एनआरएचएम आणि मणिपूर सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात तीन हजार ९११ श्रवणयंत्रे जोडण्यांचा विक्रम करण्यात आला होता. खासदार शरद पवार, आमदार अजित पवार, स्टार्की हीअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम ऑस्टिन, टीम ऑस्टिन, रोहित मिश्रा, सुरेश पिल्लई, आर. वेंकटरमण, कल्याणी मांडके, नंदकुमार फुले, महेश जोशी, रमेश थोरात, विठ्ठल कामत, प्रभाकर देशमुख, रवी शास्त्री, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, नीलेश राऊत आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, 'एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने श्रवणयंत्रे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याची जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. जागतिक दर्जाचा उपक्रम पार पडला याचा आनंद वाटतो.''गेल्या पाच वर्षांपासून राज्यात विविध भागांत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. २०१३ पासून सुमारे १५ हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या वेळी त्याची व्याप्ती वाढविण्यात आली असून, एकाच दिवशी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सहा हजार जणांना वाटप करण्याचे ठरविण्यात आले,' असे सुळे यांनी सांगितले................मुलांनी प्रथमच ऐकल्या ध्वनिलहरीया उपक्रमाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. शिवछत्रपती क्रीडासंकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे तब्बल सहा संचामध्ये या जोडण्या करण्यात येत होत्या. तपासणी, जोडणी आणि समुपदेशन आदीच्या सहा संचात या जोडण्या करण्यात आल्या. त्यामुळे आयुष्यात प्रथमच ध्वनिलहरी कानावर पडल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा ऐकायला येऊ लागल्याने आनंदाश्रू अनावर झाले होते. काही पालकांनी आपली मुले आता ऐकू आणि बोलू लागतील, याचे समाधान बोलून दाखवत होते.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/the-record-of-hearing-aids/articleshow/66383452.cms?utm_source=mt&utm_medium=Whatsapp&utm_campaign=onpagesharing

Read More

मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा

राजेंद्रकृष्ण कापसेसोमवार, 22 ऑक्टोबर 2018उत्तमनगर - "मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर तारीख मागितली आहे. परंतु, राज्यातील 60 तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचतगट महासंघाचे 14 व्या लाभांश वाटप कार्यक्रमानंतर त्या सकाळशी बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, मागील 10-15 दिवसापासून नुकताच मी मराठवाडा विदर्भातील काही दुष्काळी जिल्हात तालुक्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात परिस्थिती गंभीर होणार आहे. वेळीच मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा. असे त्यांनी सांगितले.https://www.esakal.com/pune/chief-minister-should-immediately-announce-drought-150961

Read More

खंडणी मागणाऱ्या आमदारावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी- सुप्रिया सुळे

Published 24-Oct-2018 04:21 ISTपुणे- भाजपच्या आमदाराने खंडणी घेऊन १ आठवडा होऊन गेला तरी मुख्यमंत्री गप्पच आहेत. मुलींना उचलून नेऊ म्हणणारे आमदार राम कदम व खंडणी मागणारे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक असताना क्लिनचिट दिली की काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुळे यांच्या हस्ते मंगळवार (दि.२३) रोजी दौंड तालुक्यातील केडगाव येथे दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुळे पुढे म्हणाल्या की, या सरकारने देशात जीएसटी आणली परंतु त्यामुळे सर्वच सुखी आहेत का? महागाई संपली का? नोटबंदीमुळे काळा पैसा संपला का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या सरकारने जीएसटी आणण्यासाठी घाई केल्यामुळे महागाई वाढली आहे. या फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु जमिनीत 1 फुटही पाणी मुरले नाही. त्यामुळे या सरकारमुळे कोणाचेच भले झाले नाही. राज्यात भारनियमन सुरू आहे. कोळशाचा तुटवडा नसताना  भारनियमन कसे? यात घोटाळा असल्याचा आरोप सुळे यांनी बोलताना केला. तसेच दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सुळे यांनी दिला. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, दौंड पंचायत समिती सभापती झुंबर गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर, उपाध्यक्ष शशिकांत माने, मधुकर दोरगे, बाजार समितीचे सभापती सागर फडके, प्रकाश नवले, नितीन दोरगे यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/2018/10/24042157/Supriya-sule-demands-to-take-againts-MLA-Yogesh-Tilekar.vpf

Read More

मी मुख्यमंत्र्यांसारखं खोट बोलतं नाही : सुप्रिया सुळे

योगिराज प्रभुणे, सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 पुणे : सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार या योजनेतून केली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. "जलयुक्त शिवार'च्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे टोलवत त्या म्हणाल्या, "माननीय मुख्यमंत्री जेव्हा पुण्यात येतील तेव्हा हे त्यांना जरूर विचारा. हा त्यांचा, त्यांच्या सरकारचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम' आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. कारण, त्यांच्यासारखे नुसते आरोप करण्याची माझी स्टाइल नाही आणि खोटं मी बोलत नाही.'' "जलतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार हा कार्यक्रमाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाली. पुरेसा अभ्यास न करता घाईघाईने योजना राबविली. हा "पब्लिसिटी स्टंट' असेल. मुख्यमंत्री जाहिरात करण्याच्या मागे जास्त असतात. कार्यक्रमाची अंमलबजावणीतील त्रुटी आणि त्याचा मिळणारा प्रतिसादाचा आढावा घेतला नाही. त्यातच हा प्रकल्पातील तांत्रिक चुका आणि नंतर पैशाचीपण कमतरता झाल्याने सगळा गोंधळ झाला आहे,'' असे त्या म्हणाल्या. "जलयुक्त शिवारासाठी सरकारने किती कामे केली आणि श्रमदानातून किती कामे उभी राहिली, याचाही हिशेब सरकारने दिला पाहिजे. सरकारने त्यांचा "फ्लॅगशिप प्रोग्रॅम राबविला. त्यासाठी "पब्लिसिटी' केली,'' असे सुळे यांनी सांगताच यावर तुमची भूमिका काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ""मी खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याच्या कामाचे "क्रेडिट' घेत नाही आणि त्यांच्यासारखे बिनबुडाचे आरोपही करत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आता बोलत आहेत. पण, सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची फसवणूक या सरकारने आणखी एका कार्यक्रमातून केली.'' http://www.sarkarnama.in/i-dont-speak-lie-cm-sule-29931

Read More

मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा

राजेंद्रकृष्ण कापसे09.14 AMउत्तमनगर - "मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर तारीख मागितली आहे. परंतु, राज्यातील 60 तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचतगट महासंघाचे 14 व्या लाभांश वाटप कार्यक्रमानंतर त्या सकाळशी बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, मागील 10-15 दिवसापासून नुकताच मी मराठवाडा विदर्भातील काही दुष्काळी जिल्हात तालुक्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात परिस्थिती गंभीर होणार आहे. वेळीच मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा. असे त्यांनी सांगितले.https://www.esakal.com/pune/chief-minister-should-immediately-announce-drought-150961

Read More

जैन समाजाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय : खा. सुप्रिया सुळे

प्रशांत चवरेबुधवार, 17 ऑक्टोबर 2018भिगवण : जैन समाजाच्या वतीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार पुढाकार घेतला जातो ही आनंदाची बाब आहे. पाणी टंचाई दुर, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यामध्ये भारतीय जैन संघटनांसारख्या संघटना महत्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. जैन समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चित उल्लेखनीय आहे असे मत बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे येथील जैन स्थानकांमध्ये सुरु असलेल्या चातुर्मास कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, डि.एन. जगताप, शंकरराव गायकवाड, जयदीप जाधव, धनाजी थोरात, जैन संघाचे संघपती अशोक रायसोनी, अध्यक्ष अभय रायसोनी, रवींद्र रायसोनी, विजय बोगावत,संजय रायसोनी उपस्थित होते. यावेळी बोलताना साध्वी सन्मितीजी म्हणाल्या, राजकारण व समाजकारण यांचा उत्तम मिलाफ पवार कुटुंबामध्ये पहावयास मिळतो. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातुन राबविण्यात येत असलेले मुलींसाठी सायकल वाटप, सर्वसामान्यांच्या आरोग्यांसाठी शिबीर असे उपक्रम कौतुकास्पद आहेत. प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी केले सुत्रसंचालन राहुल गुंदेचा यांनी केले तर आभार संजय रायसोनी यांनी मानले.https://www.esakal.com/pune/contribution-jain-community-very-important-said-supriya-sule-150224

Read More

शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या : खासदार सुप्रिया सुळे

कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले. By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: October 12, 2018 09:52 PM | Updated: October 12, 2018 09:57 PM धरणगाव - कृषीप्रधान असलेल्या देशात शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, युवतीवरील अत्याचार व युवकांची व्यसनाधिनता विरोधात त्यांनी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले.प्रास्तविक संस्थेचे सचिव डॉ.मिलींद डहाळे यांनी केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर , राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, पी.आर.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी, संचालीका निनाताई पाटील, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, मुख्याध्यापक प्रा.बी.एन. चौधरी, के.एम. पाटील, सी.के.पाटील उपस्थित होते.तुझ्या प्रश्नाचे उत्तर मोदीसाहेबच देतील...ईश्वर पवार या विद्यार्थ्याने आपली परिस्थिती गरीबीची असल्याने मी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू शकलो नाही. आरक्षण घटकात मोडत नसल्याने वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यावा लागला. शेतकºयाच्या लेकरांना सरकार फी माफी देत नाही तर दुसरीकडे मल्टीनॅशनल कंपन्यांना भरमसाठ सवलती सरकार देत आहे. तेव्हा हे सरकार १२५ कोटी जनतेचे आहे की मल्टीनॅशनल कंपन्यांचे..? असा प्रश्न उपस्थित करताच टाळ्यांचा गजर झाला. यावेळी खासदार सुळे मात्र निरुत्तरीत झाल्या. या प्रश्नाचे उत्तर मोदी साहेबच देवू शकतील. मी तुझा प्रश्न त्यांना टिष्ट्वटर वरुन विचारते व तुला कळवते असे त्यांनी सांगितले.http://www.lokmat.com/jalgaon/give-farmers-farmers-guarantee-their-farm-loan-waiver-mp-supriya-sule/

Read More

दुष्काळी परिस्थितीचे भान राखा; सत्कारांवर खर्च नको : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवागुरुवार, 11 ऑक्टोबर 2018पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''राज्यातील बहुतांश ठिकाणी दुष्काळाची स्थिती गंभीर असुन बळीराजासह सर्वच घटक दुष्काळामुळे अडचणीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शक्यतो आदर सत्कारावरील आपल्या दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्कार यांवर खर्च करण्याचे टाळावे. आपले बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे.सत्कारावर होणारा खर्च टाळून ती रक्कम दुष्काळ निवारणासाठी वापरावी. खरेतर या स्थितीची सरकारी यंत्रणेने आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःहून दखल घेऊन दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाचे नेते राज्यात दुष्काळ नाहीच असे चित्र उभा करीत आहेत. हे खेदजनक आणि असंवेदनशीलतेचे अत्युच्च टोक देखील आहे. कसलीही घोषणा अथवा पुर्वसूचना न देता राज्यात ठिकठिकाणी भारनियमन, विजकपात सुरु आहे. शेतीला आणि पिण्याला पाणी देतानाही हात आखडता घेतला जात आहे, असा आरोप ही सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. दुष्काळ जाहीर करायला विलंब का होतोय? सरकारने संवेदनशीलता जपत मराठवाडा आणि अन्य ठिकाणी जेथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे, त्या त्या ठिकाणी तातडीने दुष्काळ जाहिर करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.http://www.esakal.com/pune/be-aware-drought-conditions-do-not-spend-felicitates-said-supriya-sule-149138

Read More

मुख्यमंत्र्यांचा `पायगुण' जळगावकरांना अंधार देणारा ठरला : सुप्रिया सुळे

योगेश महाजन, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018अमळनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण' असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण' अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली आहे. अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. भाजप सरकारने 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, 24 तास वीज मिळते काय ? जळगावमध्ये सकाळी सात ते दहा व सायंकाळी सात ते दहा असे रोज सहा तास भारनियमन होत आहे. या सरकारचे नियोजन नसून, जनता वेठीस धरली जात आहे. शेतकरी बांधव दुष्काळात होरपळले आहेत. मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही, अशीही टीका खासदार सुळे यांनी यावेळी केली. राम कदमांबद्दल मुख्यमंत्र्यांची चुप्पी दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम हे महाराष्ट्रातील मुलींबद्दल असभ्य भाषेचा वापर करतात हे भारतीय संस्कृतीसाठी लांच्छनास्पद आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने त्यांनी आमदार कदम यांना चाप द्यायला हवा होता. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर काही तरी कारवाई होणे अपेक्षित होते. हेच जर "राष्ट्रवादी'च्या एखाद्या आमदाराने केले असते तर त्याला जनतेसमोर नेऊन जाहीर माफी मागायला लावले असते. लोकप्रतिनिधींनी असे बोलणे योग्य नाही आणि यावर गृहमंत्र्यांनी साधलेली चुप्पी याचा आपण निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. http://www.sarkarnama.in/amalner-supriya-sule-devendra-fadanvis-29575

Read More

भाजपची सत्तेची मस्ती जनताच उतरवेल : सुप्रिया सुळे

सरकारनामा ब्युरो, गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच पदाधिकारी चुकिचे विधान करीत आहेत. आमदार चक्क मुलीना पळवून नेण्याच्या गोष्टी करतात, परंतु गृहविभाग त्यांच्यावर काहीही कारवाई करीत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाजपला खरोखरच सत्तेची मस्ती आली आहे, जनताच आता ती मस्ती उतरवेल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांराशी बोलतांना व्यक्त केले.  सुळे काल (ता. 10) पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, की राज्यात महिलामध्ये असुरक्षततेची भावना आहे. महिलांच्या मनात भिती आहे. त्यांच संरक्षण हे सरकार करू शकत नाही, त्यात सत्तेतील आमदारच मुलीना पळविण्याची विधान करतात. त्यांच्यावरही कारवाई होत नाहीत. राज्यातील सरकार संपूर्णपणे असंवेदनशील झालेले आहे. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. आता जनताच त्यांची मस्ती उतरविणार आहे. दुष्काळ जाहीर करावामराठवाडा, खानदेश भागात पाण्याची परिस्थित भीषण आहे. परंतु हे शासन झोपलेले आहे. अद्यापही दुष्काळ जाहीर करून उपययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्‍टोबरनंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. जर दुष्काळाची स्थिती आहेच तर मग तो जाहीर करण्यासाठी शासन विलंब का करीत आहे. दुष्काळ निवारण्यासाठीही शासन वेळकाढू धोरण राबवित आहे. असा आरोपही त्यांनी केला. http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-bjp-government-29587

Read More

धनंजय... लोकसभेचा विचार करताय काय ? - सुप्रिया सुळे

राजेभाऊ मोगल03.28 PMऔरंगाबाद - धनंजय... तुमचे हिंदीतले अतिशय सुंदर भाषण आज प्रथमच ऐकले, लोकसभेचा विचार करताय का काय ? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मंगळवारी (ता.09) चांगलीच गुगली टाकली. मुंडे यांनीही या गुगलीने गोंधळून न जाता स्माईल दिली. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित संविधान बचाव परिषदेत बोलतांना विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या भाषणात हिंदीतील काही वाक्य आणि काही हिंदी शेरचा उल्लेख होता. त्यांच्या नंतर भाषणाला उठलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांच्याकडे पाहत आज तुमचे हिंदीतील भाषण प्रथमच ऐकले, खूप छान हिंदी बोलता, कोणी हिंदी बोलू लागले की तो लोकसभेचा विचार करतो आहे का काय ? असा विचार आमच्या मनात येतो, तुमच्या मनात ही तसा काही विचार नाही ना ? अशी गुगली टाकली. या गुगलीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष मुंडे काय प्रतिक्रिया देतात याकडे गेले, मात्र त्यांनी या गुगलीवर फक्त एक स्माईल देत या गुगलीला सन्मानजनक उत्तर दिले.तत्पूर्वी, बोलतांना मुंडे यांनी मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती व्यक्त केली. http://www.esakal.com/marathwada/dhananjay-mundhe-are-you-think-about-lok-sabha-says-supriya-sule-148657

Read More

राम कदम मुलींना पळविण्याची भाषा करतात तरी मुख्यमंत्री गप्प कसे ? सुप्रिया सुळेंचा सवाल

सरकारनामा ब्युरोमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 औरंगाबाद: भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याची भाषा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही तरी बोलाव ही अपेक्षा होती. पण ते बोलले नाही, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकाराचा निषेध करायला हवा होता ?अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.  संविधान बचाव, देश बचाव मेळाव्यात सुळे बोलत होत्या. भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे त्याठिकाणी तात्काळ दुष्काळ जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली. संविधान जाळण्याचा प्रयत्न जेव्हा दिल्लीत झाला, तेव्हा संविधान बचावसाठी सर्वात आधी राष्ट्रवादीने आंदोलन केले आणि त्यानंतर देशभरात सुरू झाले याची आठवण करून देतांनाच महिलांची सुरक्षितता गंभीर बाब असून सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांनी यापुढे महिलांच्या बाबतीत चुकीची, अपमान करणारी वक्तव्य केली तर राष्ट्रवादी ते कदापी सहन करणार नाही असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला. तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? सुप्रिया सुळे यांच्याआधी धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. आपल्या तडाखेबंद भाषणाचा शेवट मुंडे यांनी हिंदी शायरीने केला. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या अस्सलिखित हिंदींचे कौतुक करतांनाच तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? असा चिमटा देखील काढला. धनंजय मुंडे एवढ चांगले हिंदी बोलतात, यावरून ते लोकसभेची तयारी तर करत नाही ना? असे मला वाटले. पण ते औरंगाबादेत बोलत आहेत, आणि हा त्यांचा मतदारसंघ नाही असे म्हणत त्यांनी मुंडे यांची फिरकी घेतली. http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-cm-29513 

Read More