1 minute reading time
(113 words)
मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा
09.14 AM
उत्तमनगर - "मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर तारीख मागितली आहे. परंतु, राज्यातील 60 तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा." अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, मागील 10-15 दिवसापासून नुकताच मी मराठवाडा विदर्भातील काही दुष्काळी जिल्हात तालुक्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात परिस्थिती गंभीर होणार आहे. वेळीच मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा. असे त्यांनी सांगितले.
https://www.esakal.com/pune/chief-minister-should-immediately-announce-drought-150961