1 minute reading time (226 words)

खंडणी मागणाऱ्या आमदारावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी- सुप्रिया सुळे


Published 24-Oct-2018 04:21 IST

 
सुळे पुढे म्हणाल्या की, या सरकारने देशात जीएसटी आणली परंतु त्यामुळे सर्वच सुखी आहेत का? महागाई संपली का? नोटबंदीमुळे काळा पैसा संपला का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या सरकारने जीएसटी आणण्यासाठी घाई केल्यामुळे महागाई वाढली आहे. या फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु जमिनीत 1 फुटही पाणी मुरले नाही. त्यामुळे या सरकारमुळे कोणाचेच भले झाले नाही. राज्यात भारनियमन सुरू आहे. कोळशाचा तुटवडा नसताना  भारनियमन कसे? यात घोटाळा असल्याचा आरोप सुळे यांनी बोलताना केला. तसेच दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सुळे यांनी दिला.
 
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, दौंड पंचायत समिती सभापती झुंबर गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर, उपाध्यक्ष शशिकांत माने, मधुकर दोरगे, बाजार समितीचे सभापती सागर फडके, प्रकाश नवले, नितीन दोरगे यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करावा
मी मुख्यमंत्र्यांसारखं खोट बोलतं नाही : सुप्रिया स...