'तुम्ही खात जा, आम्ही क्लीन चीट देत जाऊ'

'तुम्ही खात जा, आम्ही क्लीन चीट देत जाऊ'

Published On: May 7, 2018 11:38 PM IST | Updated On: May 7, 2018 11:38 PM ISThttps://lokmat.news18.com/video/supriya-sule-on-clean-chit-289429.html

Read More

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’, भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’, भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 4, 2018 3:44 PM supriya-sule- बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात बंद असलेले छगन भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते तुरुंगातून येण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देर आए दुरुस्त आए अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना देर आए दुरुस्त आए, भगवान के घर देर है अंधेर नहीं, छगन भुजबळांना न्याय मिळाला असं म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद, पण आरोप सिद्ध न होता एखाद्याला जेलमध्ये राहावं लागतं याची खंत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचे नेते भुजबळ यांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले. सरकारनं त्यांना जामीन मिळू नये असा खूप प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्रमहाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Read More

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे

Dipak Pathak Updated Friday, 4 May 2018 - 12:10 PM sushma-andhare-and-supriya-sule टीम महाराष्ट्र देशा- आपल्या आक्रमक भाषण शैली मुळे अल्पावधीत महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या या राज्यात चळवळीतल्या सक्रिय महिला कार्यकर्त्यावर झालेल्या घटनेची सरकारने चौकशी करावी अशी मागणी सुळे यांनी केली आहे. बुधवारी रात्री मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. प्रा. सुषमा अंधारे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अंधारे या एका कार्यक्रमातून परतत होत्या. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला तीनवेळा जोराची धडक दिली अशी माहिती समोर येत आहे. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीला मार लागला आहे. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर इंदूर बायपासवर मृदंग रेस्टॉरंटसमोर असलेल्या पुलालगत हा थरार साडेतीन मिनिटे सुरू होता. अंधार असल्याने धडक देणाऱ्या गाडीत किती लोक होते हे समजू शकले नाही. मात्र धडक देणाऱ्या गाडीच्या चालकाचा स्टेअरिंगवरील हात दिसत होता. त्याच्या हातात रंगीबेरंगी दोरे बांधल्याचे दिसत होते अशी माहिती सुषमाताई अंधारे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. कोण आहेत प्रा.सुषमा अंधारे ?प्रा. सुषमा अंधारे या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.

Read More

अजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप

अजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप

स्मिताच्या_लग्नात_अक्षता_वाटताना_ताईज्ञानेश सावंत , 09.34 AMपुणे : आर. आर अर्थात, आबा आज असते तर...लग्नात स्मिता यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, त्या आबांनी पूर्ण केल्या असत्या. पण, आबांचं नसणं स्मिताला जाणवू नये, या भावनेतून स्मिताला आपली मुलगी मानून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्मिता आणि आनंद यांचा विवाह मंगळवारी शाही थाटात पार पाडला. स्मिता यांचं लग्न ठरविण्यापासून ते धुमडाक्‍यात करण्यापर्यंतची जबाबदारी अजितदादांनी वधूपित्याच्या भावनेतून पूर्ण केली. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नात उपस्थित असलेल्या मान्यवरांना अक्षता वाटप केले.लग्न मांडवाच्या प्रवेशद्वारात खुद्द अजितदादा वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करायला उभे होते. विशेष म्हणजे, स्मिता आणि आनंदला शुभार्शिवाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देता यावं म्हणून दादांनी एरवी भोवती जमणाऱ्या गर्दीला लांब ठेवलं होतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद हे मंगळवारी विवाहबध्द झाले. हडपसरमधील लक्ष्मी लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.स्मिता आणि आनंद यांच्या लग्नाची बोलणीही अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानातच झाली होती. तेव्हाच, 'मला मुलगी नसल्याने स्मिता ही माझ्यासाठी मुलीसारखी आहे,' असे सांगून त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. हो सोहळा थाटात व्हाव यासाठी अजितदादाच थोरात कुटुंबियांशी बोलत होते. लग्न जवळ आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दादा अक्षरशः लगीनघाईत होते. या काळात ते रोज पाटील आणि थोरात कुटुंबियांशी बोलून तयारीचा आढावा घेत होते. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही पदाधिकाऱ्यांना स्मिता यांच्या लग्नाचे निमंत्रण देत, लग्नाला आवर्जजून येण्याचा आग्रह त्यांनी केला होता.लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे, सोमवारीही दादांनी स्मिता, आनंद यांच्याशी बोलून काही राहिले नाही? याची विचारपूस केली. पवार कुटुंबातील बहुतांश मंडळी आज विवाह सोहळ्याच्या गडबडीत होती. सायंकाळी लग्न असल्याने दादा दुपारी चार वाजताच मांडवात आले. काही मिनिटे थांबून पाहुणे मंडळीशी चर्चा केली. त्यानंतर परिसरातील विवाहसोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी दादा बाहेर पडले. ते आटोपून पुन्हा पाच वाजता लक्ष्मी लॉनमध्ये आले. आल्याबरोबर दादा थांबले ते लक्ष्मी लाॅनच्या गेटवर. विवाहासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी!http://www.esakal.com/pune/ajit-pawar-supriya-sule-attend-rr-patil-daughter-wedding-pune-113412

Read More

प्रसाद लाड यांच्या कंपनीमार्फत मानवी तस्करी -सुप्रिया सुळे

प्रसाद लाड यांच्या कंपनीमार्फत मानवी तस्करी -सुप्रिया सुळे

असं असूनही पारदर्शकतेची ग्वाही देणारं भाजप सरकार गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. Sachin Salve | Updated On: Apr 28, 2018 05:45 PM IST मुंबई, 28 एप्रिल : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मानवी तस्करी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय.सुप्रिया सुळे यांना ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे विधान  प्रसाद लाड यांच्यावर हल्ला केलाय. प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मानवी तस्करी कऱण्यात येत असल्याचं समारो आलंय. असं असूनही पारदर्शकतेची ग्वाही देणारं भाजप सरकार गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. supriya_sule_on_ladSupriya Sule✔@supriya_sule .@sureshpprabhu BCAS ने स्पष्टपणे सांगितलेय की क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस ही प्रसाद लाड यांची कंपनी मानवी तस्करीच्या प्रकरणात गुंतलीय. एवढा गंभीर आरोप देखील भाजपमध्ये पावन झाला का @narendramodi जी, @Dev_Fadnavis जी हे सर्व तुमच्या डोळ्यादेखत होतेय.हाच का तुमचा पारदर्शक कारभार ? 3:30 PM - Apr 27, 2018यावर प्रसाद लाड यांनी सुप्रिया सुळे यांना प्रतिउत्तर दिलंय. माणूस मोठा झाला की असे आरोप होत असतात.. राष्ट्रवादीनं माझा धसका घेतलाय. माझ्या कंपनीवर कुठल्याही गुन्हेगारी स्वरुपाचा आरोप नाहीये. त्यामुळे जे आरोपी सुप्रिया सुळेंनी केलेत ते खोटे असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हंटलंय.

Read More

दौंड अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा - खा. सुळे

दौंड अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा - खा. सुळे

प्रफुल्ल भंडारी, सोमवार, 30 एप्रिल 2018[caption id="attachment_1126" align="alignnone" width="300"] सिद्धेश्वर_हॉस्पिटल_दौंडदौंड (पुणे) : राज्यातील पहिला अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त तालुका म्हणून दौंड तालुक्याची ओळख निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेसह तालुक्यातील खासगी रूग्णालये, दौंड मेडीकल असोसिएशन व अन्य संस्थांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.दौंड येथे सिध्देश्वर मॅटर्निटी, सर्जिकल व जनरल हॅास्पिटलचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले व त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह डॅा. दत्तात्रेय लोणकर, राणी शेळके, झुंबर गायकवाड, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, आनंद थोरात, डॅा. सुनीता कटारिया, बबन लव्हे, अॅड. अजित बलदोटा, नंदकुमार पवार, आदी उपस्थित होते. हॅास्पिटलचे प्रमुख डॅा. मयूर महादेव भोंगळे यांनी प्रास्ताविकात या सुसज्ज हॅास्पिटल मधील उपलब्ध सुविधा आणि औषधोपचारांविषयी माहिती दिली.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ``नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात देशात कुपोषण आणि स्त्रीभ्रुणहत्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ते अतिशय गंभीर आहे. विशेषकरून महिलांमध्ये रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आणि बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी हेल्थ कार्ड उपलब्ध करून देत त्याद्वारे रक्त तपासणी, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, आदींची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील महिला अॅनिमिया मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.``त्या पुढे म्हणाल्या, ``जैव वैद्यक कचर्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नसल्याने आपल्या आरोग्यासह पर्यावरणावर देखील विपरीत परिणाम होत आहे. या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तालुक्यातील डॅाक्टर मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेऊन कुरकुंभ येथील कंपन्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून निधी उभारून प्रकल्प केला कार्यान्वित केला पाहिजे.``शशांक मोहिते व रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर माजी सभापती रंगनाथ फुलारी यांनी आभारप्रदर्शन केले.खासदार सुप्रिया सुळे यांनी डॅा. मयूर व डॅा. अनुराधा भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करीत गरीब आणि गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे काबाडकष्ट करून तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करणारे महादेव भोंगळे व हिराबाई भोंगळे यांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.http://www.esakal.com/pune/make-daund-tehsil-anemia-and-malnutrition-free-says-supriya-sule-113263

Read More

दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता हिच्या लग्न समारंभाच्या वेळी आई सुमन ताई पाटील भावनिक

सुप्रिया ताईंकडून सुमनताईंचे सांत्वन. https://www.youtube.com/watch?v=G_Aat5RJldE&feature=youtu.be

Read More

Hinjewadi water shortage: Draw water from Mulshi, else buy, suggests MP Supriya Sule

Hinjewadi water shortage: Draw water from Mulshi, else buy, suggests MP Supriya Sule

While villages adjoining Hinjewadi receive water supply every two days for 20 minutes, housing societies near IT Parks in Hinjewadi have to completely rely on water tankers. Supriya Sule, MP, during the meeting.(HT PHOTO) Updated: Apr 27, 2018 23:22 ISTShrinivas DeshpandeHindustan Times, Pune For the past few months, six villages, including Hinjewadi, Maan, Chande, Nande, Marjuni and Mahalunge, have been facing a severe drinking water crisis. To tackle the issue, officials from various organisations and Sule discussed various available options. After meeting Hinjewadi industries association (HIA) members, Supriya Sule, member of parliament, instructed the district administration to check whether water from the Mulshi regional water scheme can be distributed to the affected areas. She also instructed the administration to check whether there is a need to buy water from Mangir Baba water supply scheme at Wakad. Sule said,"Getting enough drinking water is a basic human right. Areas near Information Technology (IT) parks are facing serious water crisis. We will definitely sort out the issue by coordinating with all the departments." While villages adjoining Hinjewadi receive water supply every two days for 20 minutes, housing societies near IT Parks in Hinjewadi have to completely rely on water tankers. In a bid to resolve the drinking water crisis in Hinjewadi, Maan and other adjoining villages, Sule conducted a meeting with officers of the Hinjewadi industries association (HIA), Maan gram panchayat, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC), public works department, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) on Monday . In addition to this, Sule also instructed the administration to start the construction work of roads from Hinjewadi to Mhalungi, Chande Nande to Mhalungi and Shivaji chowk to Wakad on top priority basis. For facilitating this, land acquisition must be completed after a discussion with local farmers and officers should pay close attention to getting the right compensation for farmers, said Sule. The construction work of these roads have been pending for many years now. Therefore, Supriya Sule demanded the administration to immediately clear all hurdles and start the work as soon as possible. Besides water shortage, garbage menace has also been continuously inconveniencing residents. As there is no official space available for garbage disposal in these six villages, residents had earlier met the authorities on multiple occasions demanding a solution, but in vain. To resolve the issue, Sule advised residents to conduct a separate meeting with the newly appointed district collector and submit a detailed project report to him. https://www.hindustantimes.com/pune-news/hinjewadi-water-shortage-draw-water-from-mulshi-else-buy-suggests-mp-supriya-sule/story-ZN8CMGjN8BQSWdkopmjSnJ.html

Read More

महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसंदर्भात खा. सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसंदर्भात खा. सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यास तुमचं सरकार सपशेल अपयशी ठरलं - सुळे By Dipak Pathak Updated Wednesday, 25 April 2018 - 11:40 AM[caption id="attachment_1115" align="alignnone" width="300"] महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसंदर्भात खा. सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून महाराष्ट्रातील संख्या जास्त आहे, असं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे. मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण पंधरा पटींनी वाढलं आहे. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रात या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यास तुमचं सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा करुन आपला पक्ष सत्तेवर आला आहे. आपण जनतेला महिला सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल अशी यंत्रणा निर्माण करणार होता. परंतु यातील एकही गोष्ट सध्या घडताना दिसत सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे. खा.सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्रदेवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, महाराष्ट्रमुंबई.मा. महोदय,महिला सुरक्षेच्या अतिशय गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहित आहे. आपल्या शासनकाळात महिलांवरील अत्याचारात लक्षणीयरित्या वाढ झाली असून काही गुन्ह्यांमध्ये तर महाराष्ट्राचा आलेख देशामध्ये उंचावलेला दिसतो. एनसीआरबीच्या अहवालात याची नोंद असून या नोंदी महाराष्ट्राला भूषणावह नाहीत.महिला सुरक्षेचा मुद्दा करुन आपला पक्ष सत्तेवर आला आहे. आपण जनतेला महिला सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल अशी यंत्रणा निर्माण करणार होता. परंतु यातील एकही गोष्ट सध्या घडताना दिसत नाही. आपल्या शासनकाळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे, यामागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या सरकारमध्ये गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. हे खाते आपण स्वतःकडेच का ठेवले आहे याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळाले नाही. मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण तब्बल पंधरा पटींनी वाढल्याचे वाचून धक्का बसला. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय असून देशात तसेच महाराष्ट्रातही त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाल्यास या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्यास आपले सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या अपयशाचा तुरा आपण आपल्या गृहमंत्री कम मुख्यमंत्री पदाच्या शिरपेचात लावणे पसंत कराल काय ?मुख्यमंत्री साहेब, राज्यातील पोलिस यंत्रणा गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अक्षरशः सैरभैर असून त्यांना खंबीर अशा गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेचा देशातच नव्हे तर विदेशातही डंका आहे. परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव आपल्या सरकारच्या काळात आहे.आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात गृहखात्यासाठी नेहमीच सक्षम मंत्री दिला. यामुळे पोलिस खाते अधिक सजगपणे आपले काम करु शकत होते.मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी खास छेडछाडविरोधी पथकाची आघाडी सरकारच्या काळात स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस यंत्रणेचा वचक होता. त्यांना कठोर शासनही होत होते. परंतु आपल्या सरकारच्या काळात अशी प्रभावी यंत्रणा दिसत नाही.आपणास मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळताना गृहखात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळतच नाही हे स्पष्ट होत असून कृपया आपण या खात्याचा भार दुसऱ्या एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवावा, जेणेकरुन गृहखाते सक्षम होईल. महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील. राज्यातील लेकींचा आपणास दुवा मिळेल.मुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या पत्राची दखल घेऊन गृहखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक अवश्य कराल ही अपेक्षा आहे.धन्यवाद.सुप्रिया सुळे, खासदार

Read More

एनडीए प्रशासनाविरोधात कोंढवे-धावडे ग्रामस्थांचे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू

एनडीए प्रशासनाविरोधात कोंढवे-धावडे ग्रामस्थांचे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू

*एमपीसी न्यूज - [caption id="attachment_1101" align="alignnone" width="300"] एनडीए_आंदोलन शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे व अहिरेगाव या गावातील ग्रामस्थांना एनडीए प्रशासनाकडून एनडीए हद्दीतून प्रवास करताना व दैनंदिन कामे करताना एनडीए प्रशासनाकडून अडवणूक केली जाते. त्याविरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एनडीए प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे. मागील दोन तासांपासून कोंढवे-धावडे येथील एनडीए गेट बाहेर हे आंदोलन सुरू आहे. * 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी धनगरबाबा यांच्या उत्सवासाठी आलेल्या भाविकांवर एनडीए प्रशासनाकडून लाठीहल्ला करण्यात आला आणि या भाविकांना बाहेर हाकलण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तसेच एनडीए हद्दीत शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे या गावांची आराध्य दैवत असलेल्या काळुबाई देवस्थान, बापूज्जीबुवा देवस्थान, कमळादेवी देवस्थान आणि धनगरबाबा देवस्थान याची मंदिरे आहेत. या ठिकाणी वर्षानुवर्षे पूजा अर्चा सन उत्सव होत आले आहेत. परंतू 2107 पासून हे या ठिकाणी सण उत्सव करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास व सण उत्सव साजरे करण्यास ग्रामस्थांना कायमस्वरुपी परवानगी मिळावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

Read More

खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण पंधरा पटींनी वाढलं आहे. खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्ररश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: 25 Apr 2018 11:12 AM मुंबई : महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून महाराष्ट्रातील संख्या जास्त आहे, असं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे. या दाव्यासाठी त्यांनी एनसीआरबीच्या अहवालाचा दाखला दिला आहे.मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण पंधरा पटींनी वाढलं आहे. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रात या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यास तुमचं सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे.या पत्रात सुप्रिया सुळे यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसल्याचंही अधोरेखित केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "गृहमंत्री नसल्याने पोलिस खात्यात नेतृत्त्वाचा अभाव आहे. त्यामुळे गृहखात्याचा भार दुसऱ्या सक्षम मंत्र्यांकडे सोपवा, जेणेकरुन गृहखातं सक्षम होईल. परिणामी महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील आणि  राज्यातील लेकींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल."सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्रदेवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, महाराष्ट्रमुंबई.मा. महोदय,महिला सुरक्षेच्या अतिशय गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहित आहे. आपल्या शासनकाळात महिलांवरील अत्याचारात लक्षणीयरित्या वाढ झाली असून काही गुन्ह्यांमध्ये तर महाराष्ट्राचा आलेख देशामध्ये उंचावलेला दिसतो. एनसीआरबीच्या अहवालात याची नोंद असून या नोंदी महाराष्ट्राला भूषणावह नाहीत.महिला सुरक्षेचा मुद्दा करुन आपला पक्ष सत्तेवर आला आहे. आपण जनतेला महिला सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल अशी यंत्रणा निर्माण करणार होता. परंतु यातील एकही गोष्ट सध्या घडताना दिसत नाही. आपल्या शासनकाळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे, यामागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या सरकारमध्ये गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. हे खाते आपण स्वतःकडेच का ठेवले आहे याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळाले नाही. मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण तब्बल पंधरा पटींनी वाढल्याचे वाचून धक्का बसला. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय असून देशात तसेच महाराष्ट्रातही त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाल्यास या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्यास आपले सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या अपयशाचा तुरा आपण आपल्या गृहमंत्री कम मुख्यमंत्री पदाच्या शिरपेचात लावणे पसंत कराल काय ?मुख्यमंत्री साहेब, राज्यातील पोलिस यंत्रणा गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अक्षरशः सैरभैर असून त्यांना खंबीर अशा गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेचा देशातच नव्हे तर विदेशातही डंका आहे. परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव आपल्या सरकारच्या काळात आहे.आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात गृहखात्यासाठी नेहमीच सक्षम मंत्री दिला. यामुळे पोलिस खाते अधिक सजगपणे आपले काम करु शकत होते.मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी खास छेडछाडविरोधी पथकाची आघाडी सरकारच्या काळात स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस यंत्रणेचा वचक होता. त्यांना कठोर शासनही होत होते. परंतु आपल्या सरकारच्या काळात अशी प्रभावी यंत्रणा दिसत नाही.आपणास मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळताना गृहखात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळतच नाही हे स्पष्ट होत असून कृपया आपण या खात्याचा भार दुसऱ्या एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवावा, जेणेकरुन गृहखाते सक्षम होईल. महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील. राज्यातील लेकींचा आपणास दुवा मिळेल.मुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या पत्राची दखल घेऊन गृहखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक अवश्य कराल ही अपेक्षा आहे.धन्यवाद.सुप्रिया सुळे, खासदारhttp://abpmajha.abplive.in/mumbai/mp-supriya-sule-writes-to-cm-over-women-safety-issues-535211

Read More

मुख्यमंत्री, माझ्या पत्राची दखल घ्याल ना?: सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री, माझ्या पत्राची दखल घ्याल ना?: सुप्रिया सुळे

Published On: Apr 25 2018 1:17PM | Last Updated: Apr 25 2018 1:17PM महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा… मुंबई : पुढारी ऑनलाईन महिला सुरक्षेचा मुद्दा करुन भाजप सत्तेवर आले. पण, राज्य सरकारने त्यासंदर्भात कोणतीही पाऊले उचलली नाहीत. यामागील मोठे कारण म्हणजे राज्य सरकारमध्ये गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. हे खाते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच का ठेवले आहे? असा सवाल राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. यासंदर्भातील एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. गृहखात्याचा भार एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवा अशी विनंतीही त्यानी या पत्रातून केली आहे आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात गृहखात्यासाठी नेहमीच सक्षम मंत्री दिला. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेचा देशातच नव्हे तर विदेशातही डंका आहे. परंतु पोलिसांना आवश्यक असणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव जाणवत असल्याची खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात गुन्हेगारांवर वचक बसविण्यास सरकार सपशेल अपयशी ठरलेय. या अपयशाचा तुरा आपल्या गृहमंत्री कम मुख्यमंत्रीपदाच्या शिरपेचात लावणे पसंत कराल काय?, असा खोचक सवालही खासदार सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. सुप्रिया सुळेंचे पत्र जसे आहे तसे....महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा… मा. महोदय, महिला सुरक्षेच्या अतिशय गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. आपल्या शासनकाळात महिलांवरील अत्याचारात लक्षणीयरित्या वाढ झाली असून काही गुन्ह्यांमध्ये तर महाराष्ट्राचा आलेख देशामध्ये उंचावलेला दिसतो. एनसीआरबीच्या अहवालात याची नोंद असून या नोंदी महाराष्ट्राला भूषणावह नाहीत. महिला सुरक्षेचा मुद्दा करुन आपला पक्ष सत्तेवर आला आहे. आपण जनतेला महिला सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल अशी यंत्रणा निर्माण करणार होता. परंतु यातील एकही गोष्ट सध्या घडताना दिसत नाही. आपल्या शासनकाळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे, यामागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या सरकारमध्ये गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. हे खाते आपण स्वतःकडेच का ठेवले आहे याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळाले नाही. मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण तब्बल पंधरा पटींनी वाढल्याचे वाचून धक्का बसला. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय असून देशात तसेच महाराष्ट्रातही त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाल्यास या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्यास आपले सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या अपयशाचा तुरा आपण आपल्या गृहमंत्री कम मुख्यमंत्री पदाच्या शिरपेचात लावणे पसंत कराल काय ? मुख्यमंत्री साहेब, राज्यातील पोलीस यंत्रणा गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अक्षरशः सैरभैर असून त्यांना खंबीर अशा गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीसांच्या कार्यक्षमतेचा देशातच नव्हे तर विदेशातही डंका आहे. परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव आपल्या सरकारच्या काळात आहे.आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात गृहखात्यासाठी नेहमीच सक्षम मंत्री दिला. यामुळे पोलीस खाते अधिक सजगपणे आपले काम करु शकत होते. मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी खास छेडछाडविरोधी पथकाची आघाडी सरकारच्या काळात स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस यंत्रणेचा वचक होता. त्यांना कठोर शासनही होत होते. परंतु आपल्या सरकारच्या काळात अशी प्रभावी यंत्रणा दिसत नाही. आपणास मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळताना गृहखात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळतच नाही हे स्पष्ट होत असून कृपया आपण या खात्याचा भार दुसऱ्या एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवावा, जेणेकरुन गृहखाते सक्षम होईल. महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील. राज्यातील लेकींचा आपणास दुवा मिळेल. मुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या पत्राची दखल घेऊन गृहखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक अवश्य कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.सुप्रिया सुळे, खासदार http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Supriya-sule-write-a-Latter-For-CM-Devendra-Fadanvis%C2%A0/

Read More

खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले पत्र

खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले पत्र

By MahaVoice Admin 2018-04-25 [caption id="attachment_1085" align="alignnone" width="300"] सुप्रिया सुळे यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र संदीप रणपिसे मुंबईमुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण पंधरा पटींनी वाढलं आहे:महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून महाराष्ट्रातील संख्या जास्त आहे, असं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे. या दाव्यासाठी त्यांनी एनसीआरबीच्या अहवालाचा दाखला दिला आहे.मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण पंधरा पटींनी वाढलं आहे. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रात या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यास तुमचं सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे.या पत्रात सुप्रिया सुळे यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसल्याचंही अधोरेखित केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "गृहमंत्री नसल्याने पोलिस खात्यात नेतृत्त्वाचा अभाव आहे. त्यामुळे गृहखात्याचा भार दुसऱ्या सक्षम मंत्र्यांकडे सोपवा, जेणेकरुन गृहखातं सक्षम होईल. परिणामी महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील आणि  राज्यातील लेकींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल." सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्रदेवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, महाराष्ट्रमुंबई.मा. महोदय,महिला सुरक्षेच्या अतिशय गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहित आहे. आपल्या शासनकाळात महिलांवरील अत्याचारात लक्षणीयरित्या वाढ झाली असून काही गुन्ह्यांमध्ये तर महाराष्ट्राचा आलेख देशामध्ये उंचावलेला दिसतो. एनसीआरबीच्या अहवालात याची नोंद असून या नोंदी महाराष्ट्राला भूषणावह नाहीत.महिला सुरक्षेचा मुद्दा करुन आपला पक्ष सत्तेवर आला आहे. आपण जनतेला महिला सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल अशी यंत्रणा निर्माण करणार होता. परंतु यातील एकही गोष्ट सध्या घडताना दिसत नाही. आपल्या शासनकाळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे, यामागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या सरकारमध्ये गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. हे खाते आपण स्वतःकडेच का ठेवले आहे याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळाले नाही. मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण तब्बल पंधरा पटींनी वाढल्याचे वाचून धक्का बसला. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय असून देशात तसेच महाराष्ट्रातही त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाल्यास या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्यास आपले सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या अपयशाचा तुरा आपण आपल्या गृहमंत्री कम मुख्यमंत्री पदाच्या शिरपेचात लावणे पसंत कराल काय ?मुख्यमंत्री साहेब, राज्यातील पोलिस यंत्रणा गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अक्षरशः सैरभैर असून त्यांना खंबीर अशा गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेचा देशातच नव्हे तर विदेशातही डंका आहे. परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव आपल्या सरकारच्या काळात आहे.आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात गृहखात्यासाठी नेहमीच सक्षम मंत्री दिला. यामुळे पोलिस खाते अधिक सजगपणे आपले काम करु शकत होते.मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी खास छेडछाडविरोधी पथकाची आघाडी सरकारच्या काळात स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस यंत्रणेचा वचक होता. त्यांना कठोर शासनही होत होते. परंतु आपल्या सरकारच्या काळात अशी प्रभावी यंत्रणा दिसत नाही.आपणास मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळताना गृहखात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळतच नाही हे स्पष्ट होत असून कृपया आपण या खात्याचा भार दुसऱ्या एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवावा, जेणेकरुन गृहखाते सक्षम होईल. महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील. राज्यातील लेकींचा आपणास दुवा मिळेल.मुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या पत्राची दखल घेऊन गृहखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक अवश्य कराल ही अपेक्षा आहे.धन्यवाद.सुप्रिया सुळे, खासदार http://www.mahavoice.com/State/details/14294/--------

Read More

MP Supriya Sule pushes for route extension to Khadakwasla

MP Supriya Sule's letter to Chief Minister Devendra Fadnavis

Sarang Dastane| TNN | Updated: Apr 25, 2018, 14:05 IST Baramati MP Supriya SulePUNE: Baramati MP Supriya Sule has thrown her weight behind the demand to extend the Pimpri-Swargate Metro rail route.Similar demands have already been made by various political leaders and citizens' groups to extend the route to Nigdi, Chakan, Hadapsar and Katraj.Now Sule has added her voice to the chorus, seeking the extension of Metro services from Swargate to Khadakwasla in a letter to chief minister Devendra Fadnavis. In the letter, Sule has requested the chief minister to initiate steps to prepare a detailed project report (DPR) for the extension. She further wrote that many tourists use Sinhagad Road to visit various historical forts and tourist spots, which causes congestion in the entire area, inconveniencing residents and daily commuters. "A Metro line from Swaragte to Khadakwasla would reduce such hardship. A provision of Metro junction at Khadakwasla would also be ideal," Sule said in the letter.Khadakwasla and adjacent regions come under Sule's Baramati constituency. Located on city's periphery, Khadakwasla has witnessed significant growth in the last few years, in terms of residential and commercial projects. Work on the Metro rail work has been initiated on two corridors in Pune and Pimpri Chinchwad, while work on the third line - between Shivajinagar and Hinjewadi - will likely begin in the near future.Steps have also been initiated to prepare DPR for the proposed Metro routes towards Nigdi and Katraj.https://timesofindia.indiatimes.com/city/pune/mp-supriya-sule-pushes-for-route-extension-to-khadakwasla/articleshow/63908794.cms?utm_source=twitter.com&utm_medium=social&utm_campaign=TOIPune

Read More

Impeachment of CJI: NCP will continue to fight against wrongdoings in judiciary, says Supriya Sule

Impeachment of CJI: NCP will continue to fight against wrongdoings in judiciary, says Supriya Sule

"The impeachment notice might have been rejected, but our fight against the wrongdoings would continue,” Supriya Sule, the daughter of NCP chief Sharad Pawar, said. NCP MP Supriya Sule at Patrakar Sangh during the press conference to inform on Bhim Mohotsav at Warje Malwadi on April 29. Express Photo By Pavan Khengre,23.04.18,Pune. Express News Service | Pune | Updated: April 24, 2018 10:49:21 amNCP MP Supriya Sule on Monday said the impeachment notice against the Chief Justice of India might have been turned down by the Chairperson of Rajya Sabha, but her party would continue the fight against the wrongdoings in the Judiciary. “Vice-President Venkaiah Naidu has rejected the impeachment notice of the Opposition parties against Chief Justice of India, Dipak Mishra. The notice might have been rejected, but our fight against the wrongdoings would continue,” Sule, the daughter of NCP chief Sharad Pawar, told reporters in the city. While the ruling BJP has alleged that the Opposition was spoiling the image of Judiciary in the country, Sule said the first voice against the wrong happenings in the judicial system was raised by the judicial members and only later the Opposition started raising it. “There is a threat to the unity of the country in the present situation as there has been rise in agitations with people from different castes demanding their rights,” said Sule. She said it was in the principles of the Congress to be connected with the public and resolve their problems. “The Congress and NCP are brothers,” she said. Sule also said that the fast held by BJP leaders alleging the Opposition of not allowing function of Parliament was a drama. “It was the duty of the ruling party to ensure the functioning of the Rajya Sabha and Lok Sabha. It was the ruling party that deliberately ensured there is no work in the parliament and instead allege the Opposition for it. If the Prime Minister was so concerned about the proceedings of the House, then the fast should have been done in the first week of the parliamentary session,” she said. http://indianexpress.com/article/cities/pune/impeachment-of-cji-ncp-will-continue-to-fight-against-wrongdoings-in-judiciary-says-supriya-sule-5149405/

Read More

निवडणूका जिंकण्याच्या नादात भाजप सत्ता राबवायला विसरली : सुप्रिया सुळे

निवडणूका जिंकण्याच्या नादात भाजप सत्ता राबवायला विसरली  : सुप्रिया सुळे

भाजप खासदारांनी देशभरात केलेल्या उपोषणानंतर सुप्रिया सुळे यांची टीका  लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: April 23, 2018 06:55 PM | Updated: April 23, 2018 07:16 PM[caption id="attachment_1063" align="alignnone" width="300"] सत्तेमध्ये आहेत तर निर्णय करावेत. ठळक मुद्देभाजप खासदारांचे उपोषण म्हणजे निव्वळ फार्स :खासदार सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी भाजपवर प्रहारजनतेला नेत्यांप्रती आदरभाव नसण्याला नेतेही जबाबदार सत्तेमध्ये आहेत तर निर्णय करावेत. पुणे :  निवडणुका जिंकण्याच्या नादात भारतीय जनता पक्ष सत्ता राबवायला विसरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली आहे.  परिवर्तन युवा परिषदेच्या कार्यक्रमात  त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी नेत्यांप्रती असणारा आदरभाव आता नसून यासाठी राजकारणीही जबाबदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात सरपंचही मंत्रालयात काम करून घेत असत आता मात्र तशी स्थिती राहिलेली नाही. लोकसभा चालवण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी ते विसरत असून एक दोन वेळा कामकाज बंद पडल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही असेही त्या म्हणाल्या. सलग पाच आठवडे आम्ही कामं सोडून अधिवेशनाला जातो आणि कामकाज होत नाही हे अत्यंत चुकीचं असल्याचंही त्या म्हणाल्या. एकीकडे सत्ताधारी भाजप विरोधक कामकाज करू देत नाहीत म्हणून उपोषण करत असताना त्यांहे मित्रपक्ष घोषणाबाजी करतात ही मॅचफिक्सिंग नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. करायचंच होत तर भाजपने पहिल्या आठवड्यात उपोषण करायचं होत आणि ११ ते ५ करण्याऐवजी २४ तास करायचं होत असा टोलाही त्यांनी लगावला. उपोषण करून प्रश्न सुटत असतील तर आपण सगळे मिळून उपोषण करूयात असेही त्या म्हणाल्या. हे सर्व प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार होते असा ताशेरा त्यांनी मारला. भाजपचे उपोषण म्हणजे फक्त फार्स होता. त्यांच्याकडे सत्ता आहे तर त्यांनी निर्णय घ्यावेत असे आव्हान त्यांनी दिले. अवघड परिस्थितीतून मार्ग काढणारी व्यक्ती खरी नेता असते असे म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Read More

खडकवासलापर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न

खडकवासलापर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: April 24, 2018 02:07 AM | Updated: April 24, 2018 02:07 AM खडकवासला पर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न धायरी : खडकवासला विधानसभा मतदार संघातील धायरी, वडगाव बु.व नांदेड सिटी परिसरातील नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला व परिसरातील नागरिकांना असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. स्वारगेट ते खडकवासला मेट्रो होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पाठपुरावा करेल, असे त्यांनी नमूद केले.धायरी येथील राजयोग सोसायटी, मियामी, क्रॉस ओव्हर काऊंटी, मधुकोश, समर्थ नगर येथील व्यंकटेश, एक्स्टसी सोसायटी अशा १५हून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी समोरासमोर चर्चा केली. कचरासमस्या, रस्ते, पाणी व स्वच्छता याबाबतीत नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदने दिली, तर जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने नांदेड सिटी येथे ‘भवताल’ या संस्थेने आयोजित केलेल्या सीडबॉल निर्मिती व वृक्ष लागवड निर्मिती कार्यक्रमात सहभागी झाल्या. प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. धायरी येथील राजयोग सोसायटी, मियामी, क्रॉस ओव्हर काऊंटी, मधुकोश, समर्थ नगर येथील व्यंकटेश, एक्स्टसी सोसायटी अशा १५हून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी समोरासमोर चर्चा केली.

Read More

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी करणार ? : सुप्रिया सुळे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी करणार ? : सुप्रिया सुळे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी पुणे :  सासवड - जेजुरी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दुभाजकांची दुरावस्था झाली आहे. या मार्गाची डागडुजी कधी करणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर अपघाताचे काही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना हा सवाल विचारला आहे. या मार्गावर सतत अपघात होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांचे जीव धोक्यात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या मार्गाची डागडुजी झाली पाहिजे असेही त्या म्हटल्या आहेत. या मार्गाशी अनेक भक्तांच्या, भाविकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ होतोय. त्यामुळे या दुभाजकांची दुरावस्था झाल्याने या भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे पुणे आणि आसपासच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हागणदारी मुक्त महाराष्ट्र या अभियानावर देखील प्रश्न उपस्थित केले होते. तसेच हा केवळ भ्रम आहे, मुख्यमंत्री हॅलिकॉप्टरने फिरतात त्यांना रस्त्यावरील सत्य माहित नाही, असेही त्यांनी म्हटले होते. एकूणच निवडणूक जवळ आली असल्याचे यातून दिसून येत आहे, त्यामुळे निवडणूक जवळ असल्याकारणाने आरोप प्रत्यारोपांचे हे सत्र असेच सुरु राहणार का ? असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित झाला आहे. http://mahamtb.com/Encyc/2018/4/23/Supriya-sule-asking-questions-to-CM-Fadnavis-.amp.html?__twitter_impression=true

Read More

शेतकऱ्याला पाण्यासाठी आत्महत्या करावी लागते हे दुर्दैवी-सुप्रिया सुळे

शेतकऱ्याला पाण्यासाठी आत्महत्या करावी लागते हे दुर्दैवी-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.  पाण्यासाठी आत्महत्या हे दुर्दैवी लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 23, 2018 9:03 PMमहाराष्ट्रात  शेतकऱ्याला पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते ही बाब दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना समान पाणी पुरवठा मिळाला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसेच आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे. इंदापूर येथील इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या इतर प्रश्नांवरही भाष्य केले. मागील चार वर्षांपासून म्हणजेच भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात स्त्री भ्रूण हत्या वाढल्या आहेत. महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत असे नीती आयोगाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यावरून सरकार कशा प्रकारे कारभार करते ते दिसून येते आहे असेही त्यांनी स्पष्ट केले महिला पत्रकाराबद्दल फेसबुक वर राष्ट्रवादीचा पदाधिकारी सुरुज चव्हाण याच्या अश्लील वक्तव्य पक्ष काय कारवाई करणार यावर त्या म्हणाल्या की, सुरज चव्हाण ला पक्षाने नोटीस पाठवली असून त्याने दिलगिरी व्यक्त करून पोस्ट डिलीट केली आहे.त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वसन त्यांनी यावेळी दिले. २५ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सरकारविरोधात आंदोलन करणार आहे. एनडीए प्रशासनाकडून जनतेला जो त्रास होतो आहे त्याविरोधात हे आंदोलन असणार आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. नाणार प्रकल्पाबाबत त्यांना विचारले असता, शरद पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते नाणारला जातील आणि तिथेच ते आपली भूमिका स्पष्ट करतील असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Read More

हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी  आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

[caption id="attachment_1043" align="alignnone" width="300"] हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणीआणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा सुप्रिया सुळे यांचे अधिकाऱ्यांना आदेशपुणे, दि. 23 (प्रतिनिधी) – हिंजवडीसह माण भागातील सहा गावांतील पाणी, रस्ते आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा. त्यासाठी स्थानिक शेतकरी, मुळशी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्वच्छ या संस्थेशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढावा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकार्यांना दिल्या.हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, ग्रामपंचायत पदाधिकारी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमारडीए आणि मुळशी तालुका प्रशासनातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.हिंजवडीसह, माण, चांदे, नाडे, मारुंजी आणि म्हाळुंगी या सहा गावांना सध्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तो सोडविण्यासाठी मुळशी प्रादेशिक पाणी योजनेतून पाणी घेता येईल. किंवा वाकड येथील मांगीरबाबा पाणी पुरवठा योजना विकत घेता येईल, तसे नियोजन करावे, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी अधिकार्यांना दिली.याबरोबरच हिंजवडी ते म्हाळुंगी, चांदे नांदे ते म्हाळुंगी, आणि वाकड येथील शिवाजी चौक या भागातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. त्यासाठी भूसंपादन आवश्यक असल्येने स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा, त्यांना योग्य मोबदला मिळावा याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे तातडीने योग्य तो मार्ग काढून लवकरात लवकर काम सुरु करावे, अशा सुचना सुप्रिया सुळे यांनी केल्या. या सहा गावांतील कचरा टाकण्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत येत आहे. तो सोडविण्यासाठी नव्या जिल्हाधिकार्यांशी चर्चा करावी. त्यासाठी येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी त्यांची वेळ घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सुचनाही सुळे यांनी मांडली. येत्या गुरुवारी (26) ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत असोसिएशनने बैठक घ्यावी, असेही सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत सुचविले. याशिवाय, वाहतूक सुधारणा, सिग्नल यंत्रणा, पीएमपीचे प्रश्न, सुरक्षा आदींबाबतही त्यांनी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.मुळशीच्या सभापती कोमल साखरे, माजी सरपंच सागर साखरे यांच्यासह शंकर मांडेकर, सुनील चांदेरे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी कर्नल चरणजीतसिंग भोगल, केदार परांजपे, ऋचा आंबेकर, अनिल पटवर्धन, उन्मेश भतीजा, रत्नपारखी, मृणाल शिवले, शंकर साळकर आदी या बैठकीला उपस्थितीत होते. नगरसेवक विशाल तांबे करणार मदतकचरा प्रश्नावर पुणे महापालिकचे राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी त्यांच्या प्रभागात उत्तम काम केले आहे. कचरा वर्गीकरण करून ओला कचऱ्यासाठी त्यांनी बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वच्छ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. तो प्रकल्प हिंजवडी भागातही राबविता येईल का, याची पाहणी तांबे हे करणार आहेत. शिवाय सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही काही संस्था त्यांच्याकडे असून त्या आपण पुरवू, असे आश्वासन तांबे यांनी हिंजवडी वासीयांना या बैठकीत दिले.

Read More