1 minute reading time (159 words)

खडकवासलापर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न

खडकवासलापर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: April 24, 2018 02:07 AM | Updated: April 24, 2018 02:07 AM खडकवासला पर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न

धायरी : खडकवासला विधानसभा मतदार संघातील धायरी, वडगाव बु.व नांदेड सिटी परिसरातील नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला व परिसरातील नागरिकांना असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. स्वारगेट ते खडकवासला मेट्रो होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पाठपुरावा करेल, असे त्यांनी नमूद केले. धायरी येथील राजयोग सोसायटी, मियामी, क्रॉस ओव्हर काऊंटी, मधुकोश, समर्थ नगर येथील व्यंकटेश, एक्स्टसी सोसायटी अशा १५हून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी समोरासमोर चर्चा केली. कचरासमस्या, रस्ते, पाणी व स्वच्छता याबाबतीत नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदने दिली, तर जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने नांदेड सिटी येथे ‘भवताल’ या संस्थेने आयोजित केलेल्या सीडबॉल निर्मिती व वृक्ष लागवड निर्मिती कार्यक्रमात सहभागी झाल्या. प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

धायरी येथील राजयोग सोसायटी, मियामी, क्रॉस ओव्हर काऊंटी, मधुकोश, समर्थ नगर येथील व्यंकटेश, एक्स्टसी सोसायटी अशा १५हून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी समोरासमोर चर्चा केली.

MP Supriya Sule pushes for route extension to Khad...
स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका सुरू करावी- ख...