'शेतात पिकवलेला कांदा शेतकऱ्याला जाळावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते?' असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. मनमाड तालुक्यातील अंदरसुल इथं त्यांची सभा झाली. त्याआधी त्यांनी नगरसूलमध्ये एका शेतकऱ्याची भेट घेतली. कांद्याला भाव नसल्यानं कृष्णा डोंगरे यांनी 5 एकर शेतातला कांदा जाळला होता. नांदगावमध्ये शेतकऱ्याने जाळलेला कांदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना भेट देणार आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याने काल आपल्या 5 एकर शेतातील कांदा जाळला होता. सुप्रिया सुळे येवल्यात आल्या असता त्यांनी नगरसूल येथे जाऊन कृष्णा डोंगरे यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी त्यांनी जळालेला कांदाही त्यांनी सोबत घेतला. ‘यूपीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का नाही?’ असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. ‘आम्ही राजीनामा देऊ, आम्ही राजीनामा देऊ, हे म्हणजे लांडगा आला रे आला यासारखं झालं आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाघ राहिलेला नाही. त्यांचं आत मांजर झालं आहे. दोन कोंबडे भांडतात तसे उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे रोज भांडतात.’ अशी जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी केली. शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे
मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेच्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी एक्स्लुझिव्ह बातचीत केली. गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. मात्र मी माझा कट्टा पाहिला नाही. त्यामुळे त्याविषयी बोलणार नाही. परंतु मी फक्त माझी जन्मतारीख लक्षात ठेवते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपला पाठिंबा नाहीचशिवसेनेचे मंत्री राजीनामा 18 फेब्रुवारी रोजी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार अस्थिर होईल. त्यामुळे सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का याबाबत प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळेंनी आमचा भाजपला पाठिंबा नसल्याचं सांगितलं. शरद पवार दोन वर्षांपूर्वी पाठिंबा देण्याचं बोलले होते. त्यानंतर एकदाही बोलले नाहीत. आम्ही कोणाबरोबरही जाणार नसल्याचं पवार काही दिवसांपूर्वी बोलले होते, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. फालतू विचार करण्यासाठी वेळ नाहीसरकारच्या विरोधात कोणते मुद्दे असल्याचं तुम्हाला वाटतं, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी याबाबत फारसा विचार केलेला नाही. फालतू विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो. मी लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहे." फडणवीस सरकारचा कारभार घाणेरडाअडीच वर्षातील फडणवीस सरकारचा सर्वात घाणेरडा कारभार असल्याचा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी केला. सत्ता स्थापनेपासूनच हे घाणेरडं सरकार आहे. महाराष्ट्राचा नंबर वन घसरला. सत्तेतील दोन पक्षात मोठं भांडण सुरु आहे. 25 वर्ष युतीमध्ये होते. 25 वर्षांनंतर दोनच वर्ष सत्तेत आले. सत्तेत सोबत असूनही भांडण एवढं टोकाला पोहोचलं आहे की, ते एकमेकांचं पाणी काढत आहेत. ही मराठी संस्कृती नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पवारांना विरोध ही खेकडा प्रवृत्तीशरद पवारांना पद्मविभूषण हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. पवारांनी हा पुरस्कार राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. पण शरद पवारांना विरोध ही खेकडा प्रवृती आहे. महाराष्ट्रातील काही जणांना पवारांना विरोध करण्याची सवय आहे, असंही सुळे म्हणाल्या.
'बोलायचं एक आणि करायचं दुसरं, म्हणजेच 'पार्टी विथ डिफरन्स'... आज स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे कार्यक्रम भाजपनं सुरु केले आहेत. डिजिटल इंडिया सोडा, पण संसदेतच वाय-फाय चालत नाही तर देश कसा डिजिटल होईल.' असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्या आज पिंपरीमध्ये बोलत होत्या. पिंपरी-चिंचवडीमधील एका सभेत बोलताना आज सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'मोदी यांना दुसऱ्या कुणाचं ऐकूच येत नाही. त्यांना फक्त स्वत:चंच ऐकू येतं.' असं म्हणत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला. 'संसदेतच वाय-फाय चालत नाही, तर देश कसा डिजिटल करणार?''संसदेत सुरक्षेच्या कारणास्तव मोबाइल चालीत नाही हे मान्य. पण वाय-फाय देखील चालत नाही? ज्या संसदेत 800 लोकं काम करतात तिथे जर वायफाय चालत नसेल तर देश कसा डिजिटल होईल? बहुतेक त्यांनी जियोला कंत्राट दिलेलं नसेल' अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी केली. 'मागच्या 20 वर्षात मुंबईत सर्वाधिक बकाल झाली''सरकार तुमचेच आहे, मग मुंबई मनपात माफिया राज कसे काय चालू आहे? एका बाजूला शिवसेनेला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसर्या बाजूला त्यांनाच घेऊन सरकार चालवायचे. असा दुटप्पी सुरु आहे. मुंबई मागच्या २० वर्षात जेवढी बकाल झाली. तेवढी ती कधीच झाली नव्हती.' असं म्हणत शिवसेना-भाजप मुंबईच्या कारभावरही सुळेंनी टीका केली. 'सरकारचा जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च''भाजप-शिवसेना राज्यात सत्तेत आल्यापासून कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. हेच पैसे जर मुंबई मनपाच्या शिक्षणावर खर्च केले असते तर विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या असत्या.' असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला.
एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, 'यालाच पार्टी विथ डिफ्रन्स' म्हणायचं का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला विचारला. युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? भाजपला नेमकी कोणती पारदर्शकता हवी आहे, या प्रश्नांची उत्तरं भाजपनं द्यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. "आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढतो. मी मुंबईत राहते, रस्ते, पाणी या समस्या आहेत. मी स्वतः "कन्फ्युज" आहे, कारण मनपा मधला रस्ते घोटाळा हा भाजपने काढला, भाजप म्हणतं आम्हाला पारदर्शी कारभार हवा, मग रस्ते घोटाळ्याचे काय झालं? त्याचा थेट आरोप शिवसेनेवर आहे, मग आता यांच्यात युती होणार असेल तर सर्व भ्रष्ट लोकं एकत्र येत आहेत", असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजप नेत्यांनीच बाहेर काढला. आता तीच भाजपा शिवसेनेशी युती करत आहे, असं सुप्रिया म्हणाल्या. शिवसेना आणि मुंबई पालिकेच्या कारभारावर भाजप आरोप करते. मग आता हेच त्यांचं पार्टी विथ डिफ्रन्स आहे का? आधी आरोप करायचे आणि मग युती करायची हेच पार्टी विथ डिफ्रन्स आहे का असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. शिवसेना, मनसे आता मॉर्डन होत आहे. पूर्वी व्हॅलेंटाईन डेला ते विरोध करायचे, आता ते सेलिब्रेट करत आहेत. त्यांच्या नेत्यांची मुलंच इंग्रजी माध्यमांतील शाळांत शिकत आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला.
यशवंतराव चव्हाण साहेबांनी शरद पवारांना मानसपुत्र मानलं होतं, मात्र त्यांचा वारसा कोण चालवेल हे काळच ठरवेल, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या आज पुण्यात बोलत होत्या. पवारांच्या संसदीय कार्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय शालेय निबंध आणि महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा अजित पवार सांभाळणार की सुप्रिया सुळे या प्रश्नावर आजवर पवार कुटुंबातील कुणीही कधीही जाहीर भाष्य केलं नव्हतं. मात्र आज सुप्रियाताईंनी शरद पवारांचा वारस काळ ठरवेल असं म्हटल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारच्या महिला सुरक्षा, कुपोषण, शेतकरी आत्महत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं. https://www.youtube.com/watch?v=sCCIZE1Fb9U
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची इत्यंभूत माहिती 28 खासदारांनी देण्यात येणार आहे. या 28 जणांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे. परराष्ट्र सचिव आणि डीजीएमओ दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीला माहिती देतील. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह 28 खासदारांचा समावेश आहे. लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) हे खासदारांना सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती देतील. संसदीय समितीला अशी माहिती देण्यास सरकारने आधी नकार दिला होता. उरी हल्ल्याच्या बदल्यावरुन देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक रणकंदन सुरु झालं होतं. मोदी सरकार जवानांच्या बलिदानाची दलाली करत असल्याचं विधान खुद्द राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे या कारवाईची गरज आणि त्यानंतर त्याच्या प्रसिद्धीची गरज का होती? हे सरकारतर्फे विषद केलं जाईल भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला होता. मात्र अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्ट्राईकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
"महिलांच्या नादाला लागू नका, अन्यथा ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असे जळजळीत उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. त्या जळगावमध्ये बोलत होत्या. "भाजप सुडाचे राजकारण करत आहे. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, अशा धमक्या मुख्यमंत्री देत आहेत. मात्र कोणतीही महिला तिच्या गळ्यापर्यंत आल्याशिवाय आवाज काढत नाही. कोणी जर तिला दंश करण्याचा प्रयत्न केला, तर ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आस्मान दाखवण्याची भाषा केल्यानंतर, गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत. सातत्यानं त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हं आहेत.
कोपर्डी बलात्कार प्रकरणात जर येत्या दोन दिवसात चार्जशीट दाखल झालं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आज त्या नाशिकमध्ये बोलत होत्या. कोपर्डीप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र आज कोपर्डी घटनेला 84 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाही. नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते. कपिलची दखल, शेतकऱ्यांची नाहीमुख्यमंत्री कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या तक्रारीची दखल घेतात, पण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. मुख्यमंत्रीको गुस्सा क्यूं आता हैमुख्यमंत्री को गुस्सा क्यूं आता है, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना काम झेपत नसेल तर राजीनामा द्या, पुन्हा विरोधी पक्षनेते व्हा आणि खुशाल भाषण ठोका, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवसेनेला टोलायावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेलाही टोला लगावला. तुम्हालापण लेकी सुना आहेत,स्वाभिमानी महिलांचा स्वाभिमान दुखावू नका, असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा-वसावसा भांडतात, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यातील मावळ येथील महिला मेळव्यात बोलत होत्या. "हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्यांचा पारा नेहमीच चढलेला असतो आणि वसावसा, वसावसा नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतो. आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिलेत, पण इतका चिडका बिब्बा पाहिला नाही. मुख्यमंत्री आमच्यापेक्षा फारकाही लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद हे खूप मोठ आणि त्यात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे खूपच मोठं आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा मान राखावा", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांना गुस्सा क्यूं आता है असं नव्हे तर इनको गुस्साही आता है, असंच म्हणावं लागेल, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली. तसंच कधी त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावं, काय माहित कधी चिडलेले असताना काही फेकून मारतील, असं म्हणत सुप्रियांनी निशाणा साधला. https://www.youtube.com/watch?v=w7g4ef6bM60&feature=youtu.be
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली. बलात्कार होऊन तीन दिवस लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणा का दिरंगाई करतात, असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला अभिमान होता, पण नगरच्या घटनेत पोलिसांनी २ दिवस माहिती बाहेर येऊ नाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावायला एवढा उशीर का केला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभेत पडसाददरम्यान राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत. कारण, विरोधक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत. काल इतर विषय बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र त्याला विधानसभाध्यक्षांनी नकार दिल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केला आहे. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुष्काळाची भीषणता बघून राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आजपासून दोन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर ड्रिप इरिगेशनला पर्याय नाही. त्यामुळे ऊस बंद करणं हा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असलं पाहिजे, त्यामुळे दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याबाबत विचार करा, असंही सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या दुष्काळाला ऊस आणि कारखाने जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढायला मी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नाही, अशी खोचक टिपणी शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
भाजयुमोत काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेवर दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यास भाजपची टाळाटाळ सुरु आहे. त्यामुळे एरवी नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपनं गणेश पांडेला पाठिशी घालावं हे दुर्दैव असल्याची बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर आमच्या पक्षात पांडे असता तर त्याचं आम्ही काय केलं असतं याचा तुम्ही विचारही करु शकत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपला खडे बोल सुनावलेत. त्या आज पुण्यात बोलत होत्या. दुसरीकडे शिवसेनेनंही गणेश पांडेची हकालपट्टी पुरेशी नसल्याचं म्हणत भाजपवर शरसंधान साधलं. इतकंच नव्हे तर याआधीही पांडेनं इतर महिलांशी असंच वर्तन केल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं पांडेवर तातडीनं पोलीसात गुन्हा दाखल करा अशी मागणी नीलम गोऱ्हेंनी केली. पांडेनं मथुरेत झालेल्या भाजयुमोच्या परिषदेवेळी महिला कार्यकर्तीशी अश्लील आणि असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला होता.
सगळ्यांना तुरुंगात टाकलं तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही मराठे आहोत, कधीच डगमगत नाही, असं आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलं आहे. भुजबळांपाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे तुरुंगात जातील, असं विधान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली होतं. त्यानंतर 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुळे यांनी ही भावना व्यक्ती केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "किरीट सोमय्या टीका करतात आणि प्रसारमाध्यमं त्यांची वक्तव्य उचलून धरतात. पण टीका करणारी व्यक्तीही भारदस्त असायला हवी. आम्ही प्रसारमाध्यमांशी सुसंवाद ठेवतो याचा अर्थ त्यांनी आम्हाला 'पप्पू' समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड आदर आहे." 'आम्ही मराठे घाबरत नाही''आम्हाल तुरुंगात डांबलं तरी घाबरणार नाही, मराठे आहोत, डगमगत नाही, शांत बसणार नाही आमचा आवाजही कोणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली की नाही हे नंतर स्पष्ट होईल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ आणि समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. दौंड रेल्वे जंक्शन आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, वाहतुकीची समस्या दौंडवासीयांना मोठ्या प्रमाणात सतावत आहे. त्यासाठी शहराअंतर्गत जाणाऱ्या रेल्वे लाईनखालून भुयारीमार्ग मंजूर केला. मागील वर्षी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या मार्गाचं भूमीपूजन केलं.निधीही मंजूर झाला. पण तरीही नगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यास टाळाटाळ करते असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्यासाठी त्यांनी आज मोर्चाचं आयोजन केलं होतं.
अजितदादाबद्दल अनेक गैरसमज झाले आहेत. असे गैरसमज पसरवले जात आहेत. दादा कमी बोलणारा आहे, अतिशय प्रेमळ, हळवा आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. “अजितदादांवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. पवार फॅक्टर 50 वर्षे महाराष्ट्रात टिकून आहे, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करून अनेकजण मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बोलण्याच्या ओघात त्याच्याकडून चूक झाली. त्याबद्दल त्याने जाहीर ऑन कॅमेरा माफी मागितली. अशी माफी मागायलाही हिम्मत लागते, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. आघाडी टिकावी ही इच्छाकाँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे ही आघाडी टिकावी आणि ती टिकेल असा विश्वास यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. काँग्रेसकडून अहमद पटेल आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे आघाडी टिकवण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मी केंद्रातचं रमलेमी मुख्यमंत्रीपदाची उमेदवार नाही. मी सध्या केंद्रात खुश आहे. महाराष्ट्राचा जो कोणी मुख्यमंत्री होईल, त्याला माझ्या शुभेच्छा, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी अधिवेशनाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं. यावेळी पवार कुटुंबियांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं सांगण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना यावेळी संबोधताना शरद पवार यांनी सिंचनप्रश्नी अजितदादांची पाठराखण करत सुप्रिया सुळेंच्या युवती मेळाव्यातील कामाचं कौतुक केलं. धरणांच्या निकृष्ट कामांसाठी नेते नव्हे तर अभियंते किंवा कंत्राटदार जबाबदार असतात, असं सांगत पवारांनी अजितदादांना क्लीन चिट दिली. तर युवती मेळाव्यामुळे राज्यात नवं नेतृत्त्व तयार होत असल्याचं पवारांनी सांगितलं. दरम्यान यावेळी शरद पवारांनी लवासाप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंह यांच्या आरोपांना पुन्हा उत्तर दिलं. लवासामुळे परिसरातील हजारो लोकांना रोजगार मिळून त्यांचा फायदाच झाला. तसंच लवासामुळे भागातील पडीक जमिनीचा योग्य वापरझाल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी राज्यातील पाणीप्रश्नालाही शरद पवारांनी हात घातला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यात सुरु असलेल्या पाणीप्रश्नाचं वास्तव लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचंही पवार सांगितलं. अधिवेशनातील भाषणात संबोधताना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विकासावर आधारित राजकारण करा आणि टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.
लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधान पद नसावं, या शिवसेनेच्या मताशी आपण सहमत असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत बोलतांना सांगितलं. कदाचित माझ्या पक्षाला माझी भूमिका मान्य नसेल, पण पंतप्रधानपद लोकपाल कक्षेच्या बाहेर असावं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या आधी संसदेत शिवसेना नेते अनंत गंगाराम गीते यांनी पंतप्रधानपद लोकपालाच्या कार्यकक्षेत आणू नये असं म्हटलं होतं. मीडीयाकडून नेत्यांनर होत असलेल्या टीकेच्या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकारण्यांनी लोकशाही पद्धतीने आपसातील मतभेद संपवून लोकांसमोर आपली प्रतिमा सुधारली पाहिजे. लोकपाल हा भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं पहिलं पाऊल आहे. संसदेत याबाबतीत सर्व पक्षांनी सहमती दर्शवली पाहिजे असंही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलतांना म्हटलंय.
राज्यात दरवर्षी १० लाखापेक्षा अधिक लोक अपघातात ठार होतात. त्यामुळं रस्ता सुरक्षा धोरण ठरवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं रस्ता सुरक्षा धोरण प्राथमिक रित्या करण्यात आलं. त्यात प्रवासी विमा, गाडीचे चालक, वाहक यांचा विमा यासह आरोग्य, रस्ते, अपघाती क्षेत्रातल्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या सूचना केल्या आहेत. येत्या काळात राज्यात परिवहन, गृह आणि बांधकाम खात्याच्या माध्यमातून धोरण तयार करण्याची मागणी सुळे यांनी केली.
सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.शिंदखेडाचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील यांच्या मालकीची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतली. मात्र, यासाठी सरकारी भावाने पैसे देण्यात आले. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील गेली दोन वर्ष लढा देत होते. आठवडाभरापूर्वी त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केले होते. रविवारी रात्री जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे’, असे ट्विट त्यांनी केले आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे. — Supriya Sule (@supriya_sule) 28 January 2018विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील सरकारवर टीकस्त्र सोडले. ‘सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले. या सरकारचा धिक्कार असून धर्मा पाटील यांच्या निधनासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. संबंधितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. मर्जीतील कंपन्यांची खिसे भरण्यासाठी आणि पतंजली ची उत्पादने विकण्यासाठी सुरु केलेली ही ‘आपले सरकार’ सारखी नाटके बंद करून टाका, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार @CMOMaharashtra तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले आहे. या सरकारचा धिक्कार असो. — Dhananjay Munde (@dhananjay_munde) 28 January 2018काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. हा सरकारी अनास्थेचा बळी असून या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकर्यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोरेगाव-भीमा द्विशतकपूर्तीनिमित्त आयोजीत राज्यस्तरीय आंबेडकरीसाहित्य संमेलनउमरखेड, दि. २७ व २८ जानेवारी २०१८उद्घाटकीयभाषण - महात्मा जोतीबा फुले आणि राजर्षि शाहू महाराज,गाडगे महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यापुरोगामी विचारांनी ज्या भूमीची मशागत झाली. ज्या भूमीत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्या भूमीत आज आंबेडकरी विचारांना वाहिलेले साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला कोरेगाव-भीमा येथील लढ्याच्या द्विशतकपूर्तीचे निमित्त आहे, ही मोठी अभिमानाची बाब आहे. स्मृतीशेष खा. हरिहरराव सानुले नगरीत सत्यशोधक विचारांचे पाईक असणारे भाऊसाहेब माने यांचे नाव असणा-या विचारमंचावरुन मला या संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या संमेलनाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करते.संमेलनाध्यक्षमा. आनंद गायकवाड,मा. ना. राजकुमार बडोले , मा. महेंद्र भवरे, मा. डॉ. विजय माने, मा. हेमंतकुमार कांबळेतसेच माझे सहकारी संदीप बजोरिया, अॅड.आशिष देशमुख माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर आणि राज्याच्या विविध भागांतून आलेले प्रतिनिधी. मागील दोन महिन्यांपूर्वी मी यवतमाळ जिल्ह्यात पदयात्रेसाठी आले होते. येथील शेतकरी,कष्टकरी,स्त्रियां, मुली, दलित आणि आदिवासी समाजातील सर्व मंडळींना यावेळी भेटले. त्यांचे प्रश्न,त्यांची दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारपुढे त्याची गा-हाणी मांडून ती दूर करण्याच प्रयत्न मी करत आहे. पुढील काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मी जाणारचं आहे. त्यामुळे तुमच्या या निमंत्रणाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते . - कोरेगाव-भीमा सारख्या घटनांनी महाराष्ट्राच्या समाजमनावर जखम केली असताना समतेच्या विचारांचा पुरस्कार करणारे हे साहित्य संमेलन उमरखेड येथे होत आहे. प्रतिगामी शक्तीं एकीकडे प्रबळ होत आहेत की काय अशी भीती व्यक्त होतेय. दलित-सवर्णअसे वाद जाणीवपूर्वक पेटवून देण्याचे प्रयत्नकाहीमनुवादी मंडळी करत आहेत.अश्यावेळीसाहित्यिकांची भूमिका आणि त्यांच्या मानवतावादी लेखनाची यथार्थता अधिक ठळकपणे अधोरेखित होत असतानाच हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून सनातनी विचारांना मोठी चपराक देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.प्रथमतः मी या संयोजन समितीच्या आयोजकांचे अभिनंदन करते, कारण या संयोजन समितीने या संमेलनात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारी सर्वच स्तरातील मंडळी जाणीवपूर्वक सहभागी झाली आहेत. हीआशादायक वसमाधानाची गोष्ट आहे. उपेक्षितसमाजाची अधोगती कशामुळे झाली याची समाजशास्त्रीय आणि त्याचबरोबर अर्थशास्त्रीय मांडणी करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. त्यांच्या पुढाकारातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण आणि नव्या विचारांचा प्रकाश नेण्याचे काम सत्यशोधक समाजाने केले. राजर्षि शाहू आणि डॉ. आंबेडकरांनी तो विचार मोठ्या कल्पकतेने पुढे नेला. समाजात नव्या विचारांची पेरणी केली. त्याचे मोठ्या डौलात आलेले पीक म्हणजे आजचे साहित्य संमेलन असे म्हणता येईल. - या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद होत आहेत, परंतु कार्यक्रम पत्रिकेतील एका परिसंवादाबाबत मला उत्सुकता वाटते. फुले-आंबेडकरांचा शेतीविषयक दृष्टीकोन असा या परिसंवादाचा विषय आहे. हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की, या दोन महान व्यक्तींचं या क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला कदाचित फारसं माहित नसावं. महात्मा फुले यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात मोलाचं काम केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे ते जनक आहेत. शेतकऱ्याचा आसूड या आपल्या क्रांतीकारक ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या परिणामकारकरित्या जनतेसमोर मांडले. समाजाच्या उत्थानासाठी शूद्र-अतिशूद्र, शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी जगला पाहिजे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी घटना लिहिली हे आपणा सर्वांनाच माहित आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्जा, खनिज आणि जलनियोजन या मंत्रीपदी असताना वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरले आहेत.दामोदर, हिराकुंड, सोन प्रकल्पांना चालना देण्याचं कार्य बाबासाहेबांनी केले.तसेचदेशातील कृषीक्षेत्राबाबत त्यांनी अनेक मोलाची टिपणे करुन ठेवली आहेत. त्यांनी त्याबाबत केलेल्या मौलिक सूचनांच्या आधारेच देशातील शेतकरी सक्षम होऊ शकला.त्याचबरोबर केंद्रामध्ये वीजपुरवठा विभाग स्थापन करून वीज, कोळसा, पेट्रोल, अल्कोहोल आणि पाणी या मुख्य स्त्रोतांचासर्व्हे करून निर्मिती क्षमता वाढविण्यावार त्यांनी भर दिलेला आढळून येतो. याची कृतज्ञतापुर्वक नोंद केली पाहिजे. - पुढील दोन दिवसांत या संमेलनात विविध विषयांवर उहापोह होणार आहे. विशेषतः आंबेडकरी विचारांच्या साहित्यविषयक चर्चांचा उपस्थितांना लाभ घेता येणार आहे. विचारांचे हे सोने लुटून प्रत्येकजण घरी जाईल, तेंव्हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रींसाठी लढण्याचे मोठे बळ अथवा उर्जा त्यांना मिळालेली असेल. या संमेलनाचे उद्घाटन करताना या व्यासपीठावरुन मी हीच उर्जा घेऊन पुढे जाणार आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या प्रतिगामी शक्तींना नेस्तानाबूत करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा हा जागर आपल्याला कायम ठेवावा लागणार आहेच. त्यासाठीच यासारख्या साहित्य संमेलनांची गरज आहे.या प्रसंगी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सटाणा येथील एक भाषण आठवत आहे. मनमाडहून चांदवड ला जाताना सटाणा येथे एका सभेला संबोधीत करताना ते असे म्हणाले होते की, देशात जर मनुच्या कायदयानुसार राज्य करणारे लोक पुन्हा...