1 minute reading time (153 words)

दादाबद्दल अनेक गैरसमज, तो अतिशय प्रेमळ, हळवा : सुप्रिया सुळे

दादाबद्दल अनेक गैरसमज, तो अतिशय प्रेमळ, हळवा : सुप्रिया सुळे

अजितदादाबद्दल अनेक गैरसमज झाले आहेत. असे गैरसमज पसरवले जात आहेत. दादा कमी बोलणारा आहे, अतिशय प्रेमळ, हळवा आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’च्या  ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होत्या.

“अजितदादांवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. पवार फॅक्टर 50 वर्षे महाराष्ट्रात टिकून आहे, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करून अनेकजण मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बोलण्याच्या ओघात त्याच्याकडून चूक झाली. त्याबद्दल त्याने जाहीर ऑन कॅमेरा माफी मागितली. अशी माफी मागायलाही हिम्मत लागते, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

आघाडी टिकावी ही इच्छा काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे ही आघाडी टिकावी आणि ती टिकेल असा विश्वास यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. काँग्रेसकडून अहमद पटेल आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे आघाडी टिकवण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मी केंद्रातचं रमले मी मुख्यमंत्रीपदाची उमेदवार नाही. मी सध्या केंद्रात खुश आहे. महाराष्ट्राचा जो कोणी मुख्यमंत्री होईल, त्याला माझ्या शुभेच्छा, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्...
पवारांकडून दादांची पाठराखण तर ताईंचं कौतुक