1 minute reading time (123 words)

'जगाला नैतिकता शिकवता, मग पांडेवर कारवाई का नाही'

'जगाला नैतिकता शिकवता, मग पांडेवर कारवाई का नाही'

भाजयुमोत काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेवर दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यास भाजपची टाळाटाळ सुरु आहे.

त्यामुळे एरवी नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपनं गणेश पांडेला पाठिशी घालावं हे दुर्दैव असल्याची बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर आमच्या पक्षात पांडे असता तर त्याचं आम्ही काय केलं असतं याचा तुम्ही विचारही करु शकत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपला खडे बोल सुनावलेत. त्या आज पुण्यात बोलत होत्या.

दुसरीकडे शिवसेनेनंही गणेश पांडेची हकालपट्टी पुरेशी नसल्याचं म्हणत भाजपवर शरसंधान साधलं.

इतकंच नव्हे तर याआधीही पांडेनं इतर महिलांशी असंच वर्तन केल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं पांडेवर तातडीनं पोलीसात गुन्हा दाखल करा अशी मागणी नीलम गोऱ्हेंनी केली.

पांडेनं मथुरेत झालेल्या भाजयुमोच्या परिषदेवेळी महिला कार्यकर्तीशी अश्लील आणि असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला होता.

 

सुप्रिया, राहुलसह 28 खासदारांना सर्जिकल स्ट्राईकची...
सगळ्यांना आत टाका, आम्ही मराठे घाबरत नाही : सुप्रि...