1 minute reading time
(228 words)
माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला : सुप्रिया सुळे
डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांची 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला. सुप्रिया सुळेंनी ट्वीट करुन, मैत्रीण निर्दोष सुटल्याचे सांगत न्याय मिळाल्याची भावना बोलून दाखवली.
2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी एकूण तीन खटले सुरु आहेत. त्यापैकी दोन सीबीआयकडे आणि एक अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. त्यापैकी ए. राजा यांच्याशी संबंधित खटल्यात सीबीआय कोर्टाने सर्व 17 आरोपींना निर्दोष मुक्त केले. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, डीएमकेच्या माजी खासदार कनिमोळी यांचाही समावेश आहे.
“माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.”, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळेंनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला आहे.
मोबाईलच्या वापरासाठी याआधी ध्वनीलहरी मर्यादित स्वरुपात होत्या. वाढत्या मोबाईलच्या वापरानंतर ध्वनीलहरींची मर्यादा केंद्र सरकारने हटवली. यूपीए सरकारने हा निर्णय घेतला. ध्वनी लहरींची सेकंड जनरेशन म्हणून टूजी म्हटलं गेलं.
तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजांवर स्पेक्ट्रम वाटपात गैरकारभार केल्याचा आरोप झाला. टेलिकॉम कंपन्यांकडून बोली मागण्याऐवजी जो प्रथम येईल, त्याला स्पेक्ट्रम वाटप केलं गेलं. स्वान टेलिकॉमसारख्या अनेक कंपन्यांना फायदा पोहोचवण्यात आल्याचा ठपका आहे.
2G स्पेक्ट्रम घोटाळा पहिल्यांदा 2010 साली समोर आला होता. टूजी स्पेक्ट्रमच्या वाटपामुळे 1 लाख 76 हजार कोटींचं नुकसान देशाला सोसावा लागल्याचा दावा कॅग रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हा रिपोर्ट 2010 मध्ये आला होता.
या घोटाळ्याप्रकरणी दोन याचिका सीबीआयने दाखल केल्या होत्या, तर एक अंमलबजावणी संचलनालयने दाखल केली होती.

काय आहे घोटाळा?
So happy for my friend kanni.. justice done🙏🏽🙏🏽🙏🏽😀 @KanimozhiDMK pic.twitter.com/NffxsIE1ww
— Supriya Sule (@supriya_sule) 21 December 2017