स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी...

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी...

जगातील सर्व कामगारांना सलाम करण्याचा आजचा दिवस अर्थात मे डे. जागतिक पातळीवर कामगारांच्या प्रश्नांची आणि त्यावरील उत्तरे शोधण्याचा हा दिवस. जगभरातील कामगार आपल्या हक्कांच्या लढाया लढत आहेत. आपल्या देशातील कामगारांचा विचार करायचा झाल्यास खुप थोडे कामगार संघटीत असून उर्वरीत सर्व असंघटीत क्षेत्रात आहेत. यातही स्वच्छता कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचा प्रश्न खुपच गंभीर असून त्यांच्या समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी भरपूर काम करावे लागणार आहे. मुंबईसारख्या महानगरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना वजा केल्यास मुंबईची काय दुरवस्था होईल याची कल्पनाच न केलेली बरी. शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्याचा स्टॅन्डर्ड राखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी जे काम करतात ते मोलाचे आहे. शहरातील कचरा जमा करुन तो डंपिग ग्राऊंड किंवा प्रक्रीया केंद्राकडे पाठविण्याचे काम हे कर्मचारी करतात. गटारे आणि मलनिस्सारण व्यवस्थेची स्वच्छता राखण्याचे अक्षरशः जीवावर उदार होऊन कामही हीच मंडळी करतात. त्यामुळे एका अर्थाने शहराच्या धमन्यातील ब्लॉकेज काढणारी ही एक सक्षम यंत्रणा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. युपीएच्या काळात डोक्यावरुन मैला वाहण्याची पद्धत शंभर टक्के बंद करण्यात सरकारला यश आले होते. डोक्यावरुन मैला वाहण्याची अनुष प्रथा बंद झाली असली तरी आधुनिक शहरांच्या वेणा अनुभवत असणाऱ्या आपल्या देशात मानवविरहीत मलनिस्सारण आणि सांडपाण्याची पक्की व्यवस्था उभारण्यात अद्यापही शंभर टक्के यश आलेय असं कुणीही छातीठोकपणे म्हणू शकत नाही. त्यामुळेच आजही तुंबलेली गटारे असो की शौचालये ती स्वच्छ करण्यासाठी मानवी हस्तक्षेप अनिवार्य आहे. याशिवाय शहरात जागोजागी साठणारा कचरा उचलण्यासाठीही मानवी हातांची आवश्यकता भासते. एकट्या मुंबईचाच विचार करायचा झाल्यास मुंबईतील स्वच्छता कर्मचारी दररोज अंदाजे दहा हजार टन कचऱ्यापैकी दोन हजार टन कोरडा कचरा झाडून स्वच्छ करतात. याशिवाय सार्वजनिक ठिकाणचे कचऱ्यांचे कोंडाळे, संडास, मुताऱ्या यांची स्वच्छता करण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज मुंबईतील रस्त्यांवर उतरते. ऋतु कोणताही असो यामध्ये तसूभरही खंड पडत नाही. एखाद्या नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातानंतर देखील स्वच्छता कर्मचारी आपले काम चोख पार पाडतात. कोणत्याही संकटाला तोंड देऊन मुंबई पूर्ववत होते असे म्हणतात त्यामध्ये या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा देखील मोठा हात आहे. एवढी महत्त्वाची कामगिरी करणारा हा घटक मात्र सतत वंचितच राहतो. परदेशात स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा आहे. त्यांना समाजात अतिशय मानाचे स्थान असते. त्यांना कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तुंमुळे त्यांचे काम अतिशय सोपे होते. त्यांच्याकडे हातमोजे, पायात बूट, अंगात कोट, हेल्मेट अशा सुरक्षाउपायांची रेलचेल असते. याऊलट आपले कर्मचारी उघड्या अंगाने गळ्यापर्यंत गाळाने भरलेल्या डबक्यात उतरुन काम करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. डिस्पोजेबल इंजेक्शन्स, सलाईनच्या सिंरींज, कात्र्या, ब्लेड्स, फुटलेल्या काचा अशा वस्तुंमुळे त्यांच्या अंगाला जखमा होत राहतात. सतत घाणीशी संपर्क आल्यामुळे त्यांना नाना प्रकारचे रोग जडतात. काम आटोपल्यानंतर लगेचच अंग धुण्यासाठी त्यांना पाणी उपलब्ध होतेच असे नाही. साबण, डेटॉलसारखी निर्जुंतके तर दूरच... अतिशय अमानवी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या व्यवसायामुळे ठराविक हॉटेमध्येच प्रवेश मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉग्ज अँड इंडियन्स नॉट अलाऊड अशा पाट्या लावणारे परकीय या देशाने पाहिले. त्यावेळी प्रत्येक भारतीय संतापाने पेटून उठत असे. पण आता आपल्याच देशवासियांना अशी अघोषीत प्रवेशबंदी करणाऱ्यांच्या विरोधात आपण चकार शब्दही काढू शकत नाही का ? मूळात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा खुप मोठा टक्का हा कंत्राटी स्वरुपाचा आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातून आलेले घटक रोजीरोटीसाठी हे काम करण्यासाठी तयार होतात. कंत्राटदाराचा हुकूम आणि मर्जीनुसार ही मंडळी कामे करतात. त्यांच्या लेखी या कर्मचाऱ्यांना शून्य किंमत असते. त्यामुळे त्यांची पिळवणूक ठरलेली. कायद्यातून पळवाटा शोधून ही मंडळी प्रशासन आणि सरकारलाही न जुमानता या कर्मचाऱ्यांची पिळवणूक करीत राहतात. सामाजिक आणि आर्थिक अवहेलनेतून व्यसनाधीनता, रोगराई आदी त्यांच्या वाट्याला येतात. एकूण मिळतीचा मोठा टक्का उपचारांवरच खर्च होतो. एका अहवालानुसार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सरासरी वय हे चाळीस ते पंचेचाळीस या घरात असते. साधारणतः २००० ते २०१५ पर्यंत केवळ मुंबईतच पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांचे काम करताना बळी गेले आहेत. दर वर्षी देशभरात सुमारे २५ हजार सफाई कर्मचाऱ्यांचा बळी जातो. आर्थिक आणि सामजीक उतरंडीतील सर्वात तळाशी असणाऱ्या या जीवंत माणसांचे श्रम सर्वांना हवे असतात मग ही माणसं पशुवत जगणं का जगतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. देशात स्वच्छ भारत मोहिम राबविणाऱ्या राज्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांना सन्मानाचे जगणे मिळवून देण्यासाठी प्रकर्षाने पुढे यावे. केवळ त्यांच्या स्वच्छताविषयक कामाचे कौतुक करुन भागणार नाही तर त्यांना जगण्याचा समान हक्क प्रदान करण्यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे. त्यांच्या मागण्याही फार मोठ्या नाहीत. यातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे पगार नियमित आणि वेळेवर असावा. शासनाने मनात आणले तर ही फार मोठी गोष्ट नाही. शासनाच्या सर्व यंत्रणा एकत्रितपणे या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठराविक तारीख निश्चित करु शकतात. त्यामध्ये ठराविक काळानंतर उचित पगारवाढ, विविध...

Read More
  110 Hits

सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा'

सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुप्रिया सुळेंनी टॅग केले आहे.कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंनी लिहिले आहे, "#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat. @ChDadaPatil" #Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat.@ChDadaPatil pic.twitter.com/IKUdOriSz5 — Supriya Sule (@supriya_sule) 1 November 2017अगदी काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी डेडलाईन जाहीर केली आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या डेडलाईनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंच्या या 'सेल्फी विथ खड्डे'ला महत्त्वं प्राप्त झालं आहे.दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या ट्वीटखाली आता राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणचे लोक खड्ड्यांसोबतचे फोटो शेअर करत असून, व्यथाही मांडत आहेत.आता खड्ड्यांविरोधातील हा ऑनलाईन आवाज तरी चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहेचेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा' 

Read More
  131 Hits

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र "भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना द्या, चांगला हमीभाव द्या. जाहिरातबाजीवरच्या खर्चातला निधी जर गरीब माणसाला दिलात, तर तुम्हाला दोन चांगले आशीर्वाद मिळतील.", असे खासदार सुप्रिया सुळेंनी हात जोडून भाजप-शिवसेनेला म्हटले. शिवसेनेचा भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे का? "भाजप आणि शिवसेना एका सरकारमध्ये काम करतात. काल शिवसेनेने 'घोटाळेबाज भाजप!' नावाची एक पुस्तिका काढली आहे. जर एवढे घोटाळेबाज भाजप असेल, मग शिवसेनेची क्रेडिबिलिटी काय? तुम्ही करप्शनला सपोर्ट करता? हा प्रश्न मला शिवसेनेला विचारायचा आहे. तुम्ही सत्तेसाठी इतके स्वत:ला कॉम्प्रमाईज करता? तुम्ही भ्रष्टाचारालापण सपोर्ट करता?", अशा प्रश्नांची सरबत्ती सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केली. सेनेच्या खोट्या डरकाळ्या! "खोट्या डरकाळ्या फोडून सरकारमध्ये राहण्याचं शिवसेनेचं प्रेम कमी होत नाही. शिवसेनेला सर्वसामान्य गरीब माणसाचं प्रेम नाही, हे त्यांच्या सगळ्याच कृतीतून दिसतंय. भाजप जर घोटाळेबाज असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं.", असा घणाघातही सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केला. सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे : - खड्ड्यांबाबत चंद्रकांतदादांच्या 18 डिसेंबरच्या डेडलाईनचं स्वागत - सुप्रिया सुळे- सरकार जाहिराती उत्तम करतंय, अतिशय सुंदर - सुप्रिया सुळे- सरकार किती सफाईने खोटं बोलतं, याची खरंतर दाद दिली पाहिजे - सुप्रिया सुळे- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे राज्य सरकारने कर्जमाफी केली - सुप्रिया सुळे- सरकारमध्ये कुणीही गंभीर नसल्यासारखं वाटू लागलंय - सुप्रिया सुळे- निवडणूक जिंकणं, ही एक गोष्ट आणि प्रशासनात काम करणं, ही वेगळी गोष्ट - सुप्रिया सुळे- सरकारला डायलॉग करायचा नाही, हे सातत्याने दिसतंय - सुप्रिया सुळे- एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आम्ही कायम उभे राहणार - सुप्रिया सुळे- 'घोटाळेबाज भाजप' पुस्तिका काढूनही शिवसेना सत्तेत का? शिवसेना भ्रष्टाचाराला सपोर्ट करते का? - सुप्रिया सुळे- पवारसाहेबांचे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध - सुप्रिया सुळे- फेरीवाल्यांच्याही पोटा-पाण्याचा प्रश्न आहे, तेही गरीब आहेत, मारहाण करुन प्रश्न सुटणार नाहीत - सुप्रिया सुळे- भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती, कामं करा, जाहिरताबाजीने काही होणार नाही - सुप्रिया सुळे VIDEO : सुप्रिया सुळेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://www.youtube.com/watch?v=C_A59H_cBXo भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे 

Read More
  107 Hits

गिरीश बापट वास्तवाची जाण असणारा नेता: सुप्रिया सुळे

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या इंदापुरात बोलत होत्या. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी पुण्यात केलं होतं. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते”. गिरीश बापट काय म्हणाले होते?वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या.पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या, असं गिरीश बापट म्हणाले होते. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. त्यावेळी बापट बोलत होते. डाळिंब उत्पादकांनी काही मागण्या गिरीश बापटांकडे केल्या होत्या. त्यावर बोलण्याच्या ओघात बापटांनी पुढील सरकार बद्दल हे वक्तव्य केलं.  https://www.youtube.com/watch?v=xcYmbnfgj8I

Read More
  138 Hits