स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा महायुतीला इशारा विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्यातील विविध मतदारसंघात नेत्यांनी दौरे करत आढावा घेत आगामी रणनीती आखली आहे. दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसं...
शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे, आज जरी 'मशाल' आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह घेऊन लढल्यावर आपल्याला यश मिळाले असले, तरी न्यायालयातील लढाई ही पक्ष आणि चिन्हाची नसून तत्वाची आहे, त्यामुळे आम्ही ती लढू असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळेंची फटकेबाजी 'उध्दव ठाकरेंवर माझा विश्वास' पक्ष, चिन्ह जाताच सुप्रिया सुळेंची फटकेबाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे "मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्श...
म्हणाल्या; 'बाळासाहेबांना काय...' Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिय...
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार ...
शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. नागपूर आमदार निवासातील सामुहिक बलात्कारप्रकरणावरुनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''मुख्यमंत्री नागपुरचा असताना आमदार निवासात बलात्कार होतात, ही दुर्दैवी घटना आहे.'' तसेच कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात,'' अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच शिवसेनेचाही सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. आपण सत्तेत आहोत कि विरोधात आहोत, याचंच त्यांना भान राहात नाही, अशी टीका सुळे यांनी यावेळी केली. शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका
जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र "भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना द्या, चांगला हमीभाव द्या. जाहिरातबाजीवरच्या खर्चातला निधी जर गरीब माणसाला दिलात, तर तुम्हाला दोन चांगले आशीर्वाद मिळतील.", असे खासदार सुप्रिया सुळेंनी हात जोडून भाजप-शिवसेनेला म्हटले. शिवसेनेचा भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे का? "भाजप आणि शिवसेना एका सरकारमध्ये काम करतात. काल शिवसेनेने 'घोटाळेबाज भाजप!' नावाची एक पुस्तिका काढली आहे. जर एवढे घोटाळेबाज भाजप असेल, मग शिवसेनेची क्रेडिबिलिटी काय? तुम्ही करप्शनला सपोर्ट करता? हा प्रश्न मला शिवसेनेला विचारायचा आहे. तुम्ही सत्तेसाठी इतके स्वत:ला कॉम्प्रमाईज करता? तुम्ही भ्रष्टाचारालापण सपोर्ट करता?", अशा प्रश्नांची सरबत्ती सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केली. सेनेच्या खोट्या डरकाळ्या! "खोट्या डरकाळ्या फोडून सरकारमध्ये राहण्याचं शिवसेनेचं प्रेम कमी होत नाही. शिवसेनेला सर्वसामान्य गरीब माणसाचं प्रेम नाही, हे त्यांच्या सगळ्याच कृतीतून दिसतंय. भाजप जर घोटाळेबाज असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं.", असा घणाघातही सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केला. सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे : - खड्ड्यांबाबत चंद्रकांतदादांच्या 18 डिसेंबरच्या डेडलाईनचं स्वागत - सुप्रिया सुळे- सरकार जाहिराती उत्तम करतंय, अतिशय सुंदर - सुप्रिया सुळे- सरकार किती सफाईने खोटं बोलतं, याची खरंतर दाद दिली पाहिजे - सुप्रिया सुळे- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे राज्य सरकारने कर्जमाफी केली - सुप्रिया सुळे- सरकारमध्ये कुणीही गंभीर नसल्यासारखं वाटू लागलंय - सुप्रिया सुळे- निवडणूक जिंकणं, ही एक गोष्ट आणि प्रशासनात काम करणं, ही वेगळी गोष्ट - सुप्रिया सुळे- सरकारला डायलॉग करायचा नाही, हे सातत्याने दिसतंय - सुप्रिया सुळे- एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आम्ही कायम उभे राहणार - सुप्रिया सुळे- 'घोटाळेबाज भाजप' पुस्तिका काढूनही शिवसेना सत्तेत का? शिवसेना भ्रष्टाचाराला सपोर्ट करते का? - सुप्रिया सुळे- पवारसाहेबांचे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध - सुप्रिया सुळे- फेरीवाल्यांच्याही पोटा-पाण्याचा प्रश्न आहे, तेही गरीब आहेत, मारहाण करुन प्रश्न सुटणार नाहीत - सुप्रिया सुळे- भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती, कामं करा, जाहिरताबाजीने काही होणार नाही - सुप्रिया सुळे VIDEO : सुप्रिया सुळेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://www.youtube.com/watch?v=C_A59H_cBXo भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे