1 minute reading time (201 words)

[Saam tv]निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंची भावूक प्रतिक्रिया

निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंची भावूक प्रतिक्रिया

म्हणाल्या; 'बाळासाहेबांना काय...'

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे..

"मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्शक आहे. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय असे वाटत आहे. तसेच याबद्दल पुढे बोलताना "शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवजी असतील, हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष काढला. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला?" असेही त्या म्हणाल्या.

[ABP MAJHA]आणीबाणी फक्त ऐकली होती पण...सुप्रिया सु...
[Loksatta]सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाळासाहेब हयात...