2 minutes reading time (382 words)

[Loksatta]सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाळासाहेब हयात असतानाच…”

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाळासाहेब हयात असतानाच…”

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. "बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची कमान देण्यात आली होती. राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडली. पण त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला. मग जर तुम्ही बाळासाहेबांचे नाव घेता तर मग तुम्ही पक्ष असा कसा नेऊ शकता. राज ठाकरेंचेही मतभेद झाले पण त्यांनी पक्ष नाही नेला. मग तुम्ही कसे काय नेऊ शकता?", असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

"मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्शक आहे. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय असे वाटत आहे. शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवजी असतील, हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष काढला. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला?"

भाजपाची भारतीय लाँड्री पार्टी झालीये

"छत्रपतींच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहेच. आम्ही संघर्ष करुच. पण मला आश्चर्याचा धक्का बसला आहे की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असताना त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला? संसदेतही राहुल गांधी यांचे भाषण रेकॉर्ड वरुन काढण्यात आले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट केले जाते. हेच लोक जेव्हा भाजपामध्ये जातात तेव्हा मात्र त्यांना क्लीन चीट दिली जाते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही भारतीय लाँड्री पार्टी झाली आहे", असेच म्हणावे लागेल.

[Saam tv]निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रिया सु...
[Sakal]सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशी...