1 minute reading time (131 words)

[ABP MAJHA]आणीबाणी फक्त ऐकली होती पण...सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

आणीबाणी फक्त ऐकली होती पण...सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे  "मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्शक आहे. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय असे वाटत आहे. तसेच याबद्दल पुढे बोलताना "शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवजी असतील, हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष काढला. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला?" असे सुळे म्हणाल्या आहेत. 

[Sakal]Uddhav Thackeray यांच्यावर विश्वास
[Saam tv]निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रिया सु...