महाराष्ट्र

धनंजय... लोकसभेचा विचार करताय काय ? - सुप्रिया सुळे

राजेभाऊ मोगल03.28 PMऔरंगाबाद - धनंजय... तुमचे हिंदीतले अतिशय सुंदर भाषण आज प्रथमच ऐकले, लोकसभेचा विचार करताय का काय ? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मंगळवारी (ता.09) चांगलीच गुगली टाकली. मुंडे यांनीही या गुगलीने गोंधळून न जाता स्माईल दिली. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित संविधान बचाव परिषदेत बोलतांना विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या भाषणात हिंदीतील काही वाक्य आणि काही हिंदी शेरचा उल्लेख होता. त्यांच्या नंतर भाषणाला उठलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांच्याकडे पाहत आज तुमचे हिंदीतील भाषण प्रथमच ऐकले, खूप छान हिंदी बोलता, कोणी हिंदी बोलू लागले की तो लोकसभेचा विचार करतो आहे का काय ? असा विचार आमच्या मनात येतो, तुमच्या मनात ही तसा काही विचार नाही ना ? अशी गुगली टाकली. या गुगलीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष मुंडे काय प्रतिक्रिया देतात याकडे गेले, मात्र त्यांनी या गुगलीवर फक्त एक स्माईल देत या गुगलीला सन्मानजनक उत्तर दिले.तत्पूर्वी, बोलतांना मुंडे यांनी मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती व्यक्त केली. http://www.esakal.com/marathwada/dhananjay-mundhe-are-you-think-about-lok-sabha-says-supriya-sule-148657

Read More
  0 Hits

मुख्यमंत्र्यांचा `पायगुण' जळगावकरांना अंधार देणारा ठरला : सुप्रिया सुळे

योगेश महाजन, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018अमळनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण' असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण' अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली आहे. अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. भाजप सरकारने 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, 24 तास वीज मिळते काय ? जळगावमध्ये सकाळी सात ते दहा व सायंकाळी सात ते दहा असे रोज सहा तास भारनियमन होत आहे. या सरकारचे नियोजन नसून, जनता वेठीस धरली जात आहे. शेतकरी बांधव दुष्काळात होरपळले आहेत. मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही, अशीही टीका खासदार सुळे यांनी यावेळी केली. राम कदमांबद्दल मुख्यमंत्र्यांची चुप्पी दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम हे महाराष्ट्रातील मुलींबद्दल असभ्य भाषेचा वापर करतात हे भारतीय संस्कृतीसाठी लांच्छनास्पद आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने त्यांनी आमदार कदम यांना चाप द्यायला हवा होता. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर काही तरी कारवाई होणे अपेक्षित होते. हेच जर "राष्ट्रवादी'च्या एखाद्या आमदाराने केले असते तर त्याला जनतेसमोर नेऊन जाहीर माफी मागायला लावले असते. लोकप्रतिनिधींनी असे बोलणे योग्य नाही आणि यावर गृहमंत्र्यांनी साधलेली चुप्पी याचा आपण निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. http://www.sarkarnama.in/amalner-supriya-sule-devendra-fadanvis-29575

Read More
  0 Hits

महाराष्ट्राचा 'लाडका' मुख्यमंत्री एकही शब्द कां काढत नाही?

सरकारनामा ब्युरोशनिवार, 15 सप्टेंबर 2018 मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्‍या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  सुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत? हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड, बलात्कार अशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-questions-devendra-fadavnis-28676

Read More
  0 Hits

सुप्रिया सुळेंचा खड्ड्याबरोबर सेल्फी, मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

मिलिंद संगई10.39 AMबारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे.बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sules-selfie-pothole-cm-will-be-answerable-144500 

Read More
  2 Hits

खड्यात जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी सरकारची, सुप्रिया सुळेंचा इशारा

सरकारनामा ब्युरोमंगळवार, 18 सप्टेंबर 2018 बारामती : रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत, या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.  थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-target-cm-fadanvice-pitch-28780

Read More
  2 Hits

एनडीए प्रशासनाविरोधात कोंढवे-धावडे ग्रामस्थांचे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू

एनडीए प्रशासनाविरोधात कोंढवे-धावडे ग्रामस्थांचे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू

*एमपीसी न्यूज - [caption id="attachment_1101" align="alignnone" width="300"] एनडीए_आंदोलन शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे व अहिरेगाव या गावातील ग्रामस्थांना एनडीए प्रशासनाकडून एनडीए हद्दीतून प्रवास करताना व दैनंदिन कामे करताना एनडीए प्रशासनाकडून अडवणूक केली जाते. त्याविरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एनडीए प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे. मागील दोन तासांपासून कोंढवे-धावडे येथील एनडीए गेट बाहेर हे आंदोलन सुरू आहे. * 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी धनगरबाबा यांच्या उत्सवासाठी आलेल्या भाविकांवर एनडीए प्रशासनाकडून लाठीहल्ला करण्यात आला आणि या भाविकांना बाहेर हाकलण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तसेच एनडीए हद्दीत शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे या गावांची आराध्य दैवत असलेल्या काळुबाई देवस्थान, बापूज्जीबुवा देवस्थान, कमळादेवी देवस्थान आणि धनगरबाबा देवस्थान याची मंदिरे आहेत. या ठिकाणी वर्षानुवर्षे पूजा अर्चा सन उत्सव होत आले आहेत. परंतू 2107 पासून हे या ठिकाणी सण उत्सव करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास व सण उत्सव साजरे करण्यास ग्रामस्थांना कायमस्वरुपी परवानगी मिळावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

Read More
  0 Hits

प्रिंट मिडिया

[robo-gallery id="181"]

Read More
  570 Hits

News 2

Dummy New 4

Read More
  557 Hits

News 1

First News

Read More
  500 Hits

News 2

News Categeory 2

Read More
  635 Hits

News 3

Demo News 3

Read More
  606 Hits

News

Categeory Baramati

Read More
  546 Hits