संविधान प्रोटेस्ट ऑफ फेसबुकर्सच्या माध्यमातून 'मेरा संविधान मेरा अभिमान' या निषेधपर कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन केले होते. लोकसत्ता ऑनलाइन | August 13, 2018 मेरा संविधान मेरा अभिमान' संविधान ही भारतीयांची ओळख असून संविधानाच्या विरोधात जर चुकीचे काम होत असल्यास पंतप्रधानांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत पोलीस यंत्रणेने त्यांना शिक्षा दिल्यास पुन्हा एकदा देशात संविधान जाळण्याचा कोणी विचारही करणार नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर काही व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यावर त्या घटनेचा निषेध देशभरातून करण्यात येत आहे. पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालय रस्त्यावर तरुणांनी एकत्र येत संविधान प्रोटेस्ट ऑफ फेसबुकर्सच्या माध्यमातून ‘मेरा संविधान मेरा अभिमान’ या निषेधपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिंदाबाद, जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान के सन्मानमे हम उतरे मैदान मे, इन्क्लाब इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
Published On: Aug 13 2018 प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडीयावरुन बदनामी होत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या संदर्भात सोमवारी सकाळी थेट पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे तक्रार केली आहे. या संदर्भातील पुरावे त्यांनी आयुक्तांकडे दिले आहेत. फेसबुकवर हाताची घडी, तोंडावर बोट नावाचे पेज तयार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर खालच्या शब्दात टीका केली जात आहे. राजकीय विचारधारेतील विरोधातून टीका करण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र वैयक्तिक पातळीवरील बदनामीकारक टीका केली जात आहे. खोटी विधाने तयार करुन, खोटे फोटो तयार करुन संभ्रम निर्माण केला जात आहे. अशा खोट्या पोस्ट तयार करुन पक्षातील मान्यवर नेते शरद पवार आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा प्रकार गंभीर असून त्याची दखल घेत या पेजच्या अॅडमिनवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांनी याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. http://www.pudhari.news/news/Pune/NCP-leaders-defame-trough-Facebook-page-supriya-sule-demanded-action-on-Facebook-page-admin/
ऑनलाइन लोकमत | Follow | Published: August 13, 2018 संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाईने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. पुणे : दिल्लीत काही समाजकंटकांकडून संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील गुडलक चाैकात तरुणाई रस्त्यावर उतरली. फेसबुकवरील तरुणाईने स्थापन केलेल्या एका ग्रुपने संध्याकाळी संविधानाची प्रस्तावना अाणि भारतीय झेंडे हातात धरत निदर्शने केली. या तरुणाईला पाठींबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, पत्रकार संजय अावटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे अादी उपस्थित हाेते. यावेळी संविधानचा जयजयकार करणाऱ्या घाेषणा देण्यात अाल्या. तसेच संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव घाेषनेरुपी करुन देण्यात अाली. शेकडाे तरुण गुडलक चाैकात जमा झाले हाेते. पाेलिसांचा माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. 'संविधान के सन्मान मै, हम उतरे मैदान मै' अशा घाेषणा यावेळी देण्यात अाल्या. तरुणाईने हातात संविधानाच्या प्रस्तवानेची प्रत तसेच भारताचा झेंडा घेतला हाेता. तसेच 'मेरा संविधान मेरा अभिमान' असे लिहीलेले अनेक फलकही हातात धरण्यात अाले हाेते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिल्लीतल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी अाम्ही सर्व भारतीय अाज पुण्यात जमलाे अाहाेत. दिल्लीतील घटनेचा जाहीर निषेध अाम्ही करत अाहाेत. संविधान जाळणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाई करावी. पुन्हा देशात काेणी संविधान जाळण्याचा विचार करणार नाही अशी भीती घालायला हवी. संविधान अाम्हा भारतीयांची अाेळख अाहे अाणि त्यावर काेणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर अाम्ही त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करु. 21 व्या शतकात संविधान वाचवण्यासाठी अापल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय हे समाज म्हणून अपयश अाहे. अांबेडकरांनी पुराेगामी विचारांनी हे संविधान लिहीलं अाहे. ज्याची जगात प्रशांसा हाेत अाहे. असं संविधान जाळलं जात असताना त्यावर कुठलिच प्रतिक्रीया उमटत नाही, हे दुर्दैवी अाहे. भारताच्या रस्त्यारस्त्यावर लाेकांनीशांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उतरायला हवं हाेतं. संविधान जाळल्याचा पहिला निषेध पंतप्रधानांनी दिल्लीत करायला हवा हाेता. संविधान वाचवण्याचं अांदाेलन हे कुठल्या पक्षाचं नाही तर विचार वाचवण्याचं अांदाेलन अाहे. http://www.lokmat.com/pune/honor-constitution-youths-road-pune/
Maharashtra Times | सुप्रिया सुळे यांची तक्रार म. टा. प्रतिनिधी, पुणे 'हाताची घडी तोंडावर बोट' या फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बदनामी केली जात असल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन केली. 'या फेसबुक पेजवरून अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली जात आहे; तसेच वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अथवा मी कधीही, कुठेही न बोललेली विधाने तयार करून, मजकूर बदलून, फोटो मार्फिंग करून ती विधाने आमचीच आहेत, असे भासविले जात आहे. त्याद्वारे जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम सुरू आहे,' असे सुळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मिलिंद संगई : 09.37 AM सुप्रियाताई ठरल्या देवदूतबारामती शहर - नशीबाची दोरी बळकट असेल तर अनेकदा काही व्यक्ती देवदूतासारख्या धावून येत जीवदान देतात. असाच काहीसा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील पाटील कुटुंबियांना आला. खासदार सुप्रिया सुळे या वेळेस एखाद्या देवदूताप्रमाणे मदतीला धावून आल्या आणि पाटील कुटुंबियातील अवघ्या दोन महिन्यांचा अथर्व अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला.अथर्वचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीरात अशुध्द रक्ताचा पुरवठा होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. हृदयात गुंतागुंत निर्माण झाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते. इतक्या छोट्या बाळावर शस्त्रक्रीया करणे जोखमीचे काम असल्याने त्याला दहा लाखांवर खर्च येणार असे पाटील कुटुंबियांना सांगितले गेले.इतका मोठा खर्च करणे पाटील कुटुंबियांना अवघड होते, त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची त्यांचे स्वीय सहायक नितिन सातव यांच्या मदतीने भेट घेतली. सुप्रिया ताईंनी क्षणाचाही विलंब न लावता मुंबईच्या एस.एल. रहेजा असोसिएटच्या रुग्णालयास फोन लावला. ताईंचे समन्वयक डॉ. संतोष भोसले यांनी या बाबत त्वरेने पुढील कार्यवाही केली. ताईंचा फोन गेल्यानंतर रुग्णालयाची सूत्रे भराभर हलली व अथर्व याच्यावर ही अवघड शस्त्रक्रीया विनामूल्य तर झालीच पण नंतरची देखभाल व औषधेही निशुल्क मिळाली. दहा दिवसानंतर अथर्व याला बारामतीत आणले गेले आहे. सध्या अथर्व याची तब्येत उत्तम असून बारामतीचे डॉ. राजेंद्र मुथा यांच्या निरिक्षणाखाली तो आहे.ताई याच अथर्वसाठी देवदूतअथर्वचे प्राण वाचविण्यासाठी सुप्रियाताई अक्षरशः एखाद्या देवदूताप्रमाणे धावून आल्या, त्यांनी पाठपुरावा केला नसता तर अथर्वचे काय झाले असते माहिती नाही, अशी भावनिक प्रतिक्रीया पाटील कुटुंबियांनी व्यक्त केली.http://www.esakal.com/pune/two-months-atherva-survived-137874
महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. Perform Puja At Your Home Supriya Suleलोकसत्ता ऑनलाइन | August 24, 2018 07:51 pmमहाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरुन झालेल्या वादावर बोलताना त्यांनी हे विधान केले.पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्यांबाबत आज पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.राज्यात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवरील प्रश्नांकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांनी पक्षाच्या प्रचाराकड़े कमी लक्ष द्यावे आणि महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे तसेच त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने त्यांना जर ते जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.फर्ग्युसन कॉलेजमधल्या सत्यनारायणाच्या पूजेवरून वादपुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावणमासानिमित सत्यनारायण पूजा करण्यात आली. या पूजेवरून वाद झाला. काही विद्यार्थी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात तणावाचे वातवारण निर्माण झाले होते.फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्यांच्या कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. याच कार्यालयाबाहेर असणाऱ्या फलकावर सर्व विद्यार्थ्यांनी पूजेचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. या पूजेची माहिती विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी प्राचार्यांना घेराव घालत जाब विचारला. मागील अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्यनारायणाची पूजेचे आयोजन केले जात असल्याने या वर्षीही पूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. पूजेचे आयोजन करुन आम्ही अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा पाळल्याचे स्पष्टीकरण या वादावर त्यांनी दिले.https://www.loksatta.com/maharashtra-news/perform-puja-at-your-home-supriya-sule-1737894/
सरकारनामा ब्यूरो : बुधवार, 29 ऑगस्ट 2018पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या बांधकाम खात्याला लक्ष्य केले असून, सेल्फी विथ खड्डा आंदोलन सुरू केले आहे. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.सरकारने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रोज नवनव्या डेडलाईन देत ‘तारीख पे तारीख’ हा खेळ सुरु ठेवला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्यभर मोहीम त्यांनी सुरु केली आहे. गेल्या वर्षी या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.``राज्य प्रगतीच्या मार्गावरुन चालत असल्याच्या प्रचार सरकार एकीकडे करीत आहे. दुसरीकडे परिस्थिती मात्र त्याच्या विपरीत आहे. प्रगतीचा मार्ग तर सोडाच परंतु ज्या रस्त्यावरुन राज्यातील जनता रोज ये-जा करते ते रस्ते देखील धड नाहीत. ज्या शहरांना स्मार्ट करण्याचे ढोल या सरकारने पिटले त्या शहरांमध्येही हिच स्थिती आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांतील रस्त्यांची स्थिती विदारक आहे. याखेरीज राज्यांतील इतर शहरांना जोडणाऱ्या तसेच खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचीही दारुण अवस्था झाली आहे,`` असा आरोप त्यांनी केला.``या रस्त्यांची डागड्डुजी व्हावी, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आपण सर्वांनी या पूर्वी ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन पुकारत यापूर्वीही सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता.आता परत तुम्ही तुमच्या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत फोटो काढून तो फेसबुक, ट्विटर या सोशल मिडियावर अपलोड करायचा आहे. या फोटोसोबत #SelfieWithPotholes हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन सुळे यांनी केले आहे.http://www.sarkarnama.in/mp-supriya-sule-selfie-potholes-27988
कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, सुप्रीम कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी मी कोर्टाचे आभार मानते-सुप्रिया सुळे ‘सनातन’ या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेवरील कारवाईवरुन लक्ष विचलित करण्यासाठी डाव्या विचारधारेच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, असा सवालही त्यांनी विचारला. पुणे पोलिसांनी नक्षली समर्थक असल्याच्या संशयातून देशाच्या विविध भागांमधून पाच जणांना नुकतीच अटक केली होती. या अटकेवरुन सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुण्यात भाजपा सरकारवर टीका केली. ‘सनातन’वरच लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्या विचारांच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, सुप्रीम कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी मी कोर्टाचे आभार मानते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुण्याजवळील बोपदेव घाटात खड्डयासोबत सेल्फी घेतला. राज्यातील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही. वाढते अपघात, त्यामुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? पारदर्शक कारभाराचे दावे करणाऱ्या या सरकारला रस्त्यांची दुरावस्था दाखवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मिलिंद संगई : 12.07 PM To Get The Work Of Various Stations From Pune To Daund Railway Soonबारामती शहर - पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील विविध स्थानके आणि गावांमध्ये तसेच लोहमार्गावरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सर्व्हिस रस्ते, प्लॅटफॉर्म दुरुस्ती आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेकडे केली आहेत.रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पुणे विभागीय प्रबंधक मिलिंद केळुसकर यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले असून लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत, असे त्यात म्हटले आहे. नुकतीच त्यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वानी लोहानी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.दौंड रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या नागरीकांचे पुनर्वसन अनेक दिवसांपासून प्रलंबित असून तातडीने त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. याशिवाय सहजपुर, कासुर्डी, यवत, खुटबाव, कडेठाण, पाटस, सोनेवाडी, खुरवाडी, भिरवडे आणि पुढे भिगवण याठिकाणी लोहमार्गावर उड्डाणपूल उभे करावेत. सहजपुर आणि कासुर्डी येथे प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वे स्थानक करण्याची गरज आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.पाटस येथे उड्डाणपुलाची गरज असून रेल्वे विभाग या कामाच्या निविदा काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी केली. याबरोबरच दौंड येथून बंगळूर आणि राजस्थान दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या दौंड स्थानकावर थांबत नाहीत. त्या याठिकाणी थांबवण्यात याव्यात. बारामती, दौंड, इंदापूर आणि भिगवण येथून या गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र कोटा जाहीर करण्यात यावा, असे सुळे यांनी या पत्रात नमूद केले आहे. या सोबतच बारामती, फलटण आणि लोणंद याठिकाणी नवीन रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन करावयाचे आहे. तो प्रश्न स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मार्गी लावावा, असेही त्यांनी म्हटले आहे.नीरा-जेजुरी रेल्वे मार्गावर जेजुरी येथे खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. त्यांच्यासाठी जेजुरी येथे भुयारी मार्गाची गरज असून सुकळवाडी येथे मशिदीत प्रार्थना करण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठीही भुयारी मार्ग तयार करण्याची गरज आहे. नीरा रेल्वे स्थानकाजवळ स्थानिक नागरिकांना छोटे व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी.जेजुरी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या छताची उंची वाढविण्याबरोबरच नव्या इमारतीची उभारणी करणे, विस्तारित विश्रांती कक्ष उभारणी, प्लॅटफॉर्म वाढविणे, सहजपुर, खामगाव, खुटबाव, कडेठाण, पाटस, आळेगाव, बोरिबेल, मलठण, राजेगाव स्थानकांची उंची वाढविणे, बारामती येथे सर्व्हिस रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, शिरसूफळ, गावडे वस्ती, सोनबा पाटील वस्ती, सर्व्हे क्रमांक 17 या ठिकाणी जोड रस्ता तयार करून देणे आदी कामे प्राधान्याने करण्यात यावीत, असे सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.http://www.esakal.com/pune/get-work-various-stations-pune-daund-railway-soon-140867
शनिवार, 1 सप्टेंबर 2018 संविधानस्तंभ उभारणी लोकचळवळ व्हावी देशानं आज प्रगतीची शिखरं पार केली आहेत. अनेक क्षेत्रात आपण जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करीत आहोत. विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, कृषी अशा अनेक क्षेत्रात आपण देदिप्यमान कामगिरी केली आहे. जगाचं लक्ष आपण वेधून घेतलंय... यासाठी देशातील प्रत्येकानं आपलं योगदान दिलं आहे. याचं कारण म्हणजे या देशवासियांची या देशाप्रती असणारी आपलेपणाची भावना. ही भावना रुजविण्यात संविधानाचा सर्वात मोठा हात आहे. म्हणूनच संविधानालाच या देशाच्या प्रगतीचा खऱ्या अर्थानं पाया असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. समाजातील सर्वांना समान न्याय देणाऱ्या या संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात संविधान स्तंभ उभारणीसारखा एक अभिनव प्रयोग करण्याचं ठरवलं. मतदारसंघातील सार्वजनिक ठिकाणी सध्या हे स्तंभ आकार घेत आहेत. लोकशाही व्यवस्थेप्रती आदर, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी उचललेलं हे एक छोटं पाऊल आहे. शिवाय या संविधानाच्या तत्वांतून या स्तभांच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल. लोकशाही व्यवस्थेबद्दलचा विश्वास आणखी दृढ होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. संविधान स्तंभ कशासाठी हे समजावून घेण्यापुर्वी थोडं इतिहासात डोकावून पाहुयात. हा देश स्वतंत्र होण्यापुर्वी अनेक राजेरजवाडे, संस्थानिकांच्या ताब्यात होता. स्वातंत्र्यचळवळीच्या माध्मयातून राष्ट्रीयत्वाची भावना ठिकठिकाणी रुजलेली होती. ब्रिटीशांपासून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशातील प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान दिले होते. तेंव्हापासूनच हा देश माझा आहे आणि या देशातील प्रत्येक व्यवस्थेत माझा वाटा आहे, ही भावना वाढीस लागली होती. आपण १५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर या भावनेला व्यावहारीक रुप देण्यासाठी म्हणजे या देशाचा कारभार चालविण्यासाठी एका सक्षम व्यवस्थेची आवश्यकता होती. लोकशाही प्रणालीच्या माध्यमातून ही व्यवस्था या देशात रुजली, सक्षम झाली. लोकशाही व्यवस्थेचा जो वटवृक्ष आज बहरलेला दिसतो त्याच्या मूळाशी येथील संविधानाची तत्त्वे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने संविधानाची निर्मीती करण्यात आली. ते देशाला अर्पण करीत असताना २५ नोव्हेंबर १९४९ साली घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत काही मोलाचे सल्ले दिले. ते म्हणाले होते की, “राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे की अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीतसुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.” सध्याच्या परिस्थितीत त्यांनी दिलेला इशारा अगदी समर्पक आहे. त्यानंतर या देशाचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या देशाने स्वीकारले. पुढे २६ जानेवारी १९५० रोजी हा देश प्रजासत्ताक म्हणजे, लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या व्यवस्थेचा झाला. समाजातील सर्वात शेवटच्या रांगेतील माणूस देखील संविधानामुळे देशाच्या उभारणीतला समान भागीदार ठरला. आजवरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत होते. आता बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक लोकशाही प्रत्यक्षात यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संविधानात नमूद असणारे, समानतेचे तत्व शतकांपासून सुरु असणाऱ्या वैचारीक मंथनाचे सार आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेतच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य आदी कायम करण्याचा उल्लेख आहे. यातील प्रत्येक शब्द लोकशाही व्यवस्थेची ताकद दाखवून देणारा आहे. संविधान स्तंभाची उभारणी करीत असताना आम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे प्रत्येक स्तंभावर संविधानाची उद्देशिका आम्ही जाणीवपूर्वक लावत आहोत. या उद्देशिकेची सुरुवातच आम्ही भारताचे नागरीक...(We the People) अशी झालेली आहे. या देशाच्या उभारणीतले समान भागीदार असणारे आम्ही देशाचे सर्व लोक ही घटना देशाला अर्पण करीत आहोत असा भाव यामध्ये आहे. सामूहिक जबाबदारीचे केवढे मोठे तत्त्व संविधानात सामावले आहे, हे यातून दिसून येईल. समाजातील प्रत्येकाला शासनव्यवस्थेत सामावून घेण्याचा हा एवढा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय संविधानाच्या निर्मात्यांनी घेतला होता. गेल्या सात दशकांच्या काळात आपण जी प्रगती केली आहे. त्याला सर्वांनीच हातभार लावला. संविधानाचे महत्त्व आणखी प्रखर व्हावे, भावी पिढ्यांना त्याची महती कळावी हा संविधान स्तंभ उभारण्या मागचा हेतू आहेच. पण त्याचसोबत अलिकडच्या काळात संवैधानिक संस्थांवर ठराविक प्रवृत्तीच्या व्यक्ती, संघटनांकडून वारंवार हल्ले होत आहेत. संविधानाची तत्त्वे पायदळी तुडविण्याचा, संविधानकर्त्यांचे योगदान नाकारण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. सध्याच्या काळात अशा शक्ती दुर्दैवाने प्रबळ आहेत. त्यांना रोखठोक उत्तर देऊन त्यांच्या दुष्प्रचाराला अटकाव करण्याचे काम संविधान स्तंभांच्या माध्यमातून व्हावे हा हेतू देखील यामध्ये आहे. संविधानस्तंभ ही एक प्रतिकात्मक कृती आहे. संविधानाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत आणखी खोलपर्यंत रुजविण्यासाठी संविधानफेरी, चर्चासत्रे, ध्वनीचित्रफिती यांसारख्या उपक्रम राबविण्याची गरज आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला, समाजातील विचारवंत अशा घटकांना सहभागी करुन घेतल्यास संविधानाचा विचार आणखी खोलपर्यंत झिरपण्यास मदत होईल. संविधानस्तंभाची उभारणीत भारतीयत्वाचा विचार आहे. आम्ही या...
एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांची दुरावस्था सरकारला दाखविण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरु केली होती. मात्र वर्षानंतरही रस्त्यांची अवस्था जैसे थे च असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा सरकार विरोधात सेल्फी विथ पॉटहोल्स मोहीम उघडली आहे. https://www.youtube.com/watch?v=kafoQsPTwhE&feature=youtu.be
मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 बारामती शहर : येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु.....आणि समजा अडचण आलीच तर तुम्ही सहा आठ महिने थांबा....एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कस काम होत नाही ते....त्या मुळे याला फार काही वेळ लागणार नाही....असे सांगत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आगामी निवडणुकीनंतर नेमके काय चित्र असेल याचेच सूतोवाच केले. बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या 56 कोटी रुपयाच्या कामाचे भूमीपुजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील, या बाबतची जोरदार चर्चा आज बारामतीत होती. शरद पवार यांच्या विधानामुळे आता बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम वेगाने मार्गी लागेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज बोलताना पवार यांनी बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्वाचे स्टेशन होईल व त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. हे काम रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्चित मार्ग काढून अशी ग्वाही पवार यांनी रेल्वेच्या अधिका-यांना या प्रसंगी दिली. सुप्रिया सुळे यांनी रेल्वेचे डीआरएम मिलिंद देऊसकर यांची प्रशंसा करीत त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची 225 कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगितले. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा देण्याबाबत त्यांनी विनंती केली. बारामती दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी 2019 पर्यंत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दौंडला बारामतीच्याच धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. दौंडचा समावेश पुणे विभागात करावा असे त्या म्हणाल्या. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली. खालील कामे प्रगतीपथावर 1. जेजुरी येथील प्लॅटफॉर्म उभारणी व त्या नंतर दुस- या प्लॅटफॉर्मची निर्मिती 2. जेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅक करण्यास मंजूरी मिळाली आहे. 3.दौंडला रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत होणार http://www.sarkarnama.in/i-will-ensure-baramati-phaltan-railway-work-done-28261
Sneha Updated Tuesday- 4 September 2018 - 6:08 PM[caption id="attachment_1867" align="alignnone" width="300"] कोणत्या शिस्तीत बसते?घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना चांगलचं सुनावलं आहे. “महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचे भाष्य करणाऱ्या राम कदम यांच्या वर आपण काही कारवाई करणार आहात का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केला.“या राज्यात रोडरोमियोंच्या त्रासामुळे मुली रस्त्यावर उतरायला देखील घाबरत असताना तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते?” अशा कणखर शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली आहे.https://maharashtradesha.com/supriya-sule-criticised-cm-fadnvis-about-ram-kadams-speech/
सकाळ वृत्तसेवा : बुधवार, 5 सप्टेंबर 2018 Sharad Pawar Railway Baramati Faltanबारामती शहर - ‘‘बारामती-फलटण लोहमार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. समजा त्यात अडचण आलीच तर सहा-आठ महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे त्याला फार काही वेळ लागणार नाही,’’ असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती-फलटण लोहमार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याची ग्वाही दिली.बारामती-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या ५६ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील, या बाबतची चर्चा आज बारामतीत होती.बारामती-फलटण लोहमार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्त्वाचे स्टेशन होईल. त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल. हे काम सध्या रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्चित मार्ग काढू, अशी ग्वाही पवार यांनी या प्रसंगी दिली.पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची २२५ कोटींची कामे मार्गी लागली आहेत. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच, बारामती-दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी-२०१९ पर्यंत व्हावे. दौंडचा समावेश पुणे विभागात करून दौंडला बारामतीच्या धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी या वेळी जाहीर केले. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली.ही कामे होणार...जेजुरीत प्लॅटफॉर्मची उभारणी. त्यानंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मितीजेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅकला मंजुरीदौंडला रेल्वेच्या जागेत उद्यान विकसित होणारhttp://www.esakal.com/pune/sharad-pawar-railway-baramati-faltan-141788
सकाळ वृत्तसेवा : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Senior Citizens Should Remain Happy Without Worrying About Age Says Sharad Pawarबारामती- ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीची व मायेची अधिक गरज असते, मात्र ज्येष्ठ नागरिकांनी वयाची फारशी काळजी न बाळगता सातत्याने आनंदी व उत्साही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.बारामती ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये सिध्दशिला ग्रुपचे प्रितम राठोड व रवी जैन यांनी उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या सोळा बंगल्यांचे उदघाटन आज शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे, विलास राठोड, संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, अध्यक्ष मुरलीधर घोळवे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, संभाजी होळकर, जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक निवासाला आश्रम अशा शब्दाने संबोधू नये त्या ऐवजी आपण दुसरा कुठला तरी शब्द शोधून काढू असे सांगत या वास्तूला आश्रम असे म्हणू नये, अशी सूचना शरद पवार यांनी केली. मी काय किंवा अरुण गुजराथी काय आम्हाला तुम्ही वयोवृध्दाच्या यादीत टाकून आम्हाला अडगळीत काही टाकू नका, मी आणि अरुणभाई दोघही आता काही निवडणूका लढविणार नाही त्या मुळे आमची चिंता कोणी काही करु नये, झाली तर आमची मदतच होईल, अशा शब्दात पवार यांनी मिश्किल टिपण्णी केली.खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. सुहासिनी सातव यांनी आभार मानले.शरद पवारांनी हास्यकल्लोळात बुडविले....कार्यक्रमादरम्यान एका लेखिकेने पवारांना एक काव्यसंग्रह दिला आणि तोच धागा पकडून शरद पवार यांनी उपस्थितांना अक्षरशः हास्यकल्लोळात बुडविले.....पवारांनी तेथे उपस्थित संबंधित लेखिकेस वय सांगायला अडचण नसेल तर सांगा....असे म्हणताच त्यांनी वय 75 सांगितले...त्यावर त्वरेने पवार उत्तरले...मग आता वय लपवायची काही गरज नाही....(हशा...) 75 व्या वर्षी त्यांनी कविता लिहीली...उद्देशून कोणाला तर प्रियकराला...(पुन्हा हशा) त्यांनी कविताच वाचून दाखविली....शेवटच्या ओळी होत्या.....जिवापाड प्रेम करुनही तुला अजूनही आपले बनवू शकले नाही....पवार म्हणाले म्हणजे अजून दुःख आहे काय...(पुन्हा हशा) कधीतरी तू घालशील मला साद...मीही आनंदाने देईन तुला प्रतिसाद...थोडा पॉज घेऊन पवार म्हणाले वय वर्षे 75.... (प्रचंड हशा) इथे असलेल्या सर्व ज्येष्ठांना मी सांगतो की काही काळजी करु नका आपणही तरुण आहोत...कोणीही येथे वृध्द नाही...http://www.esakal.com/pune/senior-citizens-should-remain-happy-without-worrying-about-age-says-sharad-pawar-141704
मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Dnyaneshwar Mulay Praise From Sharad Pawarबारामती- केंद्र सरकारच्या माध्यमातून गावोगावी पासपोर्ट मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेला महत्वाकांक्षी प्रकल्प निश्चितपणे उपयुक्त आहे. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखा एक मराठी माणूस या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठे काम करीत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.बारामतीच्या पोस्ट कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन आज पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्टमास्टर जनरल एस. एफ. एच. रिझवी, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पवार यांनी आपला पासपोर्ट कसा काढला याच्या आठवणींना उजाळा देतानाच पासपोर्टची प्रक्रीया कालानुरुप कशी बदलत गेली या बाबत माहिती दिली. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखा एक मराठी माणूस देशाच्या परराष्ट्र विभागाच्या सचिवपदाच्या माध्यमातून महत्वाचे काम करीत असल्याचा वेगळा आनंद त्यांनी बोलून दाखविला.प्रत्येक व्यक्तीला त्वरेने पासपोर्ट द्यावा असा शासनाचा प्रयत्न असून ही एक चळवळ देशात उभी केल्याचे मुळे यांनी सांगितले. आज पासपोर्ट ही चैनीची बाब राहिली नसून गरज बनली आहे, त्या मुळे प्रत्येकाकडे पासपोर्ट हवा हा आमचा प्रयत्न आहे. सुषमा स्वराज यांच्या सूचनेनंतर आज देशभरात 219 पासपोर्ट कार्यालये सुरु केल्याचे त्यांनी नमूद केले.सुप्रिया सुळे यांनीही बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी मुळे यांनी पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांचे आभार व्यक्त केले. यामुळे बारामतीकरांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रशासकीय भवनात कार्यालय हवे...बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत पासपोर्ट कार्यालय स्थलांतरीत करावे अशी सूचना शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी ज्ञानेश्वर मुळे यांना केली. भविष्यातील गर्दी विचारात घेऊन हा बदल करावा असे ते म्हणाले.http://www.esakal.com/pune/dnyaneshwar-mulay-praise-sharad-pawar-141689
मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Sharad Pawar Speak About Baramati Phaltan Rail Routeबारामती (पुणे) - येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु. समजा, अडचण आलीच तर तुम्ही सहा महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे याला फार काही वेळ लागणार नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आगामी निवडणूकीनंतर नेमके काय चित्र असेल याचेच सूतोवाच केले.बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या 56 कोटी रुपयाच्या कामाचे भूमीपुजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणूकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील या बाबतची जोरदार चर्चा आज बारामतीत होती.शरद पवार यांच्या विधानामुळे आता बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम वेगाने मार्गी लागेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज बोलताना पवार यांनी बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्वाचे स्टेशन होईल व त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. हे काम रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्चित मार्ग काढून अशी ग्वाही पवार यांनी रेल्वेच्या अधिका-यांना या प्रसंगी दिली.सुप्रिया सुळे यांनी रेल्वेचे डीआरएम मिलिंद देऊसकर यांची प्रशंसा करीत त्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची 225 कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगितले. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा देण्याबाबत त्यांनी विनंती केली. बारामती दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी 2019 पर्यंत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दौंडला बारामतीच्याच धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. दौंडचा समावेश पुणे विभागात करावा असे त्या म्हणाल्या. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली.खालील कामे प्रगतीपथावर1) जेजुरी येथील प्लॅटफॉर्म उभारणी व त्या नंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती2) जेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅक करण्यास मंजूरी मिळाली आहे.3) दौंडला रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसीत होणारhttp://www.esakal.com/pune/sharad-pawar-speak-about-baramati-phaltan-rail-route-141670
मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Dr. Ragini Parekh Gave New Life To Many - Sharad Pawarबारामती शहर - डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी आजपर्यंत मोतीबिंदूच्या अडीच लाखांवर शस्त्रक्रीया करुन अनेकांना नवदृष्टी दिली आहे. समाज कायमच त्यांच्या ऋणात राहिल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समिती, पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराच्या समारोप प्रसंगी पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.गेले तीन दिवस सुरु असलेल्या शिबीरात 426 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आला. शरद पवार यांनी लहाने व पारेख गावोगाव जाऊन रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करण्याचे काम करतात त्याची प्रशंसा केली. बारामतीतही ते नियमितपणे येऊन फोरमच्या माध्यमातून ज्येष्ठांना नवदृष्टी देतात या बाबत पवार यांनी समाधान व्यक्त केले.प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांनी या शिबीराचा आढावा घेतला, या शिबीरासह मागील सर्व शिबीरांसाठी लहाने व पारेख डॉक्टरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरवर्षी अधिकाधिक रुग्णांवर शस्त्रक्रीयेचा फोरमचा प्रयत्न असतो, पुढील शिबीरांपासून रुग्णांची संख्या वाढविण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.डॉ. तात्याराव लहाने यांनी शरद पवार यांच्यासमवेतच्या ऋणानुबंधांची माहिती देत त्यांनी सुरवातीपासूनच या कामात मोलाची मदत केल्याचे नमूद केले. या प्रसंगी या शिबीरासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.दृष्टीदानाची चळवळ व्यापक व्हावी...दरम्यान डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी सुरु केलेली ही दृष्टीदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, बारामती प्रमाणेच इंदापूर व इतर तालुक्यांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी भाषणात व्यक्त केली, त्याला डॉ. तात्याराव लहाने यांनी दुजोरा देत अशी शिबीरे करण्यास तयार असल्याचे सांगितले.http://www.esakal.com/pune/dr-ragini-parekh-gave-new-life-many-sharad-pawar-141646
बारामती येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार यांनी अापला पासपाेर्ट काढतानाच्या अाठवणी सांगितल्या. [caption id="attachment_1915" align="alignnone" width="300"] पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार ऑनलाइन लोकमत | Follow | Published: September 4, 2018 03:05 PM | Updated: September 4, 2018 03:44 PMबारामती : पासपोर्ट काढताना उडालेली धांदल... इजिप्तचा प्रवास... आणि शरद पवार... अशा त्रिकोणातील हास्यभरले किस्से उलगडले स्वत: माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी. पासपोर्ट काढण्यापासून ते परदेशवारी करुन परत येईपर्यंत असलेली धाकधूक, इंदिरा गांधींनी दौऱ्यासाठी दिलेली संधी आणि पोलिसांच्या अहवालाला लागलेला उशीर असे सर्व अनुभव ऐकताना उपस्थितांचीही उत्सुकता ताणली जात होती. बारामती येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ‘दिलखुलास’ पवार सर्वांना अनुभवायला मिळाले. पवार म्हणाले, मी १९६२ साली पहिला पासपोर्ट काढला. आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी इजिप्त येथे जाण्यासाठी माझी त्यावेळी इंदीरा गांधी यांनी निवड केली होती. जगातील ९० देशांचे तरुण त्या बैठकीला उपस्थित राहणार होते. नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह जाफर शरीफ आदी सदस्य त्या बैठकीला उपस्थित होतो. आयुष्यात पहिल्यांदाच त्यावेळी परदेशवारीला निघालो होतो. त्यावेळी पासपोर्टचे वरळी येथे कार्यालय होते. पुण्यात देखील पासपोर्टचे कार्यालय नव्हते. पासपोर्टचा अर्ज घेऊन त्यासाठी बारामती-पुणे-मुंबई असा प्रवास केला. कार्यालयात जाऊन तेथे अर्ज दिला. त्यावर एक महिन्यानंतर या, पोलीस चौकशी करावी लागेल असे मला सांगण्यात आले. बरोबर एक महिन्यानंतर परत पासपोर्ट कार्यालयात गेलो. मात्र, तुमचा पुणे ग्रामीण पोलिसांचा अहवाल अद्याप आलेला नाही, परत या असे सांगण्यात आले. दीड महीन्यांनंतरही तेच उत्तर मिळाले. अखेर दोन महिन्यांनी माझा पासपोर्ट मिळाला. पासपोर्ट आल्यावर आपण काहीतरी कमविल्याचे समाधान मला मिळाले. त्यानंतर आम्ही इजिप्त येथील ‘आस्वान’ धरणाच्या परीसरातील आयोजित बैठकीसाठी रवाना झालो. आमचे भाग्य म्हणजे त्या काळी गेलेल्या सर्वांना पुढे मुख्यमंत्री पदी काम करण्याची संधी मिळाली. इंदीरा गांधी यांनी माणसांची नेमकी निवड करण्याचा आदर्श पुढे ठेवल्याचे पवार म्हणाले. आज इथे सहज पासपोर्ट मिळत आहे. याबद्दल समाधानही व्यक्त केले. ... ‘बंधूं’च्या पासपोर्ट बरोबर आम्ही फोटो काढले१९६०- ६१ साली मी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. माझे मोठे बंधू माधवराव पवार इंग्लंडला जायला निघाले होते. त्यावेळी आम्ही पवार कुटुंबिय बारामती शहरातील आमराईमध्ये रहायला होतो. इंग्लंडला जाण्यासाठी तीन आठवड्यांचा बोटीचा प्रवास होता. परदेशात कसे जाणार, याबाबत आमच्या कुटुंबात आठ पंधरा दिवस चर्चा सुरु होती. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळी बंदरावर गेलो होतो. थोरल्या बंधुंच्या पासपोर्ट बरोबर आम्ही फोटो काढले, एवढे त्या काळात पासपोर्टचे नाविन्य होते. अशी अाठवणही शरद पवरांनी यावेळी सांगितली. http://www.lokmat.com/pune/passport-egypt-and-sharad-pawar/
“संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” राहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 06 Sep 2018 06:48 PM[caption id="attachment_1931" align="alignnone" width="300"] गाठ सुप्रिया सुळेशीhttps://abpmajha.abplive.in/pune/ncp-mp-supriya-sule-criticized-cm-ram-kadam-over-controversial-statement-in-dahihandi-582693