1 minute reading time (272 words)

[saamtv]सुप्रिया सुळेंनी बजावली ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी!

सुप्रिया सुळेंनी बजावली ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी!

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वत: उतरल्या रस्त्यावर

Supriya Sule Latest News : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात चक्क ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी बजावली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि वाहनांना वाट मोकळी करून दिली.

पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीजवळ सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुप्रिया सुळे देखील या मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी ट्राफिक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्वत: रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली.

रविवार असल्याने आज सायंकाळच्या सुमारास अनेक पर्यटक सिंहगडावर आणि चौपाटीवर मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे खडकवासला धरणाजवळ ही वाहतूक कोंडी झाली. यावेळी दोन किलोमीटर चालत जात सुप्रिया सुळे यांनी वाहनांना मार्गदर्शन करत वाहतूक सुरळीत केली. 

सुप्रिया सुळे यांनी आजच दुपारी कात्रज घाटात देखील बस प्रवाशांना मदत केली. पुणे ते मिरज येणारी शिवशाही बस भर रस्त्यात कात्रज घाटात बंद पडली. भर उन्हात प्रवाशी तब्बल एक तास ताटकळत उभे होते. अशातच आपल्या मतदार संघात निघालेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी एसटी बंद पडल्याचे पाहिलं. त्यांनी तात्काळ आपल्या कारमधून उतरत खोळंबलेल्या प्रवाशांची विचारपूस केली आणि त्यांना तातडीने मदत केली. 

यासंदर्भात त्यांनी स्वत:च एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत एसटीच्या शिवशाही बसच्या दुरावस्था आणि मिरज डेपोच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधले. सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मिरज एसटी डेपोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईची पाऊले उचलली.

...

Supriya Sule News: सुप्रिया सुळेंनी बजावली ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वत: उतरल्या रस्त्यावर | Supriya Sule performed traffic constable duty, solved traffic jam | saam tv

पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीजवळ सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुप्रिया सुळे देखील या मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी ट्राफिक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्वत: रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली.
[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी रस्त्यावर उतरत सोडवली ...
[ABP MAJHA]विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्...