1 minute reading time (75 words)

[TV9 Marathi]जेजुरीत विश्वस्त निवडीवरून वाद सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी दाखल

जेजुरीत विश्वस्त निवडीवरून वाद सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी दाखल

महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या सेवेच्या माध्यमातून देवाची निस्सीम भक्ती आणि सेवेची जबाबदारी ग्रामस्थ पूर्ण करीत असतात.ही संस्कृती पुढे जतन करण्यासाठी जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिक व्यक्तींनाच संधी मिळाली पाहिजे,अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.जेजुरी देवसंस्थान कमिटीवर जेजुरीचे स्थानिक विश्वस्त नेमावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सोमवार २९ रोजी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. 

[Maharashtra Times]माऊलींच्या गजरानं आसमंत दुमदुमल...
[Saam TV] जेजुरी विश्वस्त प्रकरणी आंदोलन, सुळेंनी ...