1 minute reading time (89 words)

[ABP MAJHA]जयंत पाटील यांची ईडी चौकशी, सुप्रिया सुळे म्हणतात...'आमच्यासाठी नवीन नाही'

जयंत पाटील यांची ईडी चौकशी, सुप्रिया सुळे म्हणतात...'आमच्यासाठी नवीन नाही'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तक घेऊन गेलेत. कारण वेळ कसा घालवणार? जयंत पाटलांना सरकारने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नोटीस पाठवून गिफ्ट दिलंय, असं त्या म्हणाल्या आहेत.  मी लोकसेभेतही बोलले की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीनं 109 वेळा धाड टाकली. हा खरंतर जागतिक विक्रमच आहे. आता भाजपचेच पदाधिकारी म्हणतायत की मला आता शांत झोप लागते. नवाब मलिक जे टीव्ही वर बोलले ते आता खरं व्हायला लागलं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

[ABP MAJHA]कात्रज घाटात शिवशाही फेल, प्रवाशांना पा...
[TV9 Marathi]आर्यन खान प्रकारणावरून सुप्रिया सुळे ...