2 minutes reading time (402 words)

[divyamarathi]कात्रज घाटात एसटी महामंडळाची बस पडली बंद

कात्रज घाटात एसटी महामंडळाची बस पडली बंद

सुप्रिया सुळे यांनी महिला, मुलांना दिली लिफ्ट

कात्रज घाटात शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याने बसमधील प्रवासी उन्हात उभे होते. यावेळी याच मार्गावरून जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी बसमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना लिफ्ट दिली.

एसटी महामंडळाच्या गाडीला फास्टटॅग नाही म्हणून जवळपास अर्धातास टोलनाक्यावर थांबचिण्यात आल्याची तक्रार प्रवाशांनी केली. तर दुसरीकडे एक तासापासून कात्रज घाटात गाडी खराब झाल्याने आम्ही इथे अडकल्याचे बसमधील महिलास प्रवाशी सांगत होते. यात सुप्रिया सुळे यांनी ज्यांच्याकडे लहान बाळ आहे, त्यांनी माझ्यागाडीत चला असे म्हणत तेथील महिलांना मदत केली आहे. भोरपर्यंत सुप्रिया सुळे यांनी या महिलांना लिफ्ट देत मदत केली आहे. सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका आणि अन्य सावली असलेल्या ठिकाणी पोहोचवले.

पुण्याहून सांगलीकडे निघालेली शिवशाही बस शिंदेवाडीजवळ बंद पडली होती. त्याबस मधील सर्व प्रवाशी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा उन्हाच्या काहिलीने हैराण होत बसजवळ उभे होते. भोर तालुका दौऱ्यावर निघालेला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा त्याठिकाणी पोहोचला, त्यावेळी रस्त्यावर उभ्या प्रवाशांना पाहून सुळे यांनी गाड्या थांबवण्याची सूचना केली आणि स्वतः गाडीतून उतरून प्रवाशांची विचारपूस केली.

गाडी बंद पडल्याने ते सर्वजण थांबल्याचे कळताच सुळे यांनी तातडीने हालचाल करत काही प्रवाशांना स्वतःच्या गाडीत घेतले, काहींना कार्यकर्त्यांच्या गाडीत बसवून घेण्याच्या सूचना दिल्या. तर काही जणांना सांगली जिल्ह्यातील पेठ येथे निघालेल्या एसटीचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांच्या बसमध्ये बसवून घेतले. त्यानंतर काही वेळाने बंद पडलेली शिवशाही बस दुरुस्त होऊन पुढे आल्यानंतर तीत बसून सर्व प्रवाशी पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दूरच्या प्रवासाला सोडण्यात येणारी प्रत्येक एसटी बस एसटी महामंडळाने तपासूनच पाठवायला हवी, अशी अपेक्षा यावेळी सुळे यांनी व्यक्त केली. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. 

...

कात्रज घाटात एसटी महामंडळाची बस पडली बंद, सुप्रिया सुळे यांनी महिला, मुलांना दिली लिफ्ट | Supriya Sule Help Shivshahi Bus Stopped Katraj Ghat - Divya Marathi

कात्रज घाटात शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याने बसमधील प्रवासी उन्हात उभे होते. यावेळी याच मार्गावरून जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी बसमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना लिफ्ट दिली. | Supriya Sule Help Shivshahi Bus Stopped Katraj Ghat कात्रज घाटात शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याने बसमधील प्रवासी उन्हात उभे होते. यावेळी याच मार्गावरुन जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी बसमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना लिफ्ट दिली.
[NEWS 100 MARATHI]रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांच्...
[etvbharat]बंद पडलेल्या शिवशाही बसमधील प्रवाश्यांस...