पुण्यातील कार्यक्रमात भरपावसात दोघेही मैदानात! पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा भर पावसात मैदानात उतरलेले दिसले. पुण्यात बावधन परिसरात सारंजाम वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र मुसळधार पावसातही शरद पवार आपली लेक सुप्रिया सुळेंना सोबत घेत या का...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्र प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्राचे ट्रीपल इंजिन सरकार सुट्ट्यांचे कारण देऊन आमदार अपात्र प्रकरणात पळपुटेपणा करत होती. राज्यात पॅालिसी पॅरालिसीस आहे. त्यांना मोठी चपराक आहे. आम...
भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात. पण विरोधात बोलाल तर एजन्सीजच्या माध्यमातून त्रास दिला जातो. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझ्या तीन बहिणींच्या घरावर एजन्सीच्या धाडी घालण्यात आल्या. त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांच्या घरापर्यंत एजन्सीज् गेल्या. त्यांच्यावर धाडी कशासाठी? हे माझ्या बहिणी आहेत म्हणून बोलत नाह...
मुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक, हुतात्मा चौकात सरकारच्या विरोधात आंदोलन मुंबई - आज एकिकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असताना, दुसरीकडे मुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक झाला असून, त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन केले. मुंबई विकास आराखड्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. मात्र, केंद्राचा हा निर्णय ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज (गुरुवारी) पुणे दौऱ्यावर असून त्यांनी निसर्ग मंगल कार्यालय येथे भेट दिली. शरद पवार यांनी कधीही कुठलीही गोष्ट यशासाठी केली नाही. ते कालही योद्धा होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार असल्याचे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना सल्ला आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही, आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टिका करावी असेही सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या वाचा... Supriya Sule on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापनदि मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडला. या कार्यक्रमात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छा अजित पवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. मला संघटनेतील कोणतं...
फक्त दडपशाही सुरू असल्याची सुळेंची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तर एका आंदोलनात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. मा...
सुप्रिया सुळे अॅक्शन मोडवर Supriya Sule Latest Speech : राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा बनल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, रयतेच राज्य आणण्यासाठी जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. देशात क...
वेल्हा : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्यानिधीतून वेल्हे पोलीस ठाण्याची प्रशस्त आणि देखणी इमारत उभी रहात आहे. काम वेगात सुरू असून लवकरच या नव्या कोऱ्या इमारतीत वेल्हा पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देऊन या कामाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ...
खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन मंथन शिबीर खडकवासला विधानसभा मतदार संघ खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन
पती गमावलेल्या मीनाताईंना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू पुणे : भारतातील जुनाट प्रथांना मूठमाती देणारे आधुनिक विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आजवर अनेक प्रसंग आणि घटनांनी वेळोवेळी आपल्या पुरोगामीपणाची प्रचिती दिली आहे. याच उदात्त परंपरेला साजेसा असा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमी आपल्या मतदारस...
नोंद: सदर लेख हा सरकारनामा या ऑनलाईन पोर्टल वर दिनांक ९ जून २०१८ रोजी पब्लिश झाला आहे. http://www.sarkarnama.in/blog-supriya-sule-two-decades-ncp-24759 अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जुन १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबईच्या रस्त्यांवर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी होती. सर्वत्र जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मुंबईनगरी उत्साहाने सळसळत होती, याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार असणारे आणि देशातील मोठ्या नेतृत्त्वापैकी एक असणारे शरद पवार साहेब नव्या पक्षाची घोषणा करणार होते. लोक मोठ्या उत्कंठेने त्यांच्या भाषणाची वाट पाहत होते. साहेब भाषणाला उभे राहताच त्यांच्या जयजयकाराने अवघे शिवाजीपार्क अक्षरशः दुमदुमून गेले. आपल्या नेहमीच्या शैलीत साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. साहेब म्हणाले, "दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे." देशाला एक नवा विश्वास देताना साहेब पुढे म्हणाले, "सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे." पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करुन दाखविला आहे. साहेबांनी शिवाजीपार्कवरील त्या भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल असे स्पष्टपणे नमूद केले होते. ही शिदोरी पाठीशी बांधूनच राष्ट्रवादीने आपली वाटचाल कायम ठेवली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मूल्याधिष्ठीत राजकारणाचा वसा घेऊन शरद पवार साहेब गेली अर्धा शतकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या काळात झालेली विविध क्षेत्रातील कामे जनतेच्या लक्षात आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सहकारातून समृद्धीचा राजमार्ग प्रशस्त करताना खेड्यापाड्यातील जनता सुखी आणि समृद्ध व्हावी याकडे त्यांनी आवर्जून लक्ष पुरविले. आपल्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात देशातील कृषीव्यवस्था अधिकाधिक बळकट व्हावी आणि त्याव्दारे शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पोषक निर्णय घेतले.त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एकेकाळी धान्य आयात करणारा आपला देश केवळ अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णच झाला नाही तर अन्नधान्याची निर्यात करणारा एक प्रमुख राष्ट्र बनला. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत संशोधनांना गती देण्याचे कार्यही त्यांच्याच काळात आवर्जून हाती घेण्यात आले. अन्नप्रक्रीया क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासाला टाळताच येणार नाही. हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्त्व असणाऱ्या नेत्याने आजवर केलेल्या कामाचा जनतेला दीर्घकालीन फायदाच झाला आहे. म्हणूनच विकास कार्याबाबत शरद पवार हे अधिक विश्वासार्ह नाव आहे, याची जनतेला खात्री आहे. प्रत्यक्ष अनुभवातून देशभरात याची प्रचितीही आलेली आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पवधीतच जनतेची पसंती मिळाली. खरेतर पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात दशकांचा कालावधी जावा लागतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पक्कं केडर उभं रहावं लागतं. पण एखादा राजकीय पक्ष स्थापन झाल्यावर वर्षाच्या आत सत्तेवर येतो आणि त्यानंतर तब्बल दीड दशकं अर्थात पंधरा वर्षे तो सत्तेच्या केंद्रस्थानी असतो हे क्वचितच घडतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे घडलं. पक्षाच्या स्थापनेस १९ वर्षे पुर्ण होत असताना आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहालोकन करणे आवश्यक ठरते. खरेतर १९-२० वर्षे हा काळ एखाद्या संघटनेसाठी फार मोठा काळ नाही. आता तर कुठे खरी सुरुवात झाली असून पक्षाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा संदेश देणारी वेळ आहे. आजघडीला समाजाच्या प्रत्येक स्तरात पक्षाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्त्व आहे. पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, गेल्या चार वर्षांत त्याचे मजबूत जाळ्यात रुपांतर केले आहे. हे जाळे पवार साहेबांसारख्या कणखर आणि कर्तबगार नेतृत्त्वाखाली पुर्वीपेक्षाही अधिक सक्रीयतेने कार्यरत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकारने आपल्या दीड दशकांच्या शासनकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी, आरोग्य, कुटुंबकल्याण, सामाजीक न्याय, क्रीडा, उद्योग, ग्रामीण आणि शहरी विकास, पायाभूत सुविधांचे जाळे, उर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर भारनियमनातून मुक्ती अशा क्षेत्रात सरकारने केलेली कामे अभूतपुर्व अशी आहेत. निसर्गाचे संकट ओढावल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे केले नाही. शेतकऱ्यांना शून्य अथवा कमी व्याजदराने शेतीसाठी पतपुरवठा कसा होईल याकडे लक्ष पुरविले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पुरविला. बचत गटाची व्यापक चळवळ...