1 minute reading time (296 words)

[sarkarnama]काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या

काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या

सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले...

'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत.

'शरद पवारसाहेब यांनी काँग्रेस (Congress) सोडली किंवा त्यांना नोटीस मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचे काम त्यांनी केले नाही. पक्षाची जी बैठक झाली त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या सांगण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचारासाठी कुठले नेते येणार याचे नियोजन सुरू असून पवार साहेब इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत बोलत आहेत', असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत. त्याविषयी तसेच जागावाटपाची माहिती बैठकीत देण्यात आली. वेळ नियोजन, सभा याबाबत चर्चा झाली. उद्या पवारसाहेब उद्धव ठाकरेंसोबत बोलणार आहेत. महाराष्ट्रात प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावरील नेते किती वेळ देणार, शरद पवारसाहेब, राहुल गांधी किती वेळ देणार याची चर्चा झाली, असे सुळे यांनी सांगितले.

सरकारवर हल्ला

हे सरकार असंवेदनशिल सरकार आहे. खोक्याचे सरकार आहे.शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, त्यावर चर्चा होत नाही. आज आमच्या मिटींगमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. आमचे सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. हे असंवेनशील सरकार आहे. घरफोड, ईडी,सीबीआय लावायचे येवढेच उद्योग हे सरकार करत आहेत, असा जोरदार हल्ला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर केला.

...

NCP Congress Merger : काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

NCP Sharad Pawar Group Will Merge With Congress Rumor Supriya Sule Sharad Pawar : शरद पवारसाहेब यांनी काँग्रेस सोडली किंवा त्यांना नोटीस मिळाली तेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचे काम त्यांनी केले ना | Sharad Pawar News | Supriya Sule News | Political News in Marathi | Maharashtra Political News | Sarkarnama
[LetsUpp Marathi]अशोक चव्हाण भाजपवासी, सुप्रिया सु...
[abplive]जयंत पाटलांनतर सुप्रिया सुळेंनी सांगितला ...