2 minutes reading time (381 words)

[abplive]जयंत पाटलांनतर सुप्रिया सुळेंनी सांगितला पक्षाचा पुढचा प्लॅन

जयंत पाटलांनतर सुप्रिया सुळेंनी सांगितला पक्षाचा पुढचा प्लॅन

म्हणाल्या येत्या निवडणुकीत....

शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कोणत्याची चर्चा झाली नाही तर बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतींवर चर्चा झाली. पक्षाचं काम कशापद्धतीने करणार, यासंदर्भात चर्चा झाल्याचं खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी स्पष्ट केलं आहे. 

यापूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची पक्षाचा पुढचा प्लॅन सांगितला होता. आता त्यानंतर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुप्रिया सुळेंनी पक्षाचा पुढचा प्लॅन सांगितला आहे. शरद पवारांनी तातडीच्या बैठकीत निवडणूकी संदर्भात पक्षाची पुढची रणनीती सांगितली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला ज्या जागा मिळणार आहे या संदर्भातील माहिती जयंत पाटलांनी आम्हाला सगळ्यांना दिली आहे. त्यानंतर प्रचारातील सगळ्यांचा वेळ कसा असेल? निवडणुकीचं नियोजन कसं असेल? पक्षाच्या पुढच्या सभा कुठे होतील, यासंदर्भात माहिती घेतली. शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांची टीम आणि आपण सगळे एकत्र कसं काम करणार आहोत?, यासंदर्भात बातचित केली. इंडिया आघाडीतील कोणते नेते प्रचारासाठी राज्यात येणार याचंदेखील नियोजन करण्यात आलं असल्याचं त्या म्हणाल्या.  

सोनिया गांधी, राहूल गांधीसोबतच कोणते बडे नेते प्रचारासाठी येणार याची चर्चा

सगळे उमेदवार आणि त्यांचा प्रचार कसा असेल. कोणते नेते निवडणून लढणार नाही पण प्रचार करतील याची चर्चा झाली. त्यासोबत शरद पवार हे लोकसभा लढणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या निवडणुकीसाठी सोनिया गांधी, राहूल गांधीसोबतच कोणते बडे नेते प्रचारासाठी येणार त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किती वेळ देणार? या सगळ्याची चर्चा आजच्या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं.

चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार

आम्हाला मिळणाऱ्या चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी केली आहे. त्यामुळे शरद पवारांकडून अदृष्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. हे चुकीचं आहे. पक्ष काढून घेणं याला अन्याय म्हणणार नाही. आम्ही कमकुवत नाही तर आम्ही मेरीटमध्ये पास होणारे आहोत. आम्ही कधीही कॉपी करुन पास झालेलो नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

...

MP Supriya Sule Reaction On Sharad Pawar Faction May Merge Into Congress And NCP Planning | Supriya Sule : जयंत पाटलांनतर सुप्रिया सुळेंनी सांगितला पक्षाचा पुढचा प्लॅन, म्हणाल्या येत्या निवडणुकीत शरद पवार....

कॉंग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कोणत्याची चर्चा झाली नाही तर बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतींवर चर्चा झाली. पक्षाचं काम कशापद्धतीने करणार, यासंदर्भात चर्चा झाल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. 
[sarkarnama]काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता ...
[tv9marathi]राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन ह...