1 minute reading time
(90 words)
[TV9 Marathi]राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून अजित पवार यांचा झालेला नाही : सुप्रिया सुळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अनिल देशमुख यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. "अनिल देशमुख हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सत्य असल्याशिवाय ते विधान करणार नाहीत", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

