1 minute reading time
(95 words)
[TV9 Marathi]भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं - सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले काम करत असतात. पण लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, 1500 रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

