[Time Maharashtra]Supriya Sule यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छांचा वर्षाव
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर चहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसाच्या निमित्त सुप्रिया सुळे यांना अनेक पक्षांकडून देखील शुभेच्छांचा पाऊस पडतोय. सुप्रिया सुळे या बारामतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेच्या खासदार, २०१४ पासून लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सपा) नेत्या आणि २०२३ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. संसदीय कर्तव्यांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना २०२५ मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सुळे यांचा जन्म भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या पोटी ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. त्यांनी सेंट कोलंबा स्कूल, गमदेवी येथून एसएससी उत्तीर्ण केले. त्यांचे शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले आणि त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली. सुळे लोकसभेच्या सदस्या म्हणून त्यांच्या संसदीय सहभागासाठी ओळखल्या जातात, त्या अनेक प्रसंगी लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी एक म्हणून उदयास आल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यातच आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हणाले,'सामान्य जनतेची बाजू संसदेत तर देशाची बाजू परदेशात प्रभावीपणे मांडणाऱ्या अभ्यासू #संसदरत्न खा. सुप्रियाताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या हातून देशाची अशीच सेवा घडो आणि त्यासाठी आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! असे रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
