1 minute reading time
(98 words)
[ABP MAJHA]मी नवऱ्याशी बोलले नाही, फक्त मतदासंघाकडे लक्ष्य दिलं, आता विधानसभा जिंकूच
सुप्रियाताई सुळे यांनी कांदा प्रश्नानेच भाजपचा वांदा केल्याचे म्हणताना भाजपला छेडलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल. तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही सर्व खासदार मांडू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. हा शब्द आहे! असे आश्वासन सुळे यांनी दिले. याआधी कांदा प्रश्नावर पियुष गोयल यांना भेटले होते. मात्र त्यांनी तीन जिल्ह्यासाठी मी देशाला वेठीस धरणार नाही असे उत्तर दिले होते. आज याच तीन जिल्ह्यांनी कांदा प्रश्नावरून भाजपच्या मंत्र्यांचा पराभव केला असेही सुळे म्हणाल्या. त्याचबरोबर सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे आपल्याला विधानसभा निवडणूक जिंकायची आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत.

