ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

वालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय... कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या...हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे... इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया.   राजकुमार थोरात 04.07 PM 2supriya_sule_17सुप्रिया सुळे या तालुक्यातील १६ गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत होत्या. पडस्थळ गावातील गावा दौरा संपवून दुसऱ्या गावाकडे जाण्याच्या तयारीमध्ये असताना एक डोक्याला लाल फेटा बांधलेले एंशी वर्षाचे आजोबा वामन मारकड अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आले. व त्यांना मनातले सांगण्यास सुरवात केली.त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारला बोझा म्हणून संबोधत होते. सरकारचं जनतेवर बोझा झाल्याचे सांगून आमच्या डोक्यावरचा बोझा कमी करा. सरकारनं महागाई वाढवली आहे. साहेबांचे (शरद पवार) यांचे काम चांगल होतं... तुमचे पहिल्या पासुन चांगल काम आहे. तुम्ही काय पण करा... लक्ष राखून निवडून या...असे सांगितले.ग्रामीण भागातील जनता शेतकरी भाजप सरकारला वैतागले आहेत. शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थाच कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा थेट परीणाम शेतकऱ्यावरती होवू लागला असून, मशागतीचा खर्च ही वाढला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास परवडत नसल्याचे शेतकरी सांगू लागले असून काय पण करा यावेळी निवडूण या असे शेतकरी सांगत आहेत. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, प्रतापराव पाटील, महारुद्र पाटील, शशिकांत तरंगे उपस्थित होते.http://www.esakal.com/paschim-maharashtra/government-has-put-farmers-down-farmers-118976

Read More
  134 Hits
Tags:

Center of Excellence for Dairy foundation stone laid in Baramati

Center of Excellence for Dairy foundation stone laid in Baramati

May 25, 2018 / By Reporter Center of Excellence for Dairy foundation stone laid in BaramatiBaramati – Netherlands Deputy Prime Minister Ms Carola Schouten on Friday laid the foundation stone of Center of Excellence for Dairy, a joint Indo – Dutch initiative between the Agricultural Development Trust, Baramati (supported by GOI under RKVY) and the Dutch Govt.Genetic improvement of Indian breeds for better cattle health, increased milk yield and milk quality improvement will be the focus areas of CoE for Dairy.“I had gotten opportunity to visit Netherlands during my stint as an Agriculture Minister. There I decided to set up the Center of Excellence for various agricultural sectors in India. In this context , In 2015, foundation stone of CoE for Vegetable Production was laid at the hands of Shri Narendra Modi in Baramati. I am happy that Ms Carola could see the state of art facilities in this CoE. In my opinion, merely bringing Dutch technology in India is not enough, it should successfully reach the farmers and their farms”, said Sharad Pawar, who was also present.Later bicycle distribution ceremony that took place. “This bicycle distribution program for girl students and ASHA workers is one of my higher priority initiative for empowering women . I’m grateful to Mr. Pankaj Munjal, Chairman Hero Cycles and Shri Jagdish Khattar, MD of Suzuki for extending support for this initiative”, Pawar added. latform to Buy, Sell & Rent tractors & farm mechanization implements Baramati – Netherlands Deputy Prime Minister Ms Carola Schouten on Friday laid the foundation stone of Center of Excellence for Dairy, a joint Indo – Dutch initiative between the Agricultural Development Trust, Baramati (supported by GOI under RKVY) and the Dutch Govt.Genetic improvement of Indian breeds for better cattle health, increased milk yield and milk quality improvement will be the focus areas of CoE for Dairy.“I had gotten opportunity to visit Netherlands during my stint as an Agriculture Minister. There I decided to set up the Center of Excellence for various agricultural sectors in India. In this context , In 2015, foundation stone of CoE for Vegetable Production was laid at the hands of Shri Narendra Modi in Baramati. I am happy that Ms Carola could see the state of art facilities in this CoE. In my opinion, merely bringing Dutch technology in India is not enough, it should successfully reach the farmers and their farms”, said Sharad Pawar, who was also present.Later bicycle distribution ceremony that took place. “This bicycle distribution program for girl students and ASHA workers is one of my higher priority initiative for empowering women . I’m grateful to Mr. Pankaj Munjal, Chairman Hero Cycles and Shri Jagdish Khattar, MD of Suzuki for extending support for this initiative”, Pawar added.Baramati MP Supriya Sule was also present on the occasion.http://www.punekarnews.in/?p=23376

Read More
  138 Hits

नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारी

नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारीराहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 25 May 2018 11:30 PMबारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली. सुप्रिया सुळेंना सायकल चालवताना पाहून उपस्थित विद्यार्थिनीही भारावल्या.बारामतीमध्ये काही स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन उपस्थित होत्या. दोघींच्या हस्ते हे सायकल वाटप करण्यात आलं.यावेळी सुप्रिया सुळे आणि स्काऊटेन यांना सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे दोघींनी काही अंतर सायकल चालवत पुढील कार्यक्रमात आगमन केलंhttp://abpmajha.abplive.in/maharashtra/supriya-sule-cycling-with-netherlands-political-leader-carolla-scouten-latest-update-544991

Read More
  121 Hits

NCP leader Supriya Sule tells CM Devendra Fadnavis to take lessons on running state from Ajit Pawar

NCP leader Supriya Sule tells CM Devendra Fadnavis to take lessons on running state from Ajit Pawar

Supriya Sule. (Photo: Twitter/@supriya_sule) Mayuresh Ganapatye Mumbai May 25, 2018 UPDATED 23:32 ISTDirectly attacking Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis's methods of governance, Member of Parliament and NCP leader Supriya Sule today told him that he should take lessons from Ajit Pawar on how to run state. She said that despite studying various problems in the state for the past three years, if the CM was still unable to solve these problems then he should take lessons from Ajit Pawar. "In the state Ajit Pawar is the best person to give tuition to Fadnavis. For this tuition we will not even charge any fees," Supriya Sule said in Indapur. Sule continued to taunt the CM saying if a student kept failing in the same class despite studying then "we ask him to join tuitions". Also read: All party Muslim MLAs protest against CM Devendra Fadnavis"CM of Maharashtra is still studying issues of the state so we feel he should join tuitions," she said. Sule praised her brother Ajit Pawar who was deputy CM of the state during Congress NCP regime. Sule felt he was the best person who could give Fadnavis proper guidance. https://www.indiatoday.in/india/story/ncp-leader-supriya-sule-tells-cm-devendra-fadnavis-to-take-lessons-on-running-state-from-ajit-pawar-1242067-2018-05-25

Read More
  100 Hits

खासदारांचे रिपोर्ट कार्ड: थोडे झाले, थोडे करायचे आहे!

खासदारांचे रिपोर्ट कार्ड: थोडे झाले, थोडे करायचे आहे!

Published On: May 26 2018 1:52AM | Last Updated: May 26 2018 खासदारांचे रिपोर्ट कार्ड केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारमुळे सामान्य नागरिकांनी काय कमावले आणि काय गमावले, यावर सोशल मीडियापासून सर्वत्रच चर्चा होत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील खासदारांनी केलेली कामे आणि उर्वरित वर्षभरातील कामांसाठी केलेल्या संकल्पाचे ‘रिपोर्ट कार्ड’ त्यांच्याच शब्दात. अनेक प्रकल्प मार्गी : खा. सुप्रिया सुळेगेल्या चार वर्षांत केंद्रात वेगळ्या विचारांचे सरकार असतानाही बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध कामांचा पाठपुरावा करून, ती मार्गी लावली असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे- दौंड लोकलचा पाठपुरावा सातत्याने केला. त्यात असलेले अडथळे दूर करण्यासाठी रेल्वेमंत्री तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी सातत्याने बैठका घेतल्या. पुणे-दौंड रेल्वेमार्गातील कडेठाण, खुटबाव, मांजरी या स्थानकांवर प्लॅटफॉर्मसाठी निधी उपलब्ध केला. तीर्थक्षेत्र जेजुरी येथील रेल्वेस्थानकाचा विकास तसेच स्थानकावर पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही मोठा पाठपुरावा केला. दौंड शहरात बीएसएनएलशी संबंधित अनेक प्रश्‍न होते. बारामतीतही काही ठिकाणी हा प्रश्‍न होता, परंतु मुख्यत्वे दौंडमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. आत्महत्या केलेल्या मतदारसंघातील  शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींच्या पुनर्वसनासाठी उमेद हा उपक्रम राबविला. या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सहाय्य करण्यात आले. पुण्याच्या कचरा डेपोच्या प्रश्‍नात फुरसुंगी व ऊरुळी देवाची येथील ग्रामस्थांसोबत आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा. रायरेश्‍वर आणि रोहिडेश्‍वर किल्ल्यांसाठी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या माध्यमातून 1.61 कोटी व 1.31कोटींचा निधी मंजूर करून आणला. सांसद आदर्श ग्राम दापोडी येथे सौरऊर्जा व पवनचक्की प्रकल्पाचे काम पूर्ण केले. इंदापूरच्या न्यायालय इमारतीसाठी निधी. सिहंगड रोड येथील नदीपात्रालगतच्या रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा. आगामी काळात मतदारसंघातील डोणजे हे गाव ऐतिहासिक खेडे पर्यटनासाठी विकसित करण्यासाठी पाठपुरावा करणार. 20 हजार कोटींहून अधिक निधी आणलाशिरूर लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारमार्फत गेल्या 4 वर्षांत निरनिराळ्या प्रकल्पांसाठी सुमारे वीस हजार कोटींहून अधिकचा निधी मिळविण्यात यश आल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पुणे-नाशिक रेल्वे मंजुरी- 5500 कोटी, राष्ट्रीय महामार्ग रस्ते कामांसाठी- 5711 कोटी, चांडोली ते सिन्नर महामार्ग चौपदरीकरण- 1970 कोटी, नाशिक फाटा ते चांडोली सहापदरीकरण- 978 कोटी, सरळगाव-बनकर फाटा-घोडेगाव-तळेघर-भीमाशंकर मार्गे वाडा-राजगुरुनगर महामार्ग करणे- 966 कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा महामार्ग रुंदीकरण- 1800 कोटी, राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-कळंब-आळेफाटा आदी गावांचा बायपास वगळता अंतर्गत महामार्गाची खास बाब म्हणून विशेष दुरुस्ती- 100 कोटी, केंद्रीय मार्ग निधीतून केदारेश्‍वर पूल, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते व पुलांची कामे- 16 कोटी, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळा खोल्या बांधणे- 3 कोटी 40 लक्ष निधी आणला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भरीव निधी मिळवण्याकडे लक्ष देणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जनधन योजना, जीवनज्योती विमा, कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना, पीक विमा आदी केंद्रीय योजनांची मतदारसंघात प्रभावीपणे अंमलबजावणी. पुढील एक वर्षात पुणे-नाशिक लोहमार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रखडलेली बायपासची कामे, मंजुरी देण्यात आलेल्या प्रकल्पांची कामे लवकर सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न. पुणे-शिरूर-नगर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आग्रही. पुणे जिल्ह्यातील शाळा खोल्यांच्या कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अपंगांना विविध स्वरूपाचे साहित्य मिळावे यासाठी केंद्रीय योजनेअंतर्गत केंद्राकडून मदत मिळवून देणार. बैलगाडा शर्यतीसाठी भक्कम कायद्याचा पाठपुरावा करूबैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयात न्याय न मिळाल्यास शर्यती सुरू होण्यासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडून केंद्र सरकारकडे याबाबत भक्कम कायदा करण्याकरता पाठपुरावा सुरू ठेवणार आहे, असे आढळराव यांनी सांगितले. नदी प्रदूषण आणि स्वस्त घरे याकडेच आता लक्षपुणे - लोणावाळा रेल्वे ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाकडून मंजूरी मिळवून दिली. त्यानंतर तिसर्‍या व चौथ्या रेल्वे ट्रॅकचा स्वर्हे सुरु झाला आहे. हा ट्रॅक सुरु झाल्यानंतर पुणे ते लोणावळा जलदगती रेल्वे सुरु होईल. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सार्वजनीक वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत पासपोर्ट कार्यालय सुरु केले. त्यामुळे या भागातील लोकांना पुणे शहरात जाण्याचा त्रास कमी झाला व चांगली सुविधा शहरात प्राप्त झाली. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच हिंजवडी, लोणावळा परिसरातील लोकांना सुविधा मिळाली. वर्षभरात सुमारे 32 हजार लोकांनी नव्याने पासपोर्ट काढले. केंद्र सरकारच्या दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत ज्या दुर्गम भागात  स्वातंत्र्यानंतर वीज पोहचलीच नाही, अशा 5 गावांत वीज पोहचविली. या योजनेअंतर्गत मावळ, कर्जत, खालापूर, पनवेल या भागातील दुर्गम, आदीवासी भागातील वस्त्यांवर  वीज सुविधा मिळाली. पनवेल ते जेएनपीटी बंदर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावर आठ पदरी रस्ता करुन वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावला. मावळ भागातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसह देहूरोड कॅन्टोन्मेंट आदी भागात पिण्याचे व शेतीचे पाणी पुरविणार्‍या पवना धरणातील सुमारे 21 हजार ट्रक गाळ खासदार निधीच्या खर्चातून काढून पवना धरणाची...

Read More
  140 Hits

महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावल्या...

महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावल्या...

राजकुमार थोरात : शुक्रवार, 25 मे 2018 Women From Walchandnagar Felicitated MP Supriya Suleवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील महिलांनी केलेल्या सत्कारामुळे खासदार सुप्रिया सुळे भारावून गेल्या. सुळे यांनी तालुक्यामध्ये अकरा तासामध्ये १६ गावातील महिलांच्या भेटीगाठी घेवून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळसदेव-बिजवडी गटातील १६ गावामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या गावभेटी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुळे यांचा दौरा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरु झाला. व रात्री ९ वाजता संपला. अकरा तासामध्‍ये १६ गावांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सुळे यांनी विशेष:ता महिलांशी संपर्क साधला. वयश्री योजनेची माहिती मिळाली होती का? अपंगाच्या मेळाव्याची माहिती देण्यात आली होती का? गावामध्ये पाणी येते का? रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत का? याची माहिती घेतली.एरवी राजकीय कार्य्रकमाला महिलांची हजेरीचे प्रमाण कमी असते. मात्र सुळेच्या दौऱ्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता.या वेळी सुळे यांनी सांगितले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे स्थानिक स्वराज संस्थेमध्ये मध्ये महिलांचा टक्का वाढला आहे. आज अनेक गावामध्ये महिला कारभारी (सरपंच) असून गावचा कारभार सक्षमपणे सांभाळत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच अनेक गावामध्ये सुळे यांचा महिलांनी सत्कार केल्यामुळे सुळे भारावून गेल्या. पुणे जिल्हातील अंगणवाडी सेविका,मदतनीस व आशा वर्कर यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्थ कार्ड तयार करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी देवून महिलांना कामानिमित्त फिरण्यासाठी विशेष सायकलची निर्मिती ही करणार असून इंदापूर तालुक्यातील मुलींसाठी ३५०० सायकली वाटप करणार असल्याचे सांगितले.आमदार भरणे, सभापती जगदाळे व माने यांचे कौतुक...इंदापूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान खासदार सुळे यांनी आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या कामाचे कौतुक करुन तालुक्याचा विकास होत आहे. नागरिकांना अडचणी असल्यास त्यांनी थेट आमदार भरणे, सभापती जगदाळे, माने व  माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.http://www.esakal.com/pune/women-walchandnagar-felicitated-mp-supriya-sule-119315

Read More
  141 Hits

'Parliamentary Award for Children' awarded to MP Supriya Sule

'Parliamentary Award for Children' awarded to MP Supriya Sule

'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेचे वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनीच ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. राज्यभरातील विशेष मुले, अंगणवाड्या, शालेय शिक्षकांसाठी सुप्रिया सुळे सातत्याने कार्यरत आहेत. कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसवण्याचा कार्यक्रम घेत असतात. सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने दखल घेतली होती. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल चार हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवण्यात आली. आपल्या मतदारसंघातील एकही मुलगी दूर अंतरामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्या दरवर्षी सुप्रिया सुळे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करतात. गेल्या वर्षी 15 हजार, तर यावर्षी दहा हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि इतर कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत 'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंट्रियन अॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला. http://aplapune.com/article/ncp-mp-supriya-sule-received-parliamentarians-award-for-children-given-by-parliamentarians-group-for

Read More
  186 Hits

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला: सुप्रिया सुळे

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला: सुप्रिया सुळे

दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही त्यांनी केली. लोकसत्ता ऑनलाइन | October 24, 2018 04:48 amराज्यात भयंकर दुष्काळ असतानाही केवळ शब्दांचे खेळ करत दुष्काळसदृश परीस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पण या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.अपुऱ्या पावसामुळे निम्म्या राज्यावर भीषण दुष्काळाची छाया पसरली असून राज्याच्या तब्बल १८० तालुक्यांतील सुमारे २० हजार गावांत सरकारने मंगळवारी टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.‘राज्यात भयंकर दुष्काळ असतानानाही केवळ शब्दांचे खेळ करीत दुष्काळसदृश परीस्थिती जाहीर करुन मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली’, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सोमवारी पुण्यात अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.दरम्यान, राज्यात यंदा सरासरीच्या ७५.८ टक्के पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद सोलापूर तर सर्वाधिक पावसाची नोंद सातारा जिल्ह्यात झाली आहे. सोलापूर,नाशिक, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्य़ांत ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याने १७३ तालुक्यांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. या जिल्ह्यांमधील जवळपास सर्वच तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती असल्याने जनतेला दिलासा देण्यासाठी या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाची वीज खंडित न करणे आदी विविध आठ सवलती लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-supriya-sule-slams-cm-devendra-fadnavis-over-drought-like-situation-1777310/

Read More
  133 Hits

News 1

First News

Read More
  145 Hits

News 2

News Categeory 2

Read More
  194 Hits

News 3

Demo News 3

Read More
  167 Hits

News 2

Dummy New 4

Read More
  132 Hits