1 minute reading time
(117 words)
[TV9 Marathi]'सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आलीय' : सुप्रिया सुळे
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "वहिनींवर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत." वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले, पण दादा आपल्यात नसल्याचे दुःख कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या, "दादा नसल्याचं दुःख आयुष्यभर राहील. ही प्रेमाची नाती असतात. वेळ जरी पुढे जात असली तरी ही पोकळी भरून निघत नाही. सुप्रिया सुळे " भावनिक होत त्या म्हणाल्या, "आमच्या सर्व भावंडांचे दादासोबत खूप जिव्हाळ्याचे नाते होते. इतक्या लहान वयात दादा आपल्याला सोडून गेले, हे मान्य करणे कठीण आहे. त्यांनी कधीही थकलेले किंवा आजारी असल्याचे दाखवले नाही. आज ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही."

