महाराष्ट्र

'Parliamentary Award for Children' awarded to MP Supriya Sule

'Parliamentary Award for Children' awarded to MP Supriya Sule

'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेचे वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनीच ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. राज्यभरातील विशेष मुले, अंगणवाड्या, शालेय शिक्षकांसाठी सुप्रिया सुळे सातत्याने कार्यरत आहेत. कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसवण्याचा कार्यक्रम घेत असतात. सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने दखल घेतली होती. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल चार हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवण्यात आली. आपल्या मतदारसंघातील एकही मुलगी दूर अंतरामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्या दरवर्षी सुप्रिया सुळे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करतात. गेल्या वर्षी 15 हजार, तर यावर्षी दहा हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि इतर कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत 'युनिसेफ' आणि 'पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन' या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंट्रियन अॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन' हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला. http://aplapune.com/article/ncp-mp-supriya-sule-received-parliamentarians-award-for-children-given-by-parliamentarians-group-for

Read More
  519 Hits

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला: सुप्रिया सुळे

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला: सुप्रिया सुळे

दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही त्यांनी केली. लोकसत्ता ऑनलाइन | October 24, 2018 04:48 amराज्यात भयंकर दुष्काळ असतानाही केवळ शब्दांचे खेळ करत दुष्काळसदृश परीस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पण या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.अपुऱ्या पावसामुळे निम्म्या राज्यावर भीषण दुष्काळाची छाया पसरली असून राज्याच्या तब्बल १८० तालुक्यांतील सुमारे २० हजार गावांत सरकारने मंगळवारी टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.‘राज्यात भयंकर दुष्काळ असतानानाही केवळ शब्दांचे खेळ करीत दुष्काळसदृश परीस्थिती जाहीर करुन मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली’, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सोमवारी पुण्यात अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.दरम्यान, राज्यात यंदा सरासरीच्या ७५.८ टक्के पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद सोलापूर तर सर्वाधिक पावसाची नोंद सातारा जिल्ह्यात झाली आहे. सोलापूर,नाशिक, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्य़ांत ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याने १७३ तालुक्यांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. या जिल्ह्यांमधील जवळपास सर्वच तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती असल्याने जनतेला दिलासा देण्यासाठी या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाची वीज खंडित न करणे आदी विविध आठ सवलती लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-supriya-sule-slams-cm-devendra-fadnavis-over-drought-like-situation-1777310/

Read More
  443 Hits

News 1

First News

Read More
  363 Hits

News 2

News Categeory 2

Read More
  484 Hits

News 3

Demo News 3

Read More
  406 Hits

News 2

Dummy New 4

Read More
  414 Hits