1 minute reading time (156 words)

मुख्यमंत्र्यांना वास्तवाची जाणीव नाही, हागणदारीमुक्त राज्य केवळ भ्रम : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांना वास्तवाची जाणीव नाही, हागणदारीमुक्त राज्य केवळ भ्रम : सुप्रिया सुळे

महा एमटीबी   22-Apr-2018
त्यांना आकडेवारी कुठून मिळते


पुणे :  मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या वास्तवाची जाणीव नाहीये. त्यांच्याकडे असेलली आकडेवारी कुठल्या आधारावर आहे माहीत नाही, मात्र त्यांची हागणदारी मुक्त महाराष्ट्राची घोषणा म्हणजे केवळ एक भ्रम आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आज पुण्याच्या तळजाई टेकडी येथे वसुंधरा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्री हॅलिकॉप्टरने फिरतात, त्यांना रस्त्यावरचे वास्तव कसे कळणार ? 
मुख्यमंत्री रस्त्याने नाही तर हॅलिकॉप्टरने फिरतात त्यामुळे त्यांना जमिनीवरचे वास्तव कसे कळणार असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या गावांमध्ये संडास असले तरी पाणी नाहीये, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप हागणदारी मुक्त झालेले नाही. तसेच ही योजना आर.आर. पाटील यांनी सुरु केली होती, त्यामुळे या योजनेवर मुख्यमंत्री आपला हक्क सांगू शकतत नाहीत, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
त्यांना ही आकडेवारी कुठून मिळते?
मुख्यमंत्री खूप आत्मविश्वासाने आकडेवारी सादर करतात, त्यांना ही आकडेवारी कुठून मिळते असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ एक भ्रम असल्याचे त्यांनी यावेळी वारंवार सांगितले.
http://mahamtb.com//Encyc/2018/4/22/Supriya-sule-lashes-out-about-devendra-Fadnavis-CMO.html
राज्य सरकारच्या योजना फसव्या - सुप्रिया सुळे
अंगणवाडी आणि आशा सेविकांना ‘हेल्थ कार्ड’ मिळावे -...