महाराष्ट्र

[Maharashtra Lokmanch]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

परदेशी फ्लेमिंगो पक्षीनवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली. आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया...

Read More
  458 Hits

[Lokmat]भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

बारामती (पुणे) : सध्या महाराष्ट्रात कोकण रेल्वे व पश्चिम रेल्वेलाइनला जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही, तसेच पूर्व भागाला जोडणारा व कोकणात विविध बंदरे, सागरी मार्गांवरील माल वाहतूक करण्यासाठीही समर्पित रेल्वेमार्ग नाही.हे लक्षात घेता बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग सुरू करण्याची मागणी खासदार...

Read More
  428 Hits

[Sakal]बारामती लोकसभा मतदार संघातील पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे-सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदार संघातील पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे-सुप्रिया सुळे

Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट प्रकल्पांसाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारकडे केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून तसे लेखी पत्रही त्यांनी दिले. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये 'पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमे...

Read More
  391 Hits

[Maharashtra Lokmanch​]सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा

सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

पुरंदर, भोर, वेल्ह्यात BSNL टॉवरसाठी खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट नवी दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठ...

Read More
  403 Hits

[AIR PUNE]खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा

खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट  पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्या...

Read More
  370 Hits

[TV9 Marathi]बारामतीत बघण्यासारखं काय?

बारामतीत बघण्यासारखं काय? सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं

सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या. असे निमंत्र...

Read More
  437 Hits

[Sakal]दिव्यांग, ज्येष्ठांच्या प्रश्‍नावर सुळेंची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

दिव्यांग, ज्येष्ठांच्या प्रश्‍नावर सुळेंची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

 पुणे, ता. २ : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 'एडीआयपी' आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार ...

Read More
  516 Hits

[Maharashtra Lokmanch]महाड – चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम व्हावे

महाड – चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम व्हावे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने निवेदन देताना माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र  पुणे – बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हा रस्ता झाल्यास येथील दळणवळण वाढून या भागातील स्था...

Read More
  479 Hits

[Punekar News]Pune-Mumbai Pragati Or Deccan Express Should Leave From Baramati, Passengers’ Time And Cost Will Be Saved: MP Supriya Sule

Pragati Or Deccan Express Should Leave From Baramati

Baramarti, 30th January 2023: MP Supriya Sule demanded the Pune Divisional Railway Administration that either Deccan or Pragati Express trains departing from Pune should be departed from Baramati for the convenience of passengers going to Mumbai from Baramati. Sule made this demand in a meeting with Pune Divisional Railway Manager (DRM) Indu Dubey....

Read More
  823 Hits

[महाराष्ट्र लोकमंच] इंदापुरात भीमेकाठी पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करा

इंदापुरात भीमेकाठी पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करा खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  इंदापूर : राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रिसॉर्ट उभे करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रि...

Read More
  503 Hits

[महाराष्ट्र टाईम्स] देशाच्या सीमेचं १७ वर्ष रक्षण, शेतीत राबले

देशाच्या सीमेचं १७ वर्ष रक्षण, शेतीत राबले अभ्यासाची जोड, ४० व्या वर्षी MPSC तून अधिकारी

अभ्यासाची जोड, ४० व्या वर्षी MPSC तून अधिकारी पुणे : भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता अक्षय झुरुंगे यांनी स्पर्धा परीक्षा दिली. ते सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी बनले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिकाला भे...

Read More
  544 Hits

[Abp माझा]40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश

40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अश्रय झुरुंगे यांची दौंडमध्ये सध्या चर्चा आहे. त्यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माज...

Read More
  485 Hits

[TV9 Marathi]'राष्ट्रवादी काँग्रेसचं काम म्हणजे विकास'

राष्ट्रवादी काँग्रेसचं काम म्हणजे विकास'

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन  मंथन शिबीर खडकवासला विधानसभा मतदार संघ खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन

Read More
  516 Hits

[News 18 लोकमत]'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासून सुरूवात करते'

'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासून सुरूवात करते' सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती

सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती पुणे, 7 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतंय, हे दुर्दैव असल...

Read More
  483 Hits

टॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे

टॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे

सकाळ वृत्तसेवापुणे-  पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुळे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पदाधिकारी; तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे आदी अधिकाऱ्यांसह मंगळवारी दौंड तालुक्‍यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. पडवी येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.  ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच सुळे यांच्या समोर वाचला. सरपंच राजेंद्र शितोळे यांनी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली.https://www.esakal.com/maharashtra/immediately-start-tanker-and-fodder-camps-says-supriya-sule-154819

Read More
  464 Hits

सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यांची व्यथा

सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यांची व्यथा

बारामती शहर - राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. केवळ हाच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करुनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, काल दोन अपघात झाले दोघेही लोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार व कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकारदरबारी या निमित्ताने न्याय मागते, असेही सुळे यांनी सांगितले.जेजुरीनजिक रेल्वे उड्डाणपूलावरुन सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत खड्डयांची परिस्थिती किती भीषण आहे याचे चित्रणच लोकांना दाखविले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान लोकांशी संवाद साधत त्यांनी लोकांच्या भावना चित्रीत केल्या, मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत हे खड्डे त्वरित बुजविण्याबाबत तसेच रस्ता व्यवस्थित करण्याबाबत विनंती केली. नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढत सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय हलगर्जीपणाचा लोकांना किती त्रास होतो हे यातून दाखवून दिले.दुष्काळाबाबतही उपाययोजना हव्यात...पुरंदर तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे, नाझरे धरणातील पाणी साठा वेगाने संपत आहे, अशा स्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत, असेही आवाहन त्यांनी केले.https://www.esakal.com/pune/supriya-sule-shows-bad-conditions-streets-through-facebook-live-154932

Read More
  446 Hits

केवळ संघटनकौशल्य पाहून सुप्रिया सुळे यांनी युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले!

केवळ संघटनकौशल्य पाहून सुप्रिया सुळे यांनी युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले!

सरकारनामा ब्युरोगुरुवार, 25 ऑक्टोबर 2018 सातारा : ''कोणतीही राजकिय पार्श्‍वभूमी नसताना केवळ सुप्रिया सुळे यांनी माझे संघटनकौशल्य पाहून मला युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले, तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आणले,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सक्षणा सलगर पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेली दोन दिवस त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी युवतींचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आज त्या साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आल्या. येथे त्यांचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. यावेळी युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्र जाधव उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला व मुली सुरक्षित नाहीत, भाजप सरकारने त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मोफत पासही मिळालेले नाहीत. त्यामुळे भाजप सरकारच्या कारभाराबाबत सर्वजण नाखुश आहेत. सरकारमधील मंत्री व नेते महिला व मुलींबाबत विकृत वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे बेटी बचाओ ऐवजी बेटी भगाओ असाच यांचा नारा दिसत आहे. भाजपचे मंत्री व नेते महिला व मुलींबाबत सातत्याने विकृत विधाने करत आहेत. मंत्रीमंडळात भाजपची ही अभद्र टीम भरलेली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सॅनिटरी नॅपकिनवरून केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.-सक्षणा सलगर http://www.sarkarnama.in/sakshana-salgar-about-supriya-sule-30024

Read More
  445 Hits

संविधान जाळण्याचे महापाप भाजप सरकारच्या काळात झाले- सुप्रिया सुळे

संविधान जाळण्याचे महापाप भाजप सरकारच्या काळात झाले- सुप्रिया सुळे

प्रभात वृत्तसेवा-October 29, 2018 | 5:50 pmपुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज पुणे येथील बालेवाडीत गणेश कला, क्रीडा मंडळ येथे संविधान बचाव , देश बचाव हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात एक अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे म्हटले. संविधान जाळण्याचे महापाप याच सरकारच्या काळात झाले. भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यावर साधी दिलगिरी व्यक्त करत नाहीत, म्हणूनच संविधान धोक्यात आहे असे आम्हाला वाटते. संविधानाविरोधात कोणीही काहीही बोलले तर आपण ते सहन न करता त्याविरोधात बोलायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.राज्यात अत्यंत भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुढचे काही महिने अडचणीचे आहे. आपण या संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. हे सरकार उदासीन आहे म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहायला हवे. सणासुदीची वेळ आहे, शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा असे काम आपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.http://www.dainikprabhat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%aa/

Read More
  423 Hits

‘मी टू’ मोहीम अंतर्मुख करणारी: सुळे

‘मी टू’ मोहीम अंतर्मुख करणारी: सुळे

'मी टू' मोहिमेच्या निमित्ताने महिला बोलू लागल्या, याचे स्वागत आहे. हा विषय गंभीर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा आहे. सर्वच क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या मोहिमेचे गांभीर्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'मी टू' मोहिमेच्या निमित्ताने महिला बोलू लागल्या, याचे स्वागत आहे. हा विषय गंभीर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा आहे. सर्वच क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या मोहिमेचे गांभीर्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. 'देशात कुपोषण, महिला अत्याचार अशा अनेक समस्या असताना आपण कोणत्या मुद्दाला प्राधान्य द्यायला हवे,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शोषण न झालेली एकही महिला दिसणार नाही. एम. जे. अकबर प्रकरणामध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली नाही. एक महिला खोटी बोलत असेल, पण २० महिला खोट्या बोलणार नाहीत. विशाखा समित्यांनी आपल्या भूमिका पार पाडल्या असत्या तर आज इतक्या प्रमाणात तक्रारी पुढे आल्याच नसत्या, असे त्यांनी सांगितले.मुलींना उचलून नेण्याची भाषा होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार खंडणी मागतात, पण गृह खाते असलेले मुख्यमंत्री 'पारदर्शक' कारभार आहे, असे नुसतेच सांगतात. आपल्या आमदारांवर काहीच बोलत नाहीत. राज्य महिला आयोग तर आजकाल बोलतही नाही आणि गंभीरही नाही. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा नारा तुम्ही देता. प्रत्यक्षात महाराष्ट्रात महिला असुरक्षित झाल्या. उत्तर प्रदेश, बिहारला नाव ठेवायचीच कशाला. महाराष्ट्रापेक्षा तर ही राज्ये अधिक उत्तम आहेत अशी म्हणायची वेळ आली. आम्ही सत्तेत आलो तर महिला सुरक्षेला आमचे प्राधान्य असेल. एकल महिला धोरणावर आम्ही गंभीर आहोत असेही त्यांनी सांगितले.या सरकारच्या प्रत्येक योजना, धोरणात पारदर्शकता दिसत नाही. स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, मुद्रा योजना, कौशल्य विकास उपक्रम सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरले. २०१९पेक्षा २०२४मध्ये जनता इतर काही नको फक्त काम द्या, असेच म्हणेल. 'मुद्रा'चे भलेमोठे रॅकेट औरंगाबादमध्येच उघडकीस आले. देशात अशीच परिस्थिती आहे. केंद्राचा, राज्याचा महिला धोरणाचा ड्राफ्ट उत्तम आहे, पण अंमलबजावणी करताना वस्तुस्थिती खूप वेगळी असते. शौचालय बांधण्याचे आवाहन सरकार करते. शासकीय जाहिरातींमध्ये अमिताभ बच्चन काम करताना पाहणे सुखावह आहे, पण महिलांना खरच फायदा झाला का. महिला स्वच्छतागृहाचा विषय तर मागेच पडला. मी इतक्या ठिकाणी फिरते पण महिला स्वच्छतागृहाची सोय कुठेच नाही, अशी खंत सुळे यांनी बोलून दाखवली.निवडणूकांपूर्वीच राम मंदिर आठवते २०१९च्या निवडणुका या मंदिरावर होतील की विकासकामांवर या प्रश्नाचे उत्तर सत्ताधारी पक्षाकडेच असावे, असे त्या म्हणाल्या. पाच वर्षांत ६०० कोटी खर्च करून भाजप मुख्यालयाची इमारत तयार झाली. भाजपची नवे कार्यालये तयार झाली, पण पाच वर्षांत सरकारला राम मंदिर काही बांधता आले नाही. २०१४च्या निवडणुकांमध्ये जनतेने विकासासाठी मतदान केले. मग आता पुन्हा राम मंदिर विषय आला. शिवसेनेला रामाची उशिरा आठवण झाली. शिवसेनेची 'अयोध्या चलो' ही भूमिका सोयीनुसार आली. अशा भूमिकेमुळे देशाचे नुकसान झाले, अशी टीका त्यांनी केली.https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/metoo-movement-mp-supriya-sule/articleshow/66376086.cms

Read More
  406 Hits

मुख्यमंत्री दुष्काळाविषयी असंवेदनशील : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री दुष्काळाविषयी असंवेदनशील  : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवादौंड : ''राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,'' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दौंड येथे आज (ता. 2) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या, ''सीएम चषकाच्या निमित्ताने सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. चषकाला माझा विरोध नाही; परंतु वेळ चुकीची आहे. दुष्काळात होरपळणाऱ्यांना आधार देऊन अडचणीत असलेल्यांना मदत करण्यास राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सगळं बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावे. राज्यात बेरोजगारी, महागाई, असुरक्षितता आणि दूषित सामाजिक वातावरणामुळे अस्वस्थता असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे गांभीर्य नाही. जाहिरातबाजीवर तुफान खर्च करणारे हे सरकार आहे. जनतेला हे सरकार वाटत नसून, एखादा प्रॉडक्‍ट वाटावा, अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. राज्याबद्दल भाजप-शिवसेनेचे नेते बोलत नाहीत. राज्य सरकारची कोणतीही योजना चाललेली नाही. आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या या युतीने लोकांची फसवणूक केली आहे.''''सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील वाद, रुपयाचे अव्यमूलन, कोलमडणारी ग्रामीण अर्थव्यवस्था, सीबीआयअंतर्गत लाच प्रकरणावरून झालेल्या धाडी आणि केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वाद दुर्दैवी आहेत. अशा विसंवाद आणि वादांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव खराब होत आहे. त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होत आहे,'' असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.अभ्यास आणि नियोजनाचा अभाव असलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम योग्य नाही. जलयुक्तचे जे काही काम झाले, त्याचे श्रेय अभिनेता अमिर खान व पाणी फाउंडेशनचे आहे. - सुप्रिया सुळे, खासदारhttps://www.esakal.com/pune/supriya-sule-criticises-cm-devendra-fadnavis-over-drought-situation-153060

Read More
  379 Hits