1 minute reading time (270 words)

[policenama]पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत

पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत

खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Mahamarg | बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) जाणाऱ्या हडपसर ते लोणंद (Hadapsar To Lonand Palkhi Marg) या पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी (Hadapsar To Zendewadi Palkhi Marg) या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. तरी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्विटद्वारे केली आहे. (Palkhi Mahamarg)

दिवे घाटातून (Dive Ghat) जाणारा हा मार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने वन विभागाच्या (Forest Department) परवानगीची अडचण होती. परंतु खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या मध्यस्थीने हा विषय मार्गी लागला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Palkhi Mahamarg)

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे (Pandharpur Wari) पायी जाणारा पालखी सोहळा लवकरच सुरु होत असून वारकऱ्यांच्या व नागरीकांच्या सुविधा लक्षात घेता हा मार्ग पुर्ण होणे गरजेचे आहे. याबाबतच्या सर्व अडचणी दूर झालेल्या असून हे काम तातडीने सुरु करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

...

Palkhi Mahamarg | पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची...

Palkhi Mahamarg | बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) जाणाऱ्या हडपसर ते लोणंद (Hadapsar To Lonand Palkhi Marg)
[loksatta]“लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…”
[TV9 Marathi ] Purandar Highlands हा माझा अभिमान -...