Aren’t Kathua and Unnao rape victims your daughters too? Supriya Sule asks PM Modi

Aren’t Kathua and Unnao rape victims your daughters too? Supriya Sule asks PM Modi

Supriya Sule has demanded action against those who were trying to shield the culprits NCP leader Supriya Sule wrote an open letter to Modi on Saturday.(Hindustan Times)NCP leader Supriya Sule wrote an open letter to Modi on Saturday.(Hindustan Times)Updated: Apr 14, 2018 23:43 ISTFaisal MalikHindustan TimesIn a scathing open letter to Prime Minister Narendra Modi over Unnao and Kathua gang-rape cases, Nationalist Congress Party (NCP) MP Supriya Sule has demanded action against those who were trying to shield the culprits.Sule asked Modi, who gave a slogan of Beti Bachao, Beti Padhao, if the eight-year-old child, who was gang-raped and murdered in J&K’s Kathua, and 17-year-old girl from Unnao are not his daughters too. Sule targeted the ruling parties in Uttar Pradesh and Jammu and Kashmir for lack of political will in taking action against the accused. While Uttar Pradesh is ruled by the Bharatiya Janata Party (BJP), the Peoples Democratic Party in alliance with the BJP is in power in Jammu and Kashmir. The alleged inept handling of chilling gang-rape cases has shocked the nation, leading to a public outcry and nationwide protests.“The victims of both Kathua and Unnao were daughters of this country. When you raise a slogan to save daughters, the responsibility for safety of these daughters is on you as well. In a way, you have become a guardian of all daughter of the country. By this way, doesn’t the Kathua child become your daughter? Being a mother of a daughter, I am urging you to act against those who are trying to shield the perpetrators,” read the letter sent to Modi on Saturday. She has also termed the stand taken by some BJP members as a precursor to anarchy. “Lack of political will was clearly visible when it came to action... If you (Modi) keep quiet today, this tendency will be encouraged,” Sule wrote.She added that she was expecting justice from a person like Modi who speaks for women empowerment. 

Read More
  245 Hits

स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका सुरू करावी- खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका सुरू करावी- खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे लोकसत्ता टीम | Updated: April 17, 2018 4:36 AM स्वारगेट खडकवासला मेट्रो सुरु करावी मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणाची मागणी होत असतानाच आता स्वारगेट ते खडकवासला अशी मेट्रो मार्गिका सुरू  करावी, अशी मागणी सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडून सुरू झाली आहेत. ही कामे सुरू झाल्यानंतर मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण करण्याची मागणी सुरू झाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची हवाई सर्वेक्षणाची प्रक्रियाही महामेट्रोकडून सुरू झाली असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) करण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडूनही शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गिकेचे हडपसपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खडकवासला हे गाव येथील धरण, त्यापुढील सिंहगड किल्ला, पानशेत, वरसगाव ही धरणे, आणि एकूणच या परिसरातील निसर्ग संपदा यामुळे या भागात पर्यटकांची बारमाही गर्दी असते. याशिवाय गेल्या काही वर्षांत या भागात वाढलेली नागरी लोकसंख्या, तेथून नोकरी व्यवसायानिमित्त रोज पुणे शहरात ये-जा करणारा नोकरदार वर्ग, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णालये आणि अन्य कारणांसाठी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना रोजच्या रोज पुण्यात यावे लागते. या सर्वाची खूप मोठी संख्या आहे. त्यांच्या सोयीसाठी स्वारगेट ते खडकवासला दरम्यान मेट्रो सुरू करावी. https://www.loksatta.com/pune-news/start-from-swargate-to-khadakwasla-metro-line-supriya-sule-1664404/

Read More
  287 Hits

अंगणवाडी आणि आशा सेविकांना ‘हेल्थ कार्ड’ मिळावे - सुप्रिया सुळे

अंगणवाडी आणि आशा सेविकांना ‘हेल्थ कार्ड’ मिळावे  - सुप्रिया सुळे

अंगणवाडी आणि आशा सेविकांना हेल्थ कार्ड मिळावे पुणे, दि. १७ (प्रतिनिधी) – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील अंगणवाडी आणि आशा सेविका काम करत असून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. त्यांना हेल्थ कार्ड देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.राज्यातील बालकांच्या आरोग्यासाठी सतत झटणाऱ्या या महिलांचे स्वत:चे आरोग्य सांभाळण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मुळातच कमी पगार, त्यात घरगुती प्रश्न, आणि अन्य अनेक कारणांनी या महिलांच्या आरोग्याची हेळसांड होते. शेकडो महिला अक्षरशः उपाशी पोटी तासनतास काम करत असतात. साहजिकच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या महिलांमध्ये अनेकदा अशक्तपणा, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग अशा आरोग्याच्या गंभीर समस्या आढळून आल्या आहेत. त्यांना स्वस्त दरात चांगले उपचार मिळावेत. यासाठी लवकरात लवकर राज्यातील सर्व अंगणवाडी आणि आशा सेविकांना हेल्थ कार्ड मिळावे, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.या सेविकांना देण्यात येणाऱ्या हेल्थ कार्डवर हिमोग्लोबिन, ब्रेस्ट व गर्भाशयाचा कॅन्सर तपासणी करण्याबरोबरच मोफत उपचाराचीही तरतुद करण्यात यावी, त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असेही सुळे यांनी म्हटले आहे.

Read More
  261 Hits

भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी,आगामी निवडणुकीत मोदी लाट दिसणार नाही

भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी,आगामी निवडणुकीत मोदी लाट दिसणार नाही

खा सुप्रिया सुळे यांचा विश्वास,सरकारच्या धोरणावर प्रखर टीका सुप्रिया सुळे अमोल तोरणे : पुण्यनगरी बारामती: देशातील प्रत्येक घटक या सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर नाराज आहे. महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यामध्ये मोठी वाढ झाली असून २०१४ साली निवडणूकीत दिलेले कोणतेही आश्वासन भाजपला पाळता आले नाही, अशी टीका करीत आगामी २०१९ च्या निवडणूकीत २०१४ प्रमाणे मोदी लाट दिसणार, त्यावेळी आघाडी सरकारच सत्तेवर येईल असा ठाम विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दैनिक पुण्यनगरीशी संवाद साधताना व्यक्त केला.सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मागील निवडणुकीत भाजपने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, काळा पैसा बाहेर काढून प्रत्येक नागरीकांच्या खात्यावर १५ लाख भरणार अशी आश्वासने दिली होती. ती आश्वासने आता गेली कुठे ? आम्ही सत्तेत असताना सर्वसामान्यांची कामे केली, त्याचे मार्केटींग केले नाही. पण त्यावेळेसचे विरोधक आणि आताचे सत्ताधारी यांचा केवळ जाहीरातबाजीवरच जोर होता. सत्तेत आल्यानंतरही त्यांचा जाहिरातबाजीचा सोस कमी होताना दिसत नाही. जाहिरातींच्या खर्चातून सरसकट कर्जमाफी होईल”, असा टोलाही त्यांनी मारला.या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत असे नमूद करुन सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. जम्मू काश्मीर येथे आठ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिथे आरोपींच्या समर्थनार्थ या सरकारच्या जवळच्या संघटनांनी मोर्चे काढले. या मोर्चांमध्ये तेथील भाजपाचे मंत्रीही सामील झाले. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका महिलेवर तेथील भाजप आमदाराने बलात्कार केला. ही पिडिता न्याय मागण्यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांच्या दारात गेली असता तिच्या वडीलांना पोलीसांनी उचलून नेले. त्यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. मागितला न्याय आणि मिळाला वडीलाचा मृतदेह अशी तिची स्थिती झाली. बलात्कार, छेडछाड, मुलींचे अपहरण, विनयभंग आदी घटनांनी राज्यात अक्षरशः कळस गाठला आहे. हे सर्व सरकारचेच आकडे आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्राला भूषणावह आहे का ? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीररित्या ढासळली असताना या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा असे मुख्यमंत्र्यांना वाटत नाही काय ?आपण सर्वच क्षेत्रात माघारलो हे सर्व आम्ही विरोधक नाही तर नीती आयोगच सांगतोय. सरकारच्या धोरणाचे एक उदाहरण सांगते, अंगणवाडी सेविका संपावर असताना त्यांना सरकारने अचानक आदेश काढून त्यांना मेस्मा लावला. पण ही चूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तो मागे घेतला. या प्रकारच्या कार्यपद्धतीला ‘गुड गव्हर्नन्स’ नाही तर ‘बॅड गव्हर्नन्स’ म्हणावे लागेल. राज्यातील बालकांच्या विकासाची स्थिती दारुण असल्याचा मुद्दा त्यांनी नमूद केला.हे सरकार कृषीविरोधी असल्याचे नमूद करुन सुप्रियाताई म्हणाल्या, सुरुवातीला आम्ही त्यांना काम करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ दिला. पण ते काहीच करत नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी जनतेच्या हितासाठी आम्ही हल्लाबोलच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलो. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पण सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारचा कर्जमाफीत हेतू स्वच्छ आहे तर मग त्यांनी दीड लाखाची अट का घातली? आम्ही सत्तेत असताना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेवून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढून त्याला पुन्हा बळ देण्याचे काम केले होते. मात्र या सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर यासाठी टाकलेल्या जाचक अटी,ऑनलाईन फॉर्म भरण्याची किचकट प्रक्रिया,अर्ज भरण्यासाठी पती-पत्नीची अट, त्यामुळे महिलांना मोठा त्रास झाला,यासाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागले. तरीदेखील काहीही साध्य झाले नाही.शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे असे नमूद करुन सुप्रिया सुळे म्हणाल्या, शेतकऱ्यांनी हजार रूपयांचे वीजबील थकविले तरी त्याची लगेच वीज तोडली जाते. शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून ते आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येत आहेत. मंत्रालयात धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने केलेली आत्महत्या असो की यवतमाळ जिल्ह्यातील सावळेश्वर येथे शेतकऱ्याने पऱ्हाटीची चिता रचून केलेले आत्मदहन हे सर्व या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचे परिणाम आहेत. आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. कर्जमाफीसाठी आम्ही शेतकऱ्यांना कुठलेही ऑनलाईन फॉर्म भरायला लावले नाहीत. त्यांना रांगेत उभे केले नाही, आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना आमच्या सरकारमधील कुणीही त्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम केले नाही. या सरकारमधील एका जबाबदार मंत्र्यांनी कर्जमाफीच्या यादीतील बहुतांश शेतकरी बोगस असल्याचे विधान केले होते. नुकत्याच झालेल्या गारपीटीनंतर शेतकऱ्यांना मदत देऊ करण्याऐवजी हे सरकार शेतकऱ्यांच्या हातात गुन्हेगारांसारख्या पाट्या देऊन त्यांचे फोटो काढण्यात मग्न होते. शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना कोणत्याही संवेदनशील सरकारला हे उद्योग सुचू कसे शकतात असा प्रश्न मला पडला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली आहे पण राज्यातील कृषीव्यवस्थाच मोडीत निघते की काय अशी स्थिती आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी उभ्या पिकांवरुन नांगर फिरवत आहेत. देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून अपेक्षाभंग झाल्याचे सांगून आपल्या मृत्यूला त्यांना जबाबदार धरावे असे लिहून आत्महत्या करीत आहेत. हे वास्तव भीषण आणि अस्वस्थ करणारे आहे.बेरोजगारीमध्ये वाढ होत असल्याचे नमूद करुन सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्योग...

Read More
  247 Hits

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, म्हणाल्या- आर आर पाटलांचा उल्लेख का टाळला?

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, म्हणाल्या- आर आर पाटलांचा उल्लेख का टाळला?

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2018, 12:46 PM IST महाराष्ट्रातील जनता आबांना विसरणार नाही- सुप्रिया सुळे मुंबई- मुख्यमंत्री जेव्हा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत होते तेव्हा त्यांच्याकडून आर. आर. आबांच्या कामाचा किमान उल्लेख होईल असे अपेक्षित होते. कारण विरोधात असताना आर. आर. पाटील यांच्या कामाचा झपाटा आणि ग्रामस्वच्छता अभियानाचे यश मुख्यमंत्र्यांनी अतिशय जवळून पाहिले होते. पक्षीय राजकारणामुळे म्हणा किंवा वरीष्ठांच्या खप्पामर्जीची भीतीने म्हणा आर. आर. आबांच्या नावाचा उल्लेख त्यांनी टाळला असला तरी ते जेव्हा एकांतात जातील तेव्हा त्यांचे मन ओरडून ओरडून आबांच्या कार्याला अनुल्लेखाने मारल्याबद्दल जाब विचारेल यात शंका नाही, असा शालजोडीतील टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. मात्र, त्यात दिवंगत माजी ग्रामविकासमंत्री आर आर पाटील यांचा उल्लेख करण्यात आला नाही. तत्कालिन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी 1999 साली हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु केला होता. राज्यातील जनतेने त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र, आज आर आर आबा आपल्यात नाहीत. त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी हागणदारीमुक्त महाराष्ट्रची घोषणा करताच मला आर आर आबांची आठवण झाली अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितली. याबाबत सुळे यांनी सविस्तर ब्लॉग लिहून आबांच्या कार्याला उजाळा व त्यातून मुख्यमंत्र्यांना चिमटेही काढले. सुप्रिया सुळेंनी लिहलेला ब्लॉग आम्ही जसाच्या तसा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रातील जनता आबांना विसरणार नाही- सुप्रिया सुळेमा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केल्याचे वाचताक्षणी मला आर. आर. आबांची तीव्रतेने आठवण झाली. राजकारणातील अतिशय निरागस व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आबांनी मोठ्या कल्पकतेने सुरु केलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आठवले. हे अभियान आबांनी प्रचंड मेहनत घेऊन ते यशस्वी करुन दाखविले. त्याची नोंद राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. संत गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छतेचे अभियान सुरु करणाऱ्या या द्रष्ट्या नेत्याने राज्यातील गावागावांत स्वच्छतेसाठी निकोप स्पर्धा लावली. यातून महाराष्ट्रात खुपच मोठे क्रांतीकारी काम झाले. महाराष्ट्राच्या सामाजिक विकासात आर. आर. आबांचे हे काम सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात स्वच्छता नांदावी, स्वच्छतेमागून समृद्धी यावी असे जे स्पप्न संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आघाडी सरकारने मांडले होते. किंबहुना स्वच्छ भारत मोहिमेची बीजे रोवली होती त्याला हागणदारीमुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून काही अंशी फळे येऊ लागल्याचे पाहून समाधान वाटले. तत्कालिन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील ( आबा) यांनी 1999 साली हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु केला होता. राज्यातील जनतेने त्याला अतिशय आनंदाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप सरकारने ही योजना स्थगित केली. खेड्यापाड्यात स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या संत गाडगेबाबांच्या नावाने सुरु झालेली ही एक यशस्वी योजना स्थगित करुन सरकारने नेमके काय साधले हा संशोधनाचा विषय आहे. मुख्यमंत्री जेंव्हा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत होते तेंव्हा त्यांच्याकडून आर. आर. आबांच्या कामाचा किमान उल्लेख होईल असे अपेक्षित होते. कारण विरोधात असताना आर. आर. पाटील यांच्य कामाचा झपाटा आणि ग्रामस्वच्छता अभियानाचे यश त्यांनी अतिशय जवळून पाहिले होते. कदाचित उघडपणे त्यांनी आर. आर. आबांच्या नावाचा उल्लेख टाळला असला, किंवा त्यांना तसा उल्लेख करण्याबाबत पक्षीय राजकारणाच्या, राजकारणातील वरीष्ठांच्या खप्पामर्जीची भीती असावी. पण जेंव्हा ते एकांतात जातील तेंव्हा त्यांचे मन ओरडून ओरडून आबांच्या कार्याला अनुल्लेखाने मारल्याबद्दल जाब विचारेल यात शंका नाही. मुख्यमंत्री साहेब, खरं तर काही गोष्टी राजकारणाच्या पलिकडच्या असतात. त्या वारसा म्हणून जपाव्या लागतात. आपण आर. आर. आबांना विसरलात तरी महाराष्ट्राची जनता मात्र विसरणार नाही. संत गाडगेबाबांचा वारसा घेऊन स्वच्छतेचे अभियान राबविणाऱ्या आर. आर. पाटील ( आबा) यांची महाराष्ट्रातील जनता कायम ऋणी राहील. कारण माणसं शरीराने निघून गेली तरी ती त्यांच्या कार्याचा अमिट ठसा समाजमनावर सोडून जातात. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आर. आर. आबांनी असाच एक न पुसुन टाकता येणारा ठसा महाराष्ट्राच्या समाजमनावर सोडला आहे. तो अनुल्लेखानेही पुसणे तुम्हाला जमणार नाही. - सुप्रिया सुळे, खासदारhttps://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-supriya-sule-wrote-a-blog-remembering-of-r-r-patil-over-swachata-abhiyan-5855929-PHO.html

Read More
  246 Hits

राज्यातील मुली व महिला असुरक्षित - सुप्रिया सुळे

राज्यातील मुली व महिला असुरक्षित - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा : शुक्रवार, 20 एप्रिल 2018 girl women unsecure in state supriya suleशेटफळगढे - ‘‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते असूनही राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. महिलांवर अत्याचाराचे व बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील मुली व महिलांना सुरक्षित राहणे अवघड झाले आहे. त्यामुळे अशा सरकारचा आपण जाहीर निषेध करीत असून, राज्यातील महिलांवर जर अन्याय झाला, तर आपण तो कदापि सहन करणार नाही,’’ असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.लामजेवाडी (ता. इंदापूर) येथे सुप्रिया सुळे यांनी आज भेट दिली, त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘केंद्र व राज्यातील सरकार महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रधानमंत्री छोट्या-छोट्या गोष्टीवर लगेच बोलतात; परंतु जम्मूची घटना व उत्तर प्रदेशातील घटनांवर बोलायला त्यांनी खूप वेळ लावला. केंद्र व राज्यातील सरकार महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अपयशी ठरल्याने महिला घराबाहेर पडल्यावर ती घरी येईपर्यंत घरच्यांना व पालकांना चिंता लागून राहत आहे.’’सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘‘राष्ट्रवादीने २०१९ च्या निवडणुकांची तयारी करू नये, तर २०२४ ची तयारी करावी. कारण सरकार भाजपचे येणार आहे,’’ असे सांगितले. याबाबत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘सध्या त्यांच्याकडे खाते असलेल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यात गोरगरीब जनतेचा विनाकारण जीव जात आहे.त्यामुळे बांधकाममंत्र्यांनी आधी या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व त्यांची संख्या शून्यावर आणावी, मगच निवडणुकीविषयी बोलावे. परंतु, भाजपच्या नेत्यांना लोकांची कामे करण्यात रस नसून, केवळ निवडणुकांत रस आहे. हा रस कमी करून कामाच्या केवळ घोषणा करण्याऐवजी गोरगरीब जनतेची कामे करावीत व महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, याचा विचार करावा.’’‘आर. आर. आबांना श्रेय’‘‘मुख्यमंत्र्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली; परंतु आपण जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असला, तरी याचे संपूर्ण श्रेय माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनाच जाते. कारण, मागील २० वर्षांपूर्वी देशात व राज्यात स्वच्छतेविषयी कोणी बोलत नव्हते, तेव्हा आर. आर. आबांनी स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी स्वच्छतेसंबंधी योजना आणल्या व यशस्वी केल्या. त्यातून गावे निर्मल झाली. त्यामुळेच महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला, याची घोषणा आपणाला करता आली. त्यामुळे त्याचे संपूर्ण श्रेय आर. आर. आबांना जाते,’’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.http://www.esakal.com/maharashtra/girl-women-unsecure-state-supriya-sule-111027

Read More
  258 Hits

मुख्यमंत्र्यांना वास्तवाची जाणीव नाही, हागणदारीमुक्त राज्य केवळ भ्रम : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांना वास्तवाची जाणीव नाही, हागणदारीमुक्त राज्य केवळ भ्रम : सुप्रिया सुळे

महा एमटीबी   22-Apr-2018 त्यांना आकडेवारी कुठून मिळतेपुणे :  मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या वास्तवाची जाणीव नाहीये. त्यांच्याकडे असेलली आकडेवारी कुठल्या आधारावर आहे माहीत नाही, मात्र त्यांची हागणदारी मुक्त महाराष्ट्राची घोषणा म्हणजे केवळ एक भ्रम आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आज पुण्याच्या तळजाई टेकडी येथे वसुंधरा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.मुख्यमंत्री हॅलिकॉप्टरने फिरतात, त्यांना रस्त्यावरचे वास्तव कसे कळणार ? मुख्यमंत्री रस्त्याने नाही तर हॅलिकॉप्टरने फिरतात त्यामुळे त्यांना जमिनीवरचे वास्तव कसे कळणार असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या गावांमध्ये संडास असले तरी पाणी नाहीये, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप हागणदारी मुक्त झालेले नाही. तसेच ही योजना आर.आर. पाटील यांनी सुरु केली होती, त्यामुळे या योजनेवर मुख्यमंत्री आपला हक्क सांगू शकतत नाहीत, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.त्यांना ही आकडेवारी कुठून मिळते?मुख्यमंत्री खूप आत्मविश्वासाने आकडेवारी सादर करतात, त्यांना ही आकडेवारी कुठून मिळते असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ एक भ्रम असल्याचे त्यांनी यावेळी वारंवार सांगितले.http://mahamtb.com//Encyc/2018/4/22/Supriya-sule-lashes-out-about-devendra-Fadnavis-CMO.html

Read More
  249 Hits

राज्य सरकारच्या योजना फसव्या - सुप्रिया सुळे

राज्य सरकारच्या योजना फसव्या - सुप्रिया सुळे

महेंद्र बडदे : सोमवार, 23 एप्रिल 2018 राज्य सरकारच्या योजना फसव्यापुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाची हौस जरा जास्तच आहे असा चिमटा काढीत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार फसव्या योजना आणत असल्याची टिका केली. टोमॅटोचे भाव गेल्या महिन्याभरापासून उतरले आहे. उत्पादन खर्च भागेल एवढा भावही मिळत नसल्याने कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी आणखी एक आंदोलन केले. शेतमालाला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनास खासदार सुळे यांनी भेट देऊन पाठींबा जाहीर केला.मुख्यमंत्री फडणवीस यांना सोशल मिडीयाची जास्तच हौस असल्याने या आंदोलनाचे फोटो मी स्वत: काढून त्यांना "ट्‌वीट' करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे "इन्स्टाग्राम'नावाचा नवीन "उद्योग' सोशल मिडीयात सुरू झाला आहे, त्यावरही हे फोटो "अपलोड ' करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना सुळे यांनी हमीभावाच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याची चिंता व्यक्त केली"" ग्रामीण भागात हमीभावाच्या प्रश्‍नावर सातत्याने चर्चा होत आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर हमी भाव कधी मिळणार हा एकच प्रश्‍न विचारला जात आहे. सरसकट कर्जमाफी कधी मिळणार हे विचारले जात आहे. हे सरकार फसव्या योजना आणत आहे. बाजार समितीचे कायदे आपण तयार केले. ते आपणच बदलले पाहिजेत. यापुढे आंदोलन कसे करायचे याविषयी डॉ. आढाव यांनी मार्गदर्शन करावे. आंदोलन तीव्र करायचे म्हणजे शेतमाल रस्त्यावर फेकून द्यायचा नाही. अन्न रस्त्यावर फेकणे आपली संस्कृती नाही.'' असे नमूद करीत सुळे यांनी कॉंग्रेस आघाडीच्या कालावधीत सातारा येथे दुधाच्या टॅंकरमधील दुध उत्पादकांनी ओतून दिल्याचे आंदोलन केले होते त्यावेळी अस्वस्थ झाल्याने झोपू शकले नव्हते असे सांगितले

Read More
  248 Hits

हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी  आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

[caption id="attachment_1043" align="alignnone" width="300"] हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणीआणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा सुप्रिया सुळे यांचे अधिकाऱ्यांना आदेशपुणे, दि. 23 (प्रतिनिधी) – हिंजवडीसह माण भागातील सहा गावांतील पाणी, रस्ते आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा. त्यासाठी स्थानिक शेतकरी, मुळशी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्वच्छ या संस्थेशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढावा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकार्यांना दिल्या.हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, ग्रामपंचायत पदाधिकारी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमारडीए आणि मुळशी तालुका प्रशासनातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.हिंजवडीसह, माण, चांदे, नाडे, मारुंजी आणि म्हाळुंगी या सहा गावांना सध्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तो सोडविण्यासाठी मुळशी प्रादेशिक पाणी योजनेतून पाणी घेता येईल. किंवा वाकड येथील मांगीरबाबा पाणी पुरवठा योजना विकत घेता येईल, तसे नियोजन करावे, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी अधिकार्यांना दिली.याबरोबरच हिंजवडी ते म्हाळुंगी, चांदे नांदे ते म्हाळुंगी, आणि वाकड येथील शिवाजी चौक या भागातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. त्यासाठी भूसंपादन आवश्यक असल्येने स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा, त्यांना योग्य मोबदला मिळावा याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे तातडीने योग्य तो मार्ग काढून लवकरात लवकर काम सुरु करावे, अशा सुचना सुप्रिया सुळे यांनी केल्या. या सहा गावांतील कचरा टाकण्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत येत आहे. तो सोडविण्यासाठी नव्या जिल्हाधिकार्यांशी चर्चा करावी. त्यासाठी येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी त्यांची वेळ घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सुचनाही सुळे यांनी मांडली. येत्या गुरुवारी (26) ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत असोसिएशनने बैठक घ्यावी, असेही सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत सुचविले. याशिवाय, वाहतूक सुधारणा, सिग्नल यंत्रणा, पीएमपीचे प्रश्न, सुरक्षा आदींबाबतही त्यांनी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.मुळशीच्या सभापती कोमल साखरे, माजी सरपंच सागर साखरे यांच्यासह शंकर मांडेकर, सुनील चांदेरे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी कर्नल चरणजीतसिंग भोगल, केदार परांजपे, ऋचा आंबेकर, अनिल पटवर्धन, उन्मेश भतीजा, रत्नपारखी, मृणाल शिवले, शंकर साळकर आदी या बैठकीला उपस्थितीत होते. नगरसेवक विशाल तांबे करणार मदतकचरा प्रश्नावर पुणे महापालिकचे राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी त्यांच्या प्रभागात उत्तम काम केले आहे. कचरा वर्गीकरण करून ओला कचऱ्यासाठी त्यांनी बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वच्छ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. तो प्रकल्प हिंजवडी भागातही राबविता येईल का, याची पाहणी तांबे हे करणार आहेत. शिवाय सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही काही संस्था त्यांच्याकडे असून त्या आपण पुरवू, असे आश्वासन तांबे यांनी हिंजवडी वासीयांना या बैठकीत दिले.

Read More
  256 Hits

शेतकऱ्याला पाण्यासाठी आत्महत्या करावी लागते हे दुर्दैवी-सुप्रिया सुळे

शेतकऱ्याला पाण्यासाठी आत्महत्या करावी लागते हे दुर्दैवी-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.  पाण्यासाठी आत्महत्या हे दुर्दैवी लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 23, 2018 9:03 PMमहाराष्ट्रात  शेतकऱ्याला पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते ही बाब दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना समान पाणी पुरवठा मिळाला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसेच आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे. इंदापूर येथील इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या इतर प्रश्नांवरही भाष्य केले. मागील चार वर्षांपासून म्हणजेच भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात स्त्री भ्रूण हत्या वाढल्या आहेत. महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत असे नीती आयोगाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यावरून सरकार कशा प्रकारे कारभार करते ते दिसून येते आहे असेही त्यांनी स्पष्ट केले महिला पत्रकाराबद्दल फेसबुक वर राष्ट्रवादीचा पदाधिकारी सुरुज चव्हाण याच्या अश्लील वक्तव्य पक्ष काय कारवाई करणार यावर त्या म्हणाल्या की, सुरज चव्हाण ला पक्षाने नोटीस पाठवली असून त्याने दिलगिरी व्यक्त करून पोस्ट डिलीट केली आहे.त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वसन त्यांनी यावेळी दिले. २५ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सरकारविरोधात आंदोलन करणार आहे. एनडीए प्रशासनाकडून जनतेला जो त्रास होतो आहे त्याविरोधात हे आंदोलन असणार आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. नाणार प्रकल्पाबाबत त्यांना विचारले असता, शरद पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते नाणारला जातील आणि तिथेच ते आपली भूमिका स्पष्ट करतील असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Read More
  236 Hits

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी करणार ? : सुप्रिया सुळे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी करणार ? : सुप्रिया सुळे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची डागडुजी कधी पुणे :  सासवड - जेजुरी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दुभाजकांची दुरावस्था झाली आहे. या मार्गाची डागडुजी कधी करणार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर अपघाताचे काही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना हा सवाल विचारला आहे. या मार्गावर सतत अपघात होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांचे जीव धोक्यात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या मार्गाची डागडुजी झाली पाहिजे असेही त्या म्हटल्या आहेत. या मार्गाशी अनेक भक्तांच्या, भाविकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ होतोय. त्यामुळे या दुभाजकांची दुरावस्था झाल्याने या भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे पुणे आणि आसपासच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हागणदारी मुक्त महाराष्ट्र या अभियानावर देखील प्रश्न उपस्थित केले होते. तसेच हा केवळ भ्रम आहे, मुख्यमंत्री हॅलिकॉप्टरने फिरतात त्यांना रस्त्यावरील सत्य माहित नाही, असेही त्यांनी म्हटले होते. एकूणच निवडणूक जवळ आली असल्याचे यातून दिसून येत आहे, त्यामुळे निवडणूक जवळ असल्याकारणाने आरोप प्रत्यारोपांचे हे सत्र असेच सुरु राहणार का ? असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित झाला आहे. http://mahamtb.com/Encyc/2018/4/23/Supriya-sule-asking-questions-to-CM-Fadnavis-.amp.html?__twitter_impression=true

Read More
  276 Hits

खडकवासलापर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न

खडकवासलापर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: April 24, 2018 02:07 AM | Updated: April 24, 2018 02:07 AM खडकवासला पर्यंत मेट्रोसाठी प्रयत्न धायरी : खडकवासला विधानसभा मतदार संघातील धायरी, वडगाव बु.व नांदेड सिटी परिसरातील नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला व परिसरातील नागरिकांना असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. स्वारगेट ते खडकवासला मेट्रो होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पाठपुरावा करेल, असे त्यांनी नमूद केले.धायरी येथील राजयोग सोसायटी, मियामी, क्रॉस ओव्हर काऊंटी, मधुकोश, समर्थ नगर येथील व्यंकटेश, एक्स्टसी सोसायटी अशा १५हून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी समोरासमोर चर्चा केली. कचरासमस्या, रस्ते, पाणी व स्वच्छता याबाबतीत नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदने दिली, तर जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने नांदेड सिटी येथे ‘भवताल’ या संस्थेने आयोजित केलेल्या सीडबॉल निर्मिती व वृक्ष लागवड निर्मिती कार्यक्रमात सहभागी झाल्या. प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. धायरी येथील राजयोग सोसायटी, मियामी, क्रॉस ओव्हर काऊंटी, मधुकोश, समर्थ नगर येथील व्यंकटेश, एक्स्टसी सोसायटी अशा १५हून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी समोरासमोर चर्चा केली.

Read More
  276 Hits

निवडणूका जिंकण्याच्या नादात भाजप सत्ता राबवायला विसरली : सुप्रिया सुळे

निवडणूका जिंकण्याच्या नादात भाजप सत्ता राबवायला विसरली  : सुप्रिया सुळे

भाजप खासदारांनी देशभरात केलेल्या उपोषणानंतर सुप्रिया सुळे यांची टीका  लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: April 23, 2018 06:55 PM | Updated: April 23, 2018 07:16 PM[caption id="attachment_1063" align="alignnone" width="300"] सत्तेमध्ये आहेत तर निर्णय करावेत. ठळक मुद्देभाजप खासदारांचे उपोषण म्हणजे निव्वळ फार्स :खासदार सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी भाजपवर प्रहारजनतेला नेत्यांप्रती आदरभाव नसण्याला नेतेही जबाबदार सत्तेमध्ये आहेत तर निर्णय करावेत. पुणे :  निवडणुका जिंकण्याच्या नादात भारतीय जनता पक्ष सत्ता राबवायला विसरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली आहे.  परिवर्तन युवा परिषदेच्या कार्यक्रमात  त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी नेत्यांप्रती असणारा आदरभाव आता नसून यासाठी राजकारणीही जबाबदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात सरपंचही मंत्रालयात काम करून घेत असत आता मात्र तशी स्थिती राहिलेली नाही. लोकसभा चालवण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी ते विसरत असून एक दोन वेळा कामकाज बंद पडल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही असेही त्या म्हणाल्या. सलग पाच आठवडे आम्ही कामं सोडून अधिवेशनाला जातो आणि कामकाज होत नाही हे अत्यंत चुकीचं असल्याचंही त्या म्हणाल्या. एकीकडे सत्ताधारी भाजप विरोधक कामकाज करू देत नाहीत म्हणून उपोषण करत असताना त्यांहे मित्रपक्ष घोषणाबाजी करतात ही मॅचफिक्सिंग नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. करायचंच होत तर भाजपने पहिल्या आठवड्यात उपोषण करायचं होत आणि ११ ते ५ करण्याऐवजी २४ तास करायचं होत असा टोलाही त्यांनी लगावला. उपोषण करून प्रश्न सुटत असतील तर आपण सगळे मिळून उपोषण करूयात असेही त्या म्हणाल्या. हे सर्व प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार होते असा ताशेरा त्यांनी मारला. भाजपचे उपोषण म्हणजे फक्त फार्स होता. त्यांच्याकडे सत्ता आहे तर त्यांनी निर्णय घ्यावेत असे आव्हान त्यांनी दिले. अवघड परिस्थितीतून मार्ग काढणारी व्यक्ती खरी नेता असते असे म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Read More
  246 Hits

Impeachment of CJI: NCP will continue to fight against wrongdoings in judiciary, says Supriya Sule

Impeachment of CJI: NCP will continue to fight against wrongdoings in judiciary, says Supriya Sule

"The impeachment notice might have been rejected, but our fight against the wrongdoings would continue,” Supriya Sule, the daughter of NCP chief Sharad Pawar, said. NCP MP Supriya Sule at Patrakar Sangh during the press conference to inform on Bhim Mohotsav at Warje Malwadi on April 29. Express Photo By Pavan Khengre,23.04.18,Pune. Express News Service | Pune | Updated: April 24, 2018 10:49:21 amNCP MP Supriya Sule on Monday said the impeachment notice against the Chief Justice of India might have been turned down by the Chairperson of Rajya Sabha, but her party would continue the fight against the wrongdoings in the Judiciary. “Vice-President Venkaiah Naidu has rejected the impeachment notice of the Opposition parties against Chief Justice of India, Dipak Mishra. The notice might have been rejected, but our fight against the wrongdoings would continue,” Sule, the daughter of NCP chief Sharad Pawar, told reporters in the city. While the ruling BJP has alleged that the Opposition was spoiling the image of Judiciary in the country, Sule said the first voice against the wrong happenings in the judicial system was raised by the judicial members and only later the Opposition started raising it. “There is a threat to the unity of the country in the present situation as there has been rise in agitations with people from different castes demanding their rights,” said Sule. She said it was in the principles of the Congress to be connected with the public and resolve their problems. “The Congress and NCP are brothers,” she said. Sule also said that the fast held by BJP leaders alleging the Opposition of not allowing function of Parliament was a drama. “It was the duty of the ruling party to ensure the functioning of the Rajya Sabha and Lok Sabha. It was the ruling party that deliberately ensured there is no work in the parliament and instead allege the Opposition for it. If the Prime Minister was so concerned about the proceedings of the House, then the fast should have been done in the first week of the parliamentary session,” she said. http://indianexpress.com/article/cities/pune/impeachment-of-cji-ncp-will-continue-to-fight-against-wrongdoings-in-judiciary-says-supriya-sule-5149405/

Read More
  279 Hits

MP Supriya Sule pushes for route extension to Khadakwasla

MP Supriya Sule's letter to Chief Minister Devendra Fadnavis

Sarang Dastane| TNN | Updated: Apr 25, 2018, 14:05 IST Baramati MP Supriya SulePUNE: Baramati MP Supriya Sule has thrown her weight behind the demand to extend the Pimpri-Swargate Metro rail route.Similar demands have already been made by various political leaders and citizens' groups to extend the route to Nigdi, Chakan, Hadapsar and Katraj.Now Sule has added her voice to the chorus, seeking the extension of Metro services from Swargate to Khadakwasla in a letter to chief minister Devendra Fadnavis. In the letter, Sule has requested the chief minister to initiate steps to prepare a detailed project report (DPR) for the extension. She further wrote that many tourists use Sinhagad Road to visit various historical forts and tourist spots, which causes congestion in the entire area, inconveniencing residents and daily commuters. "A Metro line from Swaragte to Khadakwasla would reduce such hardship. A provision of Metro junction at Khadakwasla would also be ideal," Sule said in the letter.Khadakwasla and adjacent regions come under Sule's Baramati constituency. Located on city's periphery, Khadakwasla has witnessed significant growth in the last few years, in terms of residential and commercial projects. Work on the Metro rail work has been initiated on two corridors in Pune and Pimpri Chinchwad, while work on the third line - between Shivajinagar and Hinjewadi - will likely begin in the near future.Steps have also been initiated to prepare DPR for the proposed Metro routes towards Nigdi and Katraj.https://timesofindia.indiatimes.com/city/pune/mp-supriya-sule-pushes-for-route-extension-to-khadakwasla/articleshow/63908794.cms?utm_source=twitter.com&utm_medium=social&utm_campaign=TOIPune

Read More
  321 Hits

दौंड अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा - खा. सुळे

दौंड अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा - खा. सुळे

प्रफुल्ल भंडारी, सोमवार, 30 एप्रिल 2018[caption id="attachment_1126" align="alignnone" width="300"] सिद्धेश्वर_हॉस्पिटल_दौंडदौंड (पुणे) : राज्यातील पहिला अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त तालुका म्हणून दौंड तालुक्याची ओळख निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेसह तालुक्यातील खासगी रूग्णालये, दौंड मेडीकल असोसिएशन व अन्य संस्थांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.दौंड येथे सिध्देश्वर मॅटर्निटी, सर्जिकल व जनरल हॅास्पिटलचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले व त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह डॅा. दत्तात्रेय लोणकर, राणी शेळके, झुंबर गायकवाड, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, आनंद थोरात, डॅा. सुनीता कटारिया, बबन लव्हे, अॅड. अजित बलदोटा, नंदकुमार पवार, आदी उपस्थित होते. हॅास्पिटलचे प्रमुख डॅा. मयूर महादेव भोंगळे यांनी प्रास्ताविकात या सुसज्ज हॅास्पिटल मधील उपलब्ध सुविधा आणि औषधोपचारांविषयी माहिती दिली.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ``नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात देशात कुपोषण आणि स्त्रीभ्रुणहत्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ते अतिशय गंभीर आहे. विशेषकरून महिलांमध्ये रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आणि बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी हेल्थ कार्ड उपलब्ध करून देत त्याद्वारे रक्त तपासणी, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, आदींची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील महिला अॅनिमिया मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.``त्या पुढे म्हणाल्या, ``जैव वैद्यक कचर्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नसल्याने आपल्या आरोग्यासह पर्यावरणावर देखील विपरीत परिणाम होत आहे. या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तालुक्यातील डॅाक्टर मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेऊन कुरकुंभ येथील कंपन्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून निधी उभारून प्रकल्प केला कार्यान्वित केला पाहिजे.``शशांक मोहिते व रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर माजी सभापती रंगनाथ फुलारी यांनी आभारप्रदर्शन केले.खासदार सुप्रिया सुळे यांनी डॅा. मयूर व डॅा. अनुराधा भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करीत गरीब आणि गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे काबाडकष्ट करून तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करणारे महादेव भोंगळे व हिराबाई भोंगळे यांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.http://www.esakal.com/pune/make-daund-tehsil-anemia-and-malnutrition-free-says-supriya-sule-113263

Read More
  215 Hits

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे

Dipak Pathak Updated Friday, 4 May 2018 - 12:10 PM sushma-andhare-and-supriya-sule टीम महाराष्ट्र देशा- आपल्या आक्रमक भाषण शैली मुळे अल्पावधीत महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या या राज्यात चळवळीतल्या सक्रिय महिला कार्यकर्त्यावर झालेल्या घटनेची सरकारने चौकशी करावी अशी मागणी सुळे यांनी केली आहे. बुधवारी रात्री मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. प्रा. सुषमा अंधारे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अंधारे या एका कार्यक्रमातून परतत होत्या. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला तीनवेळा जोराची धडक दिली अशी माहिती समोर येत आहे. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीला मार लागला आहे. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर इंदूर बायपासवर मृदंग रेस्टॉरंटसमोर असलेल्या पुलालगत हा थरार साडेतीन मिनिटे सुरू होता. अंधार असल्याने धडक देणाऱ्या गाडीत किती लोक होते हे समजू शकले नाही. मात्र धडक देणाऱ्या गाडीच्या चालकाचा स्टेअरिंगवरील हात दिसत होता. त्याच्या हातात रंगीबेरंगी दोरे बांधल्याचे दिसत होते अशी माहिती सुषमाताई अंधारे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. कोण आहेत प्रा.सुषमा अंधारे ?प्रा. सुषमा अंधारे या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.

Read More
  269 Hits

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’, भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’, भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 4, 2018 3:44 PM supriya-sule- बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात बंद असलेले छगन भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते तुरुंगातून येण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देर आए दुरुस्त आए अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना देर आए दुरुस्त आए, भगवान के घर देर है अंधेर नहीं, छगन भुजबळांना न्याय मिळाला असं म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद, पण आरोप सिद्ध न होता एखाद्याला जेलमध्ये राहावं लागतं याची खंत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचे नेते भुजबळ यांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले. सरकारनं त्यांना जामीन मिळू नये असा खूप प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्रमहाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Read More
  258 Hits

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

वालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय... कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या...हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे... इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया.   राजकुमार थोरात 04.07 PM 2supriya_sule_17सुप्रिया सुळे या तालुक्यातील १६ गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत होत्या. पडस्थळ गावातील गावा दौरा संपवून दुसऱ्या गावाकडे जाण्याच्या तयारीमध्ये असताना एक डोक्याला लाल फेटा बांधलेले एंशी वर्षाचे आजोबा वामन मारकड अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आले. व त्यांना मनातले सांगण्यास सुरवात केली.त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारला बोझा म्हणून संबोधत होते. सरकारचं जनतेवर बोझा झाल्याचे सांगून आमच्या डोक्यावरचा बोझा कमी करा. सरकारनं महागाई वाढवली आहे. साहेबांचे (शरद पवार) यांचे काम चांगल होतं... तुमचे पहिल्या पासुन चांगल काम आहे. तुम्ही काय पण करा... लक्ष राखून निवडून या...असे सांगितले.ग्रामीण भागातील जनता शेतकरी भाजप सरकारला वैतागले आहेत. शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थाच कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा थेट परीणाम शेतकऱ्यावरती होवू लागला असून, मशागतीचा खर्च ही वाढला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास परवडत नसल्याचे शेतकरी सांगू लागले असून काय पण करा यावेळी निवडूण या असे शेतकरी सांगत आहेत. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, प्रतापराव पाटील, महारुद्र पाटील, शशिकांत तरंगे उपस्थित होते.http://www.esakal.com/paschim-maharashtra/government-has-put-farmers-down-farmers-118976

Read More
  239 Hits
Tags:

Center of Excellence for Dairy foundation stone laid in Baramati

Center of Excellence for Dairy foundation stone laid in Baramati

May 25, 2018 / By Reporter Center of Excellence for Dairy foundation stone laid in BaramatiBaramati – Netherlands Deputy Prime Minister Ms Carola Schouten on Friday laid the foundation stone of Center of Excellence for Dairy, a joint Indo – Dutch initiative between the Agricultural Development Trust, Baramati (supported by GOI under RKVY) and the Dutch Govt.Genetic improvement of Indian breeds for better cattle health, increased milk yield and milk quality improvement will be the focus areas of CoE for Dairy.“I had gotten opportunity to visit Netherlands during my stint as an Agriculture Minister. There I decided to set up the Center of Excellence for various agricultural sectors in India. In this context , In 2015, foundation stone of CoE for Vegetable Production was laid at the hands of Shri Narendra Modi in Baramati. I am happy that Ms Carola could see the state of art facilities in this CoE. In my opinion, merely bringing Dutch technology in India is not enough, it should successfully reach the farmers and their farms”, said Sharad Pawar, who was also present.Later bicycle distribution ceremony that took place. “This bicycle distribution program for girl students and ASHA workers is one of my higher priority initiative for empowering women . I’m grateful to Mr. Pankaj Munjal, Chairman Hero Cycles and Shri Jagdish Khattar, MD of Suzuki for extending support for this initiative”, Pawar added. latform to Buy, Sell & Rent tractors & farm mechanization implements Baramati – Netherlands Deputy Prime Minister Ms Carola Schouten on Friday laid the foundation stone of Center of Excellence for Dairy, a joint Indo – Dutch initiative between the Agricultural Development Trust, Baramati (supported by GOI under RKVY) and the Dutch Govt.Genetic improvement of Indian breeds for better cattle health, increased milk yield and milk quality improvement will be the focus areas of CoE for Dairy.“I had gotten opportunity to visit Netherlands during my stint as an Agriculture Minister. There I decided to set up the Center of Excellence for various agricultural sectors in India. In this context , In 2015, foundation stone of CoE for Vegetable Production was laid at the hands of Shri Narendra Modi in Baramati. I am happy that Ms Carola could see the state of art facilities in this CoE. In my opinion, merely bringing Dutch technology in India is not enough, it should successfully reach the farmers and their farms”, said Sharad Pawar, who was also present.Later bicycle distribution ceremony that took place. “This bicycle distribution program for girl students and ASHA workers is one of my higher priority initiative for empowering women . I’m grateful to Mr. Pankaj Munjal, Chairman Hero Cycles and Shri Jagdish Khattar, MD of Suzuki for extending support for this initiative”, Pawar added.Baramati MP Supriya Sule was also present on the occasion.http://www.punekarnews.in/?p=23376

Read More
  292 Hits