3 minutes reading time (616 words)

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या: सुप्रिया सुळे

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या: सुप्रिया सुळे
स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली.

“महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी संसदेत केली”, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं.

फुले दाम्पत्याने शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात अजोड कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुढचं पाऊल टाकत ही मागणी थेट लोकसभेत केली. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या प्रस्तावावर केंद्र सरकार नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर भारतरत्न कोणालाही जाहीर झालेला नाही.

http://polldaddy.com/poll/9952946/
आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी :
पुरस्कारार्थीचे नाव                                         वर्ष1. चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972)   1954
2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 ) 1954
3. डॉ. सी.व्ही. रमण (188-1970) 1954
4. डॉ. भगवान दास (1869 – 1958) 1954
5. डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 ) 1955
6. पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 ) 1955
7. पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 ) 1957
8. डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 ) 1958
9. डॉ. बी. सी. रॉय (1882 - 1962 ) 1961
10. पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 ) 1961
11. डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963) 1962
12. डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 ) 1963
13. डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 ) 1963
14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 ) 1966
15. इंदिरा गांधी (1817 - 1984 ) 1971
16. व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 ) 1975
17. के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 ) 1976
18. मदर टेरेसा (1910 - 1997 ) 1980
19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 ) 1983
20. खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 ) 1987
21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 ) 1988
22. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 ) 1990
23. डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 ) 1990
24. राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 ) 1991
25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 ) 1991
26. मोरारजी देसाई (1896 - 1995 ) 1991
27. मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958) 1992
28. जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 ) 1992
29. सत्यजीत रे (1922 - 1992 ) 1992
30. गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 ) 1997
31. श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 ) 1997
32. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931) 1997
33. श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 ) 1998
34. सी. सब्रमण्यम (1910 - 2000 ) 1998
35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 ) 1999
36. प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 ) 1999
37. लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 ) 1999
38. पंडीत रवी शंकर (1920 - 2012 ) 1999
39. लता मंगेशकर (जन्म 1929 ) 2001
40. उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 ) 2001
41. पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 ) 2009
42. प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 ) 2014
43. सचिन तेंडुलकर ( जन्म 1973 ) 2014
44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) (1861 - 1946) 2015
45. अटलबिहारी वाजपेयी ( जन्म 25 डिसेंबर 1924 ) 2015

 
ABP Maza :महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या: सुप्रिया सुळे
महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे
पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान...