2 minutes reading time (363 words)

फुले दाम्पत्याला भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल- सुप्रिया सुळे

फुले दाम्पत्याला भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल- सुप्रिया सुळे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे.फुले दांम्पत्याने आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातले.दलित, शोषित,स्त्री,शेतकरी यांच्या भल्यासाठी ते शेवटपर्यंत झुंजले.आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास सलाम करण्यासाठी,त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे असं देखील त्या म्हणाल्या आहेत .

महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. तर देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात सावित्रीबाई फुले यांचा मोठा वाटा होता. महिलांमध्ये जागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचं निर्मूलन यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलं आहे. महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रचार केला. त्यांनी शिक्षणाची पाळंमुळं रुजवली. या दांम्पत्याने देशाच्या सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल असं मत व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान यापूर्वी राज्य सरकारने देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न मिळावे यासाठी पत्र लिहले आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.तर देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात सावित्रीबाई फुले यांचा मोठा वाटा होता. महिलांमध्ये जागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचं निर्मूलन यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलं आहे.त्यामुळे हे कार्य लक्षात घेऊन दोघांनाही ‘मरणोत्तर भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावं अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.

फुले दाम्पत्याला भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल- सुप्रिया सुळे 
This exam season, here is the report card of Pune’...
महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे