1 minute reading time (87 words)

[Saam TV]'85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला?'

'85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला?'

महाराष्ट्र पोलीस भरतीची परीक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यातील अनेक तरुण वर्षभर प्रयत्न करून या परीक्षेची तयारी करतात. पण, अशा मेहनती मुलांच्या स्वप्नावर गदा आणली जात असल्याची तक्रार आता केली जात आहे. याचे कारण, नुकताच एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये एसआरपीएफ गट 5 येथील पोलीस भरती परीक्षेत चक्क एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली आहे 

[ETV Bharat]'नसरापूर प्रकरण स्वतः मॉनिटरिंग करणार,...
[Saam TV]'नराधमाला फाशी मिळेपर्यंत पाठपुरवठा करणार...