[ABP MAJHA]राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!
Supriya Sule On NCP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. माझं आणि माझ्या दादामध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती. आमचं जे बोलणं झालं होतं ते अजितदादांना माहीत होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Supriya Sule On NCP Merger)
बहिण-भावामध्ये बोलणं झालं होतं ते आमच्यात आहे आणि ते वास्तव असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अनेकांना विलिनीकरणाबाबत बऱ्याचं गोष्टी माहीत आहेत. मात्र अनेकांना मी बोललेलं आवडत नाही. पण आज काही नेते बोलत नाहीत, असंही विधानही सुप्रिया सुळेंनी केलं. (Supriya Sule On NCP)
एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद- सुप्रिया सुळे
मी आणि सुनेत्रा वहिनी यापुर्वीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. मात्र अजितदादा नसल्याचं दुःखही आहे. अजितदादा नसण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही. आजही खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. आमचं कुटुंब सध्या अडचणीतून जात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवारांची तब्येत खूप चांगली- सुळेशरद पवारांची तब्येत खूप चांगली आहे. रूबी हॉल रूग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. शरद पवारांना उद्या रुग्णालायातून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधे होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केले होते. अजितदादानंतरच्या काळातही या सगळ्यांनी आमची साथ दिली त्याबद्दलही मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

