1 minute reading time (202 words)

[Sakal]दिव्यांग, ज्येष्ठांच्या प्रश्‍नावर सुळेंची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

दिव्यांग, ज्येष्ठांच्या प्रश्‍नावर सुळेंची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

 पुणे, ता. २ : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 'एडीआयपी' आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी यावेळी दिले.


दिव्यांग बांधवांना आणि वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत, याकरिता खासदार सुळे या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी दिल्ली येथे सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदार संघात वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर आयडीआयपी योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी आहेत. त्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून सहाय्यभूत साधने वाटप करायची आहेत. त्यासाठी साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून वितरित करावे, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री कुमार यांची भेट घेऊन सुळे यांनी मागणी केली. त्यावेळी त्यांनी हे आश्‍वासन दिल्याचे सुळे यांनी सांगितले.

...

दिव्यांग, ज्येष्ठांच्या प्रश्‍नावर सुळेंची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा | Sakal

Read Latest & Breaking Marathi News on Politics, Finance, Bollywood, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle & Business. ताज्या मराठी बातम्या एकाच ठिकाणी eSakal वर!
[Loksatta]वाकड ते नऱ्हे मार्गावर ध्वनी प्रतिबंधात्...
[TV9 Marathi]'तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या....