1 minute reading time (248 words)

[News 18 लोकमत]'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासून सुरूवात करते'

'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासून सुरूवात करते' सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती

सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती

पुणे, 7 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतंय, हे दुर्दैव असल्याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली.

'महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. महिलांना मातेसमान सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे, माँ जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात महिलांबद्दल अनेक व्यासपीठांवर चर्चा होते, हे अतिशय दुर्दैवी आहे. मला हे राजकारण अतिशय गलिच्छ वाटतं,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनंती करते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आपलं राजकारण नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी माझ्या पक्षाकडून सुरूवात करते,' असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी सगळ्याच राजकीय पक्षांना केलं आहे.

उर्फीवरून वाघ-चाकणकरांमध्ये सामना



उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात वाद सुरू आहे. रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघांवर पत्रकार परिषद घेत आरोप केले. त्याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय. आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्यायेत. एकटी म्हणजे आयोग हे डोक्यातून काढून टाका असा पलटवार चित्रा वाघांनी केलाय. महिला आयोगाकडून उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना नोटीस देण्यात आली आहे.

...

'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासून सुरूवात करते', सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती – News18 लोकमत

महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण आणि वादावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.
[लोकमत]"अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासा...
[Loksatta] सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - ...