सुप्रिया सुळेंचा ट्विटरवर प्रतिसाद! किरकटवाडीतील रस्त्यासाठी कलेक्टरांकडे बैठक

 किरकटवाडीतील रस्त्यासाठी कलेक्टरांकडे बैठक सुप्रिया सुळेंचा ट्विटरवर प्रतिसाद!

सरकारनामा ब्यूरो : गुरुवार, 5 जुलै 2018 किरकटवाडीतील रस्त्यासाठी कलेक्टरांकडे बैठकपुणे : किरकटवाडी-नांदोशी रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न किरकटवाडी-नांदोशी विकास फोरमने ट्विटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडला. त्याची तत्काळ दखल घेत खासदार सुळे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रश्‍नातून मार्ग काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक बोलवली आहे.ट्विटरच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेला इतक्या तातडीने मिळालेल्या प्रतिसादामुळे विकास फोमचे पदाधिकारी व गावातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.या संदर्भात बोलताना किरकटवाडी-नांदोशी फोरमचे सदस्य प्रफुल्ल पेटकर म्हणाले, "" आमच्या रस्त्याचा प्रश्‍न मोठा बिकट आहे. नांदोशी, सणसवाडी, किरकटवाडी या भागात जवळपास 10 हजार लोकसंख्या आहे. मात्र रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. मार्च महिन्यात खासदार सुळे यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.Kirkatwadi Development Forum@KirkatwadiForum · 5 Jul Good morning everybody ! Another new day starts but the old story continues. #KirkatwadiNandoshiRoad @supriya_sule @Dev_Fadnavis @ChDadaPatil @OfficialPMRDA @kirangitteias @CollectorPune @eSakalUpdate @abpmajhatv @nitin_gadkari pic.twitter.com/9kRRacsVfq Supriya Sule✔@supriya_sule I have written letters to concern authorities about #KirkatwadiNandoshiRoad and taking regular follow up.Meeting with @CollectorPune Shri. Naval Kishore Ram is scheduled for Mon. 9th July at 10 am to discuss the said issue.Kindly be present. 5:57 PM - Jul 5, 2018 69 35 people are talking about thisआम्ही ट्विटरवर खासदार सुळे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेकांना हा विषय कळविला होता. मात्र खासदार सुळे यांनी  दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क करून येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या माध्यमातून आमचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा पेटकर यांनी व्यक्त केली.http://www.sarkarnama.in/supriya-sule-responds-immediately-twitter-25689

Read More
  157 Hits

जलसंधारणा कामात सामाजिक संस्थांचा सहभाग कौतुकास्पद : सुप्रिया सुळे

जलसंधारणा कामात सामाजिक संस्थांचा सहभाग कौतुकास्पद : सुप्रिया सुळे पाणीटंचाईची समस्या कायमची सुटेल

संतोष आटोळे : 09.32 AM Supriya Sule Appreciates Water Conservationशिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाले आहेत. यासाठी प्रशासनासह विविध खाजगी कंपन्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे. या कामांमुळे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमची सुटेल असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.बारामती मधील गाडीखेल येथे सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व मगरपट्टा सिटी यांच्या माध्यमातुन ओढा खोलीकरण करण्यात आले. या ठिकाणी पियाजिओ व्हेईकल्स कंपनीच्या सीएसआर निधीतुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचे पुजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, व गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या ''खाजगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातुन दोन टक्के निधी हा सामाजिक विकासकामांसाठी राबविण्याचा निर्णय हा आघाडीसरकारच्या कालखंडात घेतलेला निर्णय आहे. यामाध्यमातुन सर्वत्र विविध कंपन्यांच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यामध्ये बारामती तालुक्यात सकाळ रिलीफ फंड, भारत फोर्ज, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मगरपट्टा सिटी, शरयू फाउंडेशन यांच्या सारख्या संस्थाच्या माध्यमातुन होत असलेली जलसंधारण, शैक्षणिक कामे समाधानकारक आहेत. याचे सुखद परिणाम भविष्यात दिसतील.'' यावेळी खा.सुळे यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या परिक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुळे यांनी गाडीखेल अंर्तगत येणाऱ्या धायतोंडेवस्ती येथील आयएसओ मानांकन ठरलेल्या अंगणवाडीची पाहणी केली व अंगणवाडीच्या रंगरंगोटी व इतर सुविधा पाहुन समाधान व्यक्त केले.  तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल दळवी, शरद शेंडे, राणी गाढवे, संगिता धायतोंडे, लिलाबाई दळवी, माजी सरपंच दिलीप आटोळे, रायचंद आवदे, दादा आटोळे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच अनिल आटोळे यांनी केले.http://www.esakal.com/pune/supriya-sule-appreciates-water-conservation-128844

Read More
  140 Hits

विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध : सुप्रिया सुळे

विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध : सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

संतोष आटोळे : शुक्रवार, 6 जुलै 2018 Baramati Model Of Development Is Famous In The Countryशिर्सुफळ : घरोघरी गॅस ही संकल्पना केंद्र व राज्य सरकार आता राबवित आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्यातील बहुतांशी भागात हा विकास यापूर्वीच पोचला आहे. यामुळेच विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध आहे, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.कटफळ (ता.बारामती) या मतदारसंघातील गावांमध्ये गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, युवकाध्यक्ष राहुल वाबळे, अनिल हिवरकर,राजेंद्र काटे, दत्तात्रय आवाळे, अँड.नितीन आटोळे, सरपंच सारिका भारत मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी सुळे म्हणाल्या, तालुक्यामध्ये दौरा करीत असताना कोठेही पायाभूत सुविधांची गैरसोय असल्याची तक्रार येत नाही. याचा अर्थ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सरकार आता ज्या योजना राबवित आहे. त्या बारामतीमध्ये पंचवीस वर्षांपासूनच कार्यान्वित आहेत. या कामाचे कौतुक देशाचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते करीत असतात. यापुढेही विकासाची ही घोडदौड पुढे चालवीत बारामतीची आन, बान आणि शान कायम राखणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सुळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व आयुका संस्थेच्या वतीने प्रत्येक अवकाशाच्या माहिती देणाऱ्या तारांगणचे प्रातिनिधिक उद्घाटन करण्यात आले.तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत मोकाशी, सूत्रसंचालन ग्रामसेवक अमोल घोळवे यांनी तर आभार संग्राम मोकाशी यांनी मानले.तालुकाध्यक्षांच्या कामाचे कौतुक...यावेळी खासदार सुळे यांनी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्य संभाजी होळकर यांचे विशेष कौतुक केले. यासर्व विकासकामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार यांच्यासह पूर्वीचे बांधकाम व आरोग्य सभापती व पक्षाचे तालुकाध्यक्ष यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी विकासकामांसह पक्षाची चांगली संघटना बांधली. तसेच पक्षवाढीसाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी  सांगितले.http://www.esakal.com/pune/baramati-model-development-famous-country-says-supriya-sule-128760

Read More
  143 Hits

पुणे : दिवेघाटात सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांसोबत फुगड्यांचा आनंद लुटला

पुणे : दिवेघाटात सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांसोबत फुगड्यांचा आनंद लुटला Updated 09 Jul 2018 11:26 PMhttps://abpmajha.abplive.in/videos/pune-supriya-sule-at-diveghat-wari-560331

Read More
  154 Hits

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची फुगडी | माऊलीच्या पालखीचा सोहळा

दिवेघाटाच्या पालखीचा अवघड टप्पा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार केला, यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, या वेळी सुप्रिया सुळे यांनी फुगडीचा फेर देखील धरला. NCP Leader | Supriya Sule Joined Pandharpur Wari Crossed Dive Ghat Valleyhttps://www.youtube.com/watch?v=EgHKTLjux8o

Read More
  164 Hits

सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून इंदापुरात तीन हजार मुलींना मिळाली सायकल

सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून इंदापुरात तीन हजार मुलींना मिळाली सायकल

डाॅ. संदेश शहा : शुक्रवार, 13 जुलै 2018 इंदापूर : बारामती हा देशातील आदर्श लोकसभा मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे. रक्तक्षय तसेच कुपोषण मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देत आहे. नकोशी मुलगी हवेशी होण्यासाठी सायकल वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. मुलींनी माहेरची आठवण म्हणून सायकल लग्न झाल्यानंतर सासरी नेवू नये असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल मैदानावर इंदापूर विधान सभा मतदारसंघातील आशा वर्कर्स तसेच शालेय युवतींना सुमारे दोन कोटी रूपयांच्या ती हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.  सुळे यांनी युवतींशी सुसंवाद साधत त्यांना बोलते करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे पुन्हा प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येवू शकले नाहीत. सौ. सुळे म्हणाल्या की बारामती लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्रत्येकी दहा हजार श्रवणयंत्रे व सायकलींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या धोरणाने गरिब महिला व शेतक-यांसाठी लढण्यास कटिबध्द आहे. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना सर्वप्रथम रक्तक्षय मुक्त करण्याचे धोरण आहे. महिलांच्या कर्करोगाचे निदान व्हावे म्हणून देशात सर्वप्रथम पुणे जिल्हाप रिषदेने कार्यक्रम हाती घेतला आहे. युवती व महिला सुरक्षितपणे फिरल्या पाहिजेत हे माझे स्वप्न असून हे स्वप्न पुर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देवू. आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मामून काम करणा-या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या प्रतिनिधी असल्याने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. खासदार सुळे या आदर्श संसदपटू असून त्यांनी सर्वत्र जनसंपर्क ठेवून विकासकामे केली आहेत. सायकल वाटप कार्यक्रमामुळे युवती व महिला त्यांना कधीच विसरणार नाहीत.

Read More
  127 Hits

स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला पाठिंबा

स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला पाठिंबा

By: एबीपी माझा, वेब टीम | Last Updated: 16 Jul 2018 04:11 PM स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर पुकारलेल्या दूध आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेनं शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदानाची मागणी केली. https://abpmajha.abplive.in/maharashtra/ncp-and-shivsena-supports-swabhimani-milk-protest-562977

Read More
  129 Hits

दूध आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा, भर पावसात पुंगी बजाओ आंदोलन

https://www.facebook.com/abpmajha/videos/10160832060680271/

Read More
  127 Hits

क्यों सुप्रिया सुले बजाया भोंपू? किसकी पुंगी बजाने का है इरादा?|

इस वीडियो में जानिए क्यों NCP की सुप्रिया सुले बजाया भोंपू और किस को निशाना बना रही है सुप्रिया. https://www.youtube.com/watch?v=tNDN2h4Oiwo&feature=youtu.be

Read More
  121 Hits

दूध दरवाढ आंदोलनावर काय बोलल्या सुप्रिया सुळे.. पहा

https://www.facebook.com/Tv9Marathi/videos/856723307856793/

Read More
  115 Hits

दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात ‘पुंगी बजाओ’ आंदोलन

दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात ‘पुंगी बजाओ’ आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

लोकसत्ता ऑनलाइन  | July 16, 2018 दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पुंगी बजाओ' आंदोलन केले. शेतकरी पोटतिडकीने मागण्या मांडत असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. आता दूधासाठी हक्काचा दर तो मागतोय. दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पुंगी बजाओ’ आंदोलन केले. राज्य सरकार सातत्याने गरीब, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. दुधाचा भाव वाढलाच पाहिजे असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या मागे आम्ही आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी पोटतिडकीने मागण्या मांडत असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. आता दूधासाठी हक्काचा दर तो मागतोय. मुख्यमंत्री तुम्ही जागे व्हायलाच हवे. यासाठीच आज राष्ट्रवादीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. दूध दराच्या या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा आहे. शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. गुजरात सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेज दिले आहे. महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.https://twitter.com/supriya_sule/status/1018782202438406144/photo/1

Read More
  133 Hits

भर पावसात सुप्रियाताई उतरल्या रस्त्यावर -

भर पावसात सुप्रियाताई उतरल्या रस्त्यावर

https://goo.gl/vTyPfZ  @supriya_sule @NCPspeaks @MumbaiNCP @chitrancp

Read More
  135 Hits

पहा कशासाठी पिपाणी वाजवतायतं सुप्रिया सुळे

पहा कशासाठी पिपाणी वाजवतायतं सुप्रिया सुळे भर पावसात पिपाणी आंदोलन

बुलढाणा: राज्याच्या विविध भागांमध्ये सोमवारपासून दूध आंदोलनाने जोर पकडला. सोलापूर, जालना, बुलडाणा, अमरावती आणि पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर बुलढाण्यात थेट रस्त्यावर उतरून भर पावसात पिपाणी आंदोलनही केले. यावेळी सुप्रिया सुळेंना राजू शेट्टींच्या आंदोलनाला आमचा... https://m.dailyhunt.in/news/india/marathi/zee+news+marathi-epaper-zeemar/paha+kashasathi+pipani+vajavatayat+supriya+sule-newsid-92466529?ss=wsp&s=a

Read More
  134 Hits

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण स्पर्धा परीक्षा आंदोलन

Marathi News >> माय मराठी >> homeMonday, 16 Jul, स्पर्धा परीक्षा आंदोलन पुणे-स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले . या उपोषणात राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुहास उभे व स्पर्धा परिक्षा सेलचे पुणे शहर अध्यक्ष विक्रम मधुकर गायकवाड यांच्या नेतुत्वाखाली करण्यात आले . यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण स्थळी भेट देउन मागण्याचे निवेदन स्वीकारले . या सदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले कि , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार व विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनात सरकारकडे मागण्या मांडतील व त्यांना न्याय देतील .या आंदोलनात महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे , माजी आमदार कमल ढोलेपाटील ,जालिंदर कामठे , शहर महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर , नगरसेवक प्रदीप गायकवाड , माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर , शहर युवा अध्यक्ष राकेश कामठे , प्रदेश विद्यार्थी उपाध्यक्ष सुजित जगताप , भोलासिंग अरोरा , युवती अध्यक्ष मनाली भिलारे , किशोर कांबळे , अजिंक्य पालकर , सुजित जगताप , संजय कामठे , निलेश जाधव , नितीन रोकडे , विद्यार्थी पुणे शहर अध्यक्ष ऋषी परदेशी आदी मान्यवर सहभागी झाले होते . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांना निवेदन देण्यात आले .या निवेदनामध्ये रिक्त जागा भरण्यात याव्यात , सेवा निवृत्तीचे वय ५५ करण्यात यावे , कंत्राट पद्धतीने नोकर भरती करण्यात येऊ नये , राज्य सेवेच्या २०१८ च्या जाहिरातीमध्ये पदसंख्येत वाढ करण्यात यावी , संयुक्त परीक्षा गट ब च्या जाहिरातीमध्ये पदसंख्येत वाढ करण्यात यावी , तलाठी पदाची जाहिरात प्रसिध्द करून त्याची परीक्षा mpsc द्वारे घेण्यात यावी , महापरिक्षा पोर्टल बंद करून त्या सर्व परीक्षा mpsc द्वारे घेण्यात याव्यात , परीक्षा केंद्रावरती मोबाइल जॅमर बसविण्यात यावेत , सर्व परीक्षा या सी सी टी व्ही नियंत्रण कक्षेत आणावेत , राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र मुख्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी , प्रतीक्षा यादी लावून उमेदवार निवड यादीत नाव येऊन पद स्वीकारत नाही . ते पद रिक्त न ठेवता प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला ती जागा द्यावी . यामुळे अनुशेष रिक्त राहणार नाही , पोलीस उपनिरीक्षक २०१६ व २०१७ चा प्रलंबित निकालाबाबत राज्य शासनाने भूमिका घ्यावी , mpsc ने ४५ दिवसाच्या आत निकाल लावावेत . अशा मागण्या मांडण्यात आल्या .https://m.dailyhunt.in/news/india/marathi/my+marathi-epaper-mymar/spardha+pariksha+denarya+vidyarthyanchya+maganyansathi+rashtravadi+yuva+kongresache+lakshanik+uposhan-newsid-92463791?ss=wsp&s=a

Read More
  119 Hits

दुधाला दर देण्यास सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे

दुधाला दर देण्यास सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे

Marathi News >> पुढारी >> Main EditionMonday, 16 Jul, दूध_दर_आंदोलन पुणे : पुढारी ऑनलाईन दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या दूध दर आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यासाठी पुण्यात आंदोलन करत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा...

Read More
  131 Hits

महाराष्ट्र में 'दूध रोको' आंदोलन

 https://www.youtube.com/watch?v=IPli2V4D34I&feature=youtu.be

Read More
  156 Hits

मराठा आरक्षण : झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

मराठा आरक्षण : झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

लोकसत्ता ऑनलाइन | Published on: July 25, 2018 9:13 am गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे भाजपाच्या जाहीरनाम्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा विषय होता. परंतु सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळालं नाही. कारण मुख्यमंत्र्यांना सत्तेत आल्यावर न्यायालय आठवतं , निवडणुकीच्या प्रचारात न्यायालय आठवलं नाही, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला. तसंच गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार आहेत असा आरोप करत झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज (बुधवारी) मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक दिली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहनही मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे. समन्वयकांकडून सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम होणार नसल्याचं सांगितलं असलं तरी खासगी वाहनं रस्त्यावर उतरू देणार नसल्याचा पवित्रा मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शांततेच्या मार्गाने आरक्षणासह इतर मागण्या मांडणाऱ्या मराठा तरुणांच्या मागण्यांची राज्य सरकारने योग्य दखल घेतली नसल्याने ही उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री चिथावणीखोर वक्तव्ये करीत असल्याने हे आंदोलन चिघळले आहे, असा आरोप केला आहे. मराठा आंदोलनाच्या सद्य स्थितीवर एक निवेदन प्रसारित करीत पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. https://www.loksatta.com/maharashtra-news/supriya-sule-demands-resignation-of-cm-devendra-fadanvis-maratha-agitation-1719390//lite/

Read More
  117 Hits

आंदोलन झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे

आंदोलन झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे

https://www.facebook.com/abpmajha/videos/10160866788745271/

Read More
  114 Hits

Maratha Kranti Morcha: Supriya Sule demands resignation of CM Fadnavis

Maratha Kranti Morcha: Supriya Sule demands resignation of CM Fadnavis

Aparnna Hajirnis July 25, 2018Supriya Sule in the Lok Sabha, spoke about the now-suspended Maratha Kranti Morcha in Maharashtra. Sule, MP from NCP, said, “Maratha and Dhangar were the subjects of reservation in BJP’s manifesto. But after coming to power, Marathas and Dhangars did not get reservation. Because Chief Minister remembers the High Court during elections but not when he is in power”. Supriya Sule also demanded that Chief Minister should resign if the Chief Minister, who is also responsible for the responsibility of destroying the law and order in Maharashtra, is not responsible for it.Maratha Kranti Morcha turned violent after the death of Kakasaheb Shinde in Aurangabad today called for a shutdown in Mumbai, Navi Mumbai and Thane for the demand for reservation. Maratha Morcha coordinators appealed to not be violent during bandh. The Maratha marches have not been allowed to go on the streets even though the coordinators are implied that the bandh will not have any impact on public transport.Earlier, NCP Chief Sharad Pawar also said that due to the demands of the Maratha youth who have demanded the demands of the Maratha youth, including the reservation, the state has not taken proper notice. The Chief Minister and his ministers have been accused of making false statements in this regard. On the current status of the Maratha agitation, Pawar made a demand for Maratha representation in his statement.Several places of Mumbai such as Mankhurd, Govandi saw protests turn violent with protestors torching buses and other vehicles.

Read More
  118 Hits

मराठा आरक्षण आंदोलन : खासदार सुप्रिया सुळे

मराठा आरक्षण आंदोलन : खासदार सुप्रिया सुळे

https://www.facebook.com/BBCnewsMarathi/videos/1626672627461061/

Read More
  108 Hits