दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता हिच्या लग्न समारंभाच्या वेळी आई सुमन ताई पाटील भावनिक

सुप्रिया ताईंकडून सुमनताईंचे सांत्वन. https://www.youtube.com/watch?v=G_Aat5RJldE&feature=youtu.be

Read More
  112 Hits

दौंड अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा - खा. सुळे

दौंड अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा - खा. सुळे

प्रफुल्ल भंडारी, सोमवार, 30 एप्रिल 2018[caption id="attachment_1126" align="alignnone" width="300"] सिद्धेश्वर_हॉस्पिटल_दौंडदौंड (पुणे) : राज्यातील पहिला अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त तालुका म्हणून दौंड तालुक्याची ओळख निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेसह तालुक्यातील खासगी रूग्णालये, दौंड मेडीकल असोसिएशन व अन्य संस्थांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.दौंड येथे सिध्देश्वर मॅटर्निटी, सर्जिकल व जनरल हॅास्पिटलचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले व त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह डॅा. दत्तात्रेय लोणकर, राणी शेळके, झुंबर गायकवाड, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, आनंद थोरात, डॅा. सुनीता कटारिया, बबन लव्हे, अॅड. अजित बलदोटा, नंदकुमार पवार, आदी उपस्थित होते. हॅास्पिटलचे प्रमुख डॅा. मयूर महादेव भोंगळे यांनी प्रास्ताविकात या सुसज्ज हॅास्पिटल मधील उपलब्ध सुविधा आणि औषधोपचारांविषयी माहिती दिली.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ``नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात देशात कुपोषण आणि स्त्रीभ्रुणहत्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ते अतिशय गंभीर आहे. विशेषकरून महिलांमध्ये रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आणि बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी हेल्थ कार्ड उपलब्ध करून देत त्याद्वारे रक्त तपासणी, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, आदींची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील महिला अॅनिमिया मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.``त्या पुढे म्हणाल्या, ``जैव वैद्यक कचर्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नसल्याने आपल्या आरोग्यासह पर्यावरणावर देखील विपरीत परिणाम होत आहे. या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तालुक्यातील डॅाक्टर मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेऊन कुरकुंभ येथील कंपन्यांच्या कार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून निधी उभारून प्रकल्प केला कार्यान्वित केला पाहिजे.``शशांक मोहिते व रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर माजी सभापती रंगनाथ फुलारी यांनी आभारप्रदर्शन केले.खासदार सुप्रिया सुळे यांनी डॅा. मयूर व डॅा. अनुराधा भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करीत गरीब आणि गरजूंची सेवा करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे काबाडकष्ट करून तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करणारे महादेव भोंगळे व हिराबाई भोंगळे यांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.http://www.esakal.com/pune/make-daund-tehsil-anemia-and-malnutrition-free-says-supriya-sule-113263

Read More
  125 Hits

प्रसाद लाड यांच्या कंपनीमार्फत मानवी तस्करी -सुप्रिया सुळे

प्रसाद लाड यांच्या कंपनीमार्फत मानवी तस्करी -सुप्रिया सुळे

असं असूनही पारदर्शकतेची ग्वाही देणारं भाजप सरकार गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. Sachin Salve | Updated On: Apr 28, 2018 05:45 PM IST मुंबई, 28 एप्रिल : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मानवी तस्करी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय.सुप्रिया सुळे यांना ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे विधान  प्रसाद लाड यांच्यावर हल्ला केलाय. प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मानवी तस्करी कऱण्यात येत असल्याचं समारो आलंय. असं असूनही पारदर्शकतेची ग्वाही देणारं भाजप सरकार गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. supriya_sule_on_ladSupriya Sule✔@supriya_sule .@sureshpprabhu BCAS ने स्पष्टपणे सांगितलेय की क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस ही प्रसाद लाड यांची कंपनी मानवी तस्करीच्या प्रकरणात गुंतलीय. एवढा गंभीर आरोप देखील भाजपमध्ये पावन झाला का @narendramodi जी, @Dev_Fadnavis जी हे सर्व तुमच्या डोळ्यादेखत होतेय.हाच का तुमचा पारदर्शक कारभार ? 3:30 PM - Apr 27, 2018यावर प्रसाद लाड यांनी सुप्रिया सुळे यांना प्रतिउत्तर दिलंय. माणूस मोठा झाला की असे आरोप होत असतात.. राष्ट्रवादीनं माझा धसका घेतलाय. माझ्या कंपनीवर कुठल्याही गुन्हेगारी स्वरुपाचा आरोप नाहीये. त्यामुळे जे आरोपी सुप्रिया सुळेंनी केलेत ते खोटे असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हंटलंय.

Read More
  132 Hits

अजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप

अजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप

स्मिताच्या_लग्नात_अक्षता_वाटताना_ताईज्ञानेश सावंत , 09.34 AMपुणे : आर. आर अर्थात, आबा आज असते तर...लग्नात स्मिता यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, त्या आबांनी पूर्ण केल्या असत्या. पण, आबांचं नसणं स्मिताला जाणवू नये, या भावनेतून स्मिताला आपली मुलगी मानून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्मिता आणि आनंद यांचा विवाह मंगळवारी शाही थाटात पार पाडला. स्मिता यांचं लग्न ठरविण्यापासून ते धुमडाक्‍यात करण्यापर्यंतची जबाबदारी अजितदादांनी वधूपित्याच्या भावनेतून पूर्ण केली. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नात उपस्थित असलेल्या मान्यवरांना अक्षता वाटप केले.लग्न मांडवाच्या प्रवेशद्वारात खुद्द अजितदादा वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करायला उभे होते. विशेष म्हणजे, स्मिता आणि आनंदला शुभार्शिवाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देता यावं म्हणून दादांनी एरवी भोवती जमणाऱ्या गर्दीला लांब ठेवलं होतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद हे मंगळवारी विवाहबध्द झाले. हडपसरमधील लक्ष्मी लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.स्मिता आणि आनंद यांच्या लग्नाची बोलणीही अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानातच झाली होती. तेव्हाच, 'मला मुलगी नसल्याने स्मिता ही माझ्यासाठी मुलीसारखी आहे,' असे सांगून त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. हो सोहळा थाटात व्हाव यासाठी अजितदादाच थोरात कुटुंबियांशी बोलत होते. लग्न जवळ आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दादा अक्षरशः लगीनघाईत होते. या काळात ते रोज पाटील आणि थोरात कुटुंबियांशी बोलून तयारीचा आढावा घेत होते. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही पदाधिकाऱ्यांना स्मिता यांच्या लग्नाचे निमंत्रण देत, लग्नाला आवर्जजून येण्याचा आग्रह त्यांनी केला होता.लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे, सोमवारीही दादांनी स्मिता, आनंद यांच्याशी बोलून काही राहिले नाही? याची विचारपूस केली. पवार कुटुंबातील बहुतांश मंडळी आज विवाह सोहळ्याच्या गडबडीत होती. सायंकाळी लग्न असल्याने दादा दुपारी चार वाजताच मांडवात आले. काही मिनिटे थांबून पाहुणे मंडळीशी चर्चा केली. त्यानंतर परिसरातील विवाहसोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी दादा बाहेर पडले. ते आटोपून पुन्हा पाच वाजता लक्ष्मी लॉनमध्ये आले. आल्याबरोबर दादा थांबले ते लक्ष्मी लाॅनच्या गेटवर. विवाहासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी!http://www.esakal.com/pune/ajit-pawar-supriya-sule-attend-rr-patil-daughter-wedding-pune-113412

Read More
  125 Hits

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे

Dipak Pathak Updated Friday, 4 May 2018 - 12:10 PM sushma-andhare-and-supriya-sule टीम महाराष्ट्र देशा- आपल्या आक्रमक भाषण शैली मुळे अल्पावधीत महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या या राज्यात चळवळीतल्या सक्रिय महिला कार्यकर्त्यावर झालेल्या घटनेची सरकारने चौकशी करावी अशी मागणी सुळे यांनी केली आहे. बुधवारी रात्री मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. प्रा. सुषमा अंधारे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अंधारे या एका कार्यक्रमातून परतत होत्या. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला तीनवेळा जोराची धडक दिली अशी माहिती समोर येत आहे. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीला मार लागला आहे. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर इंदूर बायपासवर मृदंग रेस्टॉरंटसमोर असलेल्या पुलालगत हा थरार साडेतीन मिनिटे सुरू होता. अंधार असल्याने धडक देणाऱ्या गाडीत किती लोक होते हे समजू शकले नाही. मात्र धडक देणाऱ्या गाडीच्या चालकाचा स्टेअरिंगवरील हात दिसत होता. त्याच्या हातात रंगीबेरंगी दोरे बांधल्याचे दिसत होते अशी माहिती सुषमाताई अंधारे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. कोण आहेत प्रा.सुषमा अंधारे ?प्रा. सुषमा अंधारे या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.

Read More
  145 Hits

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’, भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’, भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 4, 2018 3:44 PM supriya-sule- बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात बंद असलेले छगन भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते तुरुंगातून येण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देर आए दुरुस्त आए अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना देर आए दुरुस्त आए, भगवान के घर देर है अंधेर नहीं, छगन भुजबळांना न्याय मिळाला असं म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद, पण आरोप सिद्ध न होता एखाद्याला जेलमध्ये राहावं लागतं याची खंत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचे नेते भुजबळ यांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले. सरकारनं त्यांना जामीन मिळू नये असा खूप प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्रमहाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Read More
  118 Hits

'तुम्ही खात जा, आम्ही क्लीन चीट देत जाऊ'

'तुम्ही खात जा, आम्ही क्लीन चीट देत जाऊ'

Published On: May 7, 2018 11:38 PM IST | Updated On: May 7, 2018 11:38 PM ISThttps://lokmat.news18.com/video/supriya-sule-on-clean-chit-289429.html

Read More
  174 Hits

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

वालचंदनगर - ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं.... उसाला दर नायं... दुधाचं दर कमी होत हाय...तेलाचं दर वाढवतयं....पेंडचे दर वाढवतयं....तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय... कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या...हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे... इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया.   राजकुमार थोरात 04.07 PM 2supriya_sule_17सुप्रिया सुळे या तालुक्यातील १६ गावामध्ये जावून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत होत्या. पडस्थळ गावातील गावा दौरा संपवून दुसऱ्या गावाकडे जाण्याच्या तयारीमध्ये असताना एक डोक्याला लाल फेटा बांधलेले एंशी वर्षाचे आजोबा वामन मारकड अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आले. व त्यांना मनातले सांगण्यास सुरवात केली.त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारला बोझा म्हणून संबोधत होते. सरकारचं जनतेवर बोझा झाल्याचे सांगून आमच्या डोक्यावरचा बोझा कमी करा. सरकारनं महागाई वाढवली आहे. साहेबांचे (शरद पवार) यांचे काम चांगल होतं... तुमचे पहिल्या पासुन चांगल काम आहे. तुम्ही काय पण करा... लक्ष राखून निवडून या...असे सांगितले.ग्रामीण भागातील जनता शेतकरी भाजप सरकारला वैतागले आहेत. शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थाच कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा थेट परीणाम शेतकऱ्यावरती होवू लागला असून, मशागतीचा खर्च ही वाढला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यास परवडत नसल्याचे शेतकरी सांगू लागले असून काय पण करा यावेळी निवडूण या असे शेतकरी सांगत आहेत. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, प्रतापराव पाटील, महारुद्र पाटील, शशिकांत तरंगे उपस्थित होते.http://www.esakal.com/paschim-maharashtra/government-has-put-farmers-down-farmers-118976

Read More
  137 Hits
Tags:

एनडीएच्या आवारातील गावकऱ्यांच्या अडचणी काही अंशी सुटण्यास सुरुवात

एनडीएच्या आवारातील गावकऱ्यांच्या  अडचणी काही अंशी सुटण्यास सुरुवात

प्रशासनासोबत खासदार सुळे यांची पुन्हा बैठक प्रशासनासोबत खासदार सुळे यांची पुन्हा बैठक पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या पलीकडे असलेले हवेली तालुक्यातील अहिरे हे गाव आणि त्यालगतच्या सोनारवाडी, खाडेवादी, वांजळेवाडी आणि मोकरवाडी येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात काही अंशी यश आले आहे. एनडीएच्या आवारातील धनगर बाबा मंदिरात पूजा करण्यास परवानगी मिळाली असून मोकरवाडी बसस्थानकाबाबतही प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (दि. २३) पुन्हा एनडीए प्रशासनासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत अहिरेबरोबरच शिवणे, कोपरे, उत्तमनगर, आणि कोंढवे या गावांतील नागरिकांच्या मागण्यांसाठी एक प्रतिनिधी नियुक्त करावा, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मोकरवाडी येथील बसथांब्याबाबतही प्रबोधिनी सकरात्मक असून यात लक्ष घालू असे आश्वासन देण्यात आले आहे. प्रबोधिनीच्या संरक्षणाबरोबरच या भागात राहणाऱ्या भूमिपुत्रांचे हक्कही तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रबोधिनीने जास्त कठोर न होता मध्यम मार्ग काढावा या मागणीसाठी गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले होते. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल एनडीच्या मुख्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, अनिता इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.अहिरे हे गाव आणि चार वाड्या या प्रबोधिनीला लागून पण पलीकडील बाजूस असल्याने येथील नागरिकांना प्रबोधिनीच्या ह्द्दीतूनच यावे-जावे लागते. त्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. नागरिकांची ही गरज ओळखून प्रबोधिनी प्रशासनाने प्रबोधिनीचे गेट क्र. १० त्यांच्यासाठी उघडून दिले आहे. त्यासाठी पूर्वी पहाटे चार ते रात्री साडेबारा अशी वेळ ठेवली होती. परंतु अचानक ही वेळ कमी करून पहाटे पाच ते रात्री साडेदहा अशी केली. या बदलामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुलांच्या शाळांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला आजार आदि प्रसंगी रूग्णालयापार्यंत जाण्यात सुद्धा अडचणी येत आहेत. याशिवाय या लोकांना दैनंदिन व्यवहारातही अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत आहेत.या परिसरात राहणारी जवळपास सगळीच कुटुंबे शेतकरी आहेत. त्यांची दुभती जनावरे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि शेतमाल बाजारात घेऊन जाणे त्यांना अत्यंत जिकीरीचे झाले आहे. दूध घेऊन शहरात येण्यासाठी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. याशिवाय नित्य पूजा अर्चा, मंदिरात दर्शनाला जाणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या प्रबोधीनिशी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात आंदोलनही केले होते. काल पुन्हा बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करत सकारात्मक तोडगा काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

Read More
  134 Hits

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी : सुप्रिया सुळे

त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, सुप्रिया सुळे यांची टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी राहुल ढवळे, एबीपी माझा, इंदापूर | Last Updated: 24 May 2018 07:04 PMइंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. राज्यात अजित पवार यांच्याइतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक या गावाच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळेंनी हा सल्ला दिला.जर एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन-तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे, असा सुप्रिया सुळे म्हणाल्या.राज्य चांगल्या प्रकारे चालवायचे असेल, तर अजित पवार यांच्या इतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी. त्याची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, असं म्हणत त्यांनी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपवरही सडकून टीका केली.

Read More
  146 Hits

वाढत्या महिला अत्याचारांना मुख्यमंत्री जबाबदार- सुप्रिया सुळे

वाढत्या महिला अत्याचारांना मुख्यमंत्री जबाबदार- सुप्रिया सुळे

May 25, 2018 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0 वाढत्या महिला अत्याचारांना मुख्यमंत्री जबाबदार पुणे | महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत असतील तर ज्यांच्याकडे गृहखातं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री काय करतात? असा प्रश्न राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. त्या बारामती दौऱ्यावर असताना बोलत होत्या. राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टनुसार महिला अत्याचार गुन्ह्यात महाराष्ट्राचा देशात वरचा क्रमांक लागतो, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांचा आम्हाला सार्थ आभिमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More
  169 Hits

Sule meets NDA officials to resolve issues of villagers

Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues

ST Correspondent; Sule meets NDA officialsPune: About a month after over 150 villagers protested outside the Kondhwe gate of the National Defence Academy (NDA) demanding better access, Nationalist Congress Party MP Supriya Sule had a meeting with the NDA authorities on Wednesday. Her office said that the authorities have agreed for access to Dhangar Baba temple for worship and soon a solution is expected for the bus stop at Mokarwadi.As per the statement issued by her office, the meeting was held to discuss problems being faced by villagers from Ahire, Shivne, Kopre, Uttamnagar as well as Kondhwe Dhawde. “During the meeting, a decision was taken to appoint a representative for the villages to take up their issues with concerned authorities. The NDA officials are also positive about the bus stop at Mokarwadi. The security of NDA and rights of villagers, both are important,” the statement said.According to the villagers, NDA has allowed them access through Gate No. 10 but time period has been reduced. Now, they are allowed from 5 am to 10.30 pm. They face problems in taking their animals out, besides inconveniences in going to their village deity.After the protest last month, NDA issued a statement, “NDA is a premier institution with a lot of security threats from anti-national elements. Therefore, this boundary wall around the NDA was constructed. Earlier, all the villagers had uncontrolled access, but because of security reasons, the wall has been undertaken and the villagers have been given controlled access. As per request, we give pick-up and drop to villagers. In such cases, the municipal administration and district collectorate should give alternate road from Kudaje. The villagers should meet the civil authorities. They should respect NDA as an institution.”http://www.sakaltimes.com/pune/sule-meets-nda-officials-%C2%A0-resolve-issues-villagers-18625

Read More
  162 Hits

Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues

Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues

May 24, 2018 / By Reporter Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues एनडीए भागातील स्थानिक गावांच्या समस्या सुटण्यास मदत पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या पलीकडे असलेले हवेली तालुक्यातील अहिरे हे गाव आणि त्यालगतच्या सोनारवाडी, खाडेवादी, वांजळेवाडी आणि मोकरवाडी येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात काही अंशी यश आले आहे. एनडीएच्या आवारातील धनगर बाबा मंदिरात पूजा करण्यास परवानगी मिळाली असून मोकरवाडी बसस्थानकाबाबतही प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (दि. २३) पुन्हा एनडीए प्रशासनासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत अहिरेबरोबरच शिवणे, कोपरे, उत्तमनगर, आणि कोंढवे या गावांतील नागरिकांच्या मागण्यांसाठी एक प्रतिनिधी नियुक्त करावा, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मोकरवाडी येथील बसथांब्याबाबतही प्रबोधिनी सकरात्मक असून यात लक्ष घालू असे आश्वासन देण्यात आले आहे. प्रबोधिनीच्या संरक्षणाबरोबरच या भागात राहणाऱ्या भूमिपुत्रांचे हक्कही तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रबोधिनीने जास्त कठोर न होता मध्यम मार्ग काढावा या मागणीसाठी गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले होते. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल एनडीच्या मुख्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, अनिता इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.अहिरे हे गाव आणि चार वाड्या या प्रबोधिनीला लागून पण पलीकडील बाजूस असल्याने येथील नागरिकांना प्रबोधिनीच्या ह्द्दीतूनच यावे-जावे लागते. त्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. नागरिकांची ही गरज ओळखून प्रबोधिनी प्रशासनाने प्रबोधिनीचे गेट क्र. १० त्यांच्यासाठी उघडून दिले आहे. त्यासाठी पूर्वी पहाटे चार ते रात्री साडेबारा अशी वेळ ठेवली होती. परंतु अचानक ही वेळ कमी करून पहाटे पाच ते रात्री साडेदहा अशी केली. या बदलामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुलांच्या शाळांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला आजार आदि प्रसंगी रूग्णालयापार्यंत जाण्यात सुद्धा अडचणी येत आहेत. याशिवाय या लोकांना दैनंदिन व्यवहारातही अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत आहेत.या परिसरात राहणारी जवळपास सगळीच कुटुंबे शेतकरी आहेत. त्यांची दुभती जनावरे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि शेतमाल बाजारात घेऊन जाणे त्यांना अत्यंत जिकीरीचे झाले आहे. दूध घेऊन शहरात येण्यासाठी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. याशिवाय नित्य पूजा अर्चा, मंदिरात दर्शनाला जाणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या प्रबोधीनिशी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात आंदोलनही केले होते. काल पुन्हा बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करत सकारात्मक तोडगा काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

Read More
  141 Hits

या सरकारचे चाललेय तरी काय?: सुप्रिया सुळे

या सरकारचे चाललेय तरी काय?: सुप्रिया सुळे

मिलिंद संगई ; 04.52 PM या सरकारचे चाललेय तरी काय?बारामती (पुणे): महागाईने कहर केला आहे, सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण बनले आहे, लोकांच्या मनात कमालीची खदखद आहे, तरीही सरकार काहीही करायला तयार नाही...या सरकारचे चालले आहे तरी काय? असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. आज (शुक्रवार) पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला.बेरोजगारी वाढली, परकीय गुंतवणूक येत नाही, नवीन नोक-यांची निर्मिती होत नाही, शेतीमालाला हमी भाव मिळत नाही, दूध, साखरेला भाव नाही, शिक्षणाच्या बाबतीत रोज नवीन काहीतरी निर्णय होत आहेत, जे काही सरकारकडून सुरु आहे, ते फारस चांगल चाललेल नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडल.समाजामध्ये आज कमालीची खदखद जाणवते आहे. इंधनाच्या दरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात होते तेव्हा काय बोलत होते आणि आज ते काय बोलत आहेत, या विषयाबाबत प्रचंड असंतोष असूनही सरकार अजिबात गंभीर नाही, असा आरोप करत भाजप सरकार केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जाहिरातबाजी हा एककलमी कार्यक्रम राबवित असल्याचे त्या म्हणाल्या.महाराष्ट्रातही कुपोषण वाढले, नवीन रोजगारनिर्मिती झालेली नाही, महिलांवरील अत्याचार व हिंसाचारात कमालीची वाढ झाली. तुमची जनताच जर कुपोषित राहिली तर रस्ते बांधून करणार तरी काय, अशी विचारणा त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या घोषणा करतात मात्र हा पैसा आणणार कोठून याची काहीच कल्पना कोणाला नाही. जलयुक्तशिवार, मागेल त्याला शेततळे, आदर्श गाव या योजनांच नेमक काय झाल, स्टार्ट अप, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र योजनांच नेमक काय झाल याचा पत्ताच नाही, सरकारच नेमक काय चाललय हेच समजायला मार्ग नाही असेही सुळे म्हणाल्या.http://www.esakal.com/pune/supriya-sule-political-attack-government-baramat-119303

Read More
  154 Hits

दोन्ही काॅग्रेसची आघाडी लवकर व्हावी होण्यासाठी प्रयत्नशील : सुळे

दोन्ही काॅग्रेसची आघाडी लवकर व्हावी होण्यासाठी प्रयत्नशील : सुळे

मिलिंद संगई : शुक्रवार, 25 मे 2018 दोन्ही काॅग्रेसची आघाडी लवकर व्हावी होण्यासाठी प्रयत्नशीलबारामती शहर :  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी लवकरात लवकर व्हावी असा माझा स्वताःचा वैयक्तिक प्रयत्न असल्याची स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बोलून दाखविली. बारामतीतील पोस्ट कार्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. ही आघाडी जितकी लवकर होईल तितके मतभेद संपविण्यासह एखादे पाऊल पुढे मागे करायलाही वेळ मिळू शकतो, त्यामुळे ही आघाडी व कार्यकर्त्यांचे मनोमीलन यासाठी वेळ जाऊ नये. दोन्ही पक्षांना थोडे कमी जास्त करावे लागेल पण आघाडी व्हावी असे आपल्याला मनापासून वाटते. चांगली राजकीय आघाडी झाली आणि मतांचे विभाजन झाले नाही तर खूप चांगला बदल राज्यात बघायला मिळेल,`` असा विश्वासही सुळे यांनी बोलून दाखविला. गामी निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय चित्र शंभर टक्के बदलेल, राज्यात मुख्यमंत्री जरी निवडणुका जिंकत असले तरी केवळ निवडणपका जिंकणे म्हणजे सर्व काही नसते, या राज्यातील जनता दुःखी असून काय उपयोग? शेतक-यांना हमी भाव नाही, अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला, सरकार कसला विचारच करायला तयार नाही, यांच्या मनात नेमक चाललय तरी काय हेच समजेनासे झाले आहे, असे सुळे यांनी सांगितले. आकडोंसे पेट नही भरता आमचे सरकार होते तेव्हा सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या आकडोंसे पेट नही भरता है, भूक लगती है तब धान लगता है !.आज मलाच तो प्रश्न भाजपला विचारायचा आहे, मी संसदेत भाजपला हाच प्रश्न विचारणार आहे, असे त्यांनी सांगितले. http://www.sarkarnama.in/trying-alliance-between-both-congress-sule-24178

Read More
  123 Hits

Center of Excellence for Dairy foundation stone laid in Baramati

Center of Excellence for Dairy foundation stone laid in Baramati

May 25, 2018 / By Reporter Center of Excellence for Dairy foundation stone laid in BaramatiBaramati – Netherlands Deputy Prime Minister Ms Carola Schouten on Friday laid the foundation stone of Center of Excellence for Dairy, a joint Indo – Dutch initiative between the Agricultural Development Trust, Baramati (supported by GOI under RKVY) and the Dutch Govt.Genetic improvement of Indian breeds for better cattle health, increased milk yield and milk quality improvement will be the focus areas of CoE for Dairy.“I had gotten opportunity to visit Netherlands during my stint as an Agriculture Minister. There I decided to set up the Center of Excellence for various agricultural sectors in India. In this context , In 2015, foundation stone of CoE for Vegetable Production was laid at the hands of Shri Narendra Modi in Baramati. I am happy that Ms Carola could see the state of art facilities in this CoE. In my opinion, merely bringing Dutch technology in India is not enough, it should successfully reach the farmers and their farms”, said Sharad Pawar, who was also present.Later bicycle distribution ceremony that took place. “This bicycle distribution program for girl students and ASHA workers is one of my higher priority initiative for empowering women . I’m grateful to Mr. Pankaj Munjal, Chairman Hero Cycles and Shri Jagdish Khattar, MD of Suzuki for extending support for this initiative”, Pawar added. latform to Buy, Sell & Rent tractors & farm mechanization implements Baramati – Netherlands Deputy Prime Minister Ms Carola Schouten on Friday laid the foundation stone of Center of Excellence for Dairy, a joint Indo – Dutch initiative between the Agricultural Development Trust, Baramati (supported by GOI under RKVY) and the Dutch Govt.Genetic improvement of Indian breeds for better cattle health, increased milk yield and milk quality improvement will be the focus areas of CoE for Dairy.“I had gotten opportunity to visit Netherlands during my stint as an Agriculture Minister. There I decided to set up the Center of Excellence for various agricultural sectors in India. In this context , In 2015, foundation stone of CoE for Vegetable Production was laid at the hands of Shri Narendra Modi in Baramati. I am happy that Ms Carola could see the state of art facilities in this CoE. In my opinion, merely bringing Dutch technology in India is not enough, it should successfully reach the farmers and their farms”, said Sharad Pawar, who was also present.Later bicycle distribution ceremony that took place. “This bicycle distribution program for girl students and ASHA workers is one of my higher priority initiative for empowering women . I’m grateful to Mr. Pankaj Munjal, Chairman Hero Cycles and Shri Jagdish Khattar, MD of Suzuki for extending support for this initiative”, Pawar added.Baramati MP Supriya Sule was also present on the occasion.http://www.punekarnews.in/?p=23376

Read More
  143 Hits

राष्ट्रवादी काॅग्रेस सोडणे हा निरंजन डावखरेंचा असंस्कृतपणा : सुळे

राष्ट्रवादी काॅग्रेस सोडणे हा निरंजन डावखरेंचा असंस्कृतपणा : सुळे

मिलिंद संगई ; शुक्रवार, 25 मे 2018 राष्ट्रवादी काॅग्रेस सोडणे हा निरंजन डावखरेंचा असंस्कृतपणाबारामती शहर : ज्या पक्षाने सगळ देऊनही शेवटच्या मिनिटाला पक्ष सोडणे हे दुर्देवी आहे, याला असंस्कृतपणा म्हणतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत निरंजन डावखरेंच्या भाजप प्रवेशाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली.बारामती शहर : ज्या पक्षाने सगळ देऊनही शेवटच्या मिनिटाला पक्ष सोडणे हे दुर्देवी आहे, याला असंस्कृतपणा म्हणतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत निरंजन डावखरेंच्या भाजप प्रवेशाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली.डावखरेंची ही कृती असंस्कृतपणाची असल्याचे सांगत नीतीमत्तेच्या गप्पा मारणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुळे यांनी निशाणा साधला.  ``नरेंद्र मोदी प्रस्थापितांच्या विरोधात लढतात, मला मोदी आणि फडणवीस यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की निरंजन डावखरे हे प्रस्थापित आहेत की नाहीत, भाजपच्या ब-या वाईट काळात जे कार्यकर्ते भाजपमध्ये राहिले त्यांना डावलून दुस-या पक्षातून प्रस्थापिताला आयात करुन त्यांनी पद दिले, म्हणजे या दोघांची नीतीमत्ता काय आहे? निरंजन डावखरे हा प्रस्थापितांचा मुलगा नाही काय, मग भाजपने नेमके काय केले? भाषणात एक बोलायच आणि कृती दुसरीच करायची,`` अशी टीका त्यांनी केली.राष्ट्रावादी काॅग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ``पक्षात प्रवेश दिला जाईल पण त्यांना लगेच पद मिळणार नाही. त्यांना रांगेत उभे राहावे लागेल.``महागाईने कहर केला आहे, सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण बनले आहे, लोकांच्या मनात कमालीची खदखद आहे तरीही सरकार काहीही करायला तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.http://www.sarkarnama.in/nirnjan-dawkhare-shows-uncultured-beheviour-24184

Read More
  143 Hits

नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारी

नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारीराहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 25 May 2018 11:30 PMबारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली. सुप्रिया सुळेंना सायकल चालवताना पाहून उपस्थित विद्यार्थिनीही भारावल्या.बारामतीमध्ये काही स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन उपस्थित होत्या. दोघींच्या हस्ते हे सायकल वाटप करण्यात आलं.यावेळी सुप्रिया सुळे आणि स्काऊटेन यांना सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे दोघींनी काही अंतर सायकल चालवत पुढील कार्यक्रमात आगमन केलंhttp://abpmajha.abplive.in/maharashtra/supriya-sule-cycling-with-netherlands-political-leader-carolla-scouten-latest-update-544991

Read More
  126 Hits

NCP leader Supriya Sule tells CM Devendra Fadnavis to take lessons on running state from Ajit Pawar

NCP leader Supriya Sule tells CM Devendra Fadnavis to take lessons on running state from Ajit Pawar

Supriya Sule. (Photo: Twitter/@supriya_sule) Mayuresh Ganapatye Mumbai May 25, 2018 UPDATED 23:32 ISTDirectly attacking Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis's methods of governance, Member of Parliament and NCP leader Supriya Sule today told him that he should take lessons from Ajit Pawar on how to run state. She said that despite studying various problems in the state for the past three years, if the CM was still unable to solve these problems then he should take lessons from Ajit Pawar. "In the state Ajit Pawar is the best person to give tuition to Fadnavis. For this tuition we will not even charge any fees," Supriya Sule said in Indapur. Sule continued to taunt the CM saying if a student kept failing in the same class despite studying then "we ask him to join tuitions". Also read: All party Muslim MLAs protest against CM Devendra Fadnavis"CM of Maharashtra is still studying issues of the state so we feel he should join tuitions," she said. Sule praised her brother Ajit Pawar who was deputy CM of the state during Congress NCP regime. Sule felt he was the best person who could give Fadnavis proper guidance. https://www.indiatoday.in/india/story/ncp-leader-supriya-sule-tells-cm-devendra-fadnavis-to-take-lessons-on-running-state-from-ajit-pawar-1242067-2018-05-25

Read More
  106 Hits

खासदारांचे रिपोर्ट कार्ड: थोडे झाले, थोडे करायचे आहे!

खासदारांचे रिपोर्ट कार्ड: थोडे झाले, थोडे करायचे आहे!

Published On: May 26 2018 1:52AM | Last Updated: May 26 2018 खासदारांचे रिपोर्ट कार्ड केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारमुळे सामान्य नागरिकांनी काय कमावले आणि काय गमावले, यावर सोशल मीडियापासून सर्वत्रच चर्चा होत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील खासदारांनी केलेली कामे आणि उर्वरित वर्षभरातील कामांसाठी केलेल्या संकल्पाचे ‘रिपोर्ट कार्ड’ त्यांच्याच शब्दात. अनेक प्रकल्प मार्गी : खा. सुप्रिया सुळेगेल्या चार वर्षांत केंद्रात वेगळ्या विचारांचे सरकार असतानाही बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध कामांचा पाठपुरावा करून, ती मार्गी लावली असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे- दौंड लोकलचा पाठपुरावा सातत्याने केला. त्यात असलेले अडथळे दूर करण्यासाठी रेल्वेमंत्री तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी सातत्याने बैठका घेतल्या. पुणे-दौंड रेल्वेमार्गातील कडेठाण, खुटबाव, मांजरी या स्थानकांवर प्लॅटफॉर्मसाठी निधी उपलब्ध केला. तीर्थक्षेत्र जेजुरी येथील रेल्वेस्थानकाचा विकास तसेच स्थानकावर पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही मोठा पाठपुरावा केला. दौंड शहरात बीएसएनएलशी संबंधित अनेक प्रश्‍न होते. बारामतीतही काही ठिकाणी हा प्रश्‍न होता, परंतु मुख्यत्वे दौंडमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. आत्महत्या केलेल्या मतदारसंघातील  शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींच्या पुनर्वसनासाठी उमेद हा उपक्रम राबविला. या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सहाय्य करण्यात आले. पुण्याच्या कचरा डेपोच्या प्रश्‍नात फुरसुंगी व ऊरुळी देवाची येथील ग्रामस्थांसोबत आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा. रायरेश्‍वर आणि रोहिडेश्‍वर किल्ल्यांसाठी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या माध्यमातून 1.61 कोटी व 1.31कोटींचा निधी मंजूर करून आणला. सांसद आदर्श ग्राम दापोडी येथे सौरऊर्जा व पवनचक्की प्रकल्पाचे काम पूर्ण केले. इंदापूरच्या न्यायालय इमारतीसाठी निधी. सिहंगड रोड येथील नदीपात्रालगतच्या रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा. आगामी काळात मतदारसंघातील डोणजे हे गाव ऐतिहासिक खेडे पर्यटनासाठी विकसित करण्यासाठी पाठपुरावा करणार. 20 हजार कोटींहून अधिक निधी आणलाशिरूर लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारमार्फत गेल्या 4 वर्षांत निरनिराळ्या प्रकल्पांसाठी सुमारे वीस हजार कोटींहून अधिकचा निधी मिळविण्यात यश आल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पुणे-नाशिक रेल्वे मंजुरी- 5500 कोटी, राष्ट्रीय महामार्ग रस्ते कामांसाठी- 5711 कोटी, चांडोली ते सिन्नर महामार्ग चौपदरीकरण- 1970 कोटी, नाशिक फाटा ते चांडोली सहापदरीकरण- 978 कोटी, सरळगाव-बनकर फाटा-घोडेगाव-तळेघर-भीमाशंकर मार्गे वाडा-राजगुरुनगर महामार्ग करणे- 966 कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा महामार्ग रुंदीकरण- 1800 कोटी, राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-कळंब-आळेफाटा आदी गावांचा बायपास वगळता अंतर्गत महामार्गाची खास बाब म्हणून विशेष दुरुस्ती- 100 कोटी, केंद्रीय मार्ग निधीतून केदारेश्‍वर पूल, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते व पुलांची कामे- 16 कोटी, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळा खोल्या बांधणे- 3 कोटी 40 लक्ष निधी आणला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भरीव निधी मिळवण्याकडे लक्ष देणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जनधन योजना, जीवनज्योती विमा, कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना, पीक विमा आदी केंद्रीय योजनांची मतदारसंघात प्रभावीपणे अंमलबजावणी. पुढील एक वर्षात पुणे-नाशिक लोहमार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रखडलेली बायपासची कामे, मंजुरी देण्यात आलेल्या प्रकल्पांची कामे लवकर सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न. पुणे-शिरूर-नगर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आग्रही. पुणे जिल्ह्यातील शाळा खोल्यांच्या कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अपंगांना विविध स्वरूपाचे साहित्य मिळावे यासाठी केंद्रीय योजनेअंतर्गत केंद्राकडून मदत मिळवून देणार. बैलगाडा शर्यतीसाठी भक्कम कायद्याचा पाठपुरावा करूबैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयात न्याय न मिळाल्यास शर्यती सुरू होण्यासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडून केंद्र सरकारकडे याबाबत भक्कम कायदा करण्याकरता पाठपुरावा सुरू ठेवणार आहे, असे आढळराव यांनी सांगितले. नदी प्रदूषण आणि स्वस्त घरे याकडेच आता लक्षपुणे - लोणावाळा रेल्वे ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाकडून मंजूरी मिळवून दिली. त्यानंतर तिसर्‍या व चौथ्या रेल्वे ट्रॅकचा स्वर्हे सुरु झाला आहे. हा ट्रॅक सुरु झाल्यानंतर पुणे ते लोणावळा जलदगती रेल्वे सुरु होईल. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सार्वजनीक वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत पासपोर्ट कार्यालय सुरु केले. त्यामुळे या भागातील लोकांना पुणे शहरात जाण्याचा त्रास कमी झाला व चांगली सुविधा शहरात प्राप्त झाली. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच हिंजवडी, लोणावळा परिसरातील लोकांना सुविधा मिळाली. वर्षभरात सुमारे 32 हजार लोकांनी नव्याने पासपोर्ट काढले. केंद्र सरकारच्या दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत ज्या दुर्गम भागात  स्वातंत्र्यानंतर वीज पोहचलीच नाही, अशा 5 गावांत वीज पोहचविली. या योजनेअंतर्गत मावळ, कर्जत, खालापूर, पनवेल या भागातील दुर्गम, आदीवासी भागातील वस्त्यांवर  वीज सुविधा मिळाली. पनवेल ते जेएनपीटी बंदर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावर आठ पदरी रस्ता करुन वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावला. मावळ भागातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसह देहूरोड कॅन्टोन्मेंट आदी भागात पिण्याचे व शेतीचे पाणी पुरविणार्‍या पवना धरणातील सुमारे 21 हजार ट्रक गाळ खासदार निधीच्या खर्चातून काढून पवना धरणाची...

Read More
  144 Hits