2 minutes reading time (369 words)

[TV9 Marathi]राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच,

राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच

सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाल्या?

सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले. हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आहे, आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या त्या अमान्य आहेत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा गैरवापर झाला, ज्या पद्धतीने त्या यंत्रणेचा गैरवापर झाला ते लोकशाहीसाठी घातक आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेना ही काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. त्याच कारण असं की बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला, त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, आणि समजा एखाद्याचं काही वेगळ मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली, त्या पद्धतीने त्यांनी करायला हवं होतं, त्यांना कोणी अडवलं होतं. स्वत:च्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणं ही कौतुकाची गोष्ट आहे.

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर आहेत, आणि राष्ट्रवादीचं जे संविधान आहे, त्यामध्ये आमदार आणि खासदार याचं मतदान नाही. पक्ष ज्याचा आहे, त्यांच्याकडेच राहील, अशी तरदूत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच आहे, तो कालही होता, आजही होता आणि उद्याही आहे, या संदर्भातील सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला हे मी जड अंतकरणाने म्हणते, कारण आम्हाला अशा संस्थावर टीका करायला आवडत नाही. परंतु दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अतिशय चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्षावर अन्याय केला का? तर केला, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

...

राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही शरद पवारांचीच, सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाल्या? - Marathi News | The NCP belongs to Sharad Pawar yesterday today and tomorrow Supriya Sule makes a big statement what did she say about the Election Commission | TV9 Marathi

सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसत नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.
[Saam TV News]सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवड...
[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिष...