[Azad Marathi]“निवडणुका सोयीने लढायला लागले तर…”
ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या
Supriya Sule | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला दारुण पराभव पत्करावा लागला. आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी पराभवासाठी एकमेकांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. पक्ष आता 'एकला चलो'चा नारा देत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीतील नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागची वेळी वेगवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सगळ्या निवडणुका आपल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी नाय मिळणार? हे त्यांचीही निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे.