[लोकसत्ता] राजमाता जिजाऊंचा इतिहास जगभरात पोहचला पाहिजे

परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच...

Read More
  345 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्तीने डीएसके विश्व-मेघमल्हार सोसायटीचा पाणी प्रश्न सुटणार

महापालिका आयुक्तांनी बैठकीत दिले उपाययोजनेचे आश्वासन पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) - धायरी परिसरातील डीएसके विश्वमधील मेघमल्हार सोसायटीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधि...

Read More
  349 Hits

[Abp Majha]लपवण्यासारखं काहीच नाही, पाहुण्यांचं स्वागतचं करणार

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Read More
  437 Hits

[लोकसत्ता] “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे ल...

Read More
  339 Hits

[TV9 Marathi]'राष्ट्रवादी काँग्रेसचं काम म्हणजे विकास'

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन  मंथन शिबीर खडकवासला विधानसभा मतदार संघ खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन

Read More
  382 Hits

[लोकमत]"अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतं"

सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने आक्रमक होत अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलनेही केली. रा...

Read More
  295 Hits

[ ABP माझा] गलिच्छ राजकारणासाठी महिलांचा वापर होतोय;

सुप्रिया सुळे संतापल्या महिलांचा वापर हा स्वतःच्या आणि गलिच्छ राजकारणासाठी केला जात आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलत होत्या. चांगली संधी मिळाली तर माय-बाप जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडवू शकेल, यासाठी मी राजकारणात आले, असं मत त्यांनी व्यक्त केलं आ...

Read More
  340 Hits

[Loksatta] सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - सुप्रिया सुळे

महिलांचा राजकीय वापर राजकारणात महिलांविषयी होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून हे गलिच्छ राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read More
  339 Hits

[Pudhari] महिलांविषयक सामाजिक परिवर्तनाची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन   सावित्रीबाईं फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या जन्मदिनी पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे होत आहे, त्यातून आत्मचिंतन होऊन महिलांविषयक सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  321 Hits

हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं, तर सुप्रिया सुळे यांना ‘ताई’ संबोधलं जातं. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी सुप्रियाताईंनी आपल्या भावाला म्हणजेच अजितदादांना राखी बांधली.  आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!! @AjitPawarSpeaks pic.twitter.com/cgFHqyRsKF — Supriya Sule (@supriya_sule) 7 August 2017सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावंडांसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन लिहिले आहे.हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

Read More
  334 Hits

वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, सुप्रिया सुळे जेटलींच्या भेटीला

आधार कार्डच्या आधारे ओळख पटवण्यात वृद्ध शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना ज्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध शेतकरी यांना पेन्शन काढताना, रेशन खरेदी करताना आधार व्हेरिफिकेशन होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शेतात वर्षानुवर्षे काम केल्यामुळे अनेकदा वृद्ध शेतकऱ्यांच्या हातावरच्या रेषा झडतात. या बोटांचे ठसे मशीनवर व्यवस्थित घेता येत नाहीत. त्यामुळे मुळात या व्यक्तींना आधार कार्ड बनवण्यातच अडचणी येतात. सध्या मोबाईल सिम कार्डशीही आधार लिंक करण्याचा सरकारचा आदेश आहे. शिवाय पगार, पेन्शन काढताना इतर सरकारी सबसिडी मिळवतानाही आधार कार्डचीच सक्ती आहे. त्यामुळे या लोकांना ही गरजेची कामं करताना अडचणी येत आहेत. रेशनकार्ड खरेदी करतानाही अनेक ठिकाणी पीओएस मशीनवर या लोकांच्या बायोमेट्रिक्सची ओळख नीट पटत नाही. या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी जेटलींकडे केली. शिवाय या व्यक्तींच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, याबाबत स्थायी उपाययोजना करेपर्यंत त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डशिवाय इतर कागदपत्रांना ग्राह्य धरण्यात यावं, अशीही विनंती त्यांनी केली.  वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, सुप्रिया सुळे जेटलींच्या भेटीला 

Read More
  266 Hits

कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिवाय पाशा पटेल यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, पारदर्शी मुख्यमंत्री राज्यातील माध्यमांना न्याय देतील असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कर्जमाफीबाबत सरकारवर ताशेरे ओढताना, आपल्याला कर्जतमध्ये एक तरुण भेटला, कर्जमाफीसाठी कागदे गोळा करायला त्याने 400 रुपये खर्च केले आणि त्याच्या 2 खात्यात केवळ 130 रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली, असं सांगत आपण हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असून, या सरकारने दिलेला शब्द पाळावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.  https://www.youtube.com/watch?v=XFGztIsLyzs  https://www.youtube.com/watch?v=pLsAqJEk9-0  कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

Read More
  259 Hits

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही : सुप्रिया सुळे

‘1 जानेवारीपर्यंत कोपर्डी घटनेचा निकाल न लागल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य राष्ट्रीवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. ‘कोपर्डी घटनेला दीड वर्ष होत आला मात्र अद्यापही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य करत हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. या प्रकरणाचा निकाल 1 वर्षाच्या आत लावला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, आतापर्यंत तरी याचा निकाल लागलेला नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोपर्डीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. त्यामुळे आता या खटल्याचा निकाल नेमका कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कारअहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्रीमुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले होते, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.” ...अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही : सुप्रिया सुळे  

Read More
  270 Hits

ओवाळीते भाऊराया...सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाऊबीज!

देशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आज भाऊबीज साजरी केली. भाऊबीजेचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर करुन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. "दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज...!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!!" असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकुलती एक कन्या आहेत. तर अजित पवार सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, पवार कुटुंब सगळे सण बारामतीमधील 'गोविंदबाग' या निवासस्थानी साजरे करतात. यंदा पवार कुटुंबाने दिवाळी बारामतीमध्ये एकत्र साजरी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या

Read More
  347 Hits

सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुप्रिया सुळेंनी टॅग केले आहे.कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंनी लिहिले आहे, "#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat. @ChDadaPatil" #Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat.@ChDadaPatil pic.twitter.com/IKUdOriSz5 — Supriya Sule (@supriya_sule) 1 November 2017अगदी काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी डेडलाईन जाहीर केली आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या डेडलाईनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंच्या या 'सेल्फी विथ खड्डे'ला महत्त्वं प्राप्त झालं आहे.दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या ट्वीटखाली आता राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणचे लोक खड्ड्यांसोबतचे फोटो शेअर करत असून, व्यथाही मांडत आहेत.आता खड्ड्यांविरोधातील हा ऑनलाईन आवाज तरी चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहेचेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळेंचा 'सेल्फी विथ खड्डा' 

Read More
  281 Hits

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र "भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना द्या, चांगला हमीभाव द्या. जाहिरातबाजीवरच्या खर्चातला निधी जर गरीब माणसाला दिलात, तर तुम्हाला दोन चांगले आशीर्वाद मिळतील.", असे खासदार सुप्रिया सुळेंनी हात जोडून भाजप-शिवसेनेला म्हटले. शिवसेनेचा भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे का? "भाजप आणि शिवसेना एका सरकारमध्ये काम करतात. काल शिवसेनेने 'घोटाळेबाज भाजप!' नावाची एक पुस्तिका काढली आहे. जर एवढे घोटाळेबाज भाजप असेल, मग शिवसेनेची क्रेडिबिलिटी काय? तुम्ही करप्शनला सपोर्ट करता? हा प्रश्न मला शिवसेनेला विचारायचा आहे. तुम्ही सत्तेसाठी इतके स्वत:ला कॉम्प्रमाईज करता? तुम्ही भ्रष्टाचारालापण सपोर्ट करता?", अशा प्रश्नांची सरबत्ती सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केली. सेनेच्या खोट्या डरकाळ्या! "खोट्या डरकाळ्या फोडून सरकारमध्ये राहण्याचं शिवसेनेचं प्रेम कमी होत नाही. शिवसेनेला सर्वसामान्य गरीब माणसाचं प्रेम नाही, हे त्यांच्या सगळ्याच कृतीतून दिसतंय. भाजप जर घोटाळेबाज असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं.", असा घणाघातही सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केला. सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे : - खड्ड्यांबाबत चंद्रकांतदादांच्या 18 डिसेंबरच्या डेडलाईनचं स्वागत - सुप्रिया सुळे- सरकार जाहिराती उत्तम करतंय, अतिशय सुंदर - सुप्रिया सुळे- सरकार किती सफाईने खोटं बोलतं, याची खरंतर दाद दिली पाहिजे - सुप्रिया सुळे- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे राज्य सरकारने कर्जमाफी केली - सुप्रिया सुळे- सरकारमध्ये कुणीही गंभीर नसल्यासारखं वाटू लागलंय - सुप्रिया सुळे- निवडणूक जिंकणं, ही एक गोष्ट आणि प्रशासनात काम करणं, ही वेगळी गोष्ट - सुप्रिया सुळे- सरकारला डायलॉग करायचा नाही, हे सातत्याने दिसतंय - सुप्रिया सुळे- एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आम्ही कायम उभे राहणार - सुप्रिया सुळे- 'घोटाळेबाज भाजप' पुस्तिका काढूनही शिवसेना सत्तेत का? शिवसेना भ्रष्टाचाराला सपोर्ट करते का? - सुप्रिया सुळे- पवारसाहेबांचे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध - सुप्रिया सुळे- फेरीवाल्यांच्याही पोटा-पाण्याचा प्रश्न आहे, तेही गरीब आहेत, मारहाण करुन प्रश्न सुटणार नाहीत - सुप्रिया सुळे- भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती, कामं करा, जाहिरताबाजीने काही होणार नाही - सुप्रिया सुळे VIDEO : सुप्रिया सुळेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://www.youtube.com/watch?v=C_A59H_cBXo भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे 

Read More
  268 Hits

गिरीश बापट वास्तवाची जाण असणारा नेता: सुप्रिया सुळे

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या इंदापुरात बोलत होत्या. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी पुण्यात केलं होतं. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते”. गिरीश बापट काय म्हणाले होते?वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या.पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या, असं गिरीश बापट म्हणाले होते. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. त्यावेळी बापट बोलत होते. डाळिंब उत्पादकांनी काही मागण्या गिरीश बापटांकडे केल्या होत्या. त्यावर बोलण्याच्या ओघात बापटांनी पुढील सरकार बद्दल हे वक्तव्य केलं.  https://www.youtube.com/watch?v=xcYmbnfgj8I

Read More
  317 Hits

आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन

आजची स्त्री घराच्या रुढ चौकटीतून बाहेर पडली आहे. आता तिचा वावर जवळपास सर्वच क्षेत्रात आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते. स्वतःच्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी ती सक्षम आहे. अर्थात अजूनही त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अशा एकट्या महिलांची आपण जेंव्हा चर्चा करतो तेंव्हा मला माझ्या आजीची आवर्जून आठवण येते. आई खुप लहान असतानाच माझे आजोबा सदुभाऊ शिंदे यांचे निधन झाले. त्यावेळी माझी आजी निर्मला शिंदे यांचे वय केवळ सत्तावीस वर्षांचं होतं. या संकटाला आजी मोठ्या धीराने सामोरी गेली. आजोबांच्या पश्चात तिनं सगळ्या मुलांचं संगोपन मोठ्या हिंमतीनं केलं. माझ्या आजीचं हे एकटीनं सर्व काही सांभाळणं म्हणजे नेमकं काय होतं त्याची कल्पना लहान वयात मला आली नाही, पण जसजसं जाणीवेच्या कक्षा रुंदावत गेल्या तसतशी मला ते उलगडत गेलं. आजीबद्दलचा माझा आदर अधिकच वाढला. कळत्या वयात मी विचार करायचे की, आजीला कधी एकटेपणा जाणवला असेल का ? हक्कानं मनातलं सगळं काही रिकामं करावं असा माणूस तिच्या आयुष्यातून तर केंव्हाच निघून गेला होता. अशा वेळी तिनं कितीदा तरी स्वतःशीच संवाद साधला असेल. स्वतःलाच तिनं जीवन जगण्यासाठी खंबीर केलं असेल. पुढे मी जेंव्हा सामाजीक जीवनात प्रवेश केला तेंव्हा अशा अनेक एकाकी महिलांशी माझा संपर्क आला. यशस्विनी, जागर, उमेद अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात मला थोडी का होईना अशा फुलविता आली, याचे समाधान आहे. मात्र ते पुरेसे नाही याची जाणीवही आहे. त्यांचा संघर्ष, जगण्याची धडपड या सर्वांशी मी जोडली गेली. त्या सर्वांमध्ये मी माझ्या आजीचा जीवनसंघर्ष पाहत असते. आजीच्या जीवनसंघर्षात एक अदृश्य पोकळी आहे, असं मला नेहमी वाटतं. ती पोकळी तिनं कुठंच कधीच शेअर केली नसली तरीही… हीच पोकळी मला भेटायला येणाऱ्या एकल महिलांमध्ये जाणवते. कदाचित तीच त्यांना माझ्याशी घट्टपणे जोडणारा, किंबहुना माझ्यासाठी; मला तो धागा माझ्या दिवंगत आजीशी जोडतो. त्यांच्या एकटेपणाच्या वाळवंटात प्रेमासारख्या भावनेचं ओअसीस फुलायला हवं असं मला वाटतं म्हणूनच एकल महिलांविषयी लिहिण्यासाठी मी जाणीवपूर्वक १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निवडला आहे. हा दिवस प्रेमाचा संदेश देणारे युरोपातील संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. तत्कालिन रोमन सम्राटाचा आदेश झुगारुन संत व्हॅलेंटाईन यांनी सर्वदूर प्रेमाचा संदेश रुजविला (भारतीय समाजात आज विविध समाज घटकात हा प्रेमाचा संदेश देण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे. कारण द्वेषाला, सूडाला बळ देणाऱ्या शक्ती प्रबळ होताना आपण रोजच अनुभवतो आहोत. ). त्यासाठी त्यांनी मरणही पत्करले. प्रेमासाठी मरण पत्करणारा हा संत म्हणूनच पुढच्या पिढ्यांसाठी प्रेमाचा संदेश देणारा देवदूत ठरला. प्रेम ही माणसाची अतिशय तरल भावना. ही भावना सर्वांसाठी आणि सर्वसमावेशक अशीच… म्हणूनच तिचे वेगळेपण नजरेत भरणारे ठरते. व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने एकल महिलांचा मी विचार करते तेंव्हा माझ्यासमोर परीत्यक्ता, विधवा आणि इतर काही कारणांमुळे एकट्या राहिलेल्या महिलांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. या महिला मानसिकदृष्ट्या कणखर जरी असल्या तरी अचानक आलेल्या संकटाने सुरुवातीच्या काळात कांहीशा बावरुन गेलेल्या असतात. पण संकटांचा सामना करण्याची जिद्द त्यांच्यात असते. क्वचितच एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या कोलमडून पडलेली तुम्हाला आढळेल. हजारो संकटांचा सामना करुन त्या संकटांना परतावून लावतात. संकटांशी झुंजताना त्या अनेकदा माझ्याकडे खंत व्यक्त करतात ती म्हणजे जिथं आपण व्यक्त होऊ अशी एक जवळची व्यक्ती असायला हवी होती. मला वाटतं, आयुष्याशी दोन हात करणाऱ्या या शूर महिलांसाठी आपण सर्वांनीच व्हॅलेंटाईन म्हणून उभे ठाकले पाहिजे. त्यांच्या मनात एकाकीपणाची भावना रुजू नये. त्यांच्या संघर्षाला सतत बळ मिळावं. त्यांना यश मिळावं म्हणून त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्यासोबत रहायला हवं. याची सुरुवात अर्थातच घरातूनच व्हायला हवी. आई-वडील, भाऊ-बहीणी आणि इतर नातेवाईकांनी त्यांचे हे एकटेपण स्वीकारावं. त्यांना माणूस म्हणून त्यांची स्पेस जपू द्यावी. ही स्पेस त्यांच्यासाठी स्वतःशी हितगूज करण्यासाठी आवश्यक असते. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आपण त्यांना ही भेट तर नक्कीच देऊ शकू, नाही का ? कारण आदरणीय कविवर्य कुसूमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे, “प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्षआणि भविष्यकालातील अभ्युदयाची आशा एकमेव “म्हणून हा आशेचा दीप तेवत ठेवूया…!-सुप्रिया सुळे, खासदार  

Read More
  492 Hits

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या: सुप्रिया सुळे

स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली. Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule were the pioneers of Girl child education. Requested the government to bestow them posthumously 'Bharat Ratna' in the Parliament under Rule 377. — Supriya Sule (@supriya_sule) 5 March 2018“महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी संसदेत केली”, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं.फुले दाम्पत्याने शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात अजोड कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.सुप्रिया सुळे यांनी पुढचं पाऊल टाकत ही मागणी थेट लोकसभेत केली. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या प्रस्तावावर केंद्र सरकार नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर भारतरत्न कोणालाही जाहीर झालेला नाही.http://polldaddy.com/poll/9952946/आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी :पुरस्कारार्थीचे नाव                                         वर्ष1. चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972)   19542. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 ) 19543. डॉ. सी.व्ही. रमण (188-1970) 19544. डॉ. भगवान दास (1869 – 1958) 19545. डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 ) 19556. पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 ) 19557. पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 ) 19578. डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 ) 19589. डॉ. बी. सी. रॉय (1882 - 1962 ) 196110. पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 ) 196111. डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963) 196212. डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 ) 196313. डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 ) 196314. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 ) 196615. इंदिरा गांधी (1817 - 1984 ) 197116. व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 ) 197517. के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 ) 197618. मदर टेरेसा (1910 - 1997 ) 198019. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 ) 198320. खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 ) 198721. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 ) 198822. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 ) 199023. डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 ) 199024. राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 ) 199125. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 ) 199126. मोरारजी देसाई (1896 - 1995 ) 199127. मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958) 199228. जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 ) 199229. सत्यजीत रे (1922 - 1992 ) 199230. गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 ) 199731. श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 ) 199732. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931) 199733. श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 ) 199834. सी. सब्रमण्यम (1910 - 2000 ) 199835. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 ) 199936. प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 ) 199937. लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 ) 199938. पंडीत रवी शंकर (1920 - 2012 ) 199939. लता मंगेशकर (जन्म 1929 ) 200140. उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 ) 200141. पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 ) 200942. प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 ) 201443. सचिन तेंडुलकर ( जन्म 1973 ) 201444. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) (1861 - 1946) 201545. अटलबिहारी वाजपेयी ( जन्म 25 डिसेंबर 1924 ) 2015 ABP Maza :महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या: सुप्रिया सुळे

Read More
  320 Hits

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे

महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी संसदेत केल्याची माहिती सुळे यांनी ट्विटद्वारे दिली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळं त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत ही मागणी केली आहे. Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule were the pioneers of Girl child education. Requested the government to bestow them posthumously 'Bharat Ratna' in the Parliament under Rule 377. — Supriya Sule (@supriya_sule) 5 March 2018महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे 

Read More
  256 Hits