सगळ्यांना आत टाका, आम्ही मराठे घाबरत नाही : सुप्रिया सुळे

सगळ्यांना आत टाका, आम्ही मराठे घाबरत नाही : सुप्रिया सुळे

सगळ्यांना तुरुंगात टाकलं तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही मराठे आहोत, कधीच डगमगत नाही, असं आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलं आहे. भुजबळांपाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे तुरुंगात जातील, असं विधान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली होतं. त्यानंतर 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुळे यांनी ही भावना व्यक्ती केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "किरीट सोमय्या टीका करतात आणि प्रसारमाध्यमं त्यांची वक्तव्य उचलून धरतात. पण टीका करणारी व्यक्तीही भारदस्त असायला हवी. आम्ही प्रसारमाध्यमांशी सुसंवाद ठेवतो याचा अर्थ त्यांनी आम्हाला 'पप्पू' समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड आदर आहे."  'आम्ही मराठे घाबरत नाही''आम्हाल तुरुंगात डांबलं तरी घाबरणार नाही, मराठे आहोत, डगमगत नाही, शांत बसणार नाही आमचा आवाजही कोणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली की नाही हे नंतर स्पष्ट होईल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ आणि समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.

Read More
  255 Hits

'जगाला नैतिकता शिकवता, मग पांडेवर कारवाई का नाही'

'जगाला नैतिकता शिकवता, मग पांडेवर कारवाई का नाही'

भाजयुमोत काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेवर दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यास भाजपची टाळाटाळ सुरु आहे. त्यामुळे एरवी नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपनं गणेश पांडेला पाठिशी घालावं हे दुर्दैव असल्याची बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर आमच्या पक्षात पांडे असता तर त्याचं आम्ही काय केलं असतं याचा तुम्ही विचारही करु शकत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपला खडे बोल सुनावलेत. त्या आज पुण्यात बोलत होत्या. दुसरीकडे शिवसेनेनंही गणेश पांडेची हकालपट्टी पुरेशी नसल्याचं म्हणत भाजपवर शरसंधान साधलं. इतकंच नव्हे तर याआधीही पांडेनं इतर महिलांशी असंच वर्तन केल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं पांडेवर तातडीनं पोलीसात गुन्हा दाखल करा अशी मागणी नीलम गोऱ्हेंनी केली. पांडेनं मथुरेत झालेल्या भाजयुमोच्या परिषदेवेळी महिला कार्यकर्तीशी अश्लील आणि असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला होता.  

Read More
  279 Hits

मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्रिया सुळे

मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्रिया सुळे

दुष्काळाची भीषणता बघून राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आजपासून दोन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर ड्रिप इरिगेशनला पर्याय नाही. त्यामुळे ऊस बंद करणं हा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असलं पाहिजे, त्यामुळे दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याबाबत विचार करा, असंही सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या दुष्काळाला ऊस आणि कारखाने जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढायला मी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नाही, अशी खोचक टिपणी शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

Read More
  241 Hits

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली. बलात्कार होऊन तीन दिवस लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणा का दिरंगाई करतात, असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला अभिमान  होता, पण नगरच्या घटनेत पोलिसांनी २ दिवस माहिती बाहेर येऊ नाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावायला एवढा उशीर का केला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभेत पडसाददरम्यान राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत. कारण, विरोधक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत. काल इतर विषय बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र त्याला विधानसभाध्यक्षांनी नकार दिल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केला आहे. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read More
  308 Hits

नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा-वसावसा भांडतात, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.  त्या पुण्यातील मावळ येथील महिला मेळव्यात बोलत होत्या. "हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्यांचा पारा नेहमीच चढलेला असतो आणि वसावसा, वसावसा नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतो. आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिलेत, पण इतका चिडका बिब्बा पाहिला नाही. मुख्यमंत्री आमच्यापेक्षा फारकाही लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद हे खूप मोठ आणि त्यात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे खूपच मोठं आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा मान राखावा", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांना गुस्सा क्यूं आता है असं नव्हे तर इनको गुस्साही आता है, असंच म्हणावं लागेल, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली. तसंच कधी त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावं, काय माहित कधी चिडलेले असताना काही फेकून मारतील, असं म्हणत सुप्रियांनी निशाणा साधला.  https://www.youtube.com/watch?v=w7g4ef6bM60&feature=youtu.be  

Read More
  359 Hits

कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा....

कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा....

कोपर्डी बलात्कार प्रकरणात जर येत्या दोन दिवसात चार्जशीट दाखल झालं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आज त्या नाशिकमध्ये बोलत होत्या. कोपर्डीप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र आज कोपर्डी घटनेला 84 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाही. नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते. कपिलची दखल, शेतकऱ्यांची नाहीमुख्यमंत्री कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या तक्रारीची दखल घेतात, पण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. मुख्यमंत्रीको गुस्सा क्यूं आता हैमुख्यमंत्री को गुस्सा क्यूं आता है, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना काम झेपत नसेल तर राजीनामा द्या, पुन्हा विरोधी पक्षनेते व्हा आणि खुशाल भाषण ठोका, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवसेनेला टोलायावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेलाही  टोला लगावला. तुम्हालापण लेकी सुना आहेत,स्वाभिमानी महिलांचा स्वाभिमान दुखावू नका, असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला.

Read More
  290 Hits

...तर दस नंबरी नागीण स्वभाव दाखवेल : सुप्रिया सुळे

...तर दस नंबरी नागीण स्वभाव दाखवेल : सुप्रिया सुळे

"महिलांच्या नादाला लागू नका, अन्यथा ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असे जळजळीत उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. त्या जळगावमध्ये बोलत होत्या. "भाजप सुडाचे राजकारण करत आहे. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, अशा धमक्या मुख्यमंत्री देत आहेत. मात्र कोणतीही महिला तिच्या गळ्यापर्यंत आल्याशिवाय आवाज काढत नाही. कोणी जर तिला दंश करण्याचा प्रयत्न केला, तर ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आस्मान दाखवण्याची भाषा केल्यानंतर, गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत. सातत्यानं त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हं आहेत.

Read More
  309 Hits

सुप्रिया, राहुलसह 28 खासदारांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार

सुप्रिया, राहुलसह 28 खासदारांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची इत्यंभूत माहिती 28 खासदारांनी देण्यात येणार आहे. या 28 जणांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे. परराष्ट्र सचिव आणि डीजीएमओ दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीला माहिती देतील. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह 28 खासदारांचा समावेश आहे. लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) हे खासदारांना सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती देतील. संसदीय समितीला अशी माहिती देण्यास सरकारने आधी नकार दिला होता. उरी हल्ल्याच्या बदल्यावरुन देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक रणकंदन सुरु झालं होतं. मोदी सरकार जवानांच्या बलिदानाची दलाली करत असल्याचं विधान खुद्द राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे या कारवाईची गरज आणि त्यानंतर त्याच्या प्रसिद्धीची गरज का होती? हे सरकारतर्फे विषद केलं जाईल भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला होता. मात्र अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्ट्राईकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

Read More
  257 Hits

शरद पवारांचा वारस काळच ठरवेल : सुप्रिया सुळे

यशवंतराव चव्हाण साहेबांनी शरद पवारांना मानसपुत्र मानलं होतं, मात्र त्यांचा वारसा कोण चालवेल हे काळच ठरवेल, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या आज पुण्यात बोलत होत्या. पवारांच्या संसदीय कार्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय शालेय निबंध आणि महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा अजित पवार सांभाळणार की सुप्रिया सुळे या प्रश्नावर आजवर पवार कुटुंबातील कुणीही कधीही जाहीर भाष्य केलं नव्हतं. मात्र आज सुप्रियाताईंनी शरद पवारांचा वारस काळ ठरवेल असं म्हटल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारच्या महिला सुरक्षा, कुपोषण, शेतकरी आत्महत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं.  https://www.youtube.com/watch?v=sCCIZE1Fb9U  

Read More
  298 Hits

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे

एकीकडे  भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, 'यालाच पार्टी विथ डिफ्रन्स' म्हणायचं का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला विचारला. युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? भाजपला नेमकी कोणती पारदर्शकता हवी आहे, या प्रश्नांची उत्तरं भाजपनं द्यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. "आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढतो. मी मुंबईत राहते, रस्ते, पाणी या समस्या आहेत. मी स्वतः "कन्फ्युज" आहे, कारण मनपा मधला रस्ते घोटाळा हा भाजपने काढला, भाजप म्हणतं आम्हाला पारदर्शी कारभार हवा, मग रस्ते घोटाळ्याचे काय झालं? त्याचा थेट आरोप शिवसेनेवर आहे, मग आता यांच्यात युती होणार असेल तर सर्व भ्रष्ट लोकं एकत्र येत आहेत", असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजप नेत्यांनीच बाहेर काढला. आता तीच भाजपा शिवसेनेशी युती करत आहे, असं सुप्रिया म्हणाल्या. शिवसेना आणि मुंबई पालिकेच्या कारभारावर भाजप आरोप करते. मग आता हेच त्यांचं पार्टी विथ डिफ्रन्स आहे का? आधी आरोप करायचे आणि मग युती करायची हेच पार्टी विथ डिफ्रन्स आहे का असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. शिवसेना, मनसे आता मॉर्डन होत आहे. पूर्वी व्हॅलेंटाईन डेला ते विरोध करायचे, आता ते सेलिब्रेट करत आहेत. त्यांच्या नेत्यांची मुलंच इंग्रजी माध्यमांतील शाळांत शिकत आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला.

Read More
  271 Hits

संसदेतच वाय-फाय चालत नाही, देश कसा डिजिटल होणार?: सुप्रिया सुळे

संसदेतच वाय-फाय चालत नाही, देश कसा डिजिटल होणार?: सुप्रिया सुळे

'बोलायचं एक आणि करायचं दुसरं, म्हणजेच 'पार्टी विथ डिफरन्स'... आज स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे कार्यक्रम भाजपनं सुरु केले आहेत. डिजिटल इंडिया सोडा, पण संसदेतच वाय-फाय चालत नाही तर देश कसा डिजिटल होईल.' असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्या आज पिंपरीमध्ये बोलत होत्या. पिंपरी-चिंचवडीमधील एका सभेत बोलताना आज सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'मोदी यांना दुसऱ्या कुणाचं ऐकूच येत नाही. त्यांना फक्त स्वत:चंच ऐकू येतं.' असं म्हणत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला. 'संसदेतच वाय-फाय चालत नाही, तर देश कसा डिजिटल करणार?''संसदेत सुरक्षेच्या कारणास्तव मोबाइल चालीत नाही हे मान्य. पण वाय-फाय देखील चालत नाही? ज्या संसदेत 800 लोकं काम करतात तिथे जर वायफाय चालत नसेल तर देश कसा डिजिटल होईल? बहुतेक त्यांनी जियोला कंत्राट दिलेलं नसेल' अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी केली. 'मागच्या 20 वर्षात मुंबईत सर्वाधिक बकाल झाली''सरकार तुमचेच आहे, मग मुंबई मनपात माफिया राज कसे काय चालू आहे?  एका बाजूला शिवसेनेला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसर्‍या बाजूला त्यांनाच घेऊन सरकार चालवायचे. असा दुटप्पी सुरु आहे. मुंबई मागच्या २० वर्षात जेवढी बकाल झाली. तेवढी ती कधीच झाली नव्हती.' असं म्हणत शिवसेना-भाजप मुंबईच्या कारभावरही सुळेंनी टीका केली. 'सरकारचा जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च''भाजप-शिवसेना राज्यात सत्तेत आल्यापासून कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. हेच पैसे जर मुंबई मनपाच्या शिक्षणावर खर्च केले असते तर विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या असत्या.' असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला.

Read More
  254 Hits

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते : सुप्रिया सुळे

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते : सुप्रिया सुळे

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेच्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी एक्स्लुझिव्ह बातचीत केली. गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. मात्र मी माझा कट्टा पाहिला नाही. त्यामुळे त्याविषयी बोलणार नाही. परंतु मी फक्त माझी जन्मतारीख लक्षात ठेवते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपला पाठिंबा नाहीचशिवसेनेचे मंत्री राजीनामा 18 फेब्रुवारी रोजी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार अस्थिर होईल. त्यामुळे सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का याबाबत प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळेंनी आमचा भाजपला पाठिंबा नसल्याचं सांगितलं. शरद पवार दोन वर्षांपूर्वी पाठिंबा देण्याचं बोलले होते. त्यानंतर एकदाही बोलले नाहीत. आम्ही कोणाबरोबरही जाणार नसल्याचं पवार काही दिवसांपूर्वी बोलले होते, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. फालतू विचार करण्यासाठी वेळ नाहीसरकारच्या विरोधात कोणते मुद्दे असल्याचं तुम्हाला वाटतं, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी याबाबत फारसा विचार केलेला नाही. फालतू विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो. मी लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहे." फडणवीस सरकारचा कारभार घाणेरडाअडीच वर्षातील फडणवीस सरकारचा सर्वात घाणेरडा कारभार असल्याचा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी केला. सत्ता स्थापनेपासूनच हे घाणेरडं सरकार आहे. महाराष्ट्राचा नंबर वन घसरला. सत्तेतील दोन पक्षात मोठं भांडण सुरु आहे. 25 वर्ष युतीमध्ये होते. 25 वर्षांनंतर दोनच वर्ष सत्तेत आले. सत्तेत सोबत असूनही भांडण एवढं टोकाला पोहोचलं आहे की, ते एकमेकांचं पाणी काढत आहेत. ही मराठी संस्कृती नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पवारांना विरोध ही खेकडा प्रवृत्तीशरद पवारांना पद्मविभूषण हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. पवारांनी हा पुरस्कार राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. पण शरद पवारांना विरोध ही खेकडा प्रवृती आहे. महाराष्ट्रातील काही जणांना पवारांना विरोध करण्याची सवय आहे, असंही सुळे म्हणाल्या.

Read More
  268 Hits

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

'शेतात पिकवलेला कांदा शेतकऱ्याला जाळावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते?' असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. मनमाड तालुक्यातील अंदरसुल इथं त्यांची सभा झाली. त्याआधी त्यांनी नगरसूलमध्ये एका शेतकऱ्याची भेट घेतली. कांद्याला भाव नसल्यानं कृष्णा डोंगरे यांनी 5 एकर शेतातला कांदा जाळला होता. नांदगावमध्ये शेतकऱ्याने जाळलेला कांदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना भेट देणार आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याने काल आपल्या 5 एकर शेतातील कांदा जाळला होता. सुप्रिया सुळे येवल्यात आल्या असता त्यांनी नगरसूल येथे जाऊन कृष्णा डोंगरे यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी त्यांनी जळालेला कांदाही त्यांनी सोबत घेतला. ‘यूपीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का नाही?’ असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. ‘आम्ही राजीनामा देऊ, आम्ही राजीनामा देऊ, हे म्हणजे लांडगा आला रे आला यासारखं झालं आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाघ राहिलेला नाही. त्यांचं आत मांजर झालं आहे. दोन कोंबडे भांडतात तसे उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे रोज भांडतात.’ अशी जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी केली.  शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

Read More
  268 Hits

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर 'मातोश्री'ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेंनी आमच्यासारखं एकट्यानं फिरुन दाखवावं’‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले गेले आहेत, जाऊन भांडी घासा.’ पोलिसांबद्दल एक शब्द जरी काढला तर गाठ आमच्याशी आहे. उद्धव ठाकरे जर खरच वाघ असतील तर ‘मातोश्री’चे सर्व पोलीस काढा, मी आणि विद्याताई जसे एकटं फिरतो तसं महाराष्ट्रात फिरून दाखवा. उद्धव एका पोलिसाशिवाय बाहेर जात नाही. त्यांना 40 पोलीस लागतात आणि त्याच पोलिसांना नाव ठेवता? मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला ताकीद देते पोलिसांना काय बोलतात तर याद राखा.’ अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री रोज गुंडांच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात’उद्धव ठाकरेंसोबतच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान साधलं. ‘रोज गुंडाच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात. मुख्यमंत्र्याना लाज वाटली पाहिजे. पुण्यात एक मशीन आणलं आहे मुख्यमंत्र्यांनी, इकडून गुंड घातला कि मुख्यमंत्री गृहखात्याची पावडर टाकतात. मग बाहेर येतो एक सुसंस्कृत माणूस. आमच्या पुण्यात एक शेलार आहे. मुख्यमंत्र्यांनी विचारले, काय करतोस रे बाबा? तो बोलला ‘तडीपार आहे, पाच खून केले आहेत’, मुख्यमंत्री म्हणतात, ‘ये रे बाबा, मशीनमध्ये टाकलं गृहखात्याची पावडर टाकली आणि बाहेर आले माननीय शेलार, मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढला झालं. अशी जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.’ ‘ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात, ही काय संस्कृती आहे?’‘सिरीयलवाले कमी भांडतात पण हे शिवसेना-भाजप त्यांच्यापेक्षा जास्त भांडतात. उद्धव ठाकरे म्हणतात, फडणवीसांच्या डोक्यात खड्डे झाले आहेत. तर मुख्यमंत्री म्हणतात. ‘खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे कळत नाही?’ तर दुसरीकडे ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात. ही काय संस्कृती आहे का?’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेना-भाजपवर टीका केली. ‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

Read More
  264 Hits

वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील सभेसाठी सुप्रिया सुळेंची बुलेट स्वारी

https://www.youtube.com/watch?v=2m6S1hCxHkc

Read More
  252 Hits

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधणी कमी”मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवाय, "बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही. मात्र, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हाही प्रश्न आहे.", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, त्यांनी शिवसेना, भाजपच्या मुंबईतील कारभारावरही टीका केली. “…म्हणून भाषणात ‘नागिण’ संबोधलं”कुंडल्यांसदर्भातील मुंख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारल्यास, त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं. मुख्यमंत्री माझी कुंडली काढणार असतील, तर मी नाही ऐकून घेणार "  “2019 पूर्वीच राज्याची निवडणूक येऊ शकते”"शिवसेना-भाजपच्या भांडणात महाराष्ट्राचं नुकसान झालं. यांचं जनतेकडे लक्ष नाही. राज्य सरकारची निवडणूक 2019 च्या आधीही येऊ शकते. या सरकारने विश्वासार्हता गमावलीय, 2 वर्षांच्या आतच 1 विकेट (खडसे) पडली.", असे म्हणत मध्यवधी निवडणुकांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी मत मांडलं. "होय, आमच्या घरात घराणेशाही""होय, आमच्या घरात घराणेशाही आहे. मात्र, आम्ही लोकांमधून निवडून आलोय. घराणेशाहीमुळे तुम्ही एखाद्या वेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतंच", असे सुप्रिया सुळेंनी घराणेशाहीबाबत बोलताना सांगितले. मात्र, माझ्या आणि दादाच्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत आघाडीशी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आम्ही एका ताटात जेवलो आहे, त्यामुळे त्यांच्यावर करणार टीका नाही, असे सुप्रिया सुळे काँग्रेसबद्दल म्हणाल्या. शिवाय, राहुल गांधी अतिशय चांगला सहकारी ही माझी भूमिका आहे, असेही त्यांनी न विसरता सांगितले. खासदार सुप्रिया सुळेंचे ‘माझा कट्टा’वरील महत्त्वाचे मुद्दे :  जेंडरमध्ये पद अडकू नये, मुख्यमंत्री पुरुष असावा की स्त्री, त्याने योग्य काम करावं – सुप्रिया सुळे  माझ्या आणि दादाच्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी आमची इच्छा आहे – सुप्रिया सुळे  घराणेशाहीमुळे तुम्ही एखादेवेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतंच- सुप्रिया सुळे  माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 पट इमोशनल - सुप्रिया सुळे  पवार कुटुंबावर टीका केल्याने आमचं काही नुकसान होत नाही - सुप्रिया सुळे  आर. आर. पाटील यांची आठवण येते - सुप्रिया सुळे  टीव्ही, ट्विटरमुळे सर्व रेकॉर्ड राहतं,मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द पाळावेत - सुप्रिया  मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधण्यास कमी पडलो - सुप्रिया सुळे  बाळासाहेबांनी चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही - सुप्रिया सुळे  महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांमध्ये बाळासाहेबांचा नंबर, ते दिलदार होते - सुप्रिया सुळे  शिवसेनेने 25 वर्षात मुंबईत काय काम केलं? लक्षात राहील असं एकही काम दाखवू शकणार नाहीत - सुप्रिया सुळे  शिवसेनेचा हेवा वाटत नाही, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हा प्रश्न आहे - सुप्रिया सुळे  आऊट गोईंगची काळजी वाटत नाहीत, प्रत्येक संघटनेत चढ-उतार येतोच - सुप्रिया सुळे  1978 ला पवारसाहेबांनी 50 आमदार निवडून आणले,त्यापैकी 45 जण सोडून गेले, आज त्यांचं अस्तित्व काय?- सुप्रिया सुळे  जे पक्ष सोडून गेलेत त्यांना शुभेच्छा, ते का सोडून गेले हे मला माहीत नाही - सुप्रिया सुळे  मुख्यमंत्री आधी करप्ट पार्टी म्हणाले, आता कन्फ्युजन म्हणतायेत, मग खरं कन्फ्युज कोण हे दिसतंय - सुप्रिया सुळे  माझा भाऊ चुकतोय असं मला वाटत नाही - सुप्रिया सुळे  शरद पवारांच्या भाषणांना वैचारीक बैठक, काँग्रेस-राष्ट्रवादीची भाषणं पूर्णत: वेगळी - सुप्रिया सुळे  बाळासाहेबांची भाषणाची वेगळी स्टाईल होती, महाराष्ट्राने ती स्वीकारली होती - सुप्रिया सुळे  आता मुंबई केंद्रीत प्रश्न झालेत, राज्याच्या प्रश्नांकडे तितकंस लक्ष दिलं जात नाही - सुप्रिया सुळे  मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं- सुप्रिया सुळे  सत्ता असो की नसो, लोकप्रतिनीधी म्हणून काम करताना जनतेचं हित महत्त्वाचं - सुप्रिया सुळे  स्वाभिमानी संघटनेने रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं होतं, आता शेतमालाला भाव नाही मग कुठे आहेत?- सुप्रिया सुळे  मुख्यमंत्री विरोधी पक्षात होते तेव्हा एक बोलायचे आणि आता दुसरंच बोलतायेत - सुप्रिया सुळे  बाबा बोडके या गुंडाला आम्ही प्रवेश दिला होता, मात्र दीड तासात तो रद्द केला - सुप्रिया सुळे  नोटाबंदी, कांद्याला भाव नाही, कापूस-सोयाबीनला दर नाही, हे सरकारचं अपयश- सुप्रिया सुळे  अडीच वर्षांनी मी भाजपला विचारतेय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? - सुप्रिया सुळे ht  शिवसेना-भाजपच्या भांडणात महाराष्ट्राचं नुकसान, यांचं जनतेकडे लक्ष नाही - सुप्रिया सुळे  राज्य सरकारची निवडणूक 2019च्या आधीही येऊ शकते - सुप्रिया सुळे  या सरकारने विश्वासार्हता गमावलीय, 2 वर्षांच्या आतच 1 विकेट (खडसे)पडली - सुप्रिया सुळे  या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर...

Read More
  249 Hits

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. नागपूर आमदार निवासातील सामुहिक बलात्कारप्रकरणावरुनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''मुख्यमंत्री नागपुरचा असताना आमदार निवासात बलात्कार होतात, ही दुर्दैवी घटना आहे.'' तसेच कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात,'' अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच शिवसेनेचाही सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. आपण सत्तेत आहोत कि विरोधात आहोत, याचंच त्यांना भान राहात नाही, अशी टीका सुळे यांनी यावेळी केली. शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका 

Read More
  278 Hits

फुरसुंगीची कचराकोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले

फुरसुंगीची कचराकोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले

पुण्याला कचऱ्यामध्ये सोडून परदेश दौऱ्यावर गेलेल्या महापौर मुक्ता टिळक अखेर पुण्यात दाखल झाल्या आहेत. पुण्यातील कचराकोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या आंदोलकांसोबक बिबवेवाडीत मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पालिकेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दुपारी होणाऱ्या बैठकीत तरी पुण्याची कचराकोंडी सुटते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. फुरसुंगी आणि उरळी देवाची मधील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्याचं निवेदन त्यांनी दिलं होतं. पुण्यातल्या कचऱ्याला आता राजकीय दुर्गंधीही येऊ लागली आहे. फुरसुंगीचा प्रश्न सुटला नाही, तर राजीनामा देईन, असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला होता. येत्या 15 दिवसात तोडगा निघाला नाही, तर स्वत: फुरसुंगीकरांसोबत आंदोलनाला बसेन असंही शिवतारे म्हणाले होते. काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न? पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे. इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो. त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे.

Read More
  346 Hits

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘देशातील वातावरण सध्या बरंच गढूळ झालं आहे. कारण की, कुणी काय खायचं, काय घालायचं यावर बंधन येणं चुकीचं आहे. नागपूरमध्ये त्यादिवशी झालेल्या घटनेनं मला खूप त्रास झाला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणं हे चुकीचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हावं: सुप्रिया सुळे ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे पण आता त्याचं पुरोगामित्व अधोरेखित होण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वच खासदार नेहमीच ऐकी दाखवतात. महाराष्ट्र दिल्लीत आपला ठसा कायमच उमटवत आला आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. ‘स्वच्छता मोहीमेची सुरुवात 17 वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांनी सुरु केली’ ‘पंतप्रधान मोदींनी आता जरी स्वच्छेतेची मोहीम हाती घेतली असली तरी या मोहीमेची सुरुवात 17 वर्षांपूर्वीच आर. आर. पाटील यांनी केली होती.’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी स्वच्छता मोहीम राष्ट्रवादी काँग्रेसनच सुरु केल्याचं ठासून सांगितलं. राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन आई-वडील आणि सासू-सासरे सोडून मला कोणाचीही भीती नाही : सुप्रिया सुळे महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हायल हवं : सुप्रिया सुळे ठिबक सिंचन आणि पाण्याच्या उपलब्धतेवर काम गरजेचं : सुप्रिया सुळे आत्महत्यामुक्त आणि कुपोषणमुक्त महाराष्ट्र व्हायला हवं : सुप्रिया सुळे शिक्षण क्षेत्रात भरीव काम होणं गरजेचं : सुप्रिया सुळे स्वच्छतेची सुरुवात दिल्लीतून नाही, तर 17 वर्षांपूर्वी आर आर पाटील यांनी सुरु केली : सुप्रिया सुळे व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

Read More
  248 Hits

हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं, तर सुप्रिया सुळे यांना ‘ताई’ संबोधलं जातं. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी सुप्रियाताईंनी आपल्या भावाला म्हणजेच अजितदादांना राखी बांधली.  आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!! @AjitPawarSpeaks pic.twitter.com/cgFHqyRsKF — Supriya Sule (@supriya_sule) 7 August 2017सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावंडांसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन लिहिले आहे.हे बंध रेशमाचे.... दादांना ताईंचं रक्षाबंधन!

Read More
  344 Hits